चारोळी स्पर्धा...मसाला मार के...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 March, 2012 - 01:25

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!

Box 18 x 18 inch.jpg

'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे 'मसालेदार' चारोळ्या रचण्याची!

ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हांला चारोळ्या रचण्यासाठी एखादं छायाचित्र, किंवा एखादा विषय देऊ.
तुम्ही झक्कास चारोळ्या रचायच्या, आणि इथे लिहायच्या..

स्पर्धेचे नियमही खूप सोपे..

१. दिलेल्या छायाचित्रावर किंवा विषयावर तुम्ही चारोळी रचायची आहे.

२. चारोळी अर्थातच मराठीत असावी.

३. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक चारोळ्या स्पर्धेसाठी इथे लिहू शकतो.

४. तुमच्या प्रवेशिका तुम्ही त्या त्या स्पर्धेच्या धाग्यावर टाकायच्या आहेत. कृपया स्वतंत्र धागा सुरू करू नये.

५. चारोळ्या तुम्ही स्वतः रचलेल्याच असाव्यात. इतरत्र टाकलेल्या, पूर्वप्रकाशित, आक्षेपार्ह मजकूर असलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. शिवाय त्या लगेच अप्रकाशित केल्या जातील.

६. प्रत्येक स्पर्धेसाठी एक विजेता निवडला जाईल.

७. बक्षीस हे कल्पकता, चारोळीची रचना तसेच चारोळीतून पदार्थ आणि त्यातील मसाले यांची कशी सांगड घातली आहे, ह्यावर अवलंबून असेल.

६. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहतील मायबोलीचे मा. वेबमास्तर आणि मा. प्रशासक. Happy

***

चारोळ्या रचण्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं छायाचित्र...

misal.JPG

या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..

एखाद्या पदार्थाचं छायाचित्र, दुरून येणारा मसाल्याचा वास जसा भूक वाढवतो, तसंच हे मिसळीचं छायाचित्र पाहून चारोळया रचण्यासाठी सज्ज व्हा... !

***

मिसळीचं छायाचित्र मिनोती यांच्या सौजन्याने, © मिनोती.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम मसाल्याची लालभडक तर्री
आंबट-तिखट चव लई भार्री
कांदा, कोथिंबीर अन मटकीची उसळ
न्याहरीला खावी मसालेदार मिसळ

जहाल रंग,
रसनेला तरतरी,
डोळ्यातील पाण्याला आव्हान,
ही मिसळीची लज्जत न्यारी.

लाल तर्री, लिंबू कोतिंबीर
सोबती शेव मिक्श्चर
जर्रा जर्रा कांदा भुरभुरं
अशी मी खवैय्याची रानी रं

Proud

१.
मायबोली ची स्पर्धा खरोखरच न्यारी
मसालेदार मिसळीचा घाट घातला भारी
तोंडाला पाणी सुटले नुसतेच छायाचित्र जरी
करावी लागणारच आता कोल्हापूर ची वारी

----------------------------------------
२.
झणझणीत कट, फरसाण आणि उसळ
डोळ्याचं पारण फिटलं.....
मायबोलीची मसाला मारके मिसळ
आणि तोंडाला पाणी सुटलं....

हरित कोथिंबीर ,लिंबू
लाल तिखटातील डाळी
पाहुनी रंगीत सारे
रंगविरहित लाळ आली

--डॉ.कैलास गायकवाड

लिंबु, कोथिंबीर कांदा, शेव
घरात असते ह्याची नेहमीच ठेव
करा पटकन मसालेदार उसळ
नाश्त्याला द्या खमंग मिसळ..

कांदालसूण मसाला घालायचा हाय सरसगट
आन् वढायचा कट त्यो मस्त सुरसुर करत
त्ये निसतं नावाला कांदा लिंबू आनि पाव
कोल्हापुरात मिसळीचा क्येवढा तो आव

झणझणीत रस्सा, खमंग शेव
खायला येइल भलताच चेव
चटकदार मिसळीला, कोथिंबीरीची जोड
वरून पिळायला लिंबाची फोड Happy
चला मारूया भुरके मज्जेदार
डोळ्याला लागेल पाण्याची धार!!

एक गावरान झटका:

पनीर असो की काजु करी
मिसळीची सर तिला येनारच न्हाय
कोल्हापुरचा रांगडा गडी म्या
मिसळीबिगर काय खानारच न्हाय!

वटाण्याच्या उसळीत
शेव-कांदा घातला चिरून....
वटाण्याच्या उसळीत
शेव-कांदा घातला चिरून....
पनवेलकर रावांना खायला दिली
वर कोथिंबीर पेरून! Proud

फोटुतली मिसळ दिसत्येय चटकदार
तोंडाला पाणी सुटले फार्रचफार
जाच म्हणावा याला की म्हणावा अत्याचार
मा प्रायोजक तुमचा त्रिवार धिक्कार!!!!!! Proud

फोटुतली मिसळ दिसत्येय चटकदार
तोंडाला पाणी सुटले फार्रचफार
जाच म्हणावा याला की म्हणावा अत्याचार
मा प्रायोजक तुमचा त्रिवार धिक्कार!!!!!! ................ Biggrin

आठवांचा कांदा, क्षणांच्या फरसाणावरी
भावनांचा मसाला, त्यात प्रेमाची लाल तर्री
आयुष्याची सर'मिसळ', रसाळ लिंबाने पुरी
नात्याची खुले टवटवी, हिरव्या कोथींबिरीपरी

म्हणातात कोल्हापूरी मिसळ लय भारी
त्यावर असते तिखट लालेलाल तर्री
पण खर सांगु? तथ्य नाही यात कणभरी
आमच्या पूण्याचीच मिसळ्ळ वोरिजीनल खरी ... Happy

काटाकिर्र, नादखुळा, लै भारी
पोह्याचा चिवडा, मिसळीची तर्री
कटाचा झणका, फरसाणाची गोडी
कांदा, कोथिंबीर अन लिंबाच्या फोडी

गंधाळ मिसळ वाढवी बघा हो
बेचैनी जिव्हेची
नैपुण्याला जोड लाभता
प्रविण मसाल्याची

------------------------------------------------------
वरील चारोळीमधे थोडासा बदल करतो आहे

गंधाळ मिसळ वाढवी बघा हो
बेचैनी जिव्हेची
नैपुण्याला साथ लाभता
प्रविण मसाल्याची

कवितांची तर्री आली,
घातला कथारूपी कांदा,
ललितस्वरूपी शेव घालूनी
रसिकांसमोर ही रांधा...

लिंबाचे रूप घेऊनी
ड्यु आयडींची लुडबुड असे
थोडक्या त्या कोथिंबीरीपरी
गझलांचे अस्तित्व दिसे

तोंडास सुटले पाणी आता
रसनाही करी चळवळ
नको खायला विलंब आता
मायबोलीची ''मिसळ''!
अशी ही मायबोलीची ''मिसळ''! Happy

सगळ्याच चारोळ्या मस्त मसालेदार!

कौतुक, लाजो, शिल्पा लय भारी!

चारोळ्या म्हणजे चारच ओळी असाव्यात ना त्यात?

तुम्ही झणझणीत मिसळीसाठी कुठला मसाला वापरता हो?
आम्ही कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीरगॅसवर भाजून वापरतो.
आम्ही नाय बा, आम्ही आणतो विकत मस्त रेडीमेड मसाला.
तरीच तुमची मिसळ फिक्की, कायम वापरा "कुलकर्णी मसाला"

फरसाण पोहतंय तर्रीत,
वर लिंबू-कोथिंबीर गुर्मीत,
मटकीची उसळ दडून बसली,
कांदा-लसूण मसाल्याच्या वाडीत.

तर्रीवर तर्री, ही मिसळीची तर्री,
लिंबा-कोथिंबीरीने केले, निवेदन जारी,
आली त्यावर लगेच सही, फरसाणाची,
उसळीला ओढ, कांदा-लसूण मसाल्याची

Pages