होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!

Submitted by प्रमोद देव on 7 February, 2012 - 00:06

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक अर्थातच विनोदी साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... ४ मार्च २०१२ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता jaalarangaprakaashana@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण: ह्या अंकाचे संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री हेरंब ओक हे लिहिणार आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मस्त मजा आहे देवसाहेब. पुर्वी दुरदर्शनच्या एकांड्या चॅनलवर ( दुरदर्शन मुंबई ) होळीच्या निमित्ताने हास्य कवि संमेलन व्हायचे त्यात हुल्लड मुरादाबादी इ नामंकीत हास्य कवी भाग घ्यायचे याची आठवण झाली.

होय,नितीनचंद्र! खूप छान असायचा तो कार्यक्रम! आता पाहूया लोक इथे किती रंगत आणताहेत आपल्या ह्या होळी विशेषांकात!

वा.. देव काका... Happy

अरे वा... हेरंब लिहितोय.. Happy

बघुया ह्यावेळी तरी मला जमतय का लिहायला ते... Wink

रोहन, तू विनोदी लिहित असशील तर मला माहीत नाही...कारण आत्तापर्यंत मी तुझे गंभीर लेखनच वाचल्याचे आठवतंय...म्हणून तसं म्हटलं.

हक्काची काही भानगड नाही ऋयाम! ज्याचे लेखन,साहित्य त्याचेच हक्क...आम्ही फक्त एक व्यासपीठ देतोय..इतर व्यासपीठांसारखेच एक... साहित्यिकांना वाचकांपर्यंत पोचण्याचे! बाकी आम्ही कशातही भागीदार नाही.

भाउ.. Proud

प्रमोद देव, मायबोलीच्या व्यासपीठावरून दुसर्‍या एका संस्थळाकरता, त्याच्या विशेषांकाकरता खास धागा उघडून लेख मागवणे योग्य नाही असं मला वाटतं. मायबोलीची पॉलिसी काय आहे हे माहित नाही पण तरीही एथिकली हे योग्य नाही.

मायबोली सदस्यांना तुम्ही विपु किंवा संपर्कातून मेल करून जरूर विनंती करू शकता आणि ते तुम्ही करतच आहात. पण दरवेळी धागा उघडून साहित्य मागवू नये असं माझं मत आहे.

मामी तुझ्या वैयक्तिक मताचा आदर राखून सांगतो...मी जे काही करतोय त्यात काही चुकीचे आहे असे मला मुळीच वाटत नाही....माझ्या हा आवाहनामुळे मायबोलीचे कोणतेही नुकसान होत आहे असेही नाहीये. ज्यांना असे साहित्य पाठवावेसे वाटते ते जरूर पाठवतात....ज्यांना पाठवायचे नसेल त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात नाही...
अर्थात मायबोलीवर काय असावे आणि नसावे ह्याबाबतची काळजी घ्यायला इथले मालक,चालक आणि प्रशासक खंबीर आहेत..उगाच इतरांनी त्याबद्दल गळे काढू नयेत ही नम्र विनंती....

तरीही ज्यांना माझ्या अशा निवेदनांचा वैयक्तिक त्रास होत असेल त्यांनी त्याबद्दल माबो प्रशासनाकडे तक्रार करावी हे उत्तम!

मामी तुझ्या मताचा आदर.
आणि तुला +१ करणार्‍यांच्या पण Biggrin

मामी, तू म्हणतेस तो विचार तांत्रिकदृष्ट्या माझ्याही मनात आला होता, पण तुला म्हणून सांगतो.......

एक लक्षात घ्या. दिवाळी, हिवाळी, पावसाळी व अशा इतर अंकांची घोषणा प्रमोद देव सातत्याने करत आले आहेत. आक्षेप असता तर मायबोली प्रशासनाने अगोदरच घेतला असता.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण सगळे मायबोली.कॉम वर विनामूल्य लिहीत असलो तरी हा एक खाजगी आणि व्यावसायिक उपक्रम आहे (कमर्शिअल व्हेंचर). हा उपक्रम चालवून मायबोलीचे मालक व प्रशासनाला जाहीराती व इतर माध्यमातून पैसा मिळतो. पण प्रमोद देव त्यांच्या इतर सहकार्‍यांसोबत काढत असलेल्या कुठल्याही विशेषांकात, अनेकांनी तसे सुचवूनही, अजिबात जाहीराती घेत नसून हे अंक काढून त्यांचा एकाही दमडीचा फायदा होत नाही. उलटपक्षी त्यांची फक्त खर्चच होते ती वेळ आणि शक्ती, शिवाय काही प्रमाणात वीज, इंटरनेट भाडे वगैरे घटकांमुळे अप्रत्यक्षरित्या पैसे खर्च होतात ते वेगळेच. तात्पर्य, उत्पन्न काहीही नाही, झालंच तर पैशाचं नुकसान.

त्यामुळे अशा घोषणा मायबोलीवर करणे यात कुणाला काही आक्षेप असण्याचे काहीच तार्किक कारण दिसत नाही. मला असं वाटतं की निर्णय अ‍ॅडमिन यांच्यावर सोडावा.

अवांतर:
>>मायबोली सदस्यांना तुम्ही विपु किंवा संपर्कातून मेल करून जरूर विनंती करू शकता

यालाही +१ आहे असे समजू का? Wink Light 1 Rofl

मंदार +१
माझा ह्यात ...अक्षरशः एक पैशाचाही फायदा नाही..तेव्हा जमलंच तर लेखन पाठवा. Happy
उगाच विरोध नको.

मंदार्_जोशी +१

ज्यांना माबोवर लिहायचं आहे त्यांनी लिहावं इथे, ज्यांना विशेषांकात द्यायची इच्छा आहे ते देतील, तिकडे लिहिलं म्हणून माबोचं नुकसान का होणारे ?

Pages