गव्हाचा पौष्टीक चिवडा!

Submitted by मी_आर्या on 19 April, 2012 - 00:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

DSC01745

याला कुठलाही बुटका गहु चालतो. कल्याण सोना, किंवा लोकवन चालत नाही. पण एच डी २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.

कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
पुर्ण वाळले की गहु असे दिसतात.

DSC01690

वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.

DSC01694

आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! Happy
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.

हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही किती खाणार त्यावर अवलंबुन आहे. :)
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करुन पहाते
पण हा बुटका गहु कुठे मिळेल मला?
आई खुष होणारेय माबोवर
मी नविन नविन पदार्थ करुन पहायला लागलेय आजकाल Happy

प्रिया..सेम पिंच...
छान ग आर्या...करुन पाहेन..पण मला मदत लागेल ह्यासाठी Happy
आनि मला फोटो दिसत नाही आहे Sad

धन्यवाद मंडळी! Happy
नाही हो भरतजी...कुरकुरीत नाही होत. शिजवलेले गहु असल्याने खुसखुशीतच होतो. Proud

बाजारात 'लो कॅलरी गहू/ बाजरी/ सोयाबीन/ चवळी/ ज्वारी मिळते- 'खाण्यासाठी तयार' प्रकाराची. ती ह्याच पद्धतीने करत असावेत. बचत-गटांकडून असतात विकायला. अतिशय खुसखुशीत असतात.
ही पाककृती मस्तच आहे. करणार नक्की. धन्यवाद आर्या.

अरे व्वा मला माहिती नव्हते ..गव्हाचा सुद्धा चिवडा असतो म्हणुन
बघावा लागेल... पण हे बुटके गहु काय प्रकार आहे ? Happy

भारी आवडायचा. माझ्या एका मैत्रिणीची आई धुळ्याकडची होती. ती नेहमी करायची आणि आम्हालाही द्यायची. आता करून बघेन.

अरेsss लय भारी चिवडा.. पण ते वाळवणं सुकवणं खुप आहे.. छान वाटतोय.. कष्ट करावे लागतील थोडे Happy

धन्स सगळे.
मंद्या...मला तोच बिजनेस सुरु करायचाय! Proud

स्मितु, प्रिया...बुटक्या आकाराचा गहु कुठेही मिळेल गं वाण्याच्या दुकानात. उदा.वरती गव्हाची व्हरायटी दिलीये ना 'एच डी २१८९' तो ही चालतो.

वॉव, मस्त तोंपासु दिसतोय Happy

आर्ये, माझी आर्डर घेउन टाक अत्ताच अ‍ॅडव्हान्स मधे...मी देशात आले की दे मला Happy

चिवडा मस्त लागतो हा आणि नुसते खारे गहु पण भारी लागतात.
लहानपणी आजोळाहुन (नंदुरबार) येणार्‍या खाऊत हा खाऊ हमखास असायचा! Happy सोबत काबुली चणे, २-३ प्रकारच्या वाळवलेल्या बिया पण असायच्या. आम्ही त्या बिया खाऊन टरफलांचा पसारा केला की वडील हमखास म्हणायचे, काय नंदुरबारच्या थेटरसारखी घाण करताय?
धन्स आर्या!

Pages