कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 23:49
नमस्कार रसिकहो,

हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे

खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.

चला तर मग.. करा सुरवात !



कोडे क्रमांक १
chiha2.jpg


कोडे क्रमांक २
diva.jpg





कोडे क्रमांक ३
chiha7.jpg

कोडे क्रमांक ४
chiha9.jpg






कोडे क्रमांक ५
chiha8.jpg

प्रकाशचित्रे सौजन्य : बित्तुबंगा, आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स.

ध्वनिमुद्रण प्रताधिकार - कुसुमाग्रज प्रतिष्ठान. सर्व ध्वनिमुद्रणांवर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास, संगणकावर उतरवून घेण्यास वा इतर कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत मयेकरांसाठी टाळ्या. Happy

इतरेजनहो, करा प्रयत्न अजून. Happy

अश्विनीके: शक्यतो प्रकाशचित्राशी जुळणारी असेल ती ओळ लिहावी.

कोडे क्र. १: माझ्या मातीचे गायन किंवा सरणार कधी रण
कोडे क्र. २. : नवलाख विजेचे दीप तळपती जेथ
कोडे क्र. ४: घट तेजाचे भवती ओतित (प्रकाश-प्रभु)
कोडे क्र. ५: काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

धन्यवाद Happy

कोडं १ - 'लिलाव'
उभा दारी कर लावुनी कपाळा, दीन शेतकरी दावुनी उमाळा
----
कोडं ३ - 'विशाखा'
खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
-----
कोडं ४ - 'दूर मनोर्‍यात' -
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
---
कोडं ५ - 'कणा'
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

क्र. ४ स्मृती
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतीन्चा थाट
क्र. २ स्मृती
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात

कोडे क्रमांक -१:
मेघास, संग्रहः- विशाखा
'थांब थांब परतू नको रे घना कृपाळा
अजून जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा'

कोडे क्रमांक -२:
स्मृती, संग्रहः- विशाखा
'नवलाख तळपती दीप वीजेचे येथ
उतरली जणू तारकादले नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
ती माजघरातिल मंद दिव्याची वात'

कोडे क्रमांक -३:
समिधाच सख्या या, संग्रहः- विशाखा
'दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुन त्याची जीवन-सरिता
खळखळे, अडखळे, सुके कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता!'

कोडे क्रमांक -४:
स्वप्नांची समाप्ती, संग्रहः- विशाखा
'प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर'

कोडं १ - मेघास : थांब थांब परतू नको रे घना कृपाळा
अजुनि जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा

कोडं ३ - उषःकाल : इन्द्रनील ओटीत घेऊनी शिंपित भवताली, आली निर्झरणि आली
खळाळते खडकावर हंसापरी शुभ्र पाणी

कोडं ४ - प्रकाश प्रभू : घट तेजाचे भवती ओतीत, असंख्य रवीराजाचे प्रेषित
महाद्वार पूर्वेचे खोलुन क्षितीजवर येती

बित्तुबंगा- उत्तर क्रमांक ५ साठी टाळ्या. ध्रुवपदात नसलेली ओळ येऊद्या ! Happy

उत्तर क्रमांक १ मध्ये ती ओळ, ते शब्द 'आकाशश्रुतींनी' येणे अपेक्षित होते म्हणून त्यासाठी मंजूडींचे उत्तर बरोबर आहे. टाळ्या.

मन्या२८०४ आणि वेवा,
भावना पोचल्या. पण कृपया संबंधीत एकच ओळ लिहा.

मन्या२८०४,
उत्तर क्रमांक ४ साठी टाळ्या. ओळी मात्र दुसर्‍या हव्यात. पुन्हा प्रयत्न करा.

धन्यवाद रसिकहो, खेळा. Happy

बित्तु,
उठा उठा चिऊताई- कुसुमाग्रजांचे आहे?
सलील कुलकर्णीने लावलेली चाल सुरेख आहे अगदी.

आणि ते कुठले आहे, ते सलीलचे.. असेन मी, नसेन मी.. तेही केजींचे आहे ना?

श्रीनिका,
कसल्या अनवट कविता काढल्यात. भारी.

बित्तु, सुमनताई चुकीच्या किनार्‍यावर जाऊन 'उठा उठा चिऊताई' गाताहेत का रे? Wink

रैना, हे गाणे कुसुमाग्रजांचे आहे हे तुला माहिती नव्हते? Uhoh

उठा उठा चिऊताई सलील कुलकर्णींनी केलेय? मला सुमन कल्याणपूर-कमलाकर भागवत यांचेच माहीत आहे.

असेन मी नसेन मी हेही शान्ताबाई-यशवंत देव- अरुण दाते हेच माहीत आहे

३: नदी : 'सर्वांची तृषा शमन करणारी ही नदी' हे आहे का? समिधाच सख्या या फिट बसतंय!

मी एवढी हुकलेली आहे?
खरंच पहिल्यांदा सलीलकुलकर्णींच्या सीडीत ऐकले. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही' हेच ना? (त्यांच्याबद्दल , म्हणजे कुलकर्ण्यांबद्दल चांगले उद्गार काढायला त्रास होतो पण तरीही.) Proud

सुमनताईंचे आहे? अरे कर्मा. ऐकायला पाहिजे.

मंजू- इंग्रजी माध्यम दगा देते हो कधीकधी.

Pages