मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sashal, maminna dili ti suchana tulahi parat dewu Ka? Khaya na piya gilaas toda bara aana. LOL!

Are ithale raatrapalitle sanyojak kuthe gele?

Nai milali ter nai milali cadbury pan jyanna milel tyanchya karta taalya tari wajwu.

बुवा तुम्ही 'शेंका' मुद्दामहून विंग्रजीत लिहिलय. मला ती शिवी वाटतेय. Happy मराठीच्या धाग्यावर इंग्रजी लिहिणार्‍यांचा णिशेद! मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत लिहा बुवा, बुवा. Happy

मीच माझा ग्लास तोडू का बुवा?मला माहित नाही की दैनंदिनी नावाचं पुस्तक आहे की नाही. Uhoh

Maamisaab, tumhala kashi shivi dein, ithe yewun. Hannar naahi Ka tumhi mala?
Aaho dadanstyle shanka mhanlo yewdhach. Happy

Aaho computer baaykoni confiscate kelay mhanun phone warun type kartoy.

Shumpi, kaay sanga? Matka laagunahi jaail?

मराठीच्या धाग्यावर इंग्रजी लिहिणार्‍यांचा णिशेद! मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत लिहा Mingraji hi bhasha ahe , Marathi ani English donhi madhe ti valid dhartat :p

बुवा बायकोने कॉम्प घेतला कारण तुम्ही तिच्याबरोबर वेळ घालवावा म्हणून. त्यामुळे इथे खेळत बसू नका. उगाच मला जास्त कॉम्पिटिशन नकोय;)

सोनाली तुम्ही प्राणी/पक्षी आणि वैद्यबुवा तुम्ही पदार्थाचे नाव चुकीचे दिल्याने तुमच्या एंट्रीज बाद ठरून शूम्पीला बक्षिस मिळत आहे.

शूम्पी अभिनंदन!

cadburry_1.jpg

Waah waah! Shumpi, abhinandan!

Aho pan anya kuthlya bhaashet dahi butti kadhi aikla nawta. Nemka kuthla padaartha aahe mag?

येस्स! आता मी सुखाने डोळे मिटते!
सशल, मामी, बुवा, डीज्जे,सोनाली तुम्ही पण घ्या माझ्यातला एखादा तुकडा.

कर्नाटकातला असेल बुवा..जे आपलंवाटतं आणि आपलं नसतं ते शेजार्‍यांचं असतं( गाणगापूर सारखं)

संयोजकांनी विभागायच्या आधीच मी बक्षिस विभागून खाल्लं हे कृपया ल़क्शात घ्या Wink

धन्यवाद शूम्पी. Happy
अरेच्चा, बुवांआ पण मिळालं बक्षिस. आता मला क्याडबरीचे दोन दोन तुकडे मिळणार. Happy

अभिनंदन शूम्पी अन बुवा.

१. मराठी नाव - हर्षिता
२. महाराष्ट्रातील गाव - हरचिरे/ हरचेरी (रत्नागिरी जिल्हा.)
३. मराठी कलाकाराचे नाव - हिराबाई बडोदेकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - हसगत (दिलीप प्रभावळकर)
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - हरी नारायण आपटे
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - हेमा लेले
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - हसतील त्याचे दात दिसतील
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - हापूस
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - हिरव्या मिरचीचे लोणचे
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - हंस
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - हरिश्चंद्रगड
१३. मायबोली आयडी - हेम्स

मराठी नाव - हेमंत
२. महाराष्ट्रातील गाव - हिंजवडी
३. मराठी कलाकाराचे नाव :नंदू होनप
४. मराठी पुस्तकाचे नाव हरवलेले दिवस (प्रभाकर उर्ध्वरेषे)
५. मराठी लेखक/लेखिका - हरी नारायण आपटे
६. मराठी कवी/कवयित्री - हेमंत दिवटे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - ही वाट दूर जाते
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - हाजीर तो वजीर
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - हापूस
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- हलवा (संक्रांतीचा)
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - हिरवा होला
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - हरिशचंद्रगड
१३. मायबोली आयडी - हिम्सकूल

१. मराठी नाव - हेमा
२. महाराष्ट्रातील गाव - हींगोली
३. मराठी कलाकाराचे नाव - हंसा वाडकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - हॅट घालणारी बाई
५. मराठी लेखक/लेखिका - हमीद दलवाई
६. मराठी कवी/कवयित्री - हिरा बनसोडे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - ही गुलाबी हवा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण -हातच्या कंकणाला आरसा कशाला?
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - हुप्पा हुय्या
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- हुरडा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी:हरण
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - हरीहरगड
३. मायबोली आयडी: हसरी

१. मराठी नाव - हेमा
२. महाराष्ट्रातील गाव - हरिहरेश्वर
३. मराठी कलाकाराचे नाव - हेमांगी कवी
४. मराठी पुस्तकाचे नाव - हरवलेले दिवस
५. मराठी लेखक/लेखिका - ह.ना.आपटे
६. मराठी कवी/कवयित्री - हिमांशु कुलकर्णी
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - हिची चाल तुरू तुरू
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - हातच्या कंकणाला आरसा कशाला
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - ही पोरगी कुणाची
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- हुरडा/हुळा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - हळद्या
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - हरिश्चंद्रगड
१३. मायबोली आयडी - हिम्सकूल

बादवे फोंडा हे गाव सिंधुदुर्गात पण आहे बरंका. फोंडा घाटाच्या पायथ्याशी. तिथे खूप मोठा पान-बाजार भरतो. पार कर्नाटकापासून ट्रक भरून येतात पानाचे. हातांवर रूमाल टाकून भाव ठरवला जातो. महत्वाचं गाव आहे.

वरती कुठेतरी बाद केलेलं दिसलं म्हणून सांगितलं. Happy

एक प्रश्न आहे. माबो आयडी हे सद्य माबो आयडीच घ्यायचे ना?
नाही म्हणजे आता आयडी बदललेला असेल पण आधी वेगळा आयडी असेल म्हणजे उदाहरणार्थ (अ होऊन गेल्याने हरकत नाही) माझा पूर्वी अज्जुका होता तो बदलून आताचा आहे तो केलाय तर कोणी अज्जुका लिहिला तर? तो फाऊल की व्हॅलिड?

. मराठी नाव : नलिनी
२. महाराष्ट्रातील गाव : नागपूर,
३. मराठी कलाकाराचे नाव : नयनतारा
४. मराठी पुस्तकाचे नाव : नीहार (पद्मा यांचा कवितासंग्रह)
५. मराठी लेखक / लेखिका : ना.सी.फडके
६.मराठी कवी / कवयित्री : ना,धों.महानोर
७.मराठी गाणे किंवा कविता : नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण : नकतीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : नटसम्राट
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव : नारळीभात
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : नीलगाय
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची : नळदुर्ग
१३: मायबोली आयडी : नानबा

१. मराठी नाव - नेहा
२. महाराष्ट्रातील गाव - नांदेड
३. मराठी कलाकाराचे नाव -नीना कुलकर्णी
४. मराठी पुस्तकाचे नाव - नातिचरामि
५. मराठी लेखक/लेखिका - भालचंद्र नेमाडे
६. मराठी कवी/कवयित्री - ना.धो.महानोर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - नाही खर्चिली कवडी दमडी
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - न कर्त्याचा वार शनिवार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - नकळत सारे घडले
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- निवग-या
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - नीलगाय
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - नळदुर्ग
१३. मायबोली आयडी - नंदन

१. मराठी नाव : नीशा
२. महाराष्ट्रातील गाव: नांदेड
३. मराठी कलाकाराचे नाव : नाना पाटेकर
४. मराठी पुस्तकाचे नाव : नातिचरामी
५. मराठी लेखक / लेखिका : न. म. जोशी
६.मराठी कवी / कवयित्री : नयना मोरे (मायबोलीवरची : मी आर्या)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : नको रे नंदलाला
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.): नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : नटरंग
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव : निनावं
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : नीलगाय
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : निवतीचा किल्ला
१३. मायबोली आयडी : नंदिनी

मराठी नाव - नयना
२. महाराष्ट्रातील गाव - नाशिक
३. मराठी कलाकाराचे नाव - नीळु फुले
४. मराठी पुस्तकाचे नाव - नर्मदेSSहर
५. मराठी लेखक/लेखिका - ना. ह. आपटे
६. मराठी कवी/कवयित्री - नारायण सुर्वे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - नाच रे मोरा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण -नाचता येइना अंगण वाकडे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - नटरंग
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- नारळीभात
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी: नीळकंठ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे -नळदुर्ग
३. मायबोली आयडी: नील_वेद

Pages