Submitted by raajaa on 10 March, 2009 - 10:22
झाकळलेल्या ढगाळ सरत्या धूसर साय॑काळी,
आभाळाच्या घुमटाभवती काजळकिनार काळी.
पसार झाला प्रकाश सारा;जसा मुठीतुन पारा
को॑दटलेला अवघा परिसर आणि निश्चल वारा.
गदमदणारी जमीन होती, तगमगणारी राने
माळावरती घुसमटलेल्या भेगा॑चे गार्हाणे
दूर कुठे मग क्षितिजामागे उठले मेघघुमारे
अन वठलेल्या झाडा॑नाही फुटती नवे धुमारे.
सरकत आल्या अलीकडे त्या सजलघना॑च्या लाटा
आणि एका निमिषामध्ये..... पाउस बारावाटा!
गुलमोहर:
शेअर करा
या दिवसात
या दिवसात या कविता गारवा आणतात मित्रा. सुंदर.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
ब्राव्हो!!
ब्राव्हो!! अत्युत्तम कविता.
(अनुस्वारासाठी SHIFT+ M वापरा, Q नको)
-मुकुंद कर्णिक
अत्यंत
अत्यंत सुंदर कविता! इतके सुंदर वर्णन बर्याच दिवसात वाचले नव्हते. व्वा! मस्तच!
शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................
राजा, किती
राजा, किती म्हणजे किती सुरेख कविता... सुंदर कल्पनांची आणि शब्दांची नुसती झड आहे....
बहोत अच्छे!
अजून लिहा... छान लिहिताय.
व्व!!!
व्व!!! अप्रतीम
खूपच सुंदर लिहिलंय...
वा, फार
वा, फार छान.. अनेक दिवसांनी माबोवर निसर्ग कविता बघितली. सुरेख उभा केला आहे सगळा अनुभव.
वा ! मस्त
वा ! मस्त !
***
Entropy : It isn't what it used to be.
सुंदर,
सुंदर, आवडली...
व्वा
व्वा वा...काय मस्त कविता.
सध्याच्या सगळ्या गोंधळात चांगल्या कविता वाचायच मात्र राहून जातं.
सुरेख
सुरेख कविता आणि शब्दही किती छान वापरलेत! खूप छान.
खुप सुंदर !
खुप सुंदर ! आवडली !
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
अहा.........कित
अहा.........किती गोड कविता !! निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय असं लिहिता येत नाही
नितांत
नितांत सुंदर कविता !!
सस्नेह,
विशाल
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
फार
फार छान.
सुंदर पावसाची सर आल्यासारखी वाटली.
सुरेख
सुरेख आहे!
'पाऊस बारावाटा' म्हणजे काय? सगळीकडे पाऊस आला अश्या अर्थाने ना?
छान
छान
पसार झाला
पसार झाला प्रकाश सारा जसा मुठीतुन पारा....क्या कहने!
दाद शी सहमत..सुंदर कल्पनांची आणि शब्दांची नुसती झड आहे....
छान लिहता...
जयन्ता५२
द
द निल
कविता असावी ती अशी !
कशी मिसली
कशी मिसली मी? मस्तच कविता
-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ
मस्त !
मस्त !
अभिनंदन !
मीही नीट
मीही नीट वाचली नव्हती! फार सुंदर वर्णन!!
मार्चमधली सर्वोत्कृष्ट कविता झाल्याबद्दल अभिनंदन!
अरेरे मी
अरेरे मी पण मिसली होती. नशिब! हुकली नाही. गवसली
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |
राजा,
राजा, अभिनंदन रे !!
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)
मार्चमधली
मार्चमधली सर्वोत्कृष्ट कविता झाल्याबद्दल अभिनंदन!
खुपच छान!!!
खुपच छान!!!
पुरस्कार
पुरस्कार प्राप्त म्हणून वाचायला आले आणि कितीदा तरी वाचली. फार छान !
अप्रतिम्.....
अप्रतिम्......................आता कसं वाट्तय................ ?
भेगांचे
भेगांचे गार्हाणे, मेघघुमारे, पाऊस बारावाटा... अहाहा... मातीचा वास भरुन आला मनात... खुप छान..
________________________
अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है
अ प्र ति म !!!
अ प्र ति म !!! बर्याच दिवसात एक दमदार कविता वाचायला मिळाली..
याला छान कुणीतरी चाल लावायला हवी... छान गाणे होइल..
जगजीतचं एक गीत आहे, त्याची आठवण झाली..
बुझ गई तपते हुए दिनकी अगन
सांझने चुपचापही पी ली जलन
रात झुक आई पहन उजला वसन
प्राण तुम क्युं मौन हो, कुछ गुनगुनाओ, चांदनी के फूल चूमो, मुस्कुराओ.....
राजा, एकदम
राजा,
एकदम मस्त्..जबरदस्त ताकदीची कविता..
चालीसाठी बाळासाहेबाना पाठवा..(ठाकरे नाही...मंगेशकर:)
अभिनंदन..
Pages