मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जास्त क्याडबर्‍या मिळावणार्‍यांना मग कवळ्याही द्या. इतक्या कॅडबर्‍या खाऊन दात किडतीलच त्यांचे! Lol

१. मराठी नाव - लीलावती
२. महाराष्ट्रातील गाव - लासलगाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - लक्ष्मीकांत बेर्डे
४. मराठी पुस्तकाचे नाव - लिळाचरित्र
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - लक्ष्मण माने
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - लक्ष्मीबाई टिळक
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - लेक चालली सासरला
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - लवंगलतिका
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - लांडोर, लांडगा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - लोहगड
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - लाजो

१. मराठी नाव - धनंजय
२. महाराष्ट्रातील गाव - धामणगाव, धुळे
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - धनंजय दैठणकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - धाकटी पाती
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - नारायण धारप
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - अश्विनी रमेश धोंगडे
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - धरले की चावते सोडले की पळते
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - धाकटी सून
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - धिरडे
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - धामण
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - धोडप
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - धनश्री६

१. मराठी नाव - धवल
२. महाराष्ट्रातील गाव - धामणगाव
३. मराठी कलाकाराचे नाव - बाळ धुरी
४. मराठी पुस्तकाचे नाव - धुक्यातून लाल तार्‍याकडे
५. मराठी लेखक/लेखिका - धारप नारायण
६. मराठी कवी/कवयित्री - अश्विनी धोंगडे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - धरा धरा हो पकडा त्याला बिल्कुल सोडु नका
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - धनवंताला दंडवत
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - धाकटी जाऊ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- धपाटे
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - धामण
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - धोडप
१३. मायबोली आयडी -धनंजय

हह, माझी उत्तरं जास्त चांगली आहेत तुझ्यापेक्षा Proud तुला बक्षिस मिळाले की पब्लिश करेन.
धोडप किल्ला ऐकूनही माहित नाही Sad

१. मराठी नाव - धनश्री
२. महाराष्ट्रातील गाव - धुळे
३. मराठी कलाकाराचे नाव - धुरी बाळ
४. मराठी पुस्तकाचे नाव - धर्मात्मा
५. मराठी लेखक/लेखिका - धनंजर कीर
६. मराठी कवी/कवयित्री - धोंगडे अश्विनी
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - धुंदीत राहू मस्तीत गाऊ
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - धन्य ते संताजी धनाजी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- धपाटे
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - धनेश
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - धोडप
१३. मायबोली आयडी - धुंद रवी

चांगली उत्तरे Lol ध चे बक्शिस अरुंधतीला मिळणार पौर्णिमा मला नाही.
धोडप मलाही माहित नाही. विकीवरूनच मीळवला Proud
एक धोडपकर म्हणून आडनाव माहित होते फक्त.

संयोजकांनी ल ची कॅडबरी दिलीच नाही. नवीन अक्षरच दिलं थेट! संपल्या वाटतं कॅडबर्‍या. आता किटकॅट द्या ओ. वेगळं काहीतरी. लवकर द्या. माझी उत्तरं मला लिहायची आहेत, किल्ला वगळता.

आईशॉट. अकुची आणि माझी केवढी उत्तरं सारखी आहेत!! हे बघा-
मराठी नाव - धनश्री
२. महाराष्ट्रातील गाव - धुळे
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - उर्मिला धनगर
४. मराठी पुस्तकाचे नाव - धाकटी पाती
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - पुरुषोत्तम धाक्रस
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)- अश्विनी धोंगडे
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - धाव धाव विठू आता
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - धूमधडाका
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - धिरडं
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - धामण
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - Sad
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - धनश्री६

मलाही. पण त्याचं नाव मोठं आहे म्हणून लिहीलं नाही Wink
आता 'धकधक करने लगा' बसलंय तोंडात! Proud

मजा आली ह्या खेळात संयोजक. न्यवाद!

धन्यवाद धन्यवाद. पुढचे अक्षर द्या लवकर.
माझ्या खात्यात तीन कॅडबर्‍या जमल्या की मी ब्रेक घेणार. (लोकलज्जेस्तव :फिदी:)

हह, एक कॅडबरी मला दे तुझ्यातली. चित्रहारातला एक मणी ओळखूनही संयोजकांनी मला दिली नाहीये कॅडबरी. अण्याव झालाय माझ्यावर Wink

संयोजक Light 1 घ्या हो! गंमत करतेय Happy

हह काल रात्रीपासून चिकटून बसलीये तरी तीनच? काय हे हह? Wink
आम्ही बघा एक धावती भेट दिली आणि एक कॅडबरी घेऊन गेले

हह Light 1

Pages