चॉक चॉक चॉकिनीज.... (फोटोसहित)

Submitted by लाजो on 14 February, 2012 - 07:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- २०० ग्रॅम चॉकलेट - डार्क/मिल्क किंवा मिक्स,
- २५० ग्रॅम बटर (रुम टेम्परेचर),
- २०० ग्रॅम साखर (पूर्ण मिल्क चॉकलेट वापरले तर १५० ग्रॅम),
- ४ अंडी,
- ४ टेबलस्पून (हिप्ड - वरती उंचवटा येइल असे) सेल्फ रेझिंग फ्लार,
- ४ टीस्पुन कोको पावडर (पूर्ण मिल्क चॉकलेट वापरले तर घाला)
- व्हाईट चॉकलेट चंक्स/बटन्स / अक्रोड तुकडे / हेझलनट तुकडे / ग्लेस चेरीज, पाकवलेले आले, संत्र्याची किसलेली साल या पैकी काहिही - ऐच्छिक.

क्रमवार पाककृती: 

IMG_1237.JPG

१. सर्वप्रथम ओव्हन २०० डिग्री सेंटीग्रेडला तापत ठेवा आणि बेकिंग ट्रे ला बटर आणि बेकिंग पेपर लावुन तयार ठेवा,

२. चॉकलेटचे तुकडे आणि रुम टेंपरेचर बटर फुडप्रोसेसर मधे घालुन अगदी जस्ट मिक्स होइल इतपत फिरवुन घ्या,

३. आता यात साखर घालुन परत एकदा फिरवा,

४. सेल्फ रेझिंग फ्लार, कोको (घालणार असलात तर) घालुन परत एकदा फिरवा,

५. आता एका वेळेस एक अंडे घालुन प्रत्येक अंड्यानंतर एकदा मिक्स करुन घ्या.

६. हे मिश्रण तयार केलेल्या ट्रे मधे ओता,

७. यात आपल्या आवडी प्रमाणे चॉक चंक्स / अक्रोड इ इ या पैकी काहिही घालुन एकदा चमच्याने मिक्स करुन घ्या,

८. तापलेल्या ओव्हनमधे २० मिनीटे बेक करा.

९. तयार चॉकिनी व्हॅनिला आयस्क्रिम / व्हिप्ड क्रिम किम्वा नुसतीच गट्टम करा Happy

हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे! Happy

IMG_1236.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात २०-२२ चॉकिनीज होतात.
अधिक टिपा: 

१. मी अर्धे मिल्क आणि अर्धे डार्क चॉकलेट वापरले आहे, कोको घातला नाही.
२. अनसॉल्टेड बटर वापरले तर मिश्रणात चिमुटभर मिठ घाला - चॉकलेट ची चव वाढते Happy
३. मी अर्ध्या मिश्रणात व्हाईट चॉकलेट बिट्स घातले आणि अर्ध्या मिश्रणात कॉफी ग्रॅन्युल्स घालुन मोक्का चॉकिनी केल्या,
४. चॉकिनीज आतुन थोड्या मऊसरच (कच्च्या नाही) राहिल्या पाहिजेत.

माहितीचा स्रोत: 
टीव्ही प्रोग्रॅम मधली ब्राऊनी रेसिपी, त्यात थोडे बदल करुन इंस्टंट चॉकिनी बनवली :)
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चॉकीनी आताच करुन पाहिली. अर्धे माप घेतले होते. १०० ग्र. चॉकलेटला १२५ ग्र बटर. तयार चॉकनीजची चव बरी वाटली (थोडीफार चॉक लावा केकसारखी) पण केक खुपच बटरमय झाला.

वर रेसिपीत दिलेय २५० ग्र. दिलेय ते बरोबर आहे ना?

यम्म्म्म्मी Happy
इंस्टंट बनवल्यास ना...आता इंस्टंट इकडे पाठवुन दे भारतात Proud

लाजो.. मस्तय रेसिपी.. वेळ मिळेल तेव्हा करुन बघेन.. Happy
सेल्फ रेझिंग फ्लार >> हे फ्लार नसेल तर काही दुसरा पर्याय आहे का लाजो??

धन्स मंडळी Happy

@दिनेशदा Happy हल्ली वेळ मिळत नाहीये काही नविन प्रयोग करायला....

@ साधना - बटरचे प्रमाण बरोबर आहे. तुझं सेरे फ्लार थोड कमी पडलं असेल बहुतेक.

@ मेधा - सेरे फ्लार नसेल तर चिऊ म्हणत्येय तसं मैदा + बेकिंग पावडर वापरु शकतेस.

लाजो, अगं माझा वरचा लेअर क्रिस्प झाला. गार झाल्यावर तर सगळा केकच कोरडा कोरडा. शी: ! मी तशाच्या तशा स्टेप्स फॉलो करुनही नेहमीच असं का होतं? मागे ते वर्षुचं (सोप्पं) पुडिंग आणि या वेळेस केक....अगदीच फियास्को. माझं काय चुकलं? माझं काय चुकलं? Wink

@मनीमाऊ, सुलेखा म्हणतायत तसं जास्त वेळ ठेवला गेला असेल केक ओव्हनमधे, किंवा ओव्हनचे टेंपरेचर जास्त झाले असेल.