मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रील-मायक्रो कॉम्बी मोड मध्ये मेट्ल रॅक वापरली तर चालते का? माझा ओवन नुसताच पडुन आहे. कनव्हेक्शन मोड वर कधिही केक केला प्रिहीट आणि बाकी इनस्ट्रक्शन्स जरी फ़ॉलो केल्या तरी केक तळाला ओलसर आणि चिकट राह्तो.>> मुग्धा , माझ्याकडे एल जी चा आहे मावे. त्यासोबत दोन रॅक्स आहेत .
उंच रॅक मी केक साठी वापरते. केक वरून मस्त खरपूस होतो . तळाला चिकटल्याचा अनुभव नाही कधी. ग्रिल मोड कधी वापरल नाही .

मी दसर्‍याला पॅनासॉनिकचा २० लिटर कपॅसिटीचा विथ ग्रिल मायक्रोवेव्ह घेतलाय. (माझा दुसरा).
आमच्या मावे डॉक्टरच्या मते रँक्स : १ पॅनासॉनिक २ सॅमसंग ३ एल्जी. (या रँकिंगला याच क्षेत्रातल्या विक्रेत्याकडून निष्पक्ष दुजोरा मिळालाय) त्याने इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवाला घेऊ नका असे मुद्दाम सांगितले होते.

भरत मयेकर,
कोणत्या दुकानात घेतला? तुम्ही विशिष्ट शहरात आहात असं गृहित धरलय. Happy

स्ति, ग्रील-मायक्रो कॉम्बो मोड बद्दल थोडे डिटेल मधे लिहाल का? मला हा मोड अजून नीट वापरता येत नाही.>>>
अहोजाहो केलसं आता काहिच सांगणार नाही Happy

जोक्स अपार्ट , माझा प्रतिसाद नीट वाचलास तर , "ग्रिल मोड कधी वापरल नाही ."
खरतर मलाच माहिती हवी होती . कसा वापरायचा ते.
एकदाच , ग्रील सॅण्डविच करायचा प्रयत्न केला होता . तो पूर्णपणे फसला.
मला ऑटो मोड ही वापरता येत नाही.

पिझ्झा करताना ग्रील केला तर वरून छान सोनेरी होतो. फ्रोझन पिझ्झा आणला तर आधी तव्यावर ठेवून शेकून घ्यायचा आणि मग ग्रील करायचा. पण जेव्हा शिजवणे आणि ग्रील ( ग्रांते ) करायचे असेल त्यावेळी कोंबो वापरले तर जास्त चांगले. असे केल्याने भांड्यातला पदार्थ छान शिजतो आणि वरचे चीजही सोनेरी होते.

आधी जास्त मावे आणि कमी ग्रील करायचे आणि हे प्रमाण वाढवत शेवटी पूर्ण ग्रील करायचे.
चीज भरून बेक्ड पोटॅटो वगैरे करताना असे तंत्र वापरता येते.

नुसते ग्रील करताना कधी कधी पदार्थ नीट शिजत नाही, त्यामूळे जर कच्चा पदार्थ ग्रील करायचा असेल ( उदा. ग्रील्ड टोमॅटो, बटरनट, झुकिनी ) तर हे तंत्र वापरायचे.

अख्खे चेरी टोमेटो ( किंवा एकंदरच आत द्रवपदार्थ व वर पातळ कवच असलेले पदार्थ ) मावे करता येत नाहीत पण ग्रील करता येतात. भरतासाठी वांगे भाजायचे असेल तर जाड चकत्या करून आधी मावे आणि मग ग्रील करायच्या.

पुरणपोळीवर पिठीसाखर पसरून ग्रील करून पहा. तसेच केकवर वगैरेही साखर पसरून कॅरॅमल करता येते. ( साखरेचा थर अगदी पातळ असावा. त्यासाठी गाळणीत साखर भरून ती हातावर किंचीत आपटत पदार्थावर साखर पेरा. )

तांदळाची खीर केल्यासही बोलमधे शिगोशीग भरून वरून ग्रील करता येते. छान लागते.

परत आलो या बीबीकडे.

माझ्या सॅमसंगच्या मायक्रोवेवने आखीरी सांसे घेण्यास सुरूवात केली आहे. टेक्निशियन घरी बोलावल्यावर म्हणाला सर्विस सेंटरला घेऊन जा. तिथे मिनिमम चार्जेस हजार रू. आहेत. त्यामुळे इतके द्राविडी प्राणायाम (लिटरली) करण्यापेक्षा हा एक्स्चेंजम्ध्ये देऊन नवीन घ्यायचा विचार चालो आहे.

मारक्रोवेव+कन्व्हेक्शन्+ग्रिल असा ऑप्शन असलेले आय एफ बी ची प्रॉडक्ट्स कशी आहेत (सध्या ते एक्टएच एक्स्चेंज ऑफर दर्शवत आहेत)

नंदिनी आमचा मावे १० वर्षानन्तर पहिल्यांदाच बिथरलाय. त्याचे तेम्परेचर कंट्रोल चालत नाही त्यामुळे नक्की किती आहे ते कळत नाही. तक्रार केली . माणूस आला. पाहिले. पीसीबी बिघडलाय. हे मॉडेल बन्द झाले आहे. त्याचे पीसीबी रिप्लेस करायला कंपनी आता बनवत नाही. आता हे असेच राहणार. मात्र माझा भाऊ प्रायव्हेटली विदाऊट गॅरंटी दुरुस्त करील. सहाशे रुपये व्हिजिट फी घेतली. परत त्याने संपर्क केलेआ नाही . त्याच्या भावाकडून दुरुस्त करण्यासाठी.

काय करावे बरे ? ::अओ:
पुण्यात कंपनी वगळता प्रायव्हेट मेच्क्यानिक हे काम करतात का आणि कुठ्ठे ?

नंदिनि आणि पादुकानंद - जस्ट डायल वापरून सर्टिफाईड टेक्निशिअन्स/ सेंटर्स शोधता येतील. तुमच्या एरिआतले रिझल्ट्स पाहाता येतील.

मी सध्या LG चा घेतला आहे MC2883SMP खूप चांगला आहे.. आणि ३ हि combinations आहेत..
आपण जवळच्या डीलरकडे चेक करवा... तो एक्स्चेंज करून देईल...

मला एक चांगला मायक्रोवेव ओवन घ्यायचाय तर कुठल्या कंपनीचा चांगला आहे? व मला मायक्रोवेव ओवन + कन्व्हेंक्शन + ग्रील असे तिन्ही ऑपशन्स हवेत त्यात. कमीत कमी ४ ते ५ माणसांना पुरेल ईतका हवा आहे..

आमच्या मावे डॉक्टरच्या मते रँक्स : १ पॅनासॉनिक २ सॅमसंग ३ एल्जी.>>ह्या पर्यायांशी सहमत होण्यासाठी विचारायचं आहे की आणखी कोणी याप्रमाणे मायक्रो घेतलाय का.
नवीन मायक्रो - ग्रिल व कुकिंग ( कन्व्हेक्शन अगदी आवश्यक आहे असे नाही) करिता कोणत्या कंपनीचा घ्यावा? कृपया सल्ला द्यावा. सध्या घरी गोदरेज चा कॉम्बिनेशन मायक्रो आहे.

मला एक चांगला मायक्रोवेव ओवन घ्यायचाय तर कुठल्या कंपनीचा चांगला आहे? व मला मायक्रोवेव ओवन + कन्व्हेंक्शन + ग्रील असे तिन्ही ऑपशन्स हवेत त्यात. कमीत कमी ४ ते ५ माणसांना पुरेल ईतका हवा आहे.. >+१

माझ्याकडे panasonic चा microwave होता. 2013 मध्ये खरेदी केलेला. cooking primary responsibility नसल्याने वापर कमी असे. Microwave & convection दोन्ही मोड वर पदार्थ छान होत. पण वारंवार बंद पडत असे. Warranty मध्ये असेपर्यंत 1-2 दा दुरुस्त केला. नंतर 3 हजार रुपये देऊन PCB बदलले. त्यानंतर बंद पडल्यावर 2019 पर्यंत कधी वापरायची ईच्छा झाली नाही. माझा combination microwave चा अनुभव पाहून नवर्याने त्याच्या घरी फक्त OTG घेतला. आम्ही तोही खूप कमी वापरतो.
शेवटी मी मार्च 2019 मध्ये Godrej convection 19 L घेतला. उत्तम चालू आहे. (शाकाहारी) पदार्थ उत्तम होतात. मफिन्स इ. बरयाचदा करते. मांसाहारी अनुभव नाही. फक्त बेकिंग करतांना वरचा रँक वापरू नये.

Pages