Submitted by बागेश्री on 10 April, 2012 - 05:41
मन पाऊस पाऊस
चिंब अंगण- ओसरी,
कुंद गारव्याची हवा
गंध मातीचा पसरी..
मन पाऊस पाऊस
होते गालिचा हिरवा,
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!
मन पाऊस पाऊस
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
मंद हवेच्या झोकात!
मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..
मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!
मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!
मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!
असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा!...मस्त कविता! चला,
व्वा!...मस्त कविता! चला, मृदगंधाची जाणीव करून दिलीस; आता पावसाची वाट बघणे सुखकारक होईल. क्रांतीताईप्रमाणे माझीशी छोटीशी भेट!
गंध मातीचा उरावा
मनी, पाउल पाउल
थेंबाथेंबाने शिरावी
तुझी माझ्यात चाहूल
सुंदर सुंदर प्रतिसादांसाठी
सुंदर सुंदर प्रतिसादांसाठी तुम्हां सगळ्यांचे आभार मित्र मैत्रिणींनो
क्रांतितै तुमच्या नुसत्या प्रतिसादाने कविता भरून पावते माझी, इथे तर निवडक १०चा मान, प्रचंड आभारी आहे!
क्रांतितै आणि कोठीकरजी, छानश्या गिफ्टसाठी मनःपूर्वक आभार तुम्हा दोघांचे
विनायक
शेवट छान आहे... उन जरा जास्त
शेवट छान आहे... उन जरा जास्त आहे म्हणून सुचत आहेत का अश्या कविता...
अहा......... तुझी कविता वाचून
अहा......... तुझी कविता वाचून इथे आमच्या वाळवंटात सुद्धा सुखद हिरवाई उतरल्याचा भास झाला.
खूप खूप आवडेश
सुंदरच! बहिणाबाई आठवल्या.
सुंदरच! बहिणाबाई आठवल्या.
आवडली
आवडली
सुंदर कविता जाम आवडली.
सुंदर कविता जाम आवडली.
आभारी आहे सार्यांची,
आभारी आहे सार्यांची, मनापासून
सेना
सह्ही...... कालचं पावसात
सह्ही...... कालचं पावसात भिजुन झालं... आणि आज हे वाचलं..
ज्ज्ज्जाम आवडली कविता....
सुं द र.....
वाह वाह... काय बरसलेत
वाह वाह... काय बरसलेत शब्द...
>>मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!
हे तर निव्वळ "गुलजार"......
मायबोलीकरांच्या "पाऊस" अल्बम वर काम करतोय.. ही कविता घ्यायची परवानगी हवी आहे. संपर्कातून मेल करतोच आहे.
आभारी
योग, माझ्या कवितेचा हा सन्मान
योग,
माझ्या कवितेचा हा सन्मान आहे असे समजते !!
तुमच्या ईमेल ला उत्तर दिले आहे
हे बाग्ज, अभिनंदन ! आणि
हे बाग्ज,
अभिनंदन ! आणि माऊ जरा मंदच टाळ्या वाजवते आहे म्हणुन ह्या जोरदार टाळ्या पण -
कधी एकदा अल्बम लवकर ऐकायला मिळणार याची उत्सुकता आहे आता.
माऊ +१...
माऊ +१...
वा बागे अब तो पार्टी बनती है
वा बागे
अब तो पार्टी बनती है
बागे अभिनंदन गो.
बागे अभिनंदन गो.
पार्टी रे...
पार्टी रे...
बागेश्री, 'पाऊस' अल्बमसाठी
बागेश्री,
'पाऊस' अल्बमसाठी कवितेची निवड झाल्याबद्दल अभिनंदन.
अभिनन्दन बागेश्री!!
अभिनन्दन बागेश्री!!
हार्दीक अभिनंदन!
हार्दीक अभिनंदन!
सुरेख कविता. आवडलीच
सुरेख कविता. आवडलीच
वा वा, अभिनंदन
वा वा, अभिनंदन
पाणी डोळ्यांच्या द्रोणात >>>
पाणी डोळ्यांच्या द्रोणात >>> वाह! क्या सोच है! मस्तच!
सुंदर...!
खूप खूप आभार
खूप खूप आभार
अफाट. वैशाख वणवा, उन्हाची
अफाट. वैशाख वणवा, उन्हाची काहिली, घामाच्या धारा आणि हा अप्रतिम, हवाहवासा पाऊस. व्वा...!
मस्त !
मस्त !
सुर्र्रेख
सुर्र्रेख
असे चित्र पावसाचे, जणू इवला
असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!>>>व्वा!!!!! बागे कसं जमतं गं तुला इतकं गोड लिहायला...
सुरेख छंदोबध्द कविता ! वाचून
सुरेख छंदोबध्द कविता ! वाचून छान वाटलं !
अप्रतिम
अप्रतिम
फरच सुन्दर आहे हि कविता.
फरच सुन्दर आहे हि कविता.
Pages