मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी नाव - भास्कर
२. महाराष्ट्रातील गाव - भिगवण
३. मराठी कलाकाराचे नाव : भास्करबुवा बखले
४. मराठी पुस्तकाचे नाव: भाउसाहेबांची बखर
५. मराठी लेखक/लेखिका - श्री. दुर्गाबाई भागवत /श्री भीमराव आंबेडकर.
६. मराठी कवी/कवयित्री - भा.रा. तांबे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - भय इथले संपत नाही.
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - भेट तुझी माझी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- भडंग.
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - भेकर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - भैरवगड.
१३. मायबोली आयडी - भक्ती

१. मराठी नाव - भामिनी
२. महाराष्ट्रातील गाव - भातगाव
३. मराठी कलाकाराचे नाव - भाटवडेकर दाजी
४. मराठी पुस्तकाचे नाव - भटक्या वाटा
५. मराठी लेखक/लेखिका - भागवत दुर्गा
६. मराठी कवी/कवयित्री - भास
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - भवानी आई रोडगा वाहिन तुला
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - भित्यापाठी ब्रह्मराक्षस
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - भुताचा भाउ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- भडंग
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - भारद्वाज
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - भुदरगड
१३. मायबोली आयडी - भिडे दीपक

मी इतकी स्लो की माझं लिहून होईतो ४-५ जणांचं झालं...जौदे ..

१. मराठी नाव - फुलवा
२. महाराष्ट्रातील गाव - फोंडा
३. मराठी कलाकाराचे नाव - फैयाझ
४. मराठी पुस्तकाचे नाव - फास्टर फेणे
५. मराठी लेखक/लेखिका - फ. म. शहाजिंदे
६. मराठी कवी/कवयित्री - फ.मु.शिंदे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - फुलले रे क्षण माझे
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - फुकटचा च्या आन घुटुघुटु प्या!
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - फॉरीनची पाटलीण
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- फणसपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - फुरसे
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - फतेहगड
१३. मायबोली आयडी - फालकोर

१. मराठी नाव - फुलवंती
२. महाराष्ट्रातील गाव - फलटण
३. मराठी कलाकाराचे नाव - फैयाज
४. मराठी पुस्तकाचे नाव - फुरसुंगीचा फास्टर फेणे
५. मराठी लेखक/लेखिका - फिरोझ रानडे
६. मराठी कवी/कवयित्री - फ. मु. शिंदे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - फिटे अंधाराचे जाळे
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - फट् म्हणता ब्रह्महत्या
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - फू बाई फू
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- फोडणीचा भात, फेण्या
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - फुरसं
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - फत्तेगड
१३. मायबोली आयडी - फचिन

साप हा प्राणी नाही का ? Proud
स्वाती, आपली बरीच उत्तरं सारखी आहेत Happy फू बाई फू मीही लिहिणार होते पण नाटक आहे की सिरियल ह्यात गोंधळ झाला Happy

-

अगो, फोंडा गाव महाराष्ट्रात येत नसल्याने आपली एंट्री बाद होत आहे.
आणि पुन्हा एकदा स्वाती_आंबोळे तुम्हाला ही भेट.

cadburry_4.jpg

अभिनंदन!

१. मराठी नाव: कविता
२. महाराष्ट्रातील गाव: कोल्हापूर
३. मराठी कलाकाराचे नाव : कानन कौशल
४. मराठी पुस्तकाचे नाव: कुरुक्षेत्र ( सुबोध जावडेकर )
५. मराठी लेखक / लेखिका : कविता महाजन
६.मराठी कवी / कवयित्री : केशवसूत
७.मराठी गाणे किंवा कविता : का रे दुरावा का रे अबोला
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: करावे तसे भरावे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: कळत नकळत
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: करंजी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: कोल्हा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: कर्नाळा
१३. मायबोली आयडी : कविन

१. मराठी नाव - कुसुम
२. महाराष्ट्रातील गाव - कोपरगाव
३. मराठी कलाकाराचे नाव - कुलदीप पवार
४. मराठी पुस्तकाचे नाव - काठ
५. मराठी लेखक/लेखिका - कुसुमाग्रज
६. मराठी कवी/कवयित्री - केशवसूत
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - काखेत कळसा गावाला वळसा
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - कन्यादान
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- करंजी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - कावळा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - कमलगड
१३. मायबोली आयडी - कोमल

१. मराठी नाव - केदार
२. महाराष्ट्रातील गाव - केळशी
३. मराठी कलाकाराचे नाव -कुलदीप पवार
४. मराठी पुस्तकाचे नाव - काचकमळ
५. मराठी लेखक/लेखिका - कमलाकर सोनटक्के
६. मराठी कवी/कवयित्री - केशवसुत
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - केव्हातरी पहाटे
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण -कानामागून आली तिखट झाली
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - कुणासाठी कुणीतरी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- करंजी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - कावळा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - कागलगड
१३. मायबोली आयडी - केदार

. मराठी नाव - कविता
२. महाराष्ट्रातील गाव - कोल्हापूर
३. मराठी कलाकाराचे नाव - काशिनाथ घाणेकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - कायापालट
५. मराठी लेखक/लेखिका - कविता महाजन
६. मराठी कवी/कवयित्री - केशवसूत/कुसुमाग्रज
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - काय बाई सांगू
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - कानामागून आली तिखट झाली
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - कायद्याचं बोला
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- कडबोळं
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - कावळा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - कर्नाळा
१३. मायबोली आयडी - कार्ले

पुन्हा आमचं वरातीमागून घोडं

१. मराठी नाव - मालती
२. महाराष्ट्रातील गाव - महाड
३. मराठी कलाकाराचे नाव - मॄणाल कुलकर्णी
४. मराठी पुस्तकाचे नाव - मी माझा
५. मराठी लेखक/लेखिका - महादेवशास्त्री जोशी
६. मराठी कवी/कवयित्री - मंगेश पाडगावकर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - मालवून टाक दीप
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - मनातले मांडे मनात खाणे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - माणूस
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- मांडे
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - मोर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - माहुली
१३. मायबोली आयडी -मेधा

Pages