मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यावरही आहे चर्चा! वाचाल तर वाचाल! Happy Light 1

त्या प्लॅस्टिकच्या भांड्यांचं काही खरं नसतं. ती टाळावीतच शक्यतो. काचेची मायक्रोवेव्ह प्रूफ भांडी मिळतात कोणत्याही भांड्यांच्या दुकानात. दुकानदार दाखवेल. त्यांच्याकडे बरेच प्रकार असतात. बोरोसिल, ट्रिओ अशा काही कंपन्यांची काचेची भांडी असतात विविध आकारातली. आपल्या गरजेनुसार घेऊ शकतो.

धन्यवाद पोर्णिमा, ते पान व्यवस्थित वाचुन आले आता Happy बोरोसिलची भांडीच वापरेन यापूढे. अजूनही माहिती मिळाली तिथे की सुरण, बटाटा यांचे काप तसेच कटलेट्स वगैरे काचेच्या बेसवर ठेवून शिजवले की मस्त होतात. त्याप्रमाणेच फिश फ्राय(आय मीन बेक) करू शकतो का?

त्याप्रमाणेच फिश फ्राय(आय मीन बेक) करू शकतो का?>>> मलाही हेच विचारायचंय.
माझ्या मावेच्या ऑटोकुक मेन्यु मध्ये ग्रिल्ड फिश आहे पण त्याचे वजन, प्रमाण कळत नाहीये म्हणुन करायचे धाडस केले नाहीये. कमी तेलावर फिश फ्राय/ ग्रिल्ड करता आला तर निश्चिंतमनाने मासा खाता येइल. Happy

त्याप्रमाणेच फिश फ्राय(आय मीन बेक) करू शकतो का>> करू शकता. नंतर मावे साफ करावा लागतो अन्यथा वास येत राहतो.

तसंच ग्रिलवर ठेवल्यासारखे फिश खमंग होत नाही. शिजते व्यवस्थित मात्र.

ग्रील रॅक्/स्टॅण्ड वर फिश कुरकुरीत दोन्ही बाजुने होतील का? कसे, किती पॉवरवर कीती वेळ ठेवायचे? मला मावेबरोबर क्रिस्टी प्लेट मिळालीय, त्यात काय काय करता येईल? दोन वापरांच्या मध्ये किती वेळाचा ब्रेक असावा की असु नये? म्हणजे लागोपाठ एकापेक्षा जास्त वेळा वापरता येतो का मावे? जसे एकदा शेंगदाणे भाजुन झाले की लगेचच दुसर काही रवा वगैरे भाजता येतो का? स्टॅण्डींग टाईम म्हणजे काय? दिलेला वेळ संपल्यावर सुद्धा घरघर चालु असते ती थांबेपर्यंत थांबणे म्हणजे स्टॅ. टा. का? प्रत्येक पदार्थ बाहेर काढायला तेवढा वेळ थांबायचे का? अगदी मध्ये चेक करायचे असेल तर?
खुपच प्रश्न पडलेत,मदत करा Happy

पाणिनी, अगं याची सगळ्याची उत्तरं युजर मॅन्यु. मधे आहेत की.

ग्रील रॅक्/स्टॅण्ड वर फिश कुरकुरीत दोन्ही बाजुने होतील का? - कन्वेक्शन आहे का? तर होइल. क्रिस्पींग ब्राउनिंग व्यवस्थित होतं. थोडंसं ट्रायल अन एरर बेसीस वर हे जमेल. आणि एक लक्षात ठेव, मावेमधुन गरम असताना काढलेला पदार्थ मऊ दिसला तरी गार झाल्यावर ड्राय/क्रिस्प होतो बर्‍याच वेळेस.

कसे, किती पॉवरवर कीती वेळ ठेवायचे? - रेसिपी बुकमधे दिलेले असते, पण सुरुवातीला थोडा थोडा वेळ ठेवुन बाहेर काढुन चेक करायचे. युजर मॅन्यु. मधे टीप्स आहेत वाच नक्की.

मला मावेबरोबर क्रिस्टी प्लेट मिळालीय, त्यात काय काय करता येईल? - मला नाही माहित.

दोन वापरांच्या मध्ये किती वेळाचा ब्रेक असावा की असु नये? म्हणजे लागोपाठ एकापेक्षा जास्त वेळा वापरता येतो का मावे? - काहीच प्रॉब्लेम नाही.

जसे एकदा शेंगदाणे भाजुन झाले की लगेचच दुसर काही रवा वगैरे भाजता येतो का? - लयी वेळा.

स्टॅण्डींग टाईम म्हणजे काय? - पदार्थ शिजुन झाल्यावर भांड्याची, वाफेची, पदार्थाची जी हीट असते त्यावर पदार्थ पुढे थोडा वेळ अजुन थोडा शिजत रहातो. पदार्थ शिजवणे बंद केल्यापासुन गार होईपर्यंतचा काळ म्हणजे स्टँडिंग टाइम. हा कन्सिडर करुन कधी कधी थोडा पदार्थ किंचित कमी शिजवला जातो नाही तर तो ओवरकुक होतो.
दिलेला वेळ संपल्यावर सुद्धा घरघर चालु असते ती थांबेपर्यंत थांबणे म्हणजे स्टॅ. टा. का? - नाही. टायमर संपला कि लगेच घरघर थांबते. मावे चेक करुन घे. घरघर संपल्यावर पुढे स्टॅटा चालु होतो.

प्रत्येक पदार्थ बाहेर काढायला तेवढा वेळ थांबायचे का? अगदी मध्ये चेक करायचे असेल तर? - टायमर चालु असताना मधे स्टॉप करुन पदार्थ चेक करु शकतो. मग पुन्हा स्टार्ट केलंस कि तिथुन पुढे टायमर चालु होतो. बर्‍याचदा पदार्थ शिजवताना मधे मधे चेक करावा लागतो.

थॅंक्स मनिमाऊ, इतक्या लगेच उत्तरं दिल्याबद्दल. अग, कनव्हेक्शनवालाच आहे मावे. त्यात ऑटोकुक मेन्युज आहेत. हे ऑ.मे. मध्ये केले तर वेळ संपल्यावर घरघर(मशीन) लगेच थांबते(आवाज). पण कॉम्बो किंवा कनव्हेक्शनवर काही केले की वेळ संपल्यावरपण थोडा वेळ घरघर चालु असते. काही वेळाने(अंदाजे २-३ मि.) आपोआप बंद होते. त्यावेळेत डोअर उघडला तर आतला लाईट चालु होतो म्हणुन विचारले स्टॅ. टा. बद्दल. मॅन्युअल मध्ये ग्रीलींग विषयी फार काही नाही, फक्त ऑपरेटींग आहे. फ्राय फिश ऑमे मध्ये आहेत पण त्यात बाऊल मध्ये थोड तेल घेऊन त्यात फिश ठेवुन रिलेटेड मेनु नं. वर कुक करायचे अस दिलय. तसही ट्राय केलंय पण मग कुरकुरीत नाही होत, नरम होतात मासे. ग्रील रॅकवर एकाच वेळी दोन्ही बाजुने क्रिस्पी होतो की मध्येच उलटावा लगेल? का क्रिस्टी प्लेटवरच करायच असत? पुन्हा प्रश्न Happy

अरे काय हे कोणीच सांगत नाहीय Sad , मावे कित्येक महिने पडुन होता, लग्नात गिफ्ट म्हणुन आलेला, इथल्या टिप्स वाचुन पुन्हा वापरावासा वाटतोय तर प्लिज प्रश्न बाळबोध वाटत असतील तरी मदत करा लोक्स... Happy

क्रिस्पी प्लेट माहित नाही काय असते ते. पहिल्यांदाच ऐकले. ग्रिलवर किती वेळ लावलंय हेही पहावं लागेल. वरची बाजू आधी क्रिस्प होईल (रंग बदलेल). मग उलटवायची. करून करूनच अंदाज येईल वेळेचा.

धन्स पौर्णिमा, अगं क्रस्टी प्लेट आहे, युजर मॅन्युअलनुसार ती तव्यासारखी वापरता येते मावेमध्ये. नॉनस्टीक कोटींग आणि बेस सिलिकॉन्चा असतो. अजुन काही करुन नाही पाहिले त्याच्यावर, कोणाल इथे माहित असेल म्हनुन विचारले. डेमोवाल्यांशी संपर्क केलाय पण खरेदी(आम्हाला गिफ्ट मधुन आला) करुन बरेच महिने झाल्यामुळे डेमोवाले पण आखडतायत. बायदिवे डेमो म्हण्जे नक्की कस, काय दाखवतात कोणी सांगु शकेल का? त्यांना बोलावाणे उपयोगी होईल का? कि ते पुस्तकी (यु. मॅ.) भाषेतच तोंडी सांगतात, की काही करुन दाखवतात?

१९९५ साली घेतलेल्या मायक्रोवेव्हला घरघर लागली आहे. त्याने पूर्ण राम म्हणायच्या आत नवा आणावा असा विचार आहे. कुठली कंपनी,कुठले मॉडेल चांगले, काय फीचर्स बघावेत याचे रेकमेंडेशन द्या कोणीतरी. काउंटरवर ठेवण्यासारखा हवाय - वॉल माउंट चालणार नाही.

मावे मधे बेकिन्ग बद्दल काही सान्गाल का? प्रीहीट कसा करायच? रिकामाच चालु करायचा का?केक वगैरे बेक करताना टेम्प सेट कस करायच? माझ्या कडे LG चा मावे आहे.
मावे वापरावा का सरळ ओव्हन घ्यावा असा विचार करतेय. इथे उत्तर सापडल्यास मावेच नीट वापरता येइल.

इन्ना, मावेबरोबर एक माहितीपुस्तक दिलेले असेल ना? त्यात अगदी सोप्या भाषेत असते सगळी माहिती.

इन्ना, मावेबरोबर त्यांचे इन्स्ट्रक्शन किट आले असेल. ते नीट वाचून तसेच्या तसे वापरा. किंवा घरी कंपनीचा माणूस येऊन डेमो देऊन जातो, त्याच्याकडून शिकता येते.
मावेच्या कन्व्हेक्शन मोडवर मी केक करते. कधी कधी भाज्याही बेक केल्या आहेत. दोन्ही व्यवस्थित झाले आहे.

हस्ते परहस्ते माझ्याकडे पोचलाय मावे. Sad एकच पुस्तक आहे त्यात सगळ्या प्रीसेट मेन्युची माहिती आहे.
शोरुम मधे विचारल तर सुट पुस्तक नाही देता येत म्हणालेत. त्यामुळे इथे विचारणे नाहीतर त्याच मॉडेल्चा मावे कोणाकडे तरी शोधणे असे पर्याय आहेत. मावे म्हणुन वापर होतो चिकार . पण इथे वाचुन बेकिंगची सुर्सुरी आली आहे Happy

ओके Happy
कव्हेक्शन मोड सुरू केला की लगेचच प्रीहीटचे बटण आपोआप लागते. ते सुरू केले की तापमान सेट करायचे. डीफॉल्टने १८० डिग्री येते. ते कमी-जास्त करता येते. ते सेट केले की ओव्हन प्रीहीटसाठी घुमू लागतो Proud प्रीहीट झाला की शिट्टी वाजते. मग उघडून केक बाऊल ठेवायचा आणि टायमर सेट करायचा. आणि सुरू करायचा. 'सुरी टेस्ट'साठी मध्येच उघडला तर आहे त्याच टायमिंगवर तिथेच तो थांबतो. दार परत लावले की परत उर्वरित वेळेसाठी सुरू होतो.

करणे सोपे, लिहीणे अवघड आहे हे. पण ह्याने मदत व्हावी Happy शुभेच्छा.

मावेतली काचेची चकती फिरते, दिवा लागतो, ठरलेला वेळ संपल्यावर अलार्म वाजतो इत्यादी पण वस्तू गरम होत नाही असा प्रॉब्लेम आलाय का कुणाला?
गोदरेजचा कॉम्बो आहे. केवळ मावे सेटिंग बिघडलंय की बाकीचे पण ते बघितले नाहीये. वॉरंटी संपल्यावरच हा प्रॉब्लेम आलाय. तरी कंपनीतच फोन करणारे. उगाच घोळ नको.

असेल अनुभव अश्या प्रॉब्लेमचा तर आण्भव सांगा.

नीधप
माझ्या आधीच्या घरातला मायक्रोवेव्ह दर वेळी नाही पण अधून मधूनच असे अंगात आल्यासारखे वागायचा. मग परत दुसर्‍यांदा लावले तर गरम करता यायचे अन्न. दर वेळीच होत नव्हते म्हणून मी फारसे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही घरच बदलले. तुझा स्वतःचा असेल मा.वे. तर मग कंपनीला कळव.

Berg Electric Tandoor कुणी वापरला आहे का? मी डेमो बघितला आणि घ्यायचा विचार करते आहे. ईतर कोणत्या कंपनीचा Electric Tandoor माहीती असल्यास कळवा.

नीधप,
आजच माझ्याही मायक्रोवेवला सेम आजार झाला आहे. दुपारी क्स्टमर केअरला फोन केला. गेल्या वर्षी पण मला असा प्रॉब्लेम आला होता त्यावेळेस कंपनीच्या माणसाने दीड हजाराचा खर्च सांगितला होता. तेव्हा दुरुस्त करून घेतला, पण आता विचारात पडले आहे की दुरुस्त करून घ्यावा की नाही. तसेही ५ वर्षे झाली आहेत.

>>वस्तू गरम होत नाही असा प्रॉब्लेम
कालपासून ऑफिसमधला एक मावे असे वागत आहे. त्याचा जुळा भाऊ उत्तम काम करतो आहे.
वॉरंटी जाईल म्हणून सगळ्या इंजिनियरांना या मावेपासून लांब रहायला सांगितले आहे. Happy

सारांश - टेक सपोर्टला फोन करा, मनुष्य घरी बोलवा किंवा मावे घेऊन जिथून घेतला त्या दुकानात जा, दुरुस्तीसाठी.

सुमेधा, तुझा कॉम्बो आहे? असल्यास बाकीचं चालू आहे का?
माझ्या कॉम्बो मधे ग्रिल आणि बेकिंगचे ऑप्शन आहेत ते चालवून पाह्यले... तापमान वाढते आहे. बाकी अजून काही स्पेसिफिक करून घ्यायची रिस्क घेतली नाही.
आता मुंबईला परत गेले की कंपनीच्या माणसाला बोलावेन. एकदा करेन खर्च. परत झाल्यास धन्यवाद करेन.

हेहे.. माझाही मायक्रोवेव्ह एकदा दोनदा असा झोपला आहे! मग गोल गोल फिरतोय, पण आत कॉफी गारढोणच! परत एकदा लावल्यावर झालं नीट. १-२दाच झाले असल्याने मी फार काही लक्ष दिले नाहीये. Happy

Pages