होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!

Submitted by प्रमोद देव on 7 February, 2012 - 00:06

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक अर्थातच विनोदी साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... ४ मार्च २०१२ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता jaalarangaprakaashana@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण: ह्या अंकाचे संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री हेरंब ओक हे लिहिणार आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रमोदजी, हें असंच ४ तारखेपर्यंत सुरूं राहिलं, तर हा धागाच सर्वार्थाने तुमचा " होळी विशेषांक " आयताच होऊन जाईल; माझाही विदूषकी सहभाग अर्थात आहेच यांत !!! Wink

भाउ,
Rofl बात तो सो टका बराबर छे!

अरे पण ते ज्यांनी ज्यांनी हातभार लावलाय ह्या कामात तेव्हा ते .... पैशाचे तेवढे बघा... पैसे नाही मिळाले तरी आभाराचे बघा हां.... Wink

पैशाचे तेवढे बघा... पैसे नाही मिळाले तरी आभाराचे बघा हां>>> हे असे 'पैसे' वगैरे शब्द का वापरताय उगाच झंपी? मायबोलीच्या माध्यमातून प्रमोद देवांना जालरंगाच्या अंकांसाठी लेख मिळाले, ते अंक प्रकाशित झाल्याचे निवेदन मायबोलीवर लिहिताना मायबोलीचे आभार (a Line of acknowledgement) मानावेत एवढंच माझं म्हणणं आहे. तसं म्हणण्यात काय चुकीचं आहे किंवा अशी खिल्ली उडवण्यासारखं आहे ते सांगाल काय जरा?

<<<<प्रमोद देव, मायबोलीच्या व्यासपीठावरून दुसर्‍या एका संस्थळाकरता, त्याच्या विशेषांकाकरता खास धागा उघडून लेख मागवणे योग्य नाही असं मला वाटतं.>>>>>

मामी, यात दुसरे कुठलेही संस्थळ इन्वॉल्व्ह नाहीये याची खात्री मी देवु शकतो. हा आंतरजालावरील काही उत्साही ब्लॉगर्सनी एकत्र येवुन चालु केलेला एक उपक्रम आहे.

>>मामी, यात दुसरे कुठलेही संस्थळ इन्वॉल्व्ह नाहीये याची खात्री मी देवु शकतो. हा आंतरजालावरील काही उत्साही ब्लॉगर्सनी एकत्र येवुन चालु केलेला एक उपक्रम आहे.

हेच मी वर काय कानडीत सांगत होतो का? Proud

नीधप ला अनुमोदन.. इथे जाहीराती का सुरू कराव्या लगल्या, त्या आधी काय काय पर्याय होते.
अजयने निस्वर्थीपणा ने चालवलेला हा उपक्रम आहे. मायबोली ही खर्‍या अर्थाने

मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी चालवलेली मराठी साईट आहे. विधाने करण्या पुर्वी सत्यता पाडताळुन पहा...
तम्ही लावलेल्या झाडाला फळ आली तर त्याचा अस्वाद घेण्याचा हक्क तुम्हाला नक्कीच आहे, पण तो इतरांनाही घेऊ देणं ह्याला मोठेपण म्हणतात.

असो होळी विषेशांका बद्दल इथे निवेदन करण्यात मला काहीच अयोग्य वाटत नाही. "मराठीचा प्रचार आणि प्रसार" हे मायबोलीच ब्रिद वाक्य असल्याच अजय ने आणि व्यवस्थापक मंडळाने वेळोवेळी स्पष्ट केल आहे. पण तरी बोटं दिल म्हणुन हात धरणारी लोक असतातच, तेंव्हा इथे घेतलेल्या आक्षेपा मागे चांगला हेतू आहे, कुणाला दुखवण्याच हेतू नाही हे ही स्पष्ट आहे.

दोन्ही बाजू चांगल्या हेतूने कार्य करत आहेत तर उगाच वाद कशाला? एकमेंकाची विचार आणि उद्देश समजवून घेतला तर ह्या वादावर पडदा पाडेल आणि होळीची रंगत वाढेल.... तेव्हा रंगाची उधळण होऊ दे चिखलफेक नको.

Pages