गव्हाचा पौष्टीक चिवडा!

Submitted by मी_आर्या on 19 April, 2012 - 00:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

DSC01745

याला कुठलाही बुटका गहु चालतो. कल्याण सोना, किंवा लोकवन चालत नाही. पण एच डी २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.

कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
पुर्ण वाळले की गहु असे दिसतात.

DSC01690

वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.

DSC01694

आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! Happy
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.

हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही किती खाणार त्यावर अवलंबुन आहे. :)
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स! लाजो...देशात आलीस की नक्की करुन देइन!:)

बित्तु, हो रे! नक्की टाकेन डुबुकवड्यांच्या भाजीची रेसिपी... या रविवारी आहेच तो बेत,आम्हा शाकाहारी लोकांचा ! Proud

पुढच्या गटगला माझ्याकडुन चिवडा सर्वांना! Proud

पहिल्यांदाच बघितला हा प्रकार.. असे भिजवून वाळवलेले गहू विकत मिळाले तर करता येईल.

@मी_आर्या मी आज हा चिवडा केला. एकदम सोप्पी आणि झटपट झाला. गहु भिजवणे, वाळवणे, कुकरमधे वाफवणे याला जर वेळ लागला पण रिझल्ट एकदम यम्मी. तुमचे खुप खुप आभार Happy Happy

नाही मी पुण्यात नसते. ईकडे इंडियन ग्रोसरी स्टोर मधे जो गहु मिळाला तो घेतला. शंका होती नीट जमेल कि नाही म्हणुन दोन वाट्यांचा करुन पाहीला. छान झाला Happy Happy

अरे व्वा...म्हणजे चिवडा साता समुद्रापार पण पोचला एवढच नाही तर तिकडच्या क्लायमेटमधे करता आला. Happy

इथे शेअर केल्याबद्दल धन्स मृदुला! Happy

वर्षे, तु इतक्या दिवस गव्हासाठीच थांबली असशील तर घे कुठलाही गहु आणि करुन बघ! Proud

मी_आर्या अहो मीच धन्स म्हणते तुम्हाला Happy फक्त काही तासात डब्याचा तळ दिसायला लागला Happy फोडणीला तेलही कमी लागलं त्यामुळे हा गिल्ट फ्री चिवडा आहे Happy

सुमेधा,सुरुवात झालीये तशी थंडीची आणि त्यात आकाशही जरा ढगाळ आहे. अशा वातावरणात गहु नाही वाळणार. त्याला चांगलं कडकडीतच ऊन पाहिजे.

हो , फोटोपण

फेसबुकवर फ्रेन्डलिस्ट मधे नसेल तर त्यान्च्या प्रोफाएल वर जाता येत नाही ना? मेसेज ही स्पॅममधे जातो.

मीही तिथे गालिप्रदान करून आलो. Lol पण काही उपयोग होईलसे वाटत नाही.
माझं टमाट्याचं भरीतही असंच चोरलं होतं लोकांनी पूर्वी.
नेटवर काहीही टाकलं की गंगार्पण म्हणावं अन सोडून द्यावं. फार वाटलं तर चार शिव्या हासडून याव्या त्या चोराला. त्यापलिकडे काही करून फार उपयोग होत नाही.

कमेंट करता येईल.
Suvarna's kitchen असं पेज आहे.
वजास्तकरून व्हिडियो आहेत, म्हणजे स्वतः करून टाकत असाव्यात.
पण या रेसिपीसाठी ब्लॉगची लिंक दिलीय.
पोस्ट रिपोर्ट करता येईल.
बाईंनी स्वतःच्या रेसिपीजमध्ये फोटोवर watermark टाकलेत.

Pages