मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुधा कुलकर्णीचे पुस्तक मस्त आहे वेगवेगळ्या रेसीपी नीट सांगितल्यात ह्या अर्थाने. मी नुसत्या कृती वाचल्या आहेत पण केल्या नाहीत. पण स्टेप बाय स्टेप सांगितलेय.
पण मी काही मोठे जेवण असे शिजवत नाही मावेत इथे तरी.
चहा,जेवण गरम करणे, पापड,शेंगदाणे भाजणे, पॉपकॉर्न बनवणे,बटाटा उकडणे असे केलेय. हां एकदा गाजर हलवा व दूधाची मिठाई केलीय.
परवा डिंक भाजला. मस्त फुलला. काचेच्या भांड्यात डिंक भाजला लाडूसाठी.

१० वर्षात एवढाच युज केलाय. Happy (चार मावे बदलले १० वर्षात पण, मी बिघडवले/बिघडले म्हणून नाही तर काही नुकत्याच इथे आलेल्या मैत्रीणींनी माझ्या मागे त्यात स्टीलचे ताट ठेवले कधी अ‍ॅलुमिनियम फॉइल सकट वस्तू ठेवले,कधी झाकणासकट प्लॅस्टीकचे डबे चक्क दहा मिनीटे गरम करून प्लॅस्टीक वितळवून गेले वगैरे व वाट लागली माझ्या मावेची.) Happy
ते स्टीलचे ताटाने सर्कीट उडते तेव्हा कामवाली बाई ऑपरेट करत असेल तुमचा मावे तर तिला सांगून शिकवून ठेवा. आईचा मावेत कामवालीने हा चमत्कार केलाय. जोरात आवाज येवून आग दिसली आत मध्ये. गेला मावे कचर्‍यात. Happy

(इथे कोणाच्या चुका दाखवायचा हेतु नाहीये पण बर्‍याच मावेत वेगवेगळे सेटींग असते ते नीट वाचून केलेले बरे हे अनुभव शेयर करायल लिहिलेय).

पुस्तक मात्र पडून आहे. त्यात उकडिच्या मोदकापासून, पुपो पासून ते सगळे आहे वाटते(वाचून बरेच दिवस झाले ते पुस्तक्,आज जावून बघते आता). माझ्या इथल्या काही मैत्रीणी छोले,राजमा,पनीर ते गट्टे कि सब्जी मावेत बनवून मोकळ्या आहेत.
काही जणी साबू फेण्या ते तांदूळ पापड काय बनवलेय.

शाब्बास पूनम... नविन धागा उघड्ण्याच छान काम केलस... धन्यवाद Happy

आता लोकहो, टाका तुमच्या मा वे पा कृ....

इथे सर्व नाही पण थोडे काही आहे पहा- Happy
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/3468.html?1194328686
तिथे लिहिल्याप्रमाणे बटाटे उकडणे, साबुदाणा खिचडी, बेसन लाडू चांगले होतात. (पुढे "नेहमीच्या" चर्चा पण आहेत. Happy )

माझ्याकडचे पुस्तक - "मायक्रोवेव्हमधील २५० पदार्थ" लेखिका - सौ. सुधा कुलकर्णी.

मी नुसत्या कृती वाचल्या आहेत पण केल्या नाहीत. पण स्टेप बाय स्टेप सांगितलेय.>>> अगदी सेम मनु मी पण कधी केल्या नाहित आणि माझे हे पुस्तक मैत्रीणीच घेऊन जातात नविन मा.वे. खरेदी केल्यावर. Happy

मायक्रोवेव्हमधील शेवयांची खीर.
साहीत्य :-- दुध, रोस्टेड शेवया, तुप, दुधपावडर,चारोळी ,काजु तुकडे, बेदाणे

कृती:--
१) काचेच्या भांड्यात शेवयांवर थोडंसं तुप घालुन त्यात मावेत१० सेकंदासाठी ठेवा.
२) त्यात दुध घालुन ३० सेकद मावेत ठेवा. [ तेवढ्या वेळात ३ क्र. ची कृती करा]
३) एका वाटीत दुधपावडर घेउन त्यात थोडंसं दुध घालुन पेस्ट तयार करा.
४) दुधपावडरीची पेस्ट खीरीत घाला. व मावेत १ मिनिट ठेवा.
५) बदाम , चारो़ळी, केशर[दुधात खलुन], काजु तुकडे आणि बेदाणे घालुन दिड मिनिटांसाठी मावेत ठेवा खीर तयार.

खुप पटकन आणि छान होते.

मी शेवयांची खीर नेहेमीच मावे मधे करते. इतकी पटकन होते!
माझ्या सासूबाई खूप पदार्थ करतात मावे मधे..त्यांनी गाजर हलव्याची मावे रेसिपी एकदा सांगितली होती, छान झाला होता.. त्यांना विचारले पाहीजे , अजुन काही आहे का?

मायक्रोवेव्हमधील साबुदाण्याची खिचडी.

साहीत्य:-- तुप, जीरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, साबुदाणे, दाण्याचं कुट,आवडत असल्यास चवीपुरती साखर , मीठ थोडंसं ताक, उकडलेला बटाटा [ बटाट्याचे चार भाग करुन किंचीत पाणी घालुन मावेत ठेवल्यास अवघ्या चार मिनिटात छान उकडले जात्तात] कोथीबीर आणि खोबरे

कृती:--
१) मावे च्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कुट , मीठ, हवी असल्यास थोडी साखर आणि बटाट्याच्या चौकोनी फोडी एकत्र करा.
२) थोडं ताक घालुन हे सगळं जरासं ओलसर करा.
३) गैसवर तुप जीर्‍याची [मिरचीचे तुकडे घालुन] फोडणी करुन ती वरील मिश्रणावर ओता. मावे चार मिनिटांवर ७५० पॉवर देऊन सेट करा.
४) या चार मिनिटांमधे दर १ मिनिटानी खिचडी हलवत रहा.

छान मोकळी खिचडी तयार. शेवटी ओले खोबरे आणि कोथीबीर घालुन ३० सेकंदासाठी मावेत ठेवा.
डिशमधे घेतल्यावर वरुनही खोबरं कोथींबीर घालुन घ्या.

[महत्वाचे:---सगळ्या फोडण्या मी नेहमीच गैसवरच करुन घेते त्या अजुन कधीही मावेत केल्या नाहीत]

मायक्रोवेव्हमधील छोले

भिजवलेले छोले, कांदा बारीक कापुन , tomatoची मिक्सरवर प्युरी करुन, लसुण बारीच चिरुन, आलं बारीक चिरुन, धने जीरे पुड, गरम मसाल, छोले मसाला, लाल तिखट, कच्चा कांदा व कोथीबीर चिरुन. लिंबु

कृती:--
१) मावे च्या कुकरमधे पुरेसे पाणी घालुन छोले ७५० पऑवर देऊन ७ मिनिटांसाठी मावेत ठेवा. [एका बारीकशा रुमालात अर्धा चमचा चहापावडर घालुन ती पुरचुंडी चोल्यांबरोबर ठेवल्यास चोळे पटकन शिजतात]
२) एका भांड्यांत थोडे तेल घालुन त्यात बारीक चिरलेला कांदा घालुन मावेत ठेवा साधारण दोन मिनिटात शिजतो.
३) या कांद्यात बारीक चिरलेले आले व लसुण घालुन १मि. मावेत ठेवा.
४) मग यात धनेजीरे पावडर ,हळद , तिखट, मीठ, छोले मसाला घालुन ३० सेकंद मावेत ठेवा.
५ ) tomato प्युरी घालुन २ मिनिर्टे मावेत ठेवा.
६) यात आधीच शिजवलेले छोले घालुन २ मि. मावेत ठेवा.
७) छोले तयार वरुन बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि कोथींबीर घालुन सर्व्ह करा. आणि खाताना त्यावर लिंबु पिळा

नवीन धागा सुरु करुन माझ्या पाकऋती तिकडे हलवल्या आहेत. चुन दोन घागे सुरु केले गेलेत तेव्हा एदमिनना विनंती की त्यातील रिकामा धागा उडवावा.

नारळाच्या करवंटीपासून खोबरे वेगळे करण्यासाठी मा वे चा उपयोग होतो. फोडलेला नारळ पाच मिनिटे हाय वर ठेवायचा. (तो बराच गरम होतो) मग थंड झाल्यावर खोबरे सहज वेगळे करता येते. या खोबर्‍याची चटणी चांगली होते.

दिनेश मी हा प्रयोग आधीही कुठेतरी वाचुन केलेला पण नाही झाला नीट. फाट फाट आवाज येऊन करवंटीचा भाग उडाला, पुर्ण खोबर नी करवंटी अस काही वेगळ झाल नाही. प्रयोग फसला

नीरजा-- वेगळ झाल जर खोबर तर सरळ तुकडे करुन मिक्सरवर वाटायचे, खोवायच्या भानगडीत पडायचच नाही

मी साबुदाण्याची खिचडी मायक्रोवेव्हमध्येच करते. भांड्याला खाली लागून परतत बसायचा त्रास वाचतो. पाच-सहा मिनिटात होते. हो, पण फोडणी मात्र बाहेरच करुन घेते.
बेसनाचे लाडू पण मस्त होतात. फक्त दर एक मिनिटाला बाहेर काढून ढवळून घ्यायचे नाहीतर फार पट्कन जळते बेसन. पण कष्ट खूप वाचतात. माझ्या मायक्रोवेव्हमध्ये साधारण दहा मिनिटे लागतात भाजायला ( काचेच्या भांड्यातच करावे ) बेसन एकदम खरपूस भाजले जाते.

इथे खवणी कुणाकडे आहे ? तो सोडवून वाटायचा. तसा आपोआप नाहि सुटून येत, वेगळा करावा लागतो.
मी दही लावण्यासाठी पण मा वे वापरतो. विरजण लावून झाल्यावर अगदी लोएस्ट सेटींगवर दहा मिनिटे ठेवायचे. दोन तीन तासात दहि जमते, हा प्रकार विरजण न लावता पण होतो, असे वाचले होते, पण मी करुन बघितले नाही.
गार्लिक टोस्ट चांगला होतो. (ग्रील खाली ) बगेतच्या स्लाईसेस घ्यायच्या. ऑ ऑ मधे मीठ, लसुण व मिरपूड घालायची. त्यातच आवडते चीज किसून टाकायचे आणि हे मिश्रण त्या स्लाईसेस वर एकाच बाजूला लावायचे. ग्रीड व ग्रील खाली ठेवले तर दोन मिनिटात मस्त टोस्ट होतो. (साध्या पावाला थोडा वेळ लागेल, )

मायक्रोवेव ओव्हन स्वच्छ करायला बाजारातून आणलेला केमिकल स्प्रे किंवा घरगुती सोडा-व्हिनेगर वापरणं पण जिवावर येतं. म्हणून सोपा आणि हमखास उपाय:

एका मायक्रोवेवफ्रूफ पसरट भांड्यात पाणी घेऊन ३-४ मिनिटं हायवर ओव्हन चालू ठेवायचा. भांडं जपून बाहेर काढलं की आत जमलेल्या वाफेमुळे सगळं चिकटलेलं अन्न, शिंतोडे सैल होतं. स्वच्छ फडक्यानं, पेपर टॉवेलनं पुसून काढलं की ओव्हन चकचकीत दिसतं.

उग्र वासाचं अन्न किंवा माश्याचं कालवण वगैरे गरम केलं की येणारा वास काढायला पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब पिळावे.

अश्विनी, जरा बेसनाच्या लाडूची कृती ईथे टाका ना.आजच करायचा विचार होता.मावे मधे करून पाहीन.दिवाळीची ट्रायल दुसरे काय.

मृण,
हो मी हेच करते मावे साफ करायला.

पर्वा इथे वाचून वांग्याचं भरीत करायला वांगं भाजायला मावे मधे ठेवलं. तर ते फुटलं आणि थोडा वांग्याचा पोर्शन मावे मधे उडाला. ते साफ करणं आलं. परत वांग्याला खरपूस वास नाहीच. मग उरलेलं भाजण्याचं काम सरळ आई करायची तसं गॅसवर केलं. ठराविक खरपूस वास आला आणि मला बरं वाटलं. खिडकी उघडी ठेवली होती त्यामुळे धूराचा काही संबंध नव्हता. Happy

अश्विनी लिहिलच कृती पण माझी कृती सांगते.

काचेच्या भांड्यात थोडे तुप घालुन बेसन घालायचे आणि ५ मिनिटे टायमिंग लावायचे, भांडे भाहेर काढुन पीठ चांगले हलवुन घ्यायचे, थोडे तुप घालुन परत ५ मिनिटे लावायची, सगळे तुप एकदम घालु नये.

चांगला बेसन भाजल्याचा वास यायला लागला की काढुन एका पातेल्यात किंवा कढईत भाजलेले बेसन काढुन घ्यायचे, गॅसवर थोडे भाजायचे, भाजुन झाले की त्यात थोडे दुध घालायचे. (जरा जपुन कारण ते हातावर उडते.) परत एकदा चांगले ढवळुन घेतले की गॅस बंद करायचा. कोमट झाले की पिठीसाखर मिसळायची.

पुर्ण गार झाले की हे मिश्रण मिक्सरमधुन काढुन घ्यायचे म्हणजे गुढळ्या झालेल्या हाताने सारख्या कराव्या लागत नाहित आणि लाडवाला मस्त तकाकी येते.

वैनी तुमच किती कौतुक करु.
सगळी माहिती चान्गली एकत्रीत सन्कलीत झालीय.
सध्या वाचतोय. Happy

रोज सकाळी भाजी मावेमध्ये शिजवून घेते मी, म्हणजे पटकन होते. असं ऐकलं होतं, की मावेमधलं तापमान आणि घरातलं तापमान यात बराच फरक असल्यामुळे लगेच भांडं बाहेर काढू नये, भांड्याला तडे जातात.. आणि आज तेच झालं, भाजी शिजवून घेतली, गॅसवर कढईत फोडणीला टाकली आणि घाईघाईत रिकाम्या गरम काचेच्या भांड्यात पाणी घालून ठेवलं Sad
लगेच काही झालं नाही, पण १०-एक मिनिटानी भांड्याला पूर्ण तडे गेले Sad Sad पार तुकडे तुकडे- सिनेमात दाखवतात तसे Sad बोरोसिलचं २ लिटरचं भांडं Sad
जे झालं ते झालं, बाकीच्यांनी काळजी घ्यावी म्हणून सांगितले..

अग मावे घेतल्याच्या पहिल्याच दिवशी माझ्या ला ओपेलाच्या डिशचे तुकडे झालेले. उपम्यासाठी रवा भाजायला ठेवला. आई घरी ला ओपेलाच्या बाऊल वैगरे मध्ये बर्‍याचदा पदार्थ गरम करते. अन त्या डीशवर पण लिहिले होते मावे सेफ म्हणून. ३-४ मिनिटं ठेवले असेल. मग मावे उघडून डिश बाहेर काढतानाच तुकडे झाले डीशचे. Sad बाहेर दिल्लीतली थंडी होती तेंव्हा.

वरती म्रु न लिहिलय तीच idea मी पण वापरते. फक्त पाण्यात व्हिनेगर घालायच. मायक्रोवेव्ह अगदी चकचकित होतोच आणि कसलाही वास रहात नाही.

कोबीचे रोल
कोबीची पाने देठापासून वेगळी करून त्याच्या शिरा सुरीने तासून घ्या. या पानांवरून लाटणे फिरवून ते जरा मऊ करून घ्या.
गाजर खिसून घ्या. स्वीट कॉर्नचे दाणे , बारिक चोचलेली काकडी, बारीक चिरलेला कांदा, चीजचे बारीक तुकडे/कीस, बीटाचे (आधीच उकडून घ्या) बारीक तुकडे + ऑऑ +लिंबू रस+ साखर+ मीठ+चाट मसाला . हे सर्व मिश्रण करून घ्या. व वरील कोबीच्या पानात गुंडाळून घ्या. मावेच्या प्लेटमध्ये ठेवा १ मिनिटासाठी .
मस्त कोबीचे रोल तयार.
गरम गरम छान लागतात.

माझ्याकडे एलजी चा ३० लिटरचा कॉम्बो आहे. सकाळी गडबडीच्या वेळी फार उपयोगी पडतो. ओटस बनवणे, दुध गरम करणे लवकर होते. भात मावेतच बनवते. त्यामुळे जेवताना गरम गरम भात मिळतो. मुख्यतः पार्टीच्या वेळी अन्न गरम करायला फार उपयोगी पडतो.
मावे वापरावा की नाही यावर मनिषाला अनुमोदन. Happy

Pages