मानवनिर्मीत आश्चर्य- पनामा कालवा

Submitted by वर्षू. on 5 April, 2012 - 05:36

लहानपणी प्रायमरी च्या भूगोलाच्या पुस्तकात भेटलेला पनामा कालवा,पुढे कधी
आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
पण साधारण वीसेक वर्षापूर्वी आमच्या ऑफिसची एक शाखा जेंव्हा आम्ही मध्य
अमेरिकेच्या दक्षिणेकडचा शेवटला देश्,'पनामा' या चिमुकल्या देशात उघडली
,तेंव्हापासून पनामा ची वरचेवर गाठ पडू लागली. सुरुवातीला वर्षातून २,४
वार्‍या घडत. आता लेकच तिच्या परिवारासकट तिकडे सेटल झाल्यामुळे दरवर्षी
एक तरी ट्रिप होतेच.
दरवेळी पनामा कालव्याला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही. कितीदा पाहिले तरी
 त्याबद्दल वाटणारे कौतुहल ओसरत नाही.

या कालव्याच्या कल्पनेचा जन्म पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकं इस्थुमस ऑफ
पनामा मधे दाखल झाले,तेंव्हा झाला. इस्थुमस ऑफ पनामा ला अटलांटिक आणी
पॅसिफिक या दोन्ही महासागरांचे सर्वात अरूंद भाग आहेत ही गोष्ट
पहिल्यांदा लक्षात आली ती एका  स्पॅनिश ,भटक्या  खलाशी ,'बलबोआ' ला.
या पॉईंट वर कालवा खोदला तर अटलांटिक हून पॅसिफिक ला जायला  ८००० नॉटिकल
मैल इतकं अंतर कमी  होईल आणी त्यामुळे इंधनाची ही बचत होईल,याशिवाय उत्तर
अमेरिकेला जाताना ,जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या सदर्न टोकाच्या केप हॉर्न
ला पूर्ण वळसा घालून जावे लागत असे. या भागात समुद्री चाच्यांचा सुळसुळाट
होता, कालव्यामुळे हा प्रश्न ही कायमचा सुटणार होता.

कालव्याचे महत्व जाणून ,त्या दिशेने तो बनवण्याचे प्रयत्न स्पॅनिश
,ब्रिटिश  आणी शेवटी १८८० मधे फ्रेंचांनी सुरु केले. पण या भागात घनदाट
रेन फॉरेस्ट्स होते. त्यांच्यामुळे किडे,डास इ. भरपूर मात्रेत असल्याने
विभिन्न रोग पसरत .मजूर पटापट रोगाला बळी पडत. शेवटी  मजूर, पैसा या
सगळ्यांची कमतरता पडू लागली आणी कालव्याचे काम पुन्हा बंद पडले.
१९०३ मधे ,अमेरिके च्या मदतीने पनामा ,कोलंबिया पासून वेगळा झाला आणी एक
स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मग अमेरिकेने कालव्याचे काम आपल्या
हाती घेतले आणी १५ ऑगस्ट,१९१४ रोजी  हा कालवा दळणवळणासाठी खुला झाला.
अश्याप्रकारे या कालव्याच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप यायला ४०० वर्षांचा
दीर्घ काळ लागला.

अटलांटिक आणी पॅसिफिक महासागरांना जोडणारा, ८० किलोमीटर लान्बीचा  हा
कालवा बनवण्याकरता, पनामा सिटीतून पनामाच्या एका डिस्ट्रिक्ट कोलोन कडे
वाहणार्‍या 'छाग्रेस' नदी वर दोन जागी बांध घालून दोन मोठाले तलाव
निर्माण करण्यात आले. छाग्रेस नदी समुद्रपातळीपासून अडीचशे फूट उंचावर
आहे.ही जगातील एकमेव नदी आहे जी अटलांटिक आणी पॅसिफिक या दोन्ही
मसागरांमधे विलीन होते. त्यांवर तीन लॉक्स चे पॅरलल सेट्स बांधण्यात आले,
मीराफ्लोरेस्,पेड्रो मिगल आणी गातून.
यापैकी मीराफ्लोरेस लॉक्स, पनामा सिटीपासून वीस मिनिटाच्या ड्राईव वर
आहे . तिथे अटलांटिक सागर आहे तर गातून लॉक्स च्या पलीकडे पॅसेफिक सागर
आहे. पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे.
या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते.
प्रत्येक लॉक मधे १०१,००० मीटर क्यूब पाणी भरले जाते."या लॉक्स मुळे या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून वर उचलले जाते आणी अट्लांटिक कडून
गातून लॉक्समधे आल्यावर हळू हळू पाण्याची पातळी कमी करत करत पुढे गातून लेकमधुन प्रवास करुन पेड्रो-मिगेल लॉकमधुन मीराफ्लोरेस लेक मध्ये जाते व मीराफ्लोरेस लॉक्समधून दुसर्‍या बाजूला अटलांटिक महासागरात अलगद पणे प्रवेश करते. याचप्रमाणे याच्या ऊलट अटलांटिक कॅनल मधे प्रवेश करणारे जहाज मीराफ्लोरेस लॉक्स, मीराफ्लोरेस लेक, पेड्रो-मिगेल लॉक्स, गातून लेक, गातून लॉक्स असा प्रवास करत करत गातून लॉक्समधे पोचले कि दारं उघडून त्या बाजूने पॅसेफिक प्रवेश करते."

हा कालवा संपूर्ण  पार करण्यासाठी जहाजा च्या आकारमानाप्रमाणे ८ ते १०
तासांचा वेळ लागतो.
वर्षाकाठी १४,००० +  शिप्स या कालव्यातून जातात.
हा कालवा पास करण्याकरता ,एका जहाजाला सरासरी २८०००० अमेरिकन डॉलर फी द्यावी लागते.
आत्तापर्यन्तची सर्वात जास्त फी  ' कोरल प्रिंसेस' नावाच्या क्रूज शिप ने
भरलेली आहे. २००२ मधे या क्रूजशिप ने ३८०,५०० अमेरिकन डॉलर ची  घसघशीत फी
दिली होती तर १९२८ मधे रिचर्ड हेलिबर्टन या अमेरिकन स्विमर कडून   कॅनाल
पोहून जाण्याकरता केवळ ३६ सेंट्स ची फी आकारलेली होती.
पुढच्या वर्षी या कालव्याला शंभर वर्षं पूर्ण होतील.
मनुष्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती(ingenuity ) ,धैर्य ,साहस
या गुणांची ग्वाही , हा कालवा दिवसरात्र देत असतो.
(आत्ताचे लॉक्स ११० फूट रुंदीचे आणी १०५० फूट लांबीचे आहेत त्यामुळे आजची नवीन शिप्स त्यातून पास होऊ शकत नाहीत..
पण आता नवीन कॅनाल चे बांधकाम सुरु झालंय ऑलरेडी. नवीन लॉक्स ५५ मीटर रूंद आणी ४२७ मीटर लांबीचे असणारेत.. ऑलमोस्ट चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे.)
स्पेशल नोट- दिशांच्या बाबतीत झालेली चूक 'अतुलनीय' यांच्या मोलाच्या मदतीमुळे सुधारता आलीये.
अतुलनीय- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

पनामा सिटी- प्रदूषण रहित हवा आणी निरभ्र आकाश इथे बाराही महिने अनुभवायला मिळतं

मीराफ्लोरेस लॉक्स - इथे जाऊन कॅनाल ची पूर्ण प्रोसेस नीट पाहता येत नाही कारण आसपासच्या देशातून आलेल्या टूरिस्ट्स एकच झुंबड उडालेली असते.

पनामा सिटीपासून दोन तासाच्या अंतरावर कोलोन फ्री झोन मधे असलेल्या आमच्या ऑफिस ला जायचा रस्ता.. हाच रस्ता पुढे कोलोन मधे असलेल्या गातून लॉक्स कडे जातो.रस्त्याच्या दुतर्फा असलेलं हे घनदाट रेन फॉरेस्ट ,गातून पर्यन्त साथ देतंं

गातून लॉक्स- इथे ७ डॉलर चं प्रवेश तिकिट घेऊन ,वर गॅलरीत जाऊन निवांतपणे कॅनाल चं पूर्ण फंक्शन पाहायला मिळतं.

गॅलरीतून समोर जवळच दिसणारी गातून लॉक्स ची कंट्रोल रूम

अटलांटिक कडून येणारे जहाज ,गातून लॉक्स मधे प्रवेश करण्याची वाट पाहात थांबलेलं होतं

लॉक्स मधे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. एकेका लॉक मधे प्रत्येकी १०१,००० मीटर क्यूब पाणी भरण्यास केवळ आठ मिनिटांचा अवधी लागतो.

या लॉक्स मधे प्रवेश करण्यापूर्वी जहाजा चा ताबा ,लॉक्स अथॉरिटीकडे देण्यात येतो. मग लॉक्स चे कर्मचारी , कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रुळांवरून तीन तीन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स द्वारे जहाजाला कालव्यात ओढून आणतात.

पहिल्या लॉक मधे जहाजाने प्रवेश केल्यावर लॉक ची दोन्ही अजस्त्र दारे बंद होतात.. मग दुसर्‍या लॉक मधे पाणी भरलं कि दार उघडून जहाज दुसर्‍या लॉक मधे प्रवेश करतं.तोपर्यन्त तिसर्‍या लॉक मधे पाणी भरण्याची प्रोसेस चालू होते

जहाज,तिसर्‍या आणी शेवटच्या लॉक मधे प्रवेश करताना

आता ते इतक्या जवळून जात असतं कि गॅलरीतून हात बाहेर काढून त्याला स्पर्श करायचा मोह आवरत नाही.. Wink पण तितकंस जवळही नसतं

पाहतापाहता पलीकडे दिसणार्‍या पॅसेफिक मधे अलगद प्रवेश करून गेलं ही आपल्या पुढच्या वाटचाली करता...

यावेळी जेंव्हा कॅनाल ला भेट दिली तेंव्हा पॅसिफिक कडून अटलांटिक कडे जाणारं आणी अटलांटिक कडून पॅसेफिक कडे जाणारं दोन्ही एकदमच दिसली.. त्यामुळे अजूनच आनंद झाला..

गुलमोहर: 

व्वा मस्त अनुभव असेल ना.
माहिती चित्ररुपात दिल्यामुळे उत्सुकता वाढली वाचताना.

खूप छान माहिती आणि फ़ोटो.....
अशा प्रकारे पाणी भरून बोट पुढे जायची कल्पना युरोपात पण काही ठिकाणी वापरतात न? मी एकदा ट्राव्हल चॅनेलवर पाहिलं होतं आणि जाम आवडलं होतं..पण ठिकाण विसरले...ते छोट्या बोटींसाठी होतं...
.हे अर्थातच मोठ्या तत्वावर आहे....भूगोल पक्का झाल्यासारखं वाटतंय...:)

मस्त माहिती आणि फोटो Happy खूप आवडलं !!

कॅनडामधे पण अशाच प्रकारचे रिव्हर लॉक्स असल्याचं वाचलंय. त्यात माशांसाठी पण अशी वेगळी सोय आहे असंही काहीतरी वाचल्याचं आठवतंय. Happy

मस्तच परिचय, वर्षुताई. पनामा कालवा हे एक भुगोलातलं २ मार्कांचं प्रकरण प्रत्यक्षात किती कॉम्प्लिकेटेड ना? अशीच लॉक सिस्टिम सिअ‍ॅटलला ही आहे - 'द लॉक्स' असंच नाव आहे त्याला - त्यामुळे 'प्रोसिजर' पाहिलेली आहे.

दिनेशदा, लवग्रोव मध्येही अशी यंत्रणा आहे ही माहिती नविनच. आता त्या लवग्रोववर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारं म्युझियम आणि दिल्ली हाटच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या कला आणि इतर वस्तुंकरता स्टॉल्स करण्याची योजना आहे.

वर्षुनील शाळेत असताना आमच्या कालव्याविषयीच्या कल्पना तेवढ्याच सिमित होत्या Proud
<<< वर्षू - २०से.मी. डिफरन्स भरून काढ्ण्यासाठी जहाज १०० फूट वर का उचलले जाते ते समजले नाही. (मी स्वतः सिव्हील ईंजिनीयर आहे, म्हणून विचारले)>>> अतुल जहाजांना समुद्र सपाटीवरुन कालव्याच्या सपाटीपर्यंत आणावं लागेल ना आधी

मामी, १००% खरं बोललीस.. भुगोलातलं २ मार्कांचं प्रकरण.. अगदी अगदी...
श्री.. डिट्टो.. Lol

पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे. या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते. प्रत्येक लॉक मधे १०१,००० मीटर क्यूब पाणी भरले जाते. या लॉक्स मुळे
या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून वर उचलले जाते आणी पॅसेफिक कडून गातून लॉक्समधे आल्यावर हळू हळू पाण्याची पातळी कमी करत करत ,दुसर्‍या बाजूला अटलांटिक महासागरात अलगद पणे प्रवेश करते. >> यातील पहिले वाक्य उरलेल्या पॅराला जोडून घेतल्यामुळे जरा गोंधळ उडतोय असे वाटते. म्हणजे ती फॅक्टच आहे पण जहाज उचलण्याचे किंवा खाली करण्यामागचे कारण नाहीये. जहाज वर उचलले जाते ते कालव्याच्या / नदीच्या पातळीला येण्यासाठी. आणि कालव्यातून समुद्रात जाताना परत खाली सोडले जाते.

असामीने दिलेल्या चित्रामुळे बरेच स्पष्ट होतय. बरीचसा मार्ग नदीतूनच जातो फक्त जीथे नदी नाहीये तिथे लॉक्सचा वापर होतो असे वाटतय त्या चित्रावरून. बरोबर ना वर्षू?

@ Madhav-Originally, tropical rainforests and hills covered the area where the Panama Canal was built
परत एकदा डीटेल मधे लिहीन... ASAP

थोडी अ‍ॅडिशनल माहिती..

So the fate of this area (and all its populations, as well as plants and animals) had been sealed when it was finally decided to connect the two oceans at this geographical point for easier transport.

At some point during the Panama Canal construction it became clear that the sea-level implementation was not possible, and so the project sponsors decided to build a high-level canal (that is, above the sea level).

The project planners then had to find a way to fill this area above the sea with water. They found such a good opportunity in the Chagres River which they used to build a dam.

The dam flooded a massive area close to the river, and thus helped create the Gatun Lake which now forms the main part of the canal.

Another major environmental issue during the Panama Canal construction was the digging of the Culebra (Gaillard) Cut through the Continental Divide.

This involved excavation of many millions of cubic meters of soil and dumping a large proportion of it elsewhere.

And as the lake was formed, many hilltops became islands
Since the canal is above the sea level, it needs an effective transit mechanism that would lift and lower the vessels as they pass along the waterway.

This mechanism comes in a system of locks which work at several stages of the canal’s length, and do just that – lift and lower the ships.

In order to operate properly, the canal has to use vast amounts of water, which is collected during the rain season.

The Gatun Lake is also very important as a water source for the canal’s operation during the dry season.

वर्षू, ती यू ट्यूबवरची क्लिप बघून चांगले समजतेय. आता एखाद्या शिपमधून तो प्रवास करा बघू.

मामी, त्या लवग्रोव्ह च्या ठिकाणी आधी एक टेकडी होती. घरच्यांचा विरोध झाल्याने तिथे एका प्रेमी
युगुलाने आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मरणार्थ ते नाव ठेवले होते. (ब्रिटीशांच्या काळात.)

दिनेश दा,मला शिप चा प्रवास अजिबात आवडत नाही .. शॉर्ट ऑर लाँग, नो क्रूझ,,फॉर मी.. Sad
ओह, ते लव्ह ग्रोव पाहिलंच पाहिजे पुढच्या वेळी...
यू ट्यूब वर ची क्लिप खरच छान आहे..

दिनेश दा.. Happy धन्स....इतकी चर्चा/अभ्यास्/वाचन केल्यावर ,सर्व माबोकरांचा,प्रायमरीच्या पुस्तकातला पनामा चा धडा, आतापर्यन्त पक्का झाला असेल..

खुपच छान माहिति व फोटो. सेव्हन वंडर्स मध्ये खरतर हे अ‍ॅड व्हायला हव कारण १०० वर्षापुर्वि हा बांधला हे खरच आश्चर्य आहे.

सॉल्लीड प्रकार ! असलं काही असेल हे माहितंच नव्हतं !!
धन्यवाद, इथे माहिती (आणि फोटो) शेअर केल्याबद्दल.

अवांतर-
आपल्याकडच्या साध्या बुद्रुक धरणांचेही फोटो काढायला मनाई असते. असे काही पाहिल्यावर हा एक 'उगाचच' नियम आहे असे वाटते. Sad

वर्षु,
धन्स आणि लई ...लईच भारी फोटो !
५-६ फुटाचा माणुस ही असली अजस्त्र कामं करु शकतो,हे पाहुन अजब,नवल तर वाटलंच पण माझाही आत्मविश्वास नक्कीच वाढला ... (हम भी एक इन्सान है ..)
हे पाहिल्यावर नकळत पहिला सलाम ही कल्पना सत्यात ज्यांनी उतरवण्याच धाडस दाखवलं त्यांना केला आणि दुसरा सलाम अर्थातच तुला केला कारण तुझ्यामुळे हा 'पनामा' कालवा या जन्मात या डोळ्यांना बघायला मिळाला (आता हे मी सगळ्या गावाला दाखवु शकेन) .
Happy

अगं वर्षू
कसलं अवघड इंजिनिअरिंग सोप्पं करून सांगितलंस!
आणि फोटो तर मस्तच!

>>> पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे. <<<<
कृपया, उन्चीचे हे मोजमाप पुन्हा तपासुन घ्याल का? मला काहीतरी गफलत वाटते आहे.
बाकी छान माहिती दिलीत. फोटो मला दिसत नाहीत.
मात्र डिस्कव्हरीवर मागे या कालव्याचेबद्दल सलग दोनतिन दिवस खूप छान चित्रिकरण दाखविले होते त्याची आठवण झाली. Happy
[उगा नाही म्हणत, "केल्याने देशाटन....." तुम्ही नशिबवान आहात, प्रत्यक्ष बघु /अनभवु शकलात]

माधव यान्चा मुद्दा देखिल पुसटसा आठवतो आहे, पण निश्चित माहित नाही की, दोन्ही सागरान्मधिल पातळी मधे फरक असल्याने या सिस्टिम्स आहेत किन्वा माधव यान्नी म्हणले तसे सागरापेक्षा कालवा/नदीची पातळी उन्च असल्याने सिस्टिम्स आहेत.
काय विसरायला होत हल्ली? नै?

Pages