मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंडियन आयडॉलची नवी अ‍ॅड आवडली. गाणं कोणाचं ह्यावरून पैज लागते ती. त्या पैज हरणार्‍या मुलाला अ‍ॅक्टींग अजिबात येत नाहिये पण प्लॉट आवडला.

मला डीएसके वाल्यांची "भुर्कन चिऊ" बिलकुल आवडत नाही. गेंगाणा आवाज, विचित्र शब्द आणि अतिकृत्रिम अभिनय(?) > गेंगाणा आवाज >>> +१

आणि त्या जाहिरातीत सुबोध भावे इमानदारीत अभिनय वगैरे करतो >>>> लले, अगदी अगदी... Rofl

त्यातली ती नटी कुठल्याश्या केशतेलाच्या अ‍ॅड मध्ये हे एव्ह्ढे मोठ्ठाले केस घेऊन बघितलेली आठवते आहे.

"आज कुछ तूफानी करते है" ह्या जाहिरातीचे जिंगल आवडले आहे.

झी मराठीवरील अजून एक डोक्यात जाणारी जाहिरात म्हणजे "आजच घ्या. सकाळी ओके" वाली अ‍ॅड. आणि एकदा लागली की मिनिमम ३ वेळा तोच संदेश. "चूर्णाला आता राम राम म्हणे"...

शिवाय रामबंधू पापड मसाला ची हल्ली लागतेय की अ‍ॅड किती चावट आहे .
नवरा बायकोला म्हणतो "ए असं काय अजून एक देना"
बायको: "इश्श, मुलं बघतायंत"
नवरा: "अगं, मग त्यांना पण दे. त्यांनाही आवडतं"....

Rofl

"आज कुछ तूफानी करते है" ह्या जाहिरातीचे जिंगल आवडले आहे.>>> फक्त जिंगलच छान आहे पण कल्पना अजिबातच नाही आवडली.

लहान मुलांना ते फारच interesting वाटते जे धोकादायक आहे

शिवाय रामबंधू पापड मसाला ची हल्ली लागतेय की अ‍ॅड किती चावट आहे . >>> चावट नाही, ओढून ताणून केल्यामुळे बिनडोक वाटते ती जाहिरात !!

त्या टॉयलेट क्लिनरच्या अँडमध्ये नाकाला जीभ लाऊन सांगायला लावल्यावर ती बाई पण अगदी कौतुकाने लावते पण...कैच्याकै...
आणखी काही दिवसांनी काय करायला लावतील देव जाणे...

अमेरिकन टुरीस्टर बॅग - जॉन अब्राहम ज्यात येतो ती अगदी बकवास (वाह्यात का काय म्हणतात तशी) - कपाटात बसतो ती...
मिरींडाच्या सगळ्याच अ‍ॅड्स बकवास...
आयडीयाची मच्छरदाणीची अ‍ॅड कळली नाय...
शाहरुखच्या सगळ्याच अ‍ॅड्स समजण्यापलिकडे... पेप्सोडंटची अ‍ॅड लागलेली त्यात तो सोल्जर बनलाय आणि लगेचच डर्मीकुलची अ‍ॅड आली त्यात वेड्यांच्या दवाखान्यातनं आल्यासारखा वाटतो...

सोनम कपुरची अ‍ॅड ओले का कसल्यातरी शॅम्पुची आहे ती अगदी बकवास...

अ‍ॅक्सच्या काही जाहिरातींवर बंदी आली होती- अशी बातमी होती वर्तमानपत्रात. म्हणजे तक्रार नोंदवली की काम नक्कीच होते. (तरी सतत वेगवेगळ्या प्रकारे कमी कपड्यातले परदेशी स्त्री-पुरुष ते दाखवतच राहतात हा भाग वेगळा Angry त्यांच्या एजंसीलाच 'गेट वेल सून' कार्ड पाठवले पाहिजे)

बोर्नव्हिटाची अ‍ॅडही बदलली- प्रॅक्टिस करणार्‍या मुलाची. आताची बास्केटबॉल खेळणारी मुलगी आहे- वेगळी आणि आधीपेक्षा चांगली आहे ही जाहिरात.

>>आयडीया ३जी च्या नविन "अ‍ॅन आयडीया कॅन चेंज युअर आफ्टरलाईफ" काय बकवास प्रकार आहे.
अनुमोदन. चायला आत्ताच "पोचवायला" निघाले आपल्याला Angry

Cannon powershot [anushka Sharma] . fanta . lux fresh splash [Katrina] या जाहिराती चांगल्या वाटतात

बोर्नव्हिटाच्या नव्या जाहिरातीत मुलगी आहे आहे आणि ती गोरी गोरी पान फुलासारखी छान नाही, हे छान आहे.
त्या जाहिरातीनंतरच कधी कधी लांब बाह्यांचा ड्रेस घालून टेनिस खेळणार्‍या मुलीची जाहिरात लागते (व्हॅसलिन लोशन?). त्या तुलनेतही ही छान आहे.

सध्या रीबॉक ची अ‍ॅड आहे .,,,त्याच गाण मला आवडत..मस्त टेका धराय्ला लावणार म्युझीक आहे,,हिपहॉप बेस.....
अनुष्का ची कॅनन ची a-z ची makes us click ची जाहीरात पण मस्त आहे..:)
wildstone ची जाहीरात एवढी बाकीच्या तुलनेत नक्कीच सह्न करण्यासारखी आहे आनि त्याच गाण ही मस्त आहे...

अरे पिझ्झा हट ची अ‍ॅड बघितलीच नाही कोणी........... कहानी चित्रपटातला राणा आहे त्यात..... आणि त्याची बायको झालेली ती मुलगी..(गरम मसाला मधिल) ....... तिचे जेवन नेहमीच जळते म्हणुन तो पिझ्झा मागवतो.. Happy
आज क्या जला ? बैंगन का भरता......... Happy मस्त अ‍ॅड आहे

निखिल रत्नपारखीची "माझा"ची नवीन जाहिरात मस्त आहे. त्याच्या सगळ्याच जाहिराती भारी असतात. स्टार माझाची '१०च्या बातम्या' ची पण मस्त आहे. मध्यंतरी त्याची कुठल्याश्या इंशुरन्स कंपनीची जाहिरात लागायची. तो पॉलीसी काढतो आणि मग बिनधास्तपणे त्याच्या स्कूटरवरुन 'शोले' मधल्या लोकेशनवर जाऊन आरामात स्कूटर पार्क करुन गब्बरला धमकावतो..कहाँ है तुम्हारे वो सांबा-वांबा ??? Happy

व्होडाफोनच्या नव्या जाहिराती बघून दूरदर्शनवर कोणे एके काळी दाखवल्या जायच्या त्या टेली मॅचेस आठवतात; म्हणून या जाहिरती आवडतात.

>>व्होडाफोनच्या नव्या जाहिराती बघून दूरदर्शनवर कोणे एके काळी दाखवल्या जायच्या त्या टेली मॅचेस आठवतात; म्हणून या जाहिरती आवडतात.

अनुमोदन भरत. मस्त असायच्या त्या टेली मॅचेस.

मला सफोलाची नवी अ‍ॅड फार आवडते तो छोटा मुलगा त्या माणसाला पर्वतशिखरावर घेऊन जातो ती. जेम्सची नवी अ‍ॅड बकवास आहे.

Pages