चारोळी स्पर्धा...मसाला मार के...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 March, 2012 - 01:25

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!

Box 18 x 18 inch.jpg

'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे 'मसालेदार' चारोळ्या रचण्याची!

ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हांला चारोळ्या रचण्यासाठी एखादं छायाचित्र, किंवा एखादा विषय देऊ.
तुम्ही झक्कास चारोळ्या रचायच्या, आणि इथे लिहायच्या..

स्पर्धेचे नियमही खूप सोपे..

१. दिलेल्या छायाचित्रावर किंवा विषयावर तुम्ही चारोळी रचायची आहे.

२. चारोळी अर्थातच मराठीत असावी.

३. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक चारोळ्या स्पर्धेसाठी इथे लिहू शकतो.

४. तुमच्या प्रवेशिका तुम्ही त्या त्या स्पर्धेच्या धाग्यावर टाकायच्या आहेत. कृपया स्वतंत्र धागा सुरू करू नये.

५. चारोळ्या तुम्ही स्वतः रचलेल्याच असाव्यात. इतरत्र टाकलेल्या, पूर्वप्रकाशित, आक्षेपार्ह मजकूर असलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. शिवाय त्या लगेच अप्रकाशित केल्या जातील.

६. प्रत्येक स्पर्धेसाठी एक विजेता निवडला जाईल.

७. बक्षीस हे कल्पकता, चारोळीची रचना तसेच चारोळीतून पदार्थ आणि त्यातील मसाले यांची कशी सांगड घातली आहे, ह्यावर अवलंबून असेल.

६. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहतील मायबोलीचे मा. वेबमास्तर आणि मा. प्रशासक. Happy

***

चारोळ्या रचण्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं छायाचित्र...

misal.JPG

या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..

एखाद्या पदार्थाचं छायाचित्र, दुरून येणारा मसाल्याचा वास जसा भूक वाढवतो, तसंच हे मिसळीचं छायाचित्र पाहून चारोळया रचण्यासाठी सज्ज व्हा... !

***

मिसळीचं छायाचित्र मिनोती यांच्या सौजन्याने, © मिनोती.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इथे गाडी सायडिंगला टाकल्याचा सौंशेव येतोय<<<<<<<< 'मिसळ एक्सप्रेस' ची एकदम 'बार्शी लाईट' झाली की काय? Proud

ठाण्यातली मामलेदाराची मिसळ
असते तिखट, ज्वलज्जहाल !!
जो जो खाईल तो तो पाहील,
त्या-त्या क्षणी, स्वप्नांचे महाल !!

सुहास जोशींच्या "आमंत्रण" मध्ये
मिसळ असते थोडी मवाळ,
शाळा-कॉलेजच्या दिवसांपासून,
खातोय आम्ही सारे टवाळ !
Happy

चारोळ्यांच्या या आरोळ्या
तर्हतर्हेच्या मिसळीवर लिहिल्या
आवडल्या त्या आवडल्या,
नावडत्या तलावपाळीला वाहिल्या !

मिसळीवर लिहिल्या चार-चार ओळी
त्यांची तयार झाली मस्त चारोळी
एप्रिल फूल च्या दिवशी मायबोलीवर
चारोळीतून प्रसिद्ध झाली ही आरोळी !

हिरवीगार कोथिंबीर आणि लिंबाची फोड
वाटाणे- मटकीची मस्सालेदार उसळ
तर्रेदार कटाला हवी फरसाणाची जोड
मित्रांसोबत खाऊया झणझणीत मिसळ !!!

Pages