मानवनिर्मीत आश्चर्य- पनामा कालवा

Submitted by वर्षू. on 5 April, 2012 - 05:36

लहानपणी प्रायमरी च्या भूगोलाच्या पुस्तकात भेटलेला पनामा कालवा,पुढे कधी
आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
पण साधारण वीसेक वर्षापूर्वी आमच्या ऑफिसची एक शाखा जेंव्हा आम्ही मध्य
अमेरिकेच्या दक्षिणेकडचा शेवटला देश्,'पनामा' या चिमुकल्या देशात उघडली
,तेंव्हापासून पनामा ची वरचेवर गाठ पडू लागली. सुरुवातीला वर्षातून २,४
वार्‍या घडत. आता लेकच तिच्या परिवारासकट तिकडे सेटल झाल्यामुळे दरवर्षी
एक तरी ट्रिप होतेच.
दरवेळी पनामा कालव्याला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही. कितीदा पाहिले तरी
 त्याबद्दल वाटणारे कौतुहल ओसरत नाही.

या कालव्याच्या कल्पनेचा जन्म पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकं इस्थुमस ऑफ
पनामा मधे दाखल झाले,तेंव्हा झाला. इस्थुमस ऑफ पनामा ला अटलांटिक आणी
पॅसिफिक या दोन्ही महासागरांचे सर्वात अरूंद भाग आहेत ही गोष्ट
पहिल्यांदा लक्षात आली ती एका  स्पॅनिश ,भटक्या  खलाशी ,'बलबोआ' ला.
या पॉईंट वर कालवा खोदला तर अटलांटिक हून पॅसिफिक ला जायला  ८००० नॉटिकल
मैल इतकं अंतर कमी  होईल आणी त्यामुळे इंधनाची ही बचत होईल,याशिवाय उत्तर
अमेरिकेला जाताना ,जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या सदर्न टोकाच्या केप हॉर्न
ला पूर्ण वळसा घालून जावे लागत असे. या भागात समुद्री चाच्यांचा सुळसुळाट
होता, कालव्यामुळे हा प्रश्न ही कायमचा सुटणार होता.

कालव्याचे महत्व जाणून ,त्या दिशेने तो बनवण्याचे प्रयत्न स्पॅनिश
,ब्रिटिश  आणी शेवटी १८८० मधे फ्रेंचांनी सुरु केले. पण या भागात घनदाट
रेन फॉरेस्ट्स होते. त्यांच्यामुळे किडे,डास इ. भरपूर मात्रेत असल्याने
विभिन्न रोग पसरत .मजूर पटापट रोगाला बळी पडत. शेवटी  मजूर, पैसा या
सगळ्यांची कमतरता पडू लागली आणी कालव्याचे काम पुन्हा बंद पडले.
१९०३ मधे ,अमेरिके च्या मदतीने पनामा ,कोलंबिया पासून वेगळा झाला आणी एक
स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मग अमेरिकेने कालव्याचे काम आपल्या
हाती घेतले आणी १५ ऑगस्ट,१९१४ रोजी  हा कालवा दळणवळणासाठी खुला झाला.
अश्याप्रकारे या कालव्याच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप यायला ४०० वर्षांचा
दीर्घ काळ लागला.

अटलांटिक आणी पॅसिफिक महासागरांना जोडणारा, ८० किलोमीटर लान्बीचा  हा
कालवा बनवण्याकरता, पनामा सिटीतून पनामाच्या एका डिस्ट्रिक्ट कोलोन कडे
वाहणार्‍या 'छाग्रेस' नदी वर दोन जागी बांध घालून दोन मोठाले तलाव
निर्माण करण्यात आले. छाग्रेस नदी समुद्रपातळीपासून अडीचशे फूट उंचावर
आहे.ही जगातील एकमेव नदी आहे जी अटलांटिक आणी पॅसिफिक या दोन्ही
मसागरांमधे विलीन होते. त्यांवर तीन लॉक्स चे पॅरलल सेट्स बांधण्यात आले,
मीराफ्लोरेस्,पेड्रो मिगल आणी गातून.
यापैकी मीराफ्लोरेस लॉक्स, पनामा सिटीपासून वीस मिनिटाच्या ड्राईव वर
आहे . तिथे अटलांटिक सागर आहे तर गातून लॉक्स च्या पलीकडे पॅसेफिक सागर
आहे. पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे.
या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते.
प्रत्येक लॉक मधे १०१,००० मीटर क्यूब पाणी भरले जाते."या लॉक्स मुळे या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून वर उचलले जाते आणी अट्लांटिक कडून
गातून लॉक्समधे आल्यावर हळू हळू पाण्याची पातळी कमी करत करत पुढे गातून लेकमधुन प्रवास करुन पेड्रो-मिगेल लॉकमधुन मीराफ्लोरेस लेक मध्ये जाते व मीराफ्लोरेस लॉक्समधून दुसर्‍या बाजूला अटलांटिक महासागरात अलगद पणे प्रवेश करते. याचप्रमाणे याच्या ऊलट अटलांटिक कॅनल मधे प्रवेश करणारे जहाज मीराफ्लोरेस लॉक्स, मीराफ्लोरेस लेक, पेड्रो-मिगेल लॉक्स, गातून लेक, गातून लॉक्स असा प्रवास करत करत गातून लॉक्समधे पोचले कि दारं उघडून त्या बाजूने पॅसेफिक प्रवेश करते."

हा कालवा संपूर्ण  पार करण्यासाठी जहाजा च्या आकारमानाप्रमाणे ८ ते १०
तासांचा वेळ लागतो.
वर्षाकाठी १४,००० +  शिप्स या कालव्यातून जातात.
हा कालवा पास करण्याकरता ,एका जहाजाला सरासरी २८०००० अमेरिकन डॉलर फी द्यावी लागते.
आत्तापर्यन्तची सर्वात जास्त फी  ' कोरल प्रिंसेस' नावाच्या क्रूज शिप ने
भरलेली आहे. २००२ मधे या क्रूजशिप ने ३८०,५०० अमेरिकन डॉलर ची  घसघशीत फी
दिली होती तर १९२८ मधे रिचर्ड हेलिबर्टन या अमेरिकन स्विमर कडून   कॅनाल
पोहून जाण्याकरता केवळ ३६ सेंट्स ची फी आकारलेली होती.
पुढच्या वर्षी या कालव्याला शंभर वर्षं पूर्ण होतील.
मनुष्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती(ingenuity ) ,धैर्य ,साहस
या गुणांची ग्वाही , हा कालवा दिवसरात्र देत असतो.
(आत्ताचे लॉक्स ११० फूट रुंदीचे आणी १०५० फूट लांबीचे आहेत त्यामुळे आजची नवीन शिप्स त्यातून पास होऊ शकत नाहीत..
पण आता नवीन कॅनाल चे बांधकाम सुरु झालंय ऑलरेडी. नवीन लॉक्स ५५ मीटर रूंद आणी ४२७ मीटर लांबीचे असणारेत.. ऑलमोस्ट चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे.)
स्पेशल नोट- दिशांच्या बाबतीत झालेली चूक 'अतुलनीय' यांच्या मोलाच्या मदतीमुळे सुधारता आलीये.
अतुलनीय- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

पनामा सिटी- प्रदूषण रहित हवा आणी निरभ्र आकाश इथे बाराही महिने अनुभवायला मिळतं

मीराफ्लोरेस लॉक्स - इथे जाऊन कॅनाल ची पूर्ण प्रोसेस नीट पाहता येत नाही कारण आसपासच्या देशातून आलेल्या टूरिस्ट्स एकच झुंबड उडालेली असते.

पनामा सिटीपासून दोन तासाच्या अंतरावर कोलोन फ्री झोन मधे असलेल्या आमच्या ऑफिस ला जायचा रस्ता.. हाच रस्ता पुढे कोलोन मधे असलेल्या गातून लॉक्स कडे जातो.रस्त्याच्या दुतर्फा असलेलं हे घनदाट रेन फॉरेस्ट ,गातून पर्यन्त साथ देतंं

गातून लॉक्स- इथे ७ डॉलर चं प्रवेश तिकिट घेऊन ,वर गॅलरीत जाऊन निवांतपणे कॅनाल चं पूर्ण फंक्शन पाहायला मिळतं.

गॅलरीतून समोर जवळच दिसणारी गातून लॉक्स ची कंट्रोल रूम

अटलांटिक कडून येणारे जहाज ,गातून लॉक्स मधे प्रवेश करण्याची वाट पाहात थांबलेलं होतं

लॉक्स मधे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. एकेका लॉक मधे प्रत्येकी १०१,००० मीटर क्यूब पाणी भरण्यास केवळ आठ मिनिटांचा अवधी लागतो.

या लॉक्स मधे प्रवेश करण्यापूर्वी जहाजा चा ताबा ,लॉक्स अथॉरिटीकडे देण्यात येतो. मग लॉक्स चे कर्मचारी , कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रुळांवरून तीन तीन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स द्वारे जहाजाला कालव्यात ओढून आणतात.

पहिल्या लॉक मधे जहाजाने प्रवेश केल्यावर लॉक ची दोन्ही अजस्त्र दारे बंद होतात.. मग दुसर्‍या लॉक मधे पाणी भरलं कि दार उघडून जहाज दुसर्‍या लॉक मधे प्रवेश करतं.तोपर्यन्त तिसर्‍या लॉक मधे पाणी भरण्याची प्रोसेस चालू होते

जहाज,तिसर्‍या आणी शेवटच्या लॉक मधे प्रवेश करताना

आता ते इतक्या जवळून जात असतं कि गॅलरीतून हात बाहेर काढून त्याला स्पर्श करायचा मोह आवरत नाही.. Wink पण तितकंस जवळही नसतं

पाहतापाहता पलीकडे दिसणार्‍या पॅसेफिक मधे अलगद प्रवेश करून गेलं ही आपल्या पुढच्या वाटचाली करता...

यावेळी जेंव्हा कॅनाल ला भेट दिली तेंव्हा पॅसिफिक कडून अटलांटिक कडे जाणारं आणी अटलांटिक कडून पॅसेफिक कडे जाणारं दोन्ही एकदमच दिसली.. त्यामुळे अजूनच आनंद झाला..

गुलमोहर: 

या लॉक्स मुळे
या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून १०० फूट वर उचलले जाते आणी पॅसेफिक कडून
गातून लॉक्समधे आल्यावर हळू हळू पाण्याची पातळी कमी करत करत ,दुसर्‍या
बाजूला अटलांटिक महासागरात अलगद पणे प्रवेश करते. >>>

वर्षू - २०से.मी. डिफरन्स भरून काढ्ण्यासाठी जहाज १०० फूट वर का उचलले जाते ते समजले नाही. (मी स्वतः सिव्हील ईंजिनीयर आहे, म्हणून विचारले)

एकदम तिन्ही दारं उघडल्यास ते बुडून जाईल.. >> हे नाही निटसे कळले. जहाज पाण्यावर तरंगेलच ना? मग पाणी एकेका लॉकमध्ये भरा किंवा तिघांमध्ये एकदम भरा.

मी पण तिथे जी माहिती मिळाली त्यावरूनच लिहिलंय..:)
आणी मी सिविल इंजीनिअर नसल्यामुळे डोक्यात हा प्रश्न ही नाही आला..
कदाचित छाग्रेस नदीची उंची सी लेवल पेक्षा खूप उंच असल्यामुळे त्या नदीवर काढलेल्या कालव्यापर्यन्त नेऊन सोडायला म्हणून इतकेउंच उचलत असावेत..
मीराफ्लोरेस मधे दोन फ्लाईट्स आहेत, तिथे शिप ५४ फुट वर उचले जाते, मधे असलेल्या पेड्रो मिगल लॉक्स मधे ३१ फूट तर तर गातून लॉक्स मधे ८५ फूट वर किंवा खाली केले जाते..
टोटल.. १०० पेक्षा जास्त येतेय...

मी पण तिथे जी माहिती मिळाली त्यावरूनच लिहिलंय..स्मित
आणी मी सिविल इंजीनिअर नसल्यामुळे डोक्यात हा प्रश्न ही नाही आला..
कदाचित छाग्रेस नदीची उंची सी लेवल पेक्षा खूप उंच असल्यामुळे त्या नदीवर काढलेल्या कालव्यापर्यन्त नेऊन सोडायला म्हणून इतकेउंच उचलत असावेत..
मीराफ्लोरेस मधे दोन फ्लाईट्स आहेत, तिथे शिप ५४ फुट वर उचले जाते, मधे असलेल्या पेड्रो मिगल लॉक्स मधे ३१ फूट तर तर गातून लॉक्स मधे ८५ फूट वर किंवा खाली केले जाते..
टोटल.. १०० पेक्षा जास्त येतेय... >>>

धन्यवाद वर्षु - आता शेवटचा प्रश्न तीन्ही लॉक्सची खोली (अंदाजे) किती असावी?

@ माधव, अतुलनीय.. कृपा करून टेक्निकल प्रश्न विचारून माझी गोची करू नका Proud
माधव.. लॉक्स ची निर्मीती दोन्ही समुद्रांच्या पातळी कंट्रोल करतात. तिन्ही लॉक्स एकदम उघडले तर समुद्राचे पाणी भसकन आत येऊन लॉक्स समेत शिप बुडेल..

तिन्ही लॉक्स ची खोली अंदाजे ४२ ते ४५ फूट आहे..

जर मला नीट आठवत असेल तर जरी पॅसिफीक पश्चिमेला असला तरी तिथल्या u bend turn मूळे पॅसिफीक मधे जाण्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे लागते. बरोबर का ?

दोन मिनिटात पनामा कालव्यातुन अ‍ॅटलांटीक ते पॅसिपिक महासागरापर्यंतचा प्रवास यामध्ये या लॉक्सची कार्यप्रणालीही पहाता येते. या विडीओत पहा
http://www.youtube.com/watch?v=-vi19z4LEi0
किंव्हा
http://www.youtube.com/watch?v=Iz2rb1xrckI&feature=related

वर्षू:
कसली मस्त आणि "जिवंत" (live) माहिती!
नेहमीप्रमाणेच तुझ्या पोष्टीतून जगाच्या कुठल्या तरी भागाची अदभुत सफरच घडते.

धन्स स्मिता,जिप्सी..
असामी.. तुझा प्रश्न नीटसा कळला नाही.. कुठल्या यू बँड बद्दल विचारलंस???
तसा ..पॅसिफिक महासागर यू एस च्यापश्चिमेला तर आहेच्..पूर्वेकडे जपान च्या ईस्ट मधे पण आहे..

ताऊ,
कित्ती छान समजावून सांगितलंस गं!
मस्त आणि केवढं अजस्र जहाज ते, शिस्तबद्ध गेले कालव्यातून.. मस्त!
तूझा फोट्टू झक्कासच Happy

खरंच, पनामा कालव्याबद्दल ही माहिती प्रथमच वाचायला मिळाली. वर्षूतै धन्यवाद इतकी छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सगळे फोटो सुंदर.

मस्त माहीती , थँक्स वर्षुनील , भुगोलात जेव्हा पनामा कालव्याविषयी वाचलं होतं तेव्हा वाटायचा दोन्ही समुद्र सरळ जोडले असतील.

वर्षूनील
छान माहीती अन फोटुज , आमची पनामा ला ट्रिप घडवुन आणलीस . Happy
आम्ही Suez canal बघितला , तसेच Nile च्या क्रुझ करतांना अशी यंत्रणा लॉक्स मधे वॉटर लेव्हल ने खाली / वर जाण्याच अनुभव घेतांना मजा आली , ऑफ कोर्स नाईल मधे छोटी जहाज होती Happy
तु घेतलेले बर्ड आईज फोटु छानच Happy

पनामा कालव्याबद्दल ही माहिती प्रथमच वाचायला मिळाली. वर्षूतै आमची पनामा ला ट्रिप घडवुन आणली आपण पण << प्रत्यक्ष बघायला कसले भारी वाटत असेल >>> जबरदस्त अनुभव असेल हा, थँक्स :-). टेक्निकल प्रश्न विचारून माझी गोची करू नका >>>> आगदी बरोबर

वर्षू,

अतिशय अलौकिक असा प्रवास करून, त्याचे "जाणत्या दृष्टीने" प्रकाशचित्रांकन करून, प्रवासाची अनुभूती बसल्या जागीच आणून दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अशाच दुष्प्राप्य, अद्भूत आणि सुरस प्रवासवर्णनांनी मायबोली समृद्ध झालेली आहे.

त्यामुळेच मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटतो. आनंद होतो. असो.

सर्व प्रकाशचित्रे, सोबतची माहिती आणि उप-प्रश्नांना दिलेली सर्व उत्तरे आवडली.

भविष्यातील अशाच रोमांचकारक प्रवासांकरता हार्दिक शुभेच्छा!

वर्षू, इथले चित्र पाहा.

http://en.wikipedia.org/wiki/File:Panama_Canal_Rough_Diagram.png

जरी pacific ocean अमेरिकेच्या (खंडाच्या) पश्चिमेला नि atlantic पूर्वेला असला तरी, पनामा कालव्यामधून जाताना pacific मधून atlantic मधे जाताना पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते (diagonally). Happy

मनःपूर्वक धन्यवाद..
नरेंद्र जी , शुभेच्छांसाठी आभार Happy
अथक ,फोटो टाक ना सुवेझ चा इकडे..आवडेल पाहायला..
श्री.. दोन्ही समुद्रांना जर तसेच सरळ जोडून टाकले असते तर शिप्स ना जमीन कुठे आणी पाणी कुठे कळायची मोठी अडचण झाली असती. या समुद्रांच्या मधल्या भूभागावरून छाग्रेस नदी वाहते. तिच्या पाण्यावर बांध घालून लॉक्स बसवलेत.
अजून डीटेल वर लिहिलंय

व्वा:! फारच छान माहिती नि अत्यंत सुंदर फोटोज्. फोटोंमुळेच लेखाला वजन आले आहे व हे सगळं प्रकरण नीट समजलं. खूप धन्यवाद!

Pages