मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक अर्थातच विनोदी साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... ४ मार्च २०१२ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता jaalarangaprakaashana@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण: ह्या अंकाचे संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री हेरंब ओक हे लिहिणार आहेत.
होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!
Submitted by प्रमोद देव on 7 February, 2012 - 00:06
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
प्रमोद देव, मी माझं मत मांडलं
प्रमोद देव, मी माझं मत मांडलं आहे. त्यावर एवढी आगपाखड करण्याची तुम्हाला गरज वाटत असेल तर वाटो बापडे. प्रत्येकवेळी मायबोली चालक बोलत नाही म्हणून आपण गैरफायदा घेणं योग्य आहे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारून बघा.
मंदार, ते सातत्यानं झालंय म्हणूनच मी लिहिलय. मायबोलीवर आपण लिहितो म्हणजे काय? ती त्याकरताच आहे रे बाबा. पण दुसर्या संस्थळाच्या जाहिरातीसाठी वापरली जाऊ नये एवढंच माझं म्हणणं. अर्थात प्रत्येकजण आपापल्या फायद्यानुसार विचार करणार. मग एथिकल, मॉरल इश्श्युज गेले उडत!
ज्यांना माबोवर लिहायचं आहे
ज्यांना माबोवर लिहायचं आहे त्यांनी लिहावं इथे, ज्यांना विशेषांकात द्यायची इच्छा आहे ते देतील, तिकडे लिहिलं म्हणून माबोचं नुकसान का होणारे
>>>> प्राजक्ता शिरीन आधी पॉइंट लक्षात घ्या आणि मग बोला. इथल्या लेखकांनी तिथे लिहिण्याला मी नको म्हटलं नाहीये. मी कोण नको म्हणणारी. पण हे साहित्य प्रत्येकाच्या खाजगी विपुतून मागवलं जायला हवं इतकाच माझा मुद्दा.
आणखी एक गोष्ट. फक्त अधिक
आणखी एक गोष्ट. फक्त अधिक माहितीसाठी:
प्रमोद देव यांचा कुठलाही विशेषांक हा ब्लॉगस्वरूपात प्रकाशित होतो. त्यात प्रकाशित झालेले साहित्य, अगदी तिथे प्रकाशित झाल्या झाल्या दुसर्याच मिनीटाला मायबोलीवर (आणि अर्थातच आपल्या खाजगी ब्लॉगवर) टाकण्याची मुभा प्रमोद देव यांनी दिलेली आहे. त्यामुळे माझ्यासारखे अनेक - म्हणजे जे दिवसातला बराचसा वेळ आपापल्या ऑफिसात असतात आणि ऑफिसमधून ब्लॉगस्पॉट वगैरेचा अॅक्सेस नाहीये असे - आपला पहिलं वाचन व प्रतिसाद देणे हे मायबोलीवरच करतात. याही अर्थाने मायबोलीचे काहीच नुकसान होत नाही.
मामी,आगपखड आपण
मामी,आगपखड आपण करताय....ह्याला म्हणतात...जाणार्याचं जातं(इथे कुणाचंही काही जात नाहीये तरी) आणि कोठावळ्याचं पोट दुखतं....माझ्या आजवरच्या कोणत्याही निवेदनात कुणाही विषयी वैयक्तिक आकस अथवा मायबोलीविषयी अनुद्गार काढल्याचं दिसलंय काय? मग आपण एकदम एथिक वगैरे मोठे मोठे शब्द वापरून का उगाच शब्दच्छल करताय?
आपल्याला मॉरल पोलिसिंग करायला कुणी इथे ठेवलंय का? तसे अधिकार दिले आहेत काय?
>>पण दुसर्या संस्थळाच्या
>>पण दुसर्या संस्थळाच्या जाहिरातीसाठी वापरली जाऊ नये एवढंच माझं म्हणणं.
मामी, माझा मुद्दा लक्षात घे. कसला फायदा? पैशाचा? तोच कुणाचा होत नाही तिथे!!!!.
माझ्या पहिल्या आणि दुसर्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रमोद देव यांचा कुठलाही विशेषांक हा ब्लॉगस्वरूपात प्रकाशित होतो आणि तिथे कुठल्याही प्रकारची जाहीरात नसते.
No profit only loss. असं आहे. बाकी वरच्या प्रतिसादात लिहीलं आहेच.
>>अर्थात प्रत्येकजण आपापल्या फायद्यानुसार विचार करणार. मग एथिकल, मॉरल इश्श्युज गेले उडत!
तुझ्या माहितीकरता सांगतो. यावेळी माझं एकही लेखन या अंकात जाणार नाहीये.
हां आता प्रतिसादांबद्दल म्हणशील तर गंमतीचा भाग असा की याप्रकारच्या विशेषांकात दिल्या जाणार्या लेखनावर मिळणार्या प्रतिसादांपेक्षा मायबोलीवर मिळणारे प्रतिसाद संख्येच्या दृष्टीने कैक पटीने असतात. I rest my case!!
त्यात प्रकाशित झालेले
त्यात प्रकाशित झालेले साहित्य, अगदी तिथे प्रकाशित झाल्या झाल्या दुसर्याच मिनीटाला मायबोलीवर (आणि अर्थातच आपल्या खाजगी ब्लॉगवर) टाकण्याची मुभा प्रमोद देव यांनी दिलेली आहे. >>>> मग का मागवतात?????
जाणार्याचं जातं(इथे कुणाचंही काही जात नाहीये तरी) आणि कोठावळ्याचं पोट दुखतं.... >>> अरे बापरे.
माझ्या आजवरच्या कोणत्याही
माझ्या आजवरच्या कोणत्याही निवेदनात कुणाही विषयी वैयक्तिक आकस अथवा मायबोलीविषयी अनुद्गार काढल्याचं दिसलंय काय? मग आपण एकदम एथिक वगैरे मोठे मोठे शब्द वापरून का उगाच शब्दच्छल करताय?
>>>>>
कुठलाही अंक प्रकाशित झाल्यावर मायबोलीचे औपचारीक/अनौपचारीकपणे आभारही मानलेले वाचनात आलेले नाही.
देव, एथिक्स पाळणे ही खूप
देव, एथिक्स पाळणे ही खूप बेसिक बाब आहे तुम्हाला हा शब्द मोठा वाटतो यातच सगळं आलं.
>> मग का मागवतात????? मामी,
>> मग का मागवतात?????
तुझ्याकडून तरी अशा (मस्करीवजा) प्रश्नाची अपेक्षा नव्हती. 
मामी, प्लीजच.
त्यांचा अंक वाचला आहेस का? त्यांच्या अंकात साहित्याचे जसे सादरीकरण केले जाते ते बघच एकदा.
>>कुठलाही अंक प्रकाशित झाल्यावर मायबोलीचे औपचारीक/अनौपचारीकपणे आभारही मानलेले वाचनात आलेले नाही.
)
उगी उगी
श्री प्रमोद देव, पुढच्यावेळेपासून आपण आभार मानाल का? (या आधी मानले नसल्यास - काय आहे, आभार मानलेले कदाचित माझ्या नजरेतूनही सुटले असेल
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
कुणीतरी काहीतरी करतंय छान क्रिएटिव्ह त्याला प्रोत्साहन देणे तर दूरच पण खाली खेचायचे रिकामे धंदे आहेत हे. मायबोलीविषयी सगळ्यांच्याच मनात नितांत आदर आहे, पण माबोचा पत्कर घेतल्यासारखे तिरकस आणि रि.ना.भिं.तुं.ला. सारखे प्रतिसाद टाकल्याने काही साध्य होणार नाही. तुम्हाला वैयत्तिक त्रास होत असल्यास अॅडमिनकडे तक्रार करा.
तुझ्याकडून तरी अशा
तुझ्याकडून तरी अशा (मस्करीवजा) प्रश्नाची अपेक्षा नव्हती. >>> नाही रे मस्करी नाही. सिरीयसली विचारते. प्लीज इग्नोर द स्माईली. म्हणजे इथल्या लोकांकडून मागवायचं, तिथे छापायचं आणि इथेही लग्गेच प्रकाशित करायला मोठ्या मनानं 'परवानगी' द्यायची. ही काय मोडस ऑपरेंडी ते समजलं नाही.
अशानं उद्या घरी सत्यनारायण, लग्न, बारसं असं काही असलं तरी इथे जाहीर धागा काढून आमंत्रणं करायची का? (मुंज हा विधी वगळण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)
मामीनी मांडलेला मूळ मुद्दा
मामीनी मांडलेला मूळ मुद्दा तांत्रिक दृष्ट्या बिनतोड असला तरी त्यात ' एथिकल, मॉरल इश्श्युज ' कसे काय येतात हे मात्र कळत नाही; केवळ स्वार्थासाठी, गैरफायदा घेण्यासाठी कुणी कांहीं केलं तरच असं म्हणतां आलं असतं. इथं तो प्रकार निश्चितपणे नाही. मायबोलीच्या कार्याला संलग्न असलेल्या एका विषयावरचा - विनोदी साहित्य- हा धागा आहे [ लग्न, बारशासंबधी नाही] व दिवाळी अंकासारखा मायबोलीचा असा होळी विशेषांक निघत नसल्याने माबोवरच माबोशीं स्पर्धा केल्याचं त्यांत अनौचित्यही नाही; शिवाय, मायबोलीवर ५ वर्षांहून अधिक काळ निर्मळपणे वावरत असलेल्या, माबोच्या विविध कार्यक्रमात आत्मीयतेने सहभागी होणार्या प्रमोद देवांसारख्या माबोकरांना समजून घेणं , त्यांच्या सदहेतुंबद्दल सहवासामुळें शंका न येणं हेंच तर माबोचं व तत्सम संकेस्थळांचं खरं उद्दीष्ट असावं. [ कीं, गटगपुरतं एकत्र जमणं एवढंच मर्यादित असतं माबोचं उद्दीष्ट ? ] केवळ तांत्रिक मुद्दा काढून, त्याला 'एथिकल, मॉरल इश्श्युज ' चा रंग फासून त्याना अकारण दुखवणं हे त्या उद्दीष्टाशीं विसंगत नाही होत? २०१०पासून माबोच्या आधारे असा विशेषांक काढणं जर कुणाला खटकलं नसेल, तर त्याचाच अर्थ तांत्रिक बाबींपेक्षां माबोकर देवांना व त्यांच्या प्रकल्पाला माबोला अभिप्रेत असलेल्या खर्याखुर्या नजरेने पहातात असाच होतो.
धन्यवाद भाऊ! आपण अतिशय योग्य
धन्यवाद भाऊ! आपण अतिशय योग्य शब्दात मांडलंत माझंच मनोगत जे मला कदाचित इतक्या नेमकेपणाने मांडता आले नसते.
एथिकल, मॉरल इश्श्युज ' कसे
एथिकल, मॉरल इश्श्युज ' कसे काय येतात हे मात्र कळत नाही >>> यात हे इश्श्युज येतात कारण मायबोलीवर जे उपक्रम राबवले जातात (उदा. ललित लेख, कविता इ. लेखन, विशेषांक) तेच उपक्रम जालवाणी / जालरंग तर्फे राबवले जातात. मग त्या उपक्रमांची मायबोलीवर जाहिरपणे जाहिरात कशाला? इथे clash of interest आहे. होळी विशेषांक निघत नाही पण दिवाळी विशेषांक खूपच दणक्यात निघतो. अनेकजण या दिवाळी अंकाकरता खास लेखन वर्षं भर करत असतात. शिवाय मायबोलीवर अनेक उपक्रम सुरू असतात. दर सणाकरता एक विशेषांक काढण्यामुळे काही खास साध्य होईल असं नाही.
इथे काही जण गझल मुशायरा वगैरे करतात आणि त्याबद्दल धागे काढून लिहितातही. पण जोवर मायबोलीतर्फे असे मुशायरे आयोजित केले जात नाहीत तोवर त्यावर आक्षेप घेता येणार नाही. कारण दोघंही एकमेकंच्या कार्यक्षेत्राला छेद देत नाहीयेत.
उद्या मिसळपाववाले आले तर चालेल का? ब्लॉगस्वरूपात आहे, फायद्याकरता नाही या पळवाटा आहेत. मुळात एक दुभती गाय आहे शिवाय वर गरीबही आहे लाथा झाडणार नाही, मग घ्या थोडं दूध आपल्या भांड्यात ओतून, असा प्रकार आहे. कार्य छोट्या प्रमाणावर आहे की मोठ्या, हा प्रश्न नाही.
मायबोलीवरच लोकांना विनोदी लेखन करायला प्रवृत्त करून जालरंगाचे जे काही वाचक असतील त्यांना ते इथे वाचायला सांगायला काय हरकत आहे? नाहीतरी त्यातून तुम्हाला काही फायदा नाही आणि अपेक्षाही नाही ना?
मला हा तांत्रिक मुद्दा वाटतच नाही. मायबोलीवरच्या लेखकांकडून साहित्य मागवू नका असं मी म्हणत नाहीये. वेगळा धागा काढून जाहिररित्या मागवणे यावर मी आक्षेप घेत आहे. आणि हा मॉरल इश्श्युच आहे. त्याला उगाच तांत्रिक, भावनिक, आर्थिक रंग देऊ नका.
प्रशासकांनी काही आक्षेप घेतला नाही म्हणताय. तुम्ही त्यांची परवानगी घेतली होती काय?
मायबोलीवर अनेक लोक दिवसरात्र
मायबोलीवर अनेक लोक दिवसरात्र आपलं लिखाण ओतत असतात (माझ्यासकट). जाहिराती आणि इतर आर्थिक गणितं फार नंतर आली आहेत माबोच्या वाटचालीत. त्यातूनही काय करोडो रूपये जमा होत नाहीत. गल्लेवाल्यांनी आजवर भरपूर आर्थिक झळ सोसून मायबोली चालवली आणि वाढवली आहे. एवढ्या वर्षात अजय गल्लेवाले यांच्याकडून आम्ही तुम्हाला व्यासपीठे देतोय असे उपकारकर्त्याचे शब्द आलेले ऐकले/ वाचले नाहीत.
पण जालरंग प्रकाशनाचे अंक 'व्यासपीठ देतात' हे मात्र वरती वाचले. हे प्रचंड खटकले.
जालरंग प्रकाशन हा उपक्रम 'व्यासपीठे देण्याइतका' मोठा असता तर लिखाण द्या अशी जाहिरात करावीच लागली नसती नाही का?
कुणी स्वतःच्या हौसेसाठी म्हणून असा काही उपक्रम करू नये असं नाही. पण ते स्वतःच्या हौसेसाठीच आहे, जगाच्या कल्याणासाठी नव्हे हे लक्षात ठेवावे. वरच्या बर्याचश्या प्रतिक्रियांमधे ते विसरले गेलेय हे स्पष्ट दिसतेय.
एखादा उपक्रम कोणी चालवत असेल तर त्याचे कौतुकच केले गेले पाहिजे ही सक्ती का? जे एखादा विरोधी मुद्दा सांगू पाहतात ते साधारण 'राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात' अडथळा आणत असल्यासारखे इथे धिक्कारले जातायत( रिकामे धंदे, रिकामा न्हावी असली भाषा!) हे कशासाठी?
देव, एथिक्स पाळणे ही खूप बेसिक बाब आहे तुम्हाला हा शब्द मोठा वाटतो यातच सगळं आलं.<<<<<
+१०००००००००००००००००
चालू द्या
चालू द्या निवांतपणे....सद्द्या कोणताही बाफ पेटलेला नाहीये म्हणून मजा वाटत नाही...असं खाजगीत एकमेकांशी बोलणार्या तथाकतथित मायबोली हितवर्धक मंडळींचे हे धंदे निदान मला तरी नवे नाहीत.
करा,कल्ला करा! तथास्तु!
हा विषय इतका महत्वाचा आहे असं
हा विषय इतका महत्वाचा आहे असं मला तरी वाटत नाही.
प्रमोद काका तुमचा एक लेख हवाच
प्रमोद काका
तुमचा एक लेख हवाच यात.. किंवा तुम्ही प्रगोच्या कवितेला लावलेली चाल. ते जबरदस्तच आहे प्रकरण !
खाजगीत मारलेला जोक
खाजगीत मारलेला जोक दुसर्यांकडे जाऊन सांगणार्या आणि त्या कमेंटमधला विनोद समजून घेण्याची कुवत नसल्यामुळे हे आपल्याविरूध्द काही भयानक कटकारस्थान आहे असा गोड गैरसमज करून घेणार्या समस्त बालबुध्दींकरता एजोटाझापा!!!!
असो. माझा एकुलता एक मुद्दा होता जो मांडून झाला आहे. त्याने काही फार फरक पडणार नाहीये हे ही उघड आहे. यामुळे माझ्यापुरता हा विषय बंद.
मामी, तुमच्या पहिल्या
मामी, तुमच्या पहिल्या मुद्द्यापासून शेवटच्या मुद्द्यापर्यंत प्रचंड सहमत.
नीधपचेही पॉईंट्स पटले.
आक्षेप घेतल्यावर एरवी सभ्य भाषेत लिहिणार्यांची 'खरी भाषा' बाहेर पडलेली दिसली.
मामी, तुमच्या पहिल्या
मामी, तुमच्या पहिल्या मुद्द्यापासून शेवटच्या मुद्द्यापर्यंत प्रचंड सहमत. >>>> सायो.. मामी म्हणतायत त्यांचा एकूलता एक मुद्दा होता.. पाहिला आणि शेवटचा कुठून आला?
सॉरी, मुद्दा नव्हे, पोस्ट
सॉरी, मुद्दा नव्हे, पोस्ट
>>आक्षेप घेतल्यावर एरवी सभ्य
>>आक्षेप घेतल्यावर एरवी सभ्य भाषेत लिहिणार्यांची 'खरी भाषा' बाहेर पडलेली दिस>><<

असाच हल्लीचा माबोवरचा किस्सा आठवला एक.
बाकी "खरी भाषा"
ह्याच्यावर काही म्हणणं नाही पण एकच म्हण आठवली, "लोकांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे" . अशी म्हण आठवली कारण हल्लीच मीही कोणाची तरी "खरी भाषा" वाचलेली होती इथेच मायबोलीवर. आता इथे काय असेच दिसतच काहींचे की आपण "दुसर्यांना सांगायचे एक व स्वतः करायचे दुसरे.
बाकी प्रतिक्रियात कुठेतरी आले जाहीरातीं विषयी म्हणून,
मायबोलीवर जाहीरात करणे चूक का नाही ह्याबद्दल माहीत नाही पण आपल्या ब्लॉगची/च्या जाहीराती करताना किती तरी जणांना पाहिले.
उदाहरण द्यायचे तर रेसीपी ब्लॉग वर कुणी रेसीपी विचारली की आधी आपला ब्लॉगची लिंक पुढे करायची...
त्यामुळे प्रशासकांनी नियम लिखित करणे जरूरी वाटते.
सायोबाई, खरी भाषा म्हणजे ती
सायोबाई,
खरी भाषा म्हणजे ती काय हो? तुम्ही शिकवता काय दुसर्यांना?
त्यात काय शब्द येवु शकतात व नाही येवु शकत ते सांगण्यासाठी दुसरा बीबी उघडून वर्ग घ्यायला सुरु करा. मी आताच पाहिलेली काही उदाहरणं "खरी भाषेची" आहेत का ते घेवून येते मग विचारायला.
मामी, तुमच्या पहिल्या
मामी, तुमच्या पहिल्या मुद्द्यापासून शेवटच्या मुद्द्यापर्यंत प्रचंड सहमत. >>>> सायो.. मामी म्हणतायत त्यांचा एकूलता एक मुद्दा होता.. पाहिला आणि शेवटचा कुठून आला?>>>
लोक्स, आपल्या फ्रेन्डसर्कलमधल्या लोकांचं मत पटणं, हे नैसर्गिक आहे, त्यामुळे आपल्याच मित्र मंडळींची रि ओढण्यात नवीन असं काही नाही. पण तटस्थपणे वाचतांना हेच दिसते, की:
१. मामींनी हरकतीचा मुद्दा मांडला.
२. देवकाकांनी त्याला संयतपणे उत्तर देत आपली बाजू मांडली.
३. मामींनी उगीचच ' आगपाखड' हा शब्दप्रयोग केला.
४. मग देवकाकांनीपण कुठल्याश्या म्हणीचा वापर केला.
इथेच फिट्टंफाट झाली होती. यात "आक्षेप घेतल्यावर एरवी सभ्य भाषेत लिहिणार्यांची 'खरी भाषा' बाहेर पडलेली दिसली." हे लिहिण्याचं प्रयोजन काय होतं? ते नाही समजलं...
-----------------------------------------------------------------------------------------
मला मामी आणि देवकाका दोघांचेही मुद्दे पटलेले आहेत, परस्परविरोधी असूनही....त्यामु़ळे त्यावर काही बोलणार नाही.
>>>आक्षेप घेतल्यावर एरवी सभ्य
>>>आक्षेप घेतल्यावर एरवी सभ्य भाषेत लिहिणार्यांची 'खरी भाषा' बाहेर पडलेली दिसली." हे लिहिण्याचं प्रयोजन काय होतं? ते नाही समजलं..>> सानी, प्रमोद देव ह्यांची ह्यांची पोस्ट वाचून जे जाणवलं ते लिहिलं आहे. त्याच्याशी इतरांनी सहमत असावं असं नाही.
विशेषांकाच्या मुख्य घोषणेतील
विशेषांकाच्या मुख्य घोषणेतील <<मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी... पासून
>>नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल. पर्यंत
वाक्ये वाचून 'संपादन' म्हणजे काय किंवा 'संपादन' याचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ काय? असे प्रश्न पडले आहेत.
संपादनात माझ्या मते पुढील गोष्टी प्रामुख्याने होतात -
१. शुध्दलेखन, टंकलेखन चुका टाळणे
२. आक्षेपार्ह मजकूर वगळणे
३. प्रयोजनाला साजेसा मजकूर स्वीकारणे.
वरील परीच्छेदातील वाक्यांवरुन हे तीनही होणार असे दिसते. मग 'कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही' हे कसे काय?
हे कुणाला उद्धेशून नाही पण
हे कुणाला उद्धेशून नाही पण जेव्हा केव्हा मी कोणी अगदी ठासून "नैतिकता" अर्थात मराठीत morals ह्याच्यावर चर्चा करतात तेव्हा काही प्रश्ण पडतात, ते असे की रोजच्या जीवनात कितीतरी आपण morals धरून वावरतो?
आपण जेव्हा दुसर्यावर डाफरतो( आगपाखड म्हणा , वा आवडला मला शब्द) नैतिकतेला धरून वागला नाही , तो कसा चुकीचा आहे तेव्हा हे प्रश्ण जरूर पडतात,
उदाहरणार्थ,
मी ऑफेसच्या वेळात ऑफीसने दिलेल्या internet facilities वापर करून मायबोलीवर लिहितोच ना?
मी कधी तरी स्पीड लिमिटच्या बाहेर गाडी दटावलीच असेल ना, गरज म्हणून(लहानग्याला घ्यायचेय वगैरे), थ्रील म्हणून?
मी कधीतरी सिग्नल तोडलाच ना?
कधीतरी चुकून पांगळ्याच्या सीटवर बसलेयाल्या माणसावर अगदी ओरडून आगपाखड करणे बरोबर आहे का?
परदेशात येताना मसाले, धान्य आणणे कायदेशीर नाही तरी आणून वाटप करणे व एखाद्या बीबीवर कायदा/नैतिकताच्या चर्चा झडायला लागल्या की फुकटचे अनुमोदन द्यायचे की हो ते चुकीचेच आहे..
आणि काहीच नाही जमले तर कंपू करून दात काढणे.
तेव्हा माझा खरोखर हक्क बनतो का इतके "हक्काने" दुसर्याला चूक दाखवायला? ते ही नैतीकता च्या तराजूत पटकन बसवून गोष्टी करायला? हे काम पोलिसाला नाहीतर योग्य व्यक्तीला करु द्या ना.. ते बघतीलच.
निव्वळ मत व्यक्त करणं ही वेगळी गोष्ट आहे व ते होतेच पण अगदी एखाद्या गोष्टीवरून दुसर्याच्या मोरल वॅल्यु काढताना आपण कुठे बसतो ह्याचा विचार होतो का?
------------------------------------------------------------------------------------
आजचा सुविचारः धटासी धट, उद्धटासी उद्धट.:फिदी:
झंपी, किती वेळा एडीट करताय
झंपी, किती वेळा एडीट करताय पोस्ट?
अहो, माझा आधीचा सुविचार वाचला
अहो, माझा आधीचा सुविचार वाचला नाही का?
"सतरांदा पोस्ट एडिट करणे हे उत्तम संपादकाचे लक्षण आहे".
तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच पोस्ट वाचावी लागली इथे येवून ह्याबद्दल दिलगीर आहे. अहो पण इथे चालत यावे लागत नाही ना मग ठिक आहे. मला उगाच तुमची चिंता वाटली.
मला उगाच तुमची चिंता
मला उगाच तुमची चिंता वाटली.>>> आभारी आहे
Pages