Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 23:49
नमस्कार रसिकहो,
हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे
खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.
चला तर मग.. करा सुरवात !
कोडे क्रमांक १

कोडे क्रमांक २

कोडे क्रमांक ३

कोडे क्रमांक ४

कोडे क्रमांक ५
प्रकाशचित्रे सौजन्य : बित्तुबंगा, आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स.
ध्वनिमुद्रण प्रताधिकार - कुसुमाग्रज प्रतिष्ठान. सर्व ध्वनिमुद्रणांवर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास, संगणकावर उतरवून घेण्यास वा इतर कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.
हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे
खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.
चला तर मग.. करा सुरवात !
कोडे क्रमांक १

कोडे क्रमांक २

कोडे क्रमांक ३

कोडे क्रमांक ४

कोडे क्रमांक ५

प्रकाशचित्रे सौजन्य : बित्तुबंगा, आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स.
ध्वनिमुद्रण प्रताधिकार - कुसुमाग्रज प्रतिष्ठान. सर्व ध्वनिमुद्रणांवर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास, संगणकावर उतरवून घेण्यास वा इतर कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२ : स्मृती : नवलाख तळपती दीप
२ : स्मृती : नवलाख तळपती दीप विजेचे येथ
फारच सुरेख कल्पना आहे ही
फारच सुरेख कल्पना आहे ही
फारच सुरेख कल्पना आहे
फारच सुरेख कल्पना आहे ही>>>>+१
कल्पना आवडली
कल्पना आवडली
कवितेतील पहिलीच ओळ लिहायची
कवितेतील पहिलीच ओळ लिहायची आहे का? की अधली मधली जी रिलेवंट वाटतेय ती चालेल?
कोडं क्र.१: कवितेचं नाव
कोडं क्र.१: कवितेचं नाव "देणं" - मातीपण मिटता मिटत नाही - आकाशपण हटता हटत नाही
भरत मयेकरांसाठी टाळ्या.
भरत मयेकरांसाठी टाळ्या.
इतरेजनहो, करा प्रयत्न अजून.
अश्विनीके: शक्यतो प्रकाशचित्राशी जुळणारी असेल ती ओळ लिहावी.
कोडे क्र. १: माझ्या मातीचे
कोडे क्र. १: माझ्या मातीचे गायन किंवा सरणार कधी रण
कोडे क्र. २. : नवलाख विजेचे दीप तळपती जेथ
कोडे क्र. ४: घट तेजाचे भवती ओतित (प्रकाश-प्रभु)
कोडे क्र. ५: काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
धन्यवाद कोडं १ - 'लिलाव' उभा
धन्यवाद
कोडं १ - 'लिलाव'
उभा दारी कर लावुनी कपाळा, दीन शेतकरी दावुनी उमाळा
----
कोडं ३ - 'विशाखा'
खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
-----
कोडं ४ - 'दूर मनोर्यात' -
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
---
कोडं ५ - 'कणा'
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
हे जबरदस्त आहे.. मराठी भाषा
हे जबरदस्त आहे..
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..
क्र. ४ स्मृती
क्र. ४ स्मृती
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतीन्चा थाट
क्र. २ स्मृती
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात
क्र. ५ कवितेचं नाव लक्षात
क्र. ५ कवितेचं नाव लक्षात नाही
मनीचं पिल्लू पायाशी लोळतं
लोळताना म्हणतं जेवायला चला
कोडे क्र. ४: उठा उठा चिऊताई
कोडे क्र. ४: उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले
कोडे क्र. १ : 'कणा' : फक्त लढ
कोडे क्र. १ : 'कणा' : फक्त लढ म्हणा
पोस्ट संपादित.
पोस्ट संपादित.
कोडे क्रमांक -१: मेघास,
कोडे क्रमांक -१:
मेघास, संग्रहः- विशाखा
'थांब थांब परतू नको रे घना कृपाळा
अजून जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा'
कोडे क्रमांक -२:
स्मृती, संग्रहः- विशाखा
'नवलाख तळपती दीप वीजेचे येथ
उतरली जणू तारकादले नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
ती माजघरातिल मंद दिव्याची वात'
कोडे क्रमांक -३:
समिधाच सख्या या, संग्रहः- विशाखा
'दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुन त्याची जीवन-सरिता
खळखळे, अडखळे, सुके कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता!'
कोडे क्रमांक -४:
स्वप्नांची समाप्ती, संग्रहः- विशाखा
'प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर'
मस्त उपक्रम ( परीक्षाच आहे ही
मस्त उपक्रम ( परीक्षाच आहे ही
)
कोडं १ - मेघास : थांब थांब
कोडं १ - मेघास : थांब थांब परतू नको रे घना कृपाळा
अजुनि जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा
कोडं ३ - उषःकाल : इन्द्रनील ओटीत घेऊनी शिंपित भवताली, आली निर्झरणि आली
खळाळते खडकावर हंसापरी शुभ्र पाणी
कोडं ४ - प्रकाश प्रभू : घट तेजाचे भवती ओतीत, असंख्य रवीराजाचे प्रेषित
महाद्वार पूर्वेचे खोलुन क्षितीजवर येती
बित्तुबंगा- उत्तर क्रमांक ५
बित्तुबंगा- उत्तर क्रमांक ५ साठी टाळ्या. ध्रुवपदात नसलेली ओळ येऊद्या !
उत्तर क्रमांक १ मध्ये ती ओळ, ते शब्द 'आकाशश्रुतींनी' येणे अपेक्षित होते म्हणून त्यासाठी मंजूडींचे उत्तर बरोबर आहे. टाळ्या.
मन्या२८०४ आणि वेवा,
भावना पोचल्या. पण कृपया संबंधीत एकच ओळ लिहा.
मन्या२८०४,
उत्तर क्रमांक ४ साठी टाळ्या. ओळी मात्र दुसर्या हव्यात. पुन्हा प्रयत्न करा.
धन्यवाद रसिकहो, खेळा.
अफलातून कल्पना आहे.
अफलातून कल्पना आहे.
कोडे क्रमांक -४: स्वप्नांची
कोडे क्रमांक -४:
स्वप्नांची समाप्ती, संग्रहः- विशाखा
'क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत'
मन्या२८०४, उत्तर बरोबर आहे.
मन्या२८०४,
उत्तर बरोबर आहे.
आता कोडे क्रमांक ३ चे उत्तर ओळखा पाहु सगळ्यांनी..
बित्तु, उठा उठा चिऊताई-
बित्तु,
उठा उठा चिऊताई- कुसुमाग्रजांचे आहे?
सलील कुलकर्णीने लावलेली चाल सुरेख आहे अगदी.
आणि ते कुठले आहे, ते सलीलचे.. असेन मी, नसेन मी.. तेही केजींचे आहे ना?
श्रीनिका,
कसल्या अनवट कविता काढल्यात. भारी.
रैना, ’उठा उठा चिऊताई’ हे
रैना,
’उठा उठा चिऊताई’ हे बालगीत कुसुमाग्रजांचेच आहे.
भन्नाट उपक्रम... आवडला
भन्नाट उपक्रम... आवडला
घ्या, चार वर्षे पोरीला म्हणले
घ्या, चार वर्षे पोरीला म्हणले झोपवताना आणि पत्ता नाय. शेम ऑन मी.
धन्यवाद.
बित्तु, सुमनताई चुकीच्या
बित्तु, सुमनताई चुकीच्या किनार्यावर जाऊन 'उठा उठा चिऊताई' गाताहेत का रे?
रैना, हे गाणे कुसुमाग्रजांचे आहे हे तुला माहिती नव्हते?
उठा उठा चिऊताई सलील
उठा उठा चिऊताई सलील कुलकर्णींनी केलेय? मला सुमन कल्याणपूर-कमलाकर भागवत यांचेच माहीत आहे.
असेन मी नसेन मी हेही शान्ताबाई-यशवंत देव- अरुण दाते हेच माहीत आहे
३: नदी : 'सर्वांची तृषा शमन करणारी ही नदी' हे आहे का? समिधाच सख्या या फिट बसतंय!
पोस्ट संपादित.
पोस्ट संपादित.
मी एवढी हुकलेली आहे? खरंच
मी एवढी हुकलेली आहे?
खरंच पहिल्यांदा सलीलकुलकर्णींच्या सीडीत ऐकले. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही' हेच ना? (त्यांच्याबद्दल , म्हणजे कुलकर्ण्यांबद्दल चांगले उद्गार काढायला त्रास होतो पण तरीही.)
सुमनताईंचे आहे? अरे कर्मा. ऐकायला पाहिजे.
मंजू- इंग्रजी माध्यम दगा देते हो कधीकधी.
Pages