कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 23:49
नमस्कार रसिकहो,

हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे

खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.

चला तर मग.. करा सुरवात !कोडे क्रमांक १
chiha2.jpg


कोडे क्रमांक २
diva.jpg

कोडे क्रमांक ३
chiha7.jpg

कोडे क्रमांक ४
chiha9.jpg


कोडे क्रमांक ५
chiha8.jpg

प्रकाशचित्रे सौजन्य : बित्तुबंगा, आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स.

ध्वनिमुद्रण प्रताधिकार - कुसुमाग्रज प्रतिष्ठान. सर्व ध्वनिमुद्रणांवर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास, संगणकावर उतरवून घेण्यास वा इतर कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे मराठी माध्यम होते. पण मलाही नाही माहिती ऊ ऊ चि हे गाणे. आज तूनळी बघेन.

मला प्रत्येक कवी कवयित्रीच्या निवडक कविताच आवडतात. अख्खे काव्यसंग्रह आजवर कुणाचेच आवडलेले नाही. त्यातल्या त्यात मला मर्ढेकर जास्त आवडतात कारण ते लवकर कळतात म्हणून. पण बाकी अन्य कवींच्या बर्‍याच कवितांना मी फार गुण देत नाही Happy

कोडे क्र. ३: ध्यास?
चांदण्याचा झोत झरे नभातून
माझ्या मनातून ध्यास तुझा.
निर्झराचा नाद घुमे पहाडात
माझ्या अन्तरात हाक तुला

इथे मराठी अथवा इंग्रजी माध्यमाचा प्रश्न नाही. रैना म्हणजे कवितांच्या प्रांतात बाप माणूस आहे. अनेक कविता तिच्या शब्दश: तोंडात असतात. 'उठा उठा चिऊताई' माझ्यासारख्या कवितेतल्या 'ढ' मुलीला माहिती आहे आणि तिला माहिती नाही म्हणून मला आश्चर्य वाटलं एवढंच.

बी, तू गुण नाही दिलेस तरी ते ते कवी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्चस्थानीच आहेत.
असो, ही चर्चा इकडे नको.

कोडे क्र. ३ - विशाखा मधलंच घनघार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य, त्या तृषार्त भूवर आले नवचैतन्य आहे कां?

Pages