लहानपणी प्रायमरी च्या भूगोलाच्या पुस्तकात भेटलेला पनामा कालवा,पुढे कधी
आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
पण साधारण वीसेक वर्षापूर्वी आमच्या ऑफिसची एक शाखा जेंव्हा आम्ही मध्य
अमेरिकेच्या दक्षिणेकडचा शेवटला देश्,'पनामा' या चिमुकल्या देशात उघडली
,तेंव्हापासून पनामा ची वरचेवर गाठ पडू लागली. सुरुवातीला वर्षातून २,४
वार्या घडत. आता लेकच तिच्या परिवारासकट तिकडे सेटल झाल्यामुळे दरवर्षी
एक तरी ट्रिप होतेच.
दरवेळी पनामा कालव्याला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही. कितीदा पाहिले तरी
त्याबद्दल वाटणारे कौतुहल ओसरत नाही.
या कालव्याच्या कल्पनेचा जन्म पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकं इस्थुमस ऑफ
पनामा मधे दाखल झाले,तेंव्हा झाला. इस्थुमस ऑफ पनामा ला अटलांटिक आणी
पॅसिफिक या दोन्ही महासागरांचे सर्वात अरूंद भाग आहेत ही गोष्ट
पहिल्यांदा लक्षात आली ती एका स्पॅनिश ,भटक्या खलाशी ,'बलबोआ' ला.
या पॉईंट वर कालवा खोदला तर अटलांटिक हून पॅसिफिक ला जायला ८००० नॉटिकल
मैल इतकं अंतर कमी होईल आणी त्यामुळे इंधनाची ही बचत होईल,याशिवाय उत्तर
अमेरिकेला जाताना ,जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या सदर्न टोकाच्या केप हॉर्न
ला पूर्ण वळसा घालून जावे लागत असे. या भागात समुद्री चाच्यांचा सुळसुळाट
होता, कालव्यामुळे हा प्रश्न ही कायमचा सुटणार होता.
कालव्याचे महत्व जाणून ,त्या दिशेने तो बनवण्याचे प्रयत्न स्पॅनिश
,ब्रिटिश आणी शेवटी १८८० मधे फ्रेंचांनी सुरु केले. पण या भागात घनदाट
रेन फॉरेस्ट्स होते. त्यांच्यामुळे किडे,डास इ. भरपूर मात्रेत असल्याने
विभिन्न रोग पसरत .मजूर पटापट रोगाला बळी पडत. शेवटी मजूर, पैसा या
सगळ्यांची कमतरता पडू लागली आणी कालव्याचे काम पुन्हा बंद पडले.
१९०३ मधे ,अमेरिके च्या मदतीने पनामा ,कोलंबिया पासून वेगळा झाला आणी एक
स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मग अमेरिकेने कालव्याचे काम आपल्या
हाती घेतले आणी १५ ऑगस्ट,१९१४ रोजी हा कालवा दळणवळणासाठी खुला झाला.
अश्याप्रकारे या कालव्याच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप यायला ४०० वर्षांचा
दीर्घ काळ लागला.
अटलांटिक आणी पॅसिफिक महासागरांना जोडणारा, ८० किलोमीटर लान्बीचा हा
कालवा बनवण्याकरता, पनामा सिटीतून पनामाच्या एका डिस्ट्रिक्ट कोलोन कडे
वाहणार्या 'छाग्रेस' नदी वर दोन जागी बांध घालून दोन मोठाले तलाव
निर्माण करण्यात आले. छाग्रेस नदी समुद्रपातळीपासून अडीचशे फूट उंचावर
आहे.ही जगातील एकमेव नदी आहे जी अटलांटिक आणी पॅसिफिक या दोन्ही
मसागरांमधे विलीन होते. त्यांवर तीन लॉक्स चे पॅरलल सेट्स बांधण्यात आले,
मीराफ्लोरेस्,पेड्रो मिगल आणी गातून.
यापैकी मीराफ्लोरेस लॉक्स, पनामा सिटीपासून वीस मिनिटाच्या ड्राईव वर
आहे . तिथे अटलांटिक सागर आहे तर गातून लॉक्स च्या पलीकडे पॅसेफिक सागर
आहे. पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे.
या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते.
प्रत्येक लॉक मधे १०१,००० मीटर क्यूब पाणी भरले जाते."या लॉक्स मुळे या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून वर उचलले जाते आणी अट्लांटिक कडून
गातून लॉक्समधे आल्यावर हळू हळू पाण्याची पातळी कमी करत करत पुढे गातून लेकमधुन प्रवास करुन पेड्रो-मिगेल लॉकमधुन मीराफ्लोरेस लेक मध्ये जाते व मीराफ्लोरेस लॉक्समधून दुसर्या बाजूला अटलांटिक महासागरात अलगद पणे प्रवेश करते. याचप्रमाणे याच्या ऊलट अटलांटिक कॅनल मधे प्रवेश करणारे जहाज मीराफ्लोरेस लॉक्स, मीराफ्लोरेस लेक, पेड्रो-मिगेल लॉक्स, गातून लेक, गातून लॉक्स असा प्रवास करत करत गातून लॉक्समधे पोचले कि दारं उघडून त्या बाजूने पॅसेफिक प्रवेश करते."
हा कालवा संपूर्ण पार करण्यासाठी जहाजा च्या आकारमानाप्रमाणे ८ ते १०
तासांचा वेळ लागतो.
वर्षाकाठी १४,००० + शिप्स या कालव्यातून जातात.
हा कालवा पास करण्याकरता ,एका जहाजाला सरासरी २८०००० अमेरिकन डॉलर फी द्यावी लागते.
आत्तापर्यन्तची सर्वात जास्त फी ' कोरल प्रिंसेस' नावाच्या क्रूज शिप ने
भरलेली आहे. २००२ मधे या क्रूजशिप ने ३८०,५०० अमेरिकन डॉलर ची घसघशीत फी
दिली होती तर १९२८ मधे रिचर्ड हेलिबर्टन या अमेरिकन स्विमर कडून कॅनाल
पोहून जाण्याकरता केवळ ३६ सेंट्स ची फी आकारलेली होती.
पुढच्या वर्षी या कालव्याला शंभर वर्षं पूर्ण होतील.
मनुष्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती(ingenuity ) ,धैर्य ,साहस
या गुणांची ग्वाही , हा कालवा दिवसरात्र देत असतो.
(आत्ताचे लॉक्स ११० फूट रुंदीचे आणी १०५० फूट लांबीचे आहेत त्यामुळे आजची नवीन शिप्स त्यातून पास होऊ शकत नाहीत..
पण आता नवीन कॅनाल चे बांधकाम सुरु झालंय ऑलरेडी. नवीन लॉक्स ५५ मीटर रूंद आणी ४२७ मीटर लांबीचे असणारेत.. ऑलमोस्ट चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे.)
स्पेशल नोट- दिशांच्या बाबतीत झालेली चूक 'अतुलनीय' यांच्या मोलाच्या मदतीमुळे सुधारता आलीये.
अतुलनीय- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
पनामा सिटी- प्रदूषण रहित हवा आणी निरभ्र आकाश इथे बाराही महिने अनुभवायला मिळतं
मीराफ्लोरेस लॉक्स - इथे जाऊन कॅनाल ची पूर्ण प्रोसेस नीट पाहता येत नाही कारण आसपासच्या देशातून आलेल्या टूरिस्ट्स एकच झुंबड उडालेली असते.
पनामा सिटीपासून दोन तासाच्या अंतरावर कोलोन फ्री झोन मधे असलेल्या आमच्या ऑफिस ला जायचा रस्ता.. हाच रस्ता पुढे कोलोन मधे असलेल्या गातून लॉक्स कडे जातो.रस्त्याच्या दुतर्फा असलेलं हे घनदाट रेन फॉरेस्ट ,गातून पर्यन्त साथ देतंं
गातून लॉक्स- इथे ७ डॉलर चं प्रवेश तिकिट घेऊन ,वर गॅलरीत जाऊन निवांतपणे कॅनाल चं पूर्ण फंक्शन पाहायला मिळतं.
गॅलरीतून समोर जवळच दिसणारी गातून लॉक्स ची कंट्रोल रूम
अटलांटिक कडून येणारे जहाज ,गातून लॉक्स मधे प्रवेश करण्याची वाट पाहात थांबलेलं होतं
लॉक्स मधे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. एकेका लॉक मधे प्रत्येकी १०१,००० मीटर क्यूब पाणी भरण्यास केवळ आठ मिनिटांचा अवधी लागतो.
या लॉक्स मधे प्रवेश करण्यापूर्वी जहाजा चा ताबा ,लॉक्स अथॉरिटीकडे देण्यात येतो. मग लॉक्स चे कर्मचारी , कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रुळांवरून तीन तीन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स द्वारे जहाजाला कालव्यात ओढून आणतात.
पहिल्या लॉक मधे जहाजाने प्रवेश केल्यावर लॉक ची दोन्ही अजस्त्र दारे बंद होतात.. मग दुसर्या लॉक मधे पाणी भरलं कि दार उघडून जहाज दुसर्या लॉक मधे प्रवेश करतं.तोपर्यन्त तिसर्या लॉक मधे पाणी भरण्याची प्रोसेस चालू होते
जहाज,तिसर्या आणी शेवटच्या लॉक मधे प्रवेश करताना
आता ते इतक्या जवळून जात असतं कि गॅलरीतून हात बाहेर काढून त्याला स्पर्श करायचा मोह आवरत नाही..
पण तितकंस जवळही नसतं
पाहतापाहता पलीकडे दिसणार्या पॅसेफिक मधे अलगद प्रवेश करून गेलं ही आपल्या पुढच्या वाटचाली करता...
यावेळी जेंव्हा कॅनाल ला भेट दिली तेंव्हा पॅसिफिक कडून अटलांटिक कडे जाणारं आणी अटलांटिक कडून पॅसेफिक कडे जाणारं दोन्ही एकदमच दिसली.. त्यामुळे अजूनच आनंद झाला..
'काय विसरायला होत हल्ली? नै?"
'काय विसरायला होत हल्ली? नै?" लिंबुटिंबुजी... आता गृहपाठ म्हणून संपूर्ण लेख आणी प्रतिसादातील सगळी प्रश्नोत्तरे नीट वाचून काढा बर्का!!!
कधीतरी डिस्कव्हरी चॅनेल वर
कधीतरी डिस्कव्हरी चॅनेल वर बघितले होते, सर्च केल्यास युट्युब वर चित्रफिती देखिल सापडतील, पण स्वःत डोळ्यांसमोर बघण्याचा अनुभव काही औरच असेल
जबरदस्त.
जबरदस्त.
भन्नाट.....
भन्नाट.....
>>इतकी चर्चा/अभ्यास्/वाचन
>>इतकी चर्चा/अभ्यास्/वाचन केल्यावर ,सर्व माबोकरांचा,प्रायमरीच्या पुस्तकातला पनामा चा धडा, आतापर्यन्त पक्का झाला असेल...
अगदी आणि ज्यांची मुलं शाळेत हे भूगोलात शिकत असतील त्या पालकांना आपापल्या मुलांना फोटो आणि दाखवून शिकवता येईल्..म्हणजे पोरांनी पण म्हटलं पाहिजे हे तर शाळेत पण इतकं छान समजावलं नाही.....
धन्स
धन्स प्रसिक्,जागु,अमित्,वेका..
जबरदस्तच कल्पना
जबरदस्तच कल्पना आहे.....
ब-याचदा भूगोलातून वाचण्यापलिकडे याचा आणि आमचा कधी संबंध आला नाही .आत्ता कधीतरी डिस्कवरीवर पाहीला होता एक कार्यक्रम कसं पास होत जहाज ते....
पुन्हा एकदा पाहून खुपच आनंद वाटला........
प्रत्याक्षात पहायला काय मस्त वाटलं असेल याची फक्त कल्पनाच करू शकतो.
धन्यावाद....सर्व माहीती व फोटो बद्दल
मस्तच माहिती आणि फोटो.
मस्तच माहिती आणि फोटो. घरातल्या खलाश्याना ही लिंक पाठवली. त्यांच्या ज्ञानात भर पडेल. त्यांच्याकडे काही एक्स्ट्रा ज्ञान असेल तर आपल्याला सांगतील
वर कुणीतरी अवघ्या २० सेमीचा फरक पडला तर काय बघिडले? अशा अर्थाचा एक प्रश्न विचारला आहे. जहाज समुद्रामधे तरंगत असताना समुद्राच्या पाण्याच्या पातळीमधे असा अचानक फरक पडला. म्हणजे उंच असलेल्या समुद्राचे पाणी भस्सकन कमी उंचीच्या समुद्राकडे धावले (तेही अरूंद बोळातून) तर ते जहाज टायटॅनिक होइल की!!!
वर्षू, चिनीमाती पुस्तकात मीना
वर्षू,
चिनीमाती पुस्तकात मीना प्रभुंनी चीनमधल्याच अशा एका व्यवस्थेचा उल्लेख केलाय.
त्यात बोट अक्षरश: उचलून वर नेतात. यांगत्से वरचा आहे का तो ? मला नीट
आठवत नाही.
ही लिंक कृपया पहावी
ही लिंक कृपया पहावी -
http://en.wikipedia.org/wiki/Panama_Canal
In 1880, the first attempt to construct a sea-level canal began under the leadership of Ferdinand de Lesseps, builder of the Suez Canal, with substantial financing and support from Paris. The French effort went bankrupt after reportedly spending USD $287,000,000, and was largely abandoned by 1890. The Suez Canal was built in a much more benign environment but still took 10 years to complete its 102-mile length, about twice that of the Panama Canal. The French, under Ferdinand de Lesseps, began construction on a sea-level (i.e., without locks) canal through what was then Colombia's province of Panama, on January 1, 1880. The French rushed to begin work, with insufficient prior study of the geology and hydrology of the region.[8] Excavation was conducted at such a steep angle that, in some years, rain-induced landslides poured nearly as much material into the canal as had been removed.[9]
The cost and difficulty of building a canal in the rain-soaked tropics through unstable mountains exceeded expectations. Health risks posed to workers in the mosquito-infested Panamanian jungle, principally malaria and yellow fever, cost thousands of lives and caused unanticipated delays. Public health measures were ineffective because the role of the mosquito as a disease vector was then unknown. Accidents and disease cost about 22,000 workers their lives. These high death rates made it very difficult to maintain an experienced work force. Those French-trained technical employees and engineers who remained healthy, often quickly returned to France after discovering the true work conditions. Even the hospitals contributed to the problem, with conditions that unintentionally provided breeding places for mosquitoes inside the unscreened wards.
वर्षुनील यांनी फक्त लॉक्सचे फोटो दिल्यामुळे पनामा कालव्याची भव्यता लक्षात येत नाही. कारण दोन्ही महासागरामधील अंतर साधारणपणे ७७कि.मी. आहे. मध्ये प्रचंड मोठे असे गातून लेक आहे. अटलांटिक कडून प्रथम जहाज छाग्रेस नदीमध्ये येते. नंतर गातून लॉकमधुन गातून लेकमध्ये घेतले जाते. त्या लेक मध्ये बराच प्रवास करुन पेड्रो-मिग्वेल लॉकमधून मिराफ्लोरेस लेक मध्ये जहाज पोहोचते. नंतर मिराफ्लोरेस लॉकमधुन पॅसिफीक महासागरात प्रवेश करते. जरी दोन्ही महासागरांच्या लेवलमध्ये २०से.मी.चा फरक जरी असला, तरी समुद्रसपाटीच्या लेवलला जाण्यासाठी (कॅनॉलसाठी) करावे लागणारे प्रचंड खोदकाम (समुद्रसपाटीपेक्षा जमीन १०० फुटापेक्षा वर आहे) व खोदकामातून निर्माण होणारा राडा-रोडा कुठे टाकायचा हा प्रश्न सोडवण्यासाठी कालवा जमिनीच्या लेवलला ऊचलून घ्यायचा निर्णय घेण्यात आला.
A U.S. engineering panel was commissioned to study the potential of building the canal and recommended a sea-level canal to President Theodore Roosevelt. However, more extensive engineering studies favored a canal using a lock system to raise and lower ships from a large reservoir 85 feet (26 m) above sea level. This canal design was recommended to President Theodore Roosevelt by Chief Engineer John Frank Stevens and was agreed to by him. The 115 feet (35 m)-high Gatun Dam, would create both the largest dam and the largest man-made lake (Gatun Lake) in the world at that time. In the end, a canal that operated with an elevated reservoir and a system of three locks to raise ships above sea level to Gatun Lake, and then lower them on the opposite ocean with another set of three locks, was seen as much less expensive, faster to build, and more feasible in design than the original vision of a sea-level canal. The water to fill and empty the locks would be taken from Gatun Lake by opening and closing enormous gates and valves and letting gravity propel the water from the lake. Gatun Lake would connect to the Pacific through the mountains at the Gaillard (Culebra) Cut.
While the Pacific Ocean is west of the isthmus and the Atlantic to the east, the direction of the 8- to 10-hour canal passage from the Pacific to the Atlantic is from southeast to northwest. This is because of an anomaly in the shape of the isthmus at the point the canal occupies. The Bridge of the Americas (Spanish: Puente de las Américas) at the Pacific side is about a third of a degree east of the Colón end on the Atlantic side.[32]
The canal consists of artificial lakes, several improved and artificial channels, and three sets of locks. An additional artificial lake, Alajuela Lake (known during the American era as Madden Lake), acts as a reservoir for the canal. The layout of the canal as seen by a ship passing from the Pacific end to the Atlantic is as follows:[33]
From the buoyed entrance channel in the Gulf of Panama (Pacific side), ships travel 13.2 km (8.2 mi) up the channel to the Miraflores locks, passing under the Bridge of the Americas.
The two-stage Miraflores lock system, including the approach wall, is 1.7 km (1.1 mi) long, with a total lift of 16.5 meters (54 ft) at mid-tide.
The artificial Miraflores Lake is the next stage, 1.7 km (1.1 mi) long, and 16.5 meters (54 ft) above sea level.
The single-stage Pedro Miguel lock, which is 1.4 km (0.87 mi) long, is the last part of the ascent with a lift of 9.5 meters (31 ft) up to the main level of the canal.
The Gaillard (Culebra) Cut slices 12.6 km (7.8 mi) through the continental divide at an altitude of 26 meters (85 ft), and passes under the Centennial Bridge.
The Chagres River (Río Chagres), a natural waterway enhanced by the damming of Lake Gatún, runs west about 8.5 km (5.3 mi), merging into Lake Gatun.
Gatun Lake, an artificial lake formed by the building of the Gatun Dam, carries vessels 24.2 km (15.0 mi) across the isthmus.
The Gatún locks, a three-stage flight of locks 1.9 km (1.2 mi) long, drop ships back down to sea level.
A 3.2 km (2.0 mi) channel forms the approach to the locks from the Atlantic side.
Limón Bay (Bahía Limón), a huge natural harbour, provides an anchorage for some ships awaiting passage, and runs 8.7 km (5.4 mi) to the outer breakwater.
Thus, the total length of the canal is 77.1 km (47.9 mi).
@ अतुलनीय.. थँक्स फॉर द
@ अतुलनीय.. थँक्स फॉर द एक्स्ट्रा माहिती.. मी थोडा शॉर्टकट घेतला.. माधव जींच्या प्रश्नाला थोडंस डीटेल उत्तर दिलं.
वर मी फक्त कालव्याच्या टोटल लांबीचा उल्लेख केलाय. ..गातून वरून जितकं दिसतं तितकंच कॅमेर्यात पकडता आलंय..
आतापर्यन्त सर्व वाचकांनी नेट वर जाऊन बरच वाचलं असेल आणी भुल्याबिसर्या कालव्याच्या धड्याची उजळणी केली असेल..
@दिनेश दा.. हो यांगत्से नदीवर ६०७ फूट उंचीचे धरण बांधलंय आणी तेव्हढ्याच उंचीची पाणलिफ्ट बनवण्यात आलीये..
वर्षू, नवर्याला हे फोटो
वर्षू, नवर्याला हे फोटो दाखवल्यावर त्याने मला झब्ब्बू म्हणून काही फोटो दाखवले. ते इतके इंटरेस्टिंग आहेत (त्यासोबत माहिती पण!) की मी एक वेगळा लेख लिहिते आहे.
धन्यवाद.
नंदिनी..धन्यवाद.. अतुलनीय
नंदिनी..धन्यवाद..
अतुलनीय मुळे दिशांची गल्लत सुधारण्यास मदत झालीये.. म्हणून लेख परत संपादित केलाय
हे सकाळी बघितलं होतं. ऑफिसात
हे सकाळी बघितलं होतं. ऑफिसात फोटो दिसत नाहीत म्हणून. झकास आहेत प्र.चि. सगळी.
जियो!
माहिती पण अगदी विस्तृत
मस्तय फोटो आणि वर्णन
मस्तय
फोटो आणि वर्णन दोन्हींमुळे व्यवस्थित कळलं.
मीना प्रभूनं सुएझचं असंच वर्णन केलेलं आहे. पण तिथे फोटो नाहीत.
मी आत्ताच्या आत्ता जातो अन
मी आत्ताच्या आत्ता जातो अन गुगल अर्थ वरुन आभाळातुन पनामा क्यानॉल बघुन येतो

वर्षु, फोटो आणि माहिती आवडली.
वर्षु, फोटो आणि माहिती आवडली.
मानवनिर्मीत आश्चर्य- पनामा
मानवनिर्मीत आश्चर्य- पनामा कालवा बदलून
सुंदर लेख वर्षू नील. भुगोलात
सुंदर लेख वर्षू नील. भुगोलात पनामा कालवा इतकेच वाचले होते असे आठवते. तुमच्या मुळे त्याचे कार्य व गरज कळाली.
तर ते आहे, मुंबईला. वरळी नाक्यावरुन पूनम चेंबरकडे जाताना, तूम्ही
एक नाला ओलांडता. तिथे डाव्या हाताला हि यंत्रणा दिसेल. हा नाला
मुंबईतील सांडपाणी समुद्रात वाहून नेतो. पण भरती आल्यावर समुद्राचे
पाणी नाल्यात घुसू नये म्हणून ही यंत्रणा आहे, अर्थातच खुप जूनी आहे.>>>> इतक्या वेळा ते पाहिले पण आत असे काही तंत्र वापरात असेल अशी कल्पनाही नाही आली.
फोटो दाखवल्यावर त्याने मला
फोटो दाखवल्यावर त्याने मला झब्ब्बू म्हणून काही फोटो दाखवले. ते इतके इंटरेस्टिंग आहेत (त्यासोबत माहिती पण!) की मी एक वेगळा लेख लिहिते आहे.>>> जीयो नंदिनी
वर्षू मस्त माहिती आणि फोटो..
वर्षू मस्त माहिती आणि फोटो..
माहितपुर्ण लेख. फोटो पण खूपच
माहितपुर्ण लेख. फोटो पण खूपच छान:)
निसर्गाची कमालम आणि तू छान
निसर्गाची कमालम आणि तू छान लिहून उडवलीस धमाल !
अप्रतिम......................
अप्रतिम........................
दिनेशदा, तुम्हाला कशी माहिती वरळी नाल्याबद्द्ल ? मी वरळीमध्येच रहाते.
Pages