केर-सांगरीची राजस्थानी भाजी.

Submitted by सुलेखा on 28 March, 2012 - 02:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

केर सांगरी म्हणजे केर ची लहान-लहान फळे व सांगरी च्या शेंगा् .या दोन वेगवेगळ्या भाज्या आहेत..ही वाळलेली फळं आणि शेंगा मिठाच्या पाण्यात रात्रभर भिजवुन दुसरे दिवशी कडक उन्हात वाळवतात्.अशी ही वाळवलेली भाजी वर्षभर टिकते. या भाजीला मुळ विशेष वेगळी चव नाही.पण त्यातील मसाल्याने चवदार भाजी तयार होते. पण तरीही भाजीत असलेल्या आर्युवेदिक गुणतत्वामुळे ही भाजी आर्वजुन खातात.केर चे प्रमाण कमी व सांगरीचे प्रमाण जास्त घेवुन ही भाजी करतात्.माझ्या शेजारच्या जैन भाभी खुप सोप्या पद्धतीने ही भाजी करतात्.त्यांची पद्धत अशी--
पाव कप -केर..
१ कप - सांगरी..
दोन्ही भाज्या एकत्र करुन दोन्-तीन वेळा धुवुन पाणी घालुन रात्रभर [किमान ७ ते ८ तास]भिजवुन ठेवावी.
भाजी फोडणीला टाकायच्या आधी वाळवलेल्या कैरीच्या २-३फोडी .या गरम पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवुन ठेवाव्या...जर नसतील तर प्रमाणात आमचुर पावडर किंवा अनार दाना पावडर एक लहान चमचा घ्यावे.
अर्धी वाटी तेल,
फोडणी साठी मोहोरी,जिरे,हिंग,बडीशोप,हळद.
धने पुड २ चमचे.
गरम मसाला १ लहान चमचा.
मीठ चवीनुसार.
लोणच्याचा तयार मसाला २ चमचे.

क्रमवार पाककृती: 

रात्रभर भिजलेल्या भाजीतले पाणी काढुन टाकावे व स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावी.कारण बारीक रेत [वाळु]असल्यास ती निघुन जाईल.
ही भाजी भिजेल इतके पाणी घालुन कुकरमधे २ शिट्या घ्याव्यात.
कढईत तेलाची फोडणी करावी् .हिंग-मोहोरी-जिरे-तडतडले कि गॅस बंद करावा.बडीशोप, हळद,लोणचे मसाला,भिजवुन र्ठेवलेल्या कैरीच्या फोडी अथवा आमचुर्/अनारदाना पावडर घालुन परतावे.
आता कुकरमधे शिजवलेली भाजी घालुन पुन्हा परतावे.गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे. गॅस चालु करावा.मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी. केर-सांगरी ची भाजी तयार आहे.
लोणचे मसाल्यात मसाल्याचे सगळे घटक आपसुक असल्याने भाजीला अप्रतिम चव येते.

या भाजीत अजुन काही बदल करता येतील.
तिखट जास्त हवे असल्यास भाजी परतताना वरुन तिखट घालता येईल्.
आले -लसुण पेस्ट घालुन वेगळी चव येते.
मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन तेलावर परतायचा .त्यात आले- लसुण व भिजवुन वाटलेल्या लाल सुक्या मिरच्यांची पेस्ट घालुन परतावे.अंदाजे घट्ट दही घालुन मसाला परतावा व शिजवलेली भाजी घालुन परतावे.यात आमचुर /अनारदाना घालु नये .दह्याचा आंबटपणा पुरतो

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरते.
अधिक टिपा: 

वाळलेली भाजी भिजल्यावर व शिजवल्यावर वाढते किंवा जास्त दिसते .त्यामुळे सुरवातीला कमी प्रमाणात करुन पहा.
इथे जवळपासच्या एकाही किराणादुकानात [दुकानदार मारवाडी;राजस्थानी असुनही,ते म्हणे जब देस जाते है तब बहोत खाते है ]ही भाजी उपलब्ध झाली नाही.
त्यामुळे आत्ता प्रत्यक्ष ही भाजी करता आली नाही.

माहितीचा स्रोत: 
माझी शेजारीण जैन भाभी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फक्त लोणचे खाल्लेय याचे, तेही राजस्थान मधेच.
बाय द वे, सांगरी म्हणजे आपला शमी. (हो तोच पांडवांनी शस्त्रे ठेवली होती तो,
गणेशपत्री मधे असायला हवा तो.) राजस्थानचा राज्यवृक्ष आहे तो.

इंटरेस्टिंग!!

करुन पहाणे होणार नाही... राजस्थानात गेले तर नक्की ट्राय करेन किंवा तुमच्याकडे येइन Happy

सुलेखा मी पण ही भाजी खाल्ली आहे. माझ्या मारवाडी मैत्रिणीकडे वर्षातून एकदा ही भाजी होते,तेंव्हा ती मला पाठवते.राजस्थानात ही खूप महाग मिळते.असे तिने सांगितले.पण खूप पौष्टीक असते असेही ती म्हणाली.मला वाटते अतिशय उन्हाळ्यामुळे ह्या भाज्या तिकडे वाळवून ठेवत असतील.

वा!! मस्त पाककृती.
पण आपण स्वत: करून खाण्यापेक्षा राजस्थानी मैत्रिणीला करून आणायला सांगणे जास्त सोप्पं वाटतंय. Happy

मागच्या आठवड्यातच खाल्ली होती ही भाजी. कोणत्या पद्धतीने केली होती याची कल्पना नाही पण काहीशी उग्र चव असते याची.

सुलेखा तुम्हाला राबोडीची भाजीची कृती येत असेल तर द्या ना. मी खूप पूर्वी एका मित्राच्या डब्यात खाल्ली होती. जैन लोक त्यांच्या तिथीच्या दिवशी बर्‍याचदा ही भाजी करतात. भाजी अजून लक्षात रहायला दोन कारणे आहेत - १. अप्रतिम चव २. ठाण्यामधे या नावाचा एक भाग आहे Happy

दिनेशदा,लोणचे -केर-सांगरी-भोकरे [लिसोडे] वाळवलेले, मिठाच्या पाण्यात २४ तास भिजवुन ठेवतात्.त्यासाठी माठ वापरतातं.नंतर कापडावर पसरुन यातील पाणी टिपले कि तीळाच्या तेलात हे लोणचे करतात.मसाल्यात अर्धवट भरडलेलीबडीशोप व अनारदाणा,कलौंजी असते.तसेच तिथे खरबुज सारखेच पाणीदार असलेले काचरी चे पिवळसर पण आकाराने लहान फळ मिळते या फळाची पुड ही या लोणच्यात घालतात त्यामुळे लोणचे लौकर मुरते .[म्हणजे चिवट लागत नाही]असे म्हणतात..या काचरीची पुड मटण शिजवतानाही लौकर शिजावे म्हणुन घालतात्.कच्च्या पपई सारखा गुणधर्म /साम्यता असे वाटते.ही काचरी गुजरातमधे असताना बर्‍याचदा खाल्ली आहे. या काचरी बरोबर चिबुड ही मिळायचे.काचरी व चिबुड खुपसे खरबुजासारखी चव व वासाचे असते.खेडेगावातले खाणे आहे हे.

पुण्यात केर सांगरी कुठे मिळेल, कुणाला माहिती आहे का?>>>>>>> पुणे मंडईत दोन दुकाने आहे जिथे चांगली व रास्त किमतीत मिळेल्(तसेही खूप महाग आहे एथे) ......तसेच मार्केट यार्ड मध्येही दोन - तीन ठिकाणि मसाले विकतात तिथे मिळते.......पण आम्ही वर्षभराचा स्टॉक गुजरातहुन मागवतो..... Happy

अवांतर........ ही भाजी भिजवताना आंबोळ्या थोड्या टाकतात या भाजीत (आंबोळ्या - कैरीचे काप करुन वाळवतात)

स्वाती,रविवार पेठेत किंवा बुरुड आळीच्या मागे विजय ब्रदर्स चे घाऊक किराणा दुकान प्रसिद्ध आहे.तो राजस्थानचाच आहे.त्याच्याकडे मिळेल.

विनोद दुआच्या जायका इंडिया का की अशाच कोणत्या तरी कार्यक्रमात पाहिली होती, तेव्हापासून हे नाव लक्षात आहे. खायची संधी येणे कठीण

मस्त. मैत्रिणीकडे भिजत घातलेली भाजी बघितली आहे पण खाल्लेली नाही.
मयेकर, जोधा अकबरमध्ये जोधाबाई स्वतःच्या हाताने केलेलं जेवण अकबराला वाढते त्यातही केर सांगरी असते.

आत्ताच केर सांगरीची भाजी राजस्थानी मैत्रिणीकडे खाऊन आले.तुम्ही इथे रेसिपी लिहिल्याचे आठवत होते म्हणून मुद्दाम सांगायला आले. एकदम वेगळ्या चवीची भाजी आहे पण फार टेस्टी लागते. मैत्रिणीच्या सासूबाई केर, सांगरी,काचरी, कुमाट(? ) आणि लिसोडे अशा वाळवलेल्या भाज्यांचा पॅक भारतातून घेऊन आल्या आहेत. जयपूरच्या सुपरमार्केट्स मध्ये तयार पॅक्स मिळतात असे कळले. खाली चित्रात दिसतेय तशीच तयार भाजी दिसत होती. Happy तयार भाजी बघून मला आधी वाटले की त्यांनी फणसाची भाजी केलीये Proud

ker.jpg

संपदा,या सगळ्या भाज्या एकसाथ किंवा वेगवेगळ्या मिळतात. त्याना फारशी वेग-वेगळी चव नसते.लिसोडे आंबट चवीचे असतात्.सुकवलेल्या व नंतर शिजवुन्/उकडुन करतात त्यामुळे तेल जरा जास्त च लागते .त्यामुळे भाजी टिकते व मसाल्यांचा स्वाद असतो.पुर्वी राजस्थान मधे हिरव्या भाज्या उन्हाळ्यात दुर्भिक्ष असायचे म्हणुन ही भाजी करायचे.आता एक स्पेशलिटी म्हणुन आवर्जुन केली जाते.