राजस्थानी खाद्यसंपदा

Submitted by प्राजक्ता on 19 April, 2012 - 10:37

मला माझ्या मुलिच्या रविवार शाळेतील पोर्जेक्ट साठी राजस्थानी खाद्यसंपदेवर माहिति हवि आहे, विशेषतः तिथल्या धान्य, खाद्यपंरपरा,विशेष सणवार आणि त्यायोगे केलेले वेगवेगळे शाकाहारी ,मासांहारी,गोड्,तिखट पदार्थ..कुणि इथे राजस्थानचे असेल तर तुमची घरची पाकक्रुती शेअर कराल का?फोटो देवु शकलात तर अजुनच छान!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे पारंपारिक दाल-बाटी, सुलेखांनी दिलेली केर-संगरीची भाजी अशा कृती आहेत आधीच.

मी मैत्रिणीला विचारुन एखाद्या सणवार स्पेशल पदार्था विषयी लिहिते संध्याकाळपर्यंत.

थॅक्स सिंडि!
जनरली राजस्थानी पदार्थ म्ह्नणजे दाल्-बाटी किंवा चुर्मा लाडु वैगरेच आठवतात म्हनुनच वेगळा धागा काढलाय त्यायोगे अजुन काही पदार्थांही ओळख होईल.

बित्तु! तिथे खाणपानावर अगदीच थोडि माहिती आहे, प्रसिद्ध मिठाईया अस नुसतच शिषर्क आहे किल्क केल्यावर काही माहिती येत नाहिये!

प्राजक्ता , "मालपुवा" विसरु नकोस. मारवाडी फॅमिलीची खासियत आहे ती. Happy
इथे रेसीपीज आहेत काही http://tarladalal.com/recipes-for-rajasthani-15

आणखी माहिती जरा विचारुन मग लिहिन .

तिथली अजुन एक पद्धत- धुळवड,दसरा व त्याच्या दुसर्‍या दिवशी [बासी दशेरा म्हणतात]दिवाळीच्या/लक्ष्मीपुजनाच्या दुसर्‍या दिवशी एकमेकांकडे भेटायला जातात.पुरुष एकमेकांची गळा भेट घेतात . "गले मिलना' म्हणतात त्याला.त्यावेळी पहिला "राम बोलो "तर दुसरा पहिल्याला "श्याम बोलो"
असे म्हणतात्.या गळाभेटीच्या वेळी खरे नांव घेत नाही..वैमनस्य असल्यास ते विसरुन नव्याने "दोस्ती" करण्याची ही प्रथा आहे.
गणगोर व तीज पुजण्याचा प्रघात आहे.सण कोणताही असो मेहंदी लावतातच्.लाखेचा चुडा भरतात्.मांग्-टिक्का तर हवाच.
राजस्थान बाहेर रहाणार्‍या लोकांसाठी कुठेही चार जातवाले एकत्र होणार असतील तर राजस्थानी भाषा बोलली पाहिजे व बायकांनी त्यांचा खास राजस्थानी ड्रेस च घातला पाहिजे .असा "फतवा"[नियम] काढल्याचे कळले आहे.

मिरची वडा ही सुध्धा एक फेमस डिश आहे तिथली, आणि मावा कचोरी.

मिरची वड्यात मोठ्ठीच्या मोठी हिरवी मिरची लिंबू रसात भिजवतात, मग त्यात उकडलेल्या मिठ, चाट मसाला घातलेल्या बटाट्याचे सारण भरतात. मग बेसनात घोळून आख्खी तळतात, जाम यम्म लागते ती, पण गरमच खातात.

मावा कचोरीत खवा, आणि ड्राय फ्रूट्स घालून गोड कचोरी केली जाते, ती फार हेवी असते खायला.

दाल बाटीच्या दालमधे ५ डाळी असतात.
केर सांग्रीची भाजी मात्र काही विशेष आवडली नव्हती.

http://www.cuisineroyal.com/rajastan.html
मध्ययुगातील युद्धग्रस्त परिस्थिती आणि वाळवंटी प्रदेशामुळे साधनसामुग्रीतील विविधतेचा अभाव, तसेच पाणी , ताज्या भाज्या, वेगवेगळे मसाले यांची कमतरता यांचा परिणाम राजस्थानच्या खाद्यसंस्कृतीवर झाला आहे.
अनेक दिवस टिकतील , पुन्हा गरम केल्याशिवाय खाता येतील असे खाद्यपदार्थ रजपूत लढवय्यांना सोयीचे ठरत.
मारवाडी स्वयंपाकात पाण्याचा वापर कमी तर दूध, ताक आणि तूप यांचा वापर जास्त असतो. शुष्क हवामानामुळे बहुसंख्य पदार्थांत तुपाचा वापर असतो.
दाल बाटीच्या उद्गमाबद्दल वाचलेली एक रोचक माहिती : राजपूत योद्धे भरपूर तूप घालून केलेले कणकेचे गोळे वाळूत पुरून ठेवीत आणि गरजेनुसार भाजलेल्या बाट्या काढून स्वाहा करीत

मावा कचोरी खुप सुरेख लागते. मागच्या महिन्यात जोधपुर ला एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तिकडे ताज हरी महल मध्ये खाण्या पिण्याची रेल चेल होती. त्या शेफ ने आम्हाला काही पदार्थ करुन दाखवले. त्यात गट्टे की सबजी होती. तिकडे उजाड असल्याने फारशा भाज्या मिळत नाहीत. त्यामुळे केर - संगरी खुप प्रसिद्ध आहे. ही अंबट असते. गोड खाणे खुप. माल्पुवा, चुर्मा लड्डु, हे खुप प्रसिध्ध. मुख्य खाणे बटाटा, दाल, आरबी, बेसनाचे पदार्थ. भात खुप कमी. सगळ्या रेसीपी मध्ये डाळ, गहू हेच दिसतात. जयपुर ला मागे एक पदार्थ खाल्ला होता. "चीला" सगळ्या डाळी ५-६ तास भिजत घालुन त्यात वाटलेली मिरची, मीठ घालुन त्याचे घावन करतात. तसच शीकंजी प्यायली होती.

तिखट - दाल बाटी, गट्टे की सब्जी, गवार बटाटा भाजी, मोड ना आलेली कडधान्यांची उसळ (स्पे. मटकी, ते मोड म्हणे अळीसारखे दिसतात म्हणुन), रोटली (तळहाताएवढे जाड पराठे - नुसत्या मीठ + कणकेचे, त्याला खड्डे करुन चांगले वाटीभर तुप १-१ पराठ्यात ओतुन मंद खरपुस भाजुन), मक्याच्या पीठाची रोटी

गोड - दलीया (लाप्शी रवा गोडाचा), बुंदी, मखाना चे पदार्थ

तीथी, सण - त्यांचा महिना आपल्यापेक्षा १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमे नंतर सुरु होतो. स्पेशल सण, तीज म्हणजे राखीच्या नंतर ३ रा दिवस - त्या दिवशी बायका नवीन कपडे घालुन पुजा करतात.

हे मी त्यांच्यातल्या ब्राम्हणांबद्दल असलेल्या माहिती वरुन लिहिले आहे. अजुनही बरेच असेल. Happy

मारवाडी/राजस्थानी जेवणात बेसन, चणा खूप वापरतात पाहिलेय. दूध, दही, तूप पण खूपच खातात.
कुठल्या ना कुठल्या प्रकारात बेसन असतेच.

बाकी प्रसिद्ध पदार्थांबद्दल वर आलंच आहे. एक मिस्ड आउट पदार्थ ( जो मला खुप आवडला होता), 'तिखारी'. काइंड ऑफ घट्टसर कढी, ज्यामधे लसणाची ( पेस्ट) फोडणी असते आणि नावाप्रमाणे तिखट्ट असते. जाम यम्मी होती ही डिश. ( हाच पदार्थ नंतर कच्छ/राजकोट मधे पण खुप ठिकाणी मिळाला.)