मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ही प्रकार झक्कास! मी काल मिसलं. फक्त ते पहिलं 'मराठी नाव' ही काय भानगड आहे ते कळलं नाही. नावात काय मराठी-अमराठी? मराठी आडनाव ठीक आहे.

रच्याकने, संयोजकांना बाराखडीतला 'प' चा संच विशेष आवडता दिसतोय. संपवलाच. Proud

१. मराठी नाव : देविका
२. महाराष्ट्रातील गाव : दादर/दापोडी
३. मराठी कलाकाराचे नाव : दादा कोंडके
४. मराठी पुस्तकाचे नाव : दुनियादारी
५. मराठी लेखक / लेखिका : दादोबा तर्खडकर
६.मराठी कवी / कवयित्री : देशपांडे आत्माराम
७.मराठी गाणे किंवा कविता : देहाची तिजोरी
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण : देव तारी त्याला कोण मारी
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : देखणी बायको दुसर्याची
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव : दहीभात/ दाण्याची चटणी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : देवचिमणी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : देवगड
१३. मायबोली आयडी : दक्षिणा

मराठी नाव - दमयंती
महाराष्ट्रातील गाव - दाभोळ
३. मराठी कलाकाराचे नाव - दादा कोंडके
४. मराठी पुस्तकाचे नाव - दुनियादारी
५. मराठी लेखक/लेखिका - द मा मिरासदार
६. मराठी कवी/कवयित्री - दिलीप चित्रे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - दिस जातील दिस येतील
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - दैव देतं कर्म नेतं
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - दे धक्का
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- दही बुत्ती
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - देवमासा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे -देवगड
१३. मायबोली आयडी - दक्षिणा

१. मराठी नाव - दिलिप
२. महाराष्ट्रातील गाव - दौलताबाद
३. मराठी कलाकाराचे नाव -दादा कोंडके/दिलिप प्रभावळकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - दैनंदिनी
५. मराठी लेखक/लेखिका - दुर्गा भागवत
६. मराठी कवी/कवयित्री - दिलिप चित्रे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किभागवत्दता - दाटूनकंठ्येतो
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - दाम करी काम
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - देउळ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- दडपे पोहे
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - देवमासा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - दौलताबादचा किल्ला
१३. मायबोली आयडी - दाद

देवगड गावाचं नाव आहे. किल्ला आहे का ?

मला ज आणि स वरुन सुरु होणारे किल्ले माहिती आहेत. लवकर ही अक्षरे द्या Wink

१. मराठी नाव : दमयंती
२. महाराष्ट्रातील गाव : दापोली
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : दाजी भाटवडेकर
४. मराठी पुस्तकाचे नाव : द्रोहपर्व
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : दिवाकर
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : ज्ञानेश्वर
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) : दात कोरून पोट भरणे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : दिवा जळू दे सारी रात
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीयन म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) : दडपे पोहे
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : माहित नाही
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : दुर्गाडी किल्ला
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) : दिनेशदा

देवगड किल्ला ही आहे बहुतेक. दक्षिणा आयडी होता ना तिचा? मामी, तुम्ही तुमची एंट्री ल्ह्या, दुसृयांच्या एंट्र्या बाद करु नका. Proud

१. मराठी नाव : दीपाली
२. महाराष्ट्रातील गाव : दौंड
३. मराठी कलाकाराचे नाव : दीपाली सय्यद
४. मराठी पुस्तकाचे नाव : दुनियादारी
५. मराठी लेखक / लेखिका : दामु धोत्रे
६.मराठी कवी / कवयित्री : दिलिप चित्रे
७.मराठी गाणे किंवा कविता : दमलेल्या बाबांची कहाणी
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण : दुरुन डोंगर साजरे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : दे दणादण
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव : दडपे पोहे
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : देवमासा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : दौलताबाद चा किल्ला
१३. मायबोली आयडी : दीपांजली

सशल मला कॅडबरी मिळाल्यास त्यात्ली अर्धी तुला देइन;)
मामी, ज्ञ हे वेगळं अक्षर की वो. हवीतर सशलला देउन उर्लेल्यातली अर्धी तुम्हाला देते:)

१. मराठी नाव - देवेन्द्र
२. महाराष्ट्रातील गाव - दौलताबाद
३. मराठी कलाकाराचे नाव - प्रशांत दामले
४. मराठी पुस्तकाचे नाव - दवबिंदू
५. मराठी लेखक/लेखिका - सुनिता देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - गो. नि. दांडेकर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - दादला नको ग बाई
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - देखल्या देवा दंडवत
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - दे दणादण
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- दहीवडा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - दयाळ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - देवगड
१३. मायबोली आयडी - देवा

ज्ञ वेगळं अक्षर काय. बरं बरं. बरोबर आहे. पण ज्ञानेश्वरांचं नाव लिहिलं म्हणून तरी द्याना क्याडबरी.

'द' पासून 'दीपांजली' न लिहिणार्‍या सगळ्यांचा णिषेध >>> Lol

पण ज्ञानेश्वरांचं नाव लिहिलं म्हणून तरी द्याना क्याडबरी.>> Happy फार्फार तर श व रून माझा आयडी लिहाल तर माझ्याचकडून एक कॅडबरीदेइन. डीजे, असं काहितरी ऑफर केलं असतस तर?

Thik ahe shoompi , jar koni k pasoon 'kafan' lihila tar tyala ek Halloween id bhet milel :p

१. मराठी नाव : दत्तात्रय
२. महाराष्ट्रातील गाव : दिवे आगर
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही )दादा कोंडके
४. मराठी पुस्तकाचे नाव : दुनियादारी
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : द.मा मिरासदार
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : दहाके वसंत
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : द द द..दत्ताची गाय..
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) : दाम करी काम
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : दे धक्का
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीयन म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) : दुधी हलवा
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : दयाळ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : दौलताबाद
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) : दक्षिणा

Aavo tasa nhai maami, tumhi shenkha kaadhta an sanyojakanchya dokyaat paal chukchukli ter phukat aamchi cadbury jaaychi. Lol

Pages