अल्बोर्ग पोर्ट, डेन्मार्क...

Submitted by सेनापती... on 9 October, 2010 - 14:02

आमची बोट तब्बल ४ वर्षांनी 'ड्राय डॉक' मध्ये दुरुस्तीसाठी आणली आहे. कामाचा नुसता गोंधळ सुरु आहे. बोटीच्या प्रोपेलर पासून सर्वत्र काम सुरु आहे. हैदोस घातलाय नुसता १०० - १२० जणांनी. प्रत्येक डेक वर काम सुरु आहे.

१.

'वेस्टर्न रिजेन्ट' 'ड्राय डॉक' मध्ये...

२.

३.

४.

जवळच असलेले चर्च..

५.

पोर्ट मध्ये असलेल्या 'विंड मिल्स'...

अजून काही फोटो टाकीन नंतर... Happy

गुलमोहर: 

बोटीला काहीही झालेले नाही.. नियमित दुरुस्तीसाठी बोट दर काही वर्षांनी 'ड्राय डॉक' मध्ये आणली जाते. तालाचा गांजलेला भाग दुरुस्त करणे, पुन्हा रंगरंगोटी करणे आणि इतर काही कामे असतील तर ती केली जातात.

छान Happy

ठीक आहे... थोडी माहिती सुद्धा लिहितो... Happy जे लिखाण डोक्यात आहे ते बाजूला राहते मग... Happy

(स्वगत : लिहायला वेळ नाही म्हणून प्रचि टाकल्या तर त्यावर पण लिखाण करायचे... :D)

भटके भाऊ, छान फोटो! (स्वगत : नुस्ते फोटो टाकून कसं भागेल? आम्हाला माहिती पण लागते सोबत! :उत्कंठा असलेली बाहुली:)

हो ना, सविस्तर लिहायचे नव्हते तर नुसते प्रचि टाकून ओळखा पाहू ! असे लिहायचे.
लोकांनी टायटॅनिक पासून क्वीन एलिझाबेथ पर्यंत सगळी नावे घेतली असती. कदाचित रामदास आणि तुकाराम सुद्धा !!!

कदाचित रामदास आणि तुकाराम सुद्धा !!! << Rofl

एवढं मोठं जहाज .. सहिच रे रोहन , एवढं मोठ्या जहाजावर फिरायला केवढं मोठ्ठ लागत असेल नै.. धाडस !

ड्राय डॉक बद्दल, मी एका कम्प्युटर गेम ( VICE CITY ) मधे वाचलं होतं. अश्या जहाजाच्या दुरुस्तीला साधारण किती अवधी लागतो रे?

तुमची बोट? म्हणजे काय?!
या क्षेत्राबद्दल अजुन वाचायला आवडेल. आता तर फोटो टकल्यामुळे जास्त उत्सुकता निर्माण झालीये!!

अरुंधती... थोड़ी माहिती लिहितो ज़रा सवडीने...

दिनेशदा... हल्ली रामदास आणि तुकाराम ही नावे कुठे पण घुसवता येतात... Happy असो.. इकडे नको रे ते बाबा...

सूर्या... किती दिवस लागतात ते बोटीवर अवलंबून आहे. आम्हाला एकून २ आठवडे लागणार आहेत सर्व कामे आटपायला.. Happy

आमच्या गावात तर खुप जुना dry dock होता. त्यात गलबतांची दुरुस्ती व्हायची. मोठ्या भरतीला गलबत आत घेतले जायचे. मग दरवाजा बंद करुन dry dock मधील पाणी बाहेर काढुन दुरुस्ती - रंग रंगोटी व्हायची.

वॉव्..सर्व्च्यासर्व फोटो आवडले...

रोहन्..कधी पनामा कनाल पास केलायेस का???कि तू युरोपातच भटकत असतोस???

वा: ! नंदिनीच्या जहाजबांधणीवरील लेखमालेपाठोपाठ ड्रायडॉकमधल्या जहाजदुरुस्तीवरची प्रकाशचित्रं व माहिती !! माबोचीं क्षितीजं खरंच रुंदावत चाललीत . धन्यवाद सेनापति.
[ सेनापति, आर्मीबरोबर आपण आरमाराचे ' सरखेल' पण आहात का ? Wink ]

धन्यवाद शैलजा आणि अश्विनी.. Happy

वर्षु.. नाही केलाय मी पनामा पार.. Happy कारण मी मर्चंट शिपिंग मध्ये नाहीये..
आमच्या बोटी फार प्रवास करत नाहीत.. Happy खोल समुद्रात असतात.. सर्वे करत.. Happy

भाऊ.. मी पण इथल्या कामाबद्दल आणि राहण्याबद्दल लिखाण करीन म्हणतोय.. Happy
खरेतर सरखेल असा आयडी देखील घ्यायला हरकत नव्हती... Wink

फोटो व चर्चा खुपच छान।,
ड्राय डॅक बाबत डिस्कवरीवर कार्यक्रम पाहीलेत बरेच,
पण ते शब्दात मांडणे शक्य नाही ....(म्हणजे लिहीने शक्य नाही)

<< मी पण इथल्या कामाबद्दल आणि राहण्याबद्दल लिखाण करीन म्हणतोय.. >> खरंच लिहा. मी तर आधाशासारखं वाचायचों [ आतां जरा वाचनच कमी झालंय ] समुद्र व जहाजांबद्दल कांहीही मिळालं कीं ; 'मॉबी डिक' पुस्तकाने शाळेत असताना सुरवात झाली होती या वेडाला !! Wink

सेनापती.. तुम्ही बोटीवर असता का? मस्तच. त्याबद्दल पण माहिती लिहा.

आमच्या घरामधे माझे वडिल, नवरा आणि भाऊ जहाजबांधणीमधे. काका, मामा, आतेभाऊ आणि मामेभाऊ मर्चंट नेव्हीमधे. Happy कधीमधी हे नातेवाईक भेटलेच तर अफाट गप्पा रंगतात. मी सध्या वडलांचे अनुभव माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहत आहे.

अरे सेनापती... यु आर अ शीपी!!! शीपी म्हंटले की मला अनंत सामंतांची "एम्.टी. आयवा मारु" ही कादंबरीच आठवते.

तुमचे अनुभव वाचायला आवडतील. माझा एक मित्र पण मेर्चंट नेव्ही मध्ये कॅप्टन आहे. त्यांच जीवनच वेगळ असतं.

Pages