मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मराठी नाव: ममता
२. महाराष्ट्रातील गाव: मलकापूर
३. मराठी कलाकाराचे नाव : माया जाधव
४. मराठी पुस्तकाचे नाव: मृत्युंजय
५. मराठी लेखक / लेखिका : मधु मंगेश कर्णिक
६.मराठी कवी / कवयित्री : महेश केळूस्कर
७.मराठी गाणे किंवा कविता : मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: मरावे परि कीर्तीरूपी ऊरावे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: मोहित्यांची मंजूळा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: मोदक
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: मांजर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: मलंगगड
१३. मायबोली आयडी : मृण्मयी

१. मराठी नाव: गंगा
२. महाराष्ट्रातील गाव: गाणगापूर
३. मराठी कलाकाराचे नाव : गायत्री जोशी
४. मराठी पुस्तकाचे नाव: गणगोत
५. मराठी लेखक / लेखिका : गंगाधर गाडगीळ
६.मराठी कवी / कवयित्री : ग्रेस
७.मराठी गाणे किंवा कविता : गगनसदन
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: गाढवाला गुळाची चव काय
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: गारंबीचा बापू
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: गुळपोळी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: गाय
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: गगनबावडा
१३. मायबोली आयडी : गामा पैलवान

१. मराठी नाव: गौरी
२. महाराष्ट्रातील गाव: गुहागर
३. मराठी कलाकाराचे नाव : गिरिजा ओक
४. मराठी पुस्तकाचे नाव: गोष्टीवेल्हाळ ( मधुकर धर्मापुरीकर )
५. मराठी लेखक / लेखिका : गिरीजा कीर
६.मराठी कवी / कवयित्री : गोविंद विनायक करंदीकर
७.मराठी गाणे किंवा कविता : गोमू संगतीनं माझ्या तू येशील का
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: गंगेत घोडं न्हालं
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: गैर
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: गाजर हलवा
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: गाय
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: गोपाळगड ( गुहागर )
१३. मायबोली आयडी : गंगाधर मुटे

शूम्पी, गाणगापूर महाराष्ट्रात नाही. तसेच गगनबावडा हे गडाचे किंवा किल्ल्याचे नाव नसल्याने तुमची एंट्री बाद होत आहे.

संपदा, अभिनंदन!

cadburry_0.jpg

१. मराठी नाव: गिरीजा
२. महाराष्ट्रातील गाव: गाणगापूर
३. मराठी कलाकाराचे नाव : गिरीष ओक
४. मराठी पुस्तकाचे नाव: गोफ
५. मराठी लेखक / लेखिका : गौरी देशपांडे
६.मराठी कवी / कवयित्री : गुरु ठाकूर
७.मराठी गाणे किंवा कविता : गजानना श्री गणराया
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: गुरुदक्षिणा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: गोळा भात
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: गोरीला
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: गोवळकोंडा
१३. मायबोली आयडी : गायत्री

माझ तेच होतयं - गड्/किल्ल्याचे नाव सगळ्यात जास्त वेळ घेतयं माझा!! Sad
आणि आधी प्राणी-पक्ष्यानंही घोळ केला होता - मी महाराष्ट्रात दिसणारे प्राणी-पक्षी इतकाच विचार करत बसले. Happy
मग नीट सूचना पाहिल्या तर कोणत्याही प्राण्याचे मराठी नाव हे समजलं. Happy

१. मराठी नाव: बबन
२. महाराष्ट्रातील गाव: बुलढाणा
३. मराठी कलाकाराचे नाव : बाळ कर्वे
४. मराठी पुस्तकाचे नाव: बापलेकी
५. मराठी लेखक / लेखिका : बा सी मर्ढेकर
६.मराठी कवी / कवयित्री : बहिणाबाई
७.मराठी गाणे किंवा कविता : बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: बडा घर पोकळ वासा
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: बिनकामाचा नवरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: बासुंदी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: बगळा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: बाणकोट
१३. मायबोली आयडी : बी

१. मराठी नाव : बेला
२. महाराष्ट्रातील गाव : बिरवडी
३. मराठी कलाकाराचे नाव : बेला शेंडे
४. मराठी पुस्तकाचे नाव : बनगरवाडी
५. मराठी लेखक / लेखिका : बहिणाबाई
६.मराठी कवी / कवयित्री : बालकवी
७.मराठी गाणे किंवा कविता : बाई बाई मनमोराचा
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण : बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : ब्रम्हचारी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव : बासुंदी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : बिबट्या
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : बालेकिल्ला
१३. मायबोली आयडी : बिल्वा

१. मराठी नाव: बिल्वा
२. महाराष्ट्रातील गाव: बदलापूर
३. मराठी कलाकाराचे नाव : बेला शेंडे
४. मराठी पुस्तकाचे नाव: बापलेकी
५. मराठी लेखक / लेखिका : बहिणाबाई
६.मराठी कवी / कवयित्री : बी/बालकवी
७.मराठी गाणे किंवा कविता : बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण: बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव: बिनकामाचा नवरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव: बदामाचा शीरा
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव: बदक
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे: बलवंतगड
१३. मायबोली आयडी : बी

१. मराठी नाव - बकुळ
२. महाराष्ट्रातील गाव - बोरगाव
३. मराठी कलाकाराचे नाव -बाळ धुरी
४. मराठी पुस्तकाचे नाव -ब्र
५. मराठी लेखक/लेखिका - बाबा भांड
६. मराठी कवी/कवयित्री - बा.भ.बोरकर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - बोलाची कढी बोलाचाच भात
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - बनगरवाडी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- बटाटावडा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - बकरी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - बालापूर(अकोला)
१३. मायबोली आयडी - बी

<< बी सुपरहिट दिसतोय सगळ्यांच्या ऑप्शन्स मधे

पटकन लिहिता येणारा आयडी आहे तो , लिहिलं की लग्गेच पोस्ट करायला बरं Wink

Pages