मराठी भाषा दिवस २०१२ स्पर्धा - निकाल

Submitted by संयोजक on 7 March, 2012 - 02:50

palakhi.jpgमराठी भाषा दिवस २०१२ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

म..म..मराठी, ग..ग..गोष्टी

परीक्षकांचे मनोगत :
गेल्या काही दिवसांमध्ये इथे, मायबोलीवर, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या "नेहमीच्या गंमतगोष्टी" आणि "चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी" ह्या स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिका पाहणं/ऐकणं/वाचणं हा आमच्यासाठी एक आनंदानुभव होता. संयोजक मंडळाने या स्पर्धेसाठी आम्हाला परीक्षक म्हणून नेमल्यामुळे हा आनंदानुभव आम्हाला मन:पूत घेता आला याबद्दल आम्ही संयोजक मंडळाचे आभारी आहोत आणि आशा करतो आहोत की यात भाग घेतलेल्या पालकांना पण, ह्या प्रवेशिका त्यांच्या पाल्यांबरोबर तयार करतांना, ह्या आनंदाचा अनुभव आला असेल आणि कुठल्याही बक्षिसापेक्षा हा निखळ आनंद मोठा आहे, महत्त्वाचा आहे, हेही ते उमजून असतील.
एकूण सत्तेचाळीस प्रवेशिकांपैकी तीस प्रवेशिका दोन ते बारा या वयोगटातील (नेहमीच्या गंमतगोष्टी) आणि सतरा प्रवेशिका तीन ते चौदा या वयोगटातील (चित्रसंचावर आधारित गोष्टी) होत्या. पहिल्या गटात सहा कथन-चित्रण तर चोवीस फक्त कथन अशा वर्गवारीत होत्या. तीन ते चौदा या गटातील वर्गवारी आठ कथन आणि नऊ लेखन याप्रमाणे होती.
पहिल्या गटात दोन ते पाच वर्षांपर्यंतचे चौदा स्पर्धक, पाच ते आठ वर्षांपर्यंतचे चौदा स्पर्धक आणि आठ ते नऊ वर्षांपर्यंतचे दोन स्पर्धक होते तर दुसर्‍या गटात एक पावणे पाच वर्षाचा स्पर्धक सोडल्यास बाकी सात ते तेरा वर्षे या वयाचे स्पर्धक होते.
परीक्षण करताना आमच्या लक्षात एक गोष्ट अशी आली की "नेहमीच्या गंमतगोष्टी" मध्ये वैविध्य कमी होतं. ठराविक एक दोनच गोष्टी, त्याही काही पिढ्या जुन्या असलेल्या, कथनात वापरलेल्या दिसल्या. याचे कारण खरोखरच लहान मुलांना त्याच गोष्टी आवडतात की फक्त त्याच गोष्टी त्यांच्या कानावर पडलेल्या आहेत ह्याचा विचार करायला हवा. चित्रसंचावर आधारित कथांमध्ये लिहिलेल्या किंवा ध्वनिमुद्रित केलेल्या प्रवेशिकांमध्येसुद्धा अजून विविधता, कल्पनाशक्तीचा वापर स्वागतार्ह ठरला असता. काही गोष्टींमधे चारही चित्रांचा वापर केवळ आवश्यक आहे म्हणून निव्वळ उल्लेख करून सोडून देण्याकडे प्रवृत्ती दिसली.
महाराष्ट्रापासून, किंबहुना देशापासूनही दूर निवासी असल्यामुळे बर्‍याच स्पर्धकांना मराठी शब्दांचे उच्चार कठीण वाटत होते आणि इंग्रजी लकबीने ते उच्चारण्याची सवय जडलेली लक्षात आली. तथापि हा मुलांचा दोष म्हणता येणार नाही त्यामुळे परीक्षण करताना या त्रुटीकडे शक्य तितका कानाडोळा केला आहे.
गुणवत्तेचे परीक्षण करताना पहिल्या गटामधे गोष्ट स्वत: सांगणे, पालकांकडून वाजवीपेक्षा अधिक सूचना (प्रॉम्प्टिंग) नसणे, स्वच्छ आवाज, स्पष्ट उच्चार, १ ते ३ मिनिटांच्या मर्यादेचे वाजवीपेक्षा जास्त उल्लंघन नसणे आणि सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, एकसुरीपणा नसणे, कथनात भावनांची व्यवस्थित अभिव्यक्ती आणि एकंदरीत परिणामकारकता हे निकष लावण्यात आले होते. ही स्पर्धा पाल्यांकरिता असल्यामुळे पालकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल पूर्ण आदर ठेवूनही, गुणवत्तेच्या मोजमापात त्या अंगाला जाणीवपूर्वकच स्थान दिले नव्हते.
दुसर्‍या गटामधे गोष्ट लिखित स्वरुपात असल्यास ती स्वरचित आणि स्वलिखीत असणे, एका चित्रसंचातील सर्व चित्रांचा वापर, तोही निव्वळ उल्लेखापेक्षा जास्त आणि चपखल असणे, हस्ताक्षर, गोष्टीची लांबी, आणि कथित स्वरुपात असल्यास पालकांकडून वाजवीपेक्षा अधिक सूचना (प्रॉम्प्टिंग) नसणे, स्वच्छ आवाज, स्पष्ट उच्चार, १ ते ३ मिनिटांच्या मर्यादेचे वाजवीपेक्षा जास्त उल्लंघन नसणे आणि सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, एकसुरीपणा नसणे, कथनात सुसूत्रता, भावनांची व्यवस्थित अभिव्यक्ती आणि एकंदरीत परिणामकारकता हे निकष ठेवले होते.
या सर्व निकषांवर घासून पाहिल्यावर आम्ही परीक्षक पुढील स्पर्धकाना विजेते म्हणून अभिवादन करीत आहोत.
नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट २ ते ५ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका ५ स्पर्धक [इरा] प्रेषक [रैना] शीर्षक [बुड बुड घागरी]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ९ स्पर्धक [श्रीशैल] प्रेषक [इंद्रधनुष्य] शीर्षक [मैत्रीची गंमत]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका ३८ स्पर्धक [मनस्वी बाचल] प्रेषक [मंगेशमनु] शीर्षक [चिऊकाऊची गोष्ट]
विजेता क्रमांक ४ - प्रवेशिका ७ स्पर्धक [तनिष] प्रेषक [Manasi-Patil] शीर्षक [लाकूडतोड्याची गोष्ट]

नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट ५ ते ८ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका ४७ स्पर्धक [मुक्ता] प्रेषक [स्मिताके] शीर्षक [दगडाचं सूप]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका २२ स्पर्धक [ईषू] प्रेषक [मवा] शीर्षक [कबुतर आणि मुंगी]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका ३१ स्पर्धक [मैत्रेयी] प्रेषक [संपदा] शीर्षक [गोगलगाय व चिमणी]

नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट ८ ते १२ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका १ स्पर्धक [नचिकेत] प्रेषक [पौर्णिमा] शीर्षक [शब्द म्हणजे शस्त्र]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका १० स्पर्धक [शंतनू शिंदे] प्रेषक [शर्मिष्ठा] शीर्षक [धाडसी सावरकरांची गोष्ट]

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी – वयाचा गट ३ ते १४ वर्षे - उपगट लेखन
विजेता क्रमांक १ – प्रवेशिका १६ स्पर्धक [अवनी] प्रेषक [मंजिरी] शीर्षक [स्वप्नातील सायकल]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ११ स्पर्धक [राहुल] प्रेषक [लोला] शीर्षक [सोनेरी सायकल]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका १५ स्पर्धक [मानसी कुलकर्णी] प्रेषक [अनघा_कुल] शीर्षक [जंगलातले साहस]

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी – वयाचा गट ३ ते १४ वर्षे - उपगट कथन
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका २४ स्पर्धक [अक्षज] प्रेषक [बिल्वा] शीर्षक [राजूची गोष्ट]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ४० स्पर्धक [साजिरी] प्रेषक [साजिरा] शीर्षक [चिंकीची गोष्ट]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका २९ स्पर्धक [अनन्या] प्रेषक [मी अनन्या] शीर्षक [थापाड्या चिंटू]
विजेता क्रमांक ४ - प्रवेशिका १९ स्पर्धक [मनस्व मादुस्कर] प्रेषक [Monalip] शीर्षक [मॅजिक टोमॅटो]

- mkarnik, अनुदोन

वेळात वेळ काढून, सर्व प्रवेशिका तपासून, निकष ठरवून, ही जबाबदारी यथायोग्य पार पाडल्याबद्दल मुकुंद कर्णिक आणि विद्युल्लता महाबळ यांचे संयोजनमंडळातर्फे मनःपूर्वक आभार. फार मोठे काम केले आपण!
_____________
मी मराठी
विजेता सभासद: HH
_____________
कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार
विजेते सभासद: भरत मयेकर,अश्विनीके, मन्या२८०४
_____________
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

*****************
स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे) ह्यांचे आम्ही शतश: आभारी आहोत.

प्रायोजक समकालिन प्रकाशन- नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणारे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.
खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीतील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.
samakaaleen%20prakaashan%20logo.jpg

******************
नियमावली

१. सर्व विजेत्यांना ईमेलद्वारे संपर्क करून पारितोषिक कसे घेऊन जावे हे सविस्तर कळवण्यात येईल. पारितोषिक हवे असल्यास आपले खरे नाव, पत्ता कळवणे बंधनकारक असेल.
२. सर्व बालस्पर्धकांना संयोजन मंडळातर्फे पीडीएफ स्वरुपात प्रशस्तीपत्रक पाठवण्यात येईल. प्रशस्तीपत्रक हवे असल्यास त्यासाठी पाल्याचे नाव कळवणे बंधनकारक असेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला निकाल! वा!!
सर्व पिल्लू विजेत्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि विजेत्या मायबोलीकरांचं हार्दिक अभिनंदन करतो. Happy

आता परीक्षकांचं मनोगत पुन्हा वाचतो. Happy

Happy

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, त्याचबरोबर सर्व सहभागी बालकलाकारांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन.. Happy

ह्या कार्यक्रमामुळे, बाल गोपालांच्या गोष्टींमुळे मराठी दिन अगदी "गोssड" साजरा झाला, त्यासाठी संपुर्ण टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद! Happy

भरतजी, अश्वीनी के, मया >> सहीच, अभिनंदन तुमचेही...

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. Happy विशेषतः बालस्पर्धकांचे कौतुक Happy
सुरेख कार्यक्रम आखणीसाठी संयोजकांना स्पेशल धन्यवाद Happy

समकालीन प्रकाशनास शुभेच्छा! Happy

माझ्या छोट्या प्रिय दोस्तांचे आणि त्यांच्या आईबाबांचे मनःपुर्वक अभिनंदन. खूपच भरघोस प्रतिसाद मिळाला ह्यावेळी.

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!! Happy

परिक्षण करताना आमच्या लक्षात एक गोष्ट अशी आली की "नेहमीच्या गंमतगोष्टी" मध्ये वैविध्य कमी होतं. ठराविक एक दोनच गोष्टी, त्याही काही पिढ्या जुन्या असलेल्या, कथनात वापरलेल्या दिसल्या. याचे कारण खरोखरंच लहान मुलांना त्याच गोष्टी आवडतात की फक्त त्याच गोष्टी त्यांच्या कानावर पडलेल्या आहेत ह्याचा विचार करायला हवा. चित्रसंचावर आधारित कथांमध्ये लिहिलेल्या किंवा ध्वनिमुद्रित केलेल्या प्रवेशिकांमध्येसुद्धा अजून विविधता, कल्पनाशक्तीचा वापर स्वागतार्ह ठरला असता. काही गोष्टींमधे चारीही चित्रांचा वापर केवळ आवश्यक आहे म्हणून निव्वळ उल्लेख करून सोडून देण्याकडे प्रवृत्ती दिसली.>>>> परीक्षकांच्या या निरीक्षणाशी मी असहमत आहे.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! आणि सर्व बालकलाकारांचे खूप खूप कौतुक व अभिनंदन! या पिल्लांचे आवाज, त्यांनी सांगितलेल्या गोड गोष्टी, त्यांचे व्हिडियोत दिसलेले आविर्भाव, ठसके, उच्चार.... सगळंच गोड! निर्व्याज निरागसता अनुभवायला मिळाली त्यांच्या गंमत गोष्टी ऐकताना! Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन Happy

(अवांतर - वर निकालाच्या यादीत दोन ठिकाणी 'उत्तेजनार्ह' झालंय, ते सुधारणार का?)

ललिता-प्रीती,

'उत्तेजनार्ह' हाच शब्द बरोबर आहे 'उत्तेजनार्थ' नाही.

अजून एक गंमतीदार उदारहरण. शाळेतील काही विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्रके पाहिली. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्ह असे गट असतात. पण "उत्तेजनार्ह' हा शब्द त्या प्रशस्तीपत्रकांवर "उत्तेजनार्थ' असा चुकीचा लिहिला जातो. मुळात ज्याची उत्तीर्ण होण्याची आर्हता आहे तो "उत्तेजनार्ह' असतो.

हे वाचः http://kushthink.blogspot.com/

मुळात ज्याची उत्तीर्ण होण्याची आर्हता आहे तो "उत्तेजनार्ह' असतो.>>>> हे स्पष्टीकरण पटत नाही.

स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे) >>>> हे वाक्य पूर्ण करायला हवं आहे.

स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे) >>>> हे वाक्य पूर्ण करायला हवं आहे.

मंजूडी, चुक दुरुस्त केली आहे. धन्यवाद.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
Happy
उपक्रमाला छोटूछोटू कलाकारांकडून भरघोस प्रतिसाद मिळालाय..
त्यांना या उपक्रमात भाग घेण्यास उत्तेजन दिल्याबद्दल त्यांच्या पालकांचे खूप अभिनंदन..

सर्व विजेत्यांचं आणि ह्या स्पर्धांमधून सहभागी झालेल्या बाकी सर्वांचंही मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या सहभागामुळे आम्हाला गेला आठवडाभर खूप छान ऐकायला, वाचायला, बघायला मिळालं Happy

सर्व विजेत्यांचं अभिनंदन Happy

वर बक्षिसांसंदर्भात 'उत्तेजनार्ह' हा शब्द वापरण्यात आला आहे, तो चूक आहे. तिथे 'उत्तेजनार्थ' हाच शब्द हवा.
उत्तेजनार्ह = उत्तेजन देण्यास योग्य
उत्तेजनार्थ = उत्तेजन देण्यासाठी

उत्तेजनार्थ बक्षीस हे उत्तेजन देण्यासाठी असते. 'उत्तेजन देण्यास योग्य' बक्षीस म्हणजे काय? Happy

तसंच वरच्या मजकुरात असंख्य चुका आहेत. कृपया मुद्रितशोधन कराल का? मराठी भाषा दिनानिमित्तानं हे कार्यक्रम आहेत, म्हणून शुद्धलेखनाच्या चुका असू नयेत, ही अपेक्षा. Happy

Pages