'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा १

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2012 - 00:42

नमस्कार मंडळी,

स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?
असेच समोरच्याकडे पाहता येते का?
अशी मैत्री असू शकते का?
या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत?
वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भाने लिंगनिरपेक्ष अस्तित्व आणि मैत्री या दोन्हीचे वेगवेगळे पैलू असू शकतात का? असतील तर कसे?
हे मुद्दे तर आहेतच आणि या प्रश्नांमधे नसलेलेही अनेक मुद्दे तुमच्या मनात असू शकतातच.
या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया.

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' या विषयावरील आपल्या परिसंवाद विशेषांकाचे संपादक मंडळ तयार झाले असून मंडळाचे काम सुरू झाले आहे.

या संपादक मंडळातील मायबोलीकर आहेत
नीधप
अगो
स्वाती२
नानबा
पराग
सानी
नादखुळा

हा उपक्रम संयुक्तातर्फे होत असला तरी संपादक मंडळातही संयुक्ताबाहेरच्या व पुरूष मायबोलीकरांचाही सहभाग आहे ही यावर्षीची एक विशेष बाब. लिंगनिरपेक्षता यासंदर्भात विचारांचे आदानप्रदान व्हायचे तर ते योग्यच आहे.

हे झालं संपादक मंडळाबद्दल. पण हा अंक तुमच्या विचारांशिवाय, लेखांशिवाय घडूच शकत नाही. तेव्हा स्त्री, पुरूष, नवे, जुने, साधे, फोडणीचे, आटपाटनगरातले, दंबद्विपावरचे, अल्लड नवथर, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अश्या सगळ्याप्रकारच्या मायबोलीकरांनी लेखण्या/ कीबोर्डस सरसावून सज्ज व्हा.

हा परिसंवाद-विशेषांक असल्याने अंकामधे प्रामुख्याने आपल्या विचारांवर/ अनुभवांवर/ अभ्यासावर आधारित लेख अपेक्षित आहेत.
शब्दमर्यादा १०००.
तुम्हाला रोजच्या व्यापातून वेळ काढणे कठीण जात असेल हे लक्षात घेऊन लेख पाठवण्यासाठी मुदतवाढ करीत आहोत. लेख पाठवण्याची अंतिम तारीख आता २० फेब्रुवारी अशी आहे.
लेखन पाठवायची जागा http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

चला तर मग लिहायला घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खरंचच छान कल्पना आहे. मी नक्की लिहीणार...
मध्यंतरी आणखी एक घोषणा केली होती ना कार्यक्रमासंदर्भात ?

किरण मध्यंतरी केलेली घोषणा हि ह्या संदर्भातली पहिलीच घोषणा होती. संपादक मंडळात संयोजन सहभागाबद्दल तिथे विचारलं गेलं होतं आणि या परिसंवादाची ओळखही करून दिली होती.

लोकांनो, या विषयावर काय सुचंतय ते बघा आणि लिहायला सुरवात करा. Happy

किती मोठा ते आत्ता नाही सांगता येणार Sad ठीक आहे. लेख लिहिला की मंडळातील एका सदस्याला इमेल करेन. नाही घेता आला तरी तसं काही नाही. मुद्दे इतके आवडले की वाटलं लिहावसं इतकंच. Happy

तुम्ही लिहा. शक्यतो शब्दमर्यादेच्या फार पुढे जाणार नाही असा प्रयत्न करा. लेख पाठवायची लिंक वरती दिली आहेच. कृपया त्याच दुव्यावर लेखन पाठवा.

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' हे शीर्षक बोजड आहे. ते 'धर्मनिरपेक्ष मैत्री - ओळख' अश्या एखाद्या (काँग्रेसच्या) मानभावी घोषणेसारखं वाटतं! Biggrin

'स्त्रीपुरुष निखळ मैत्री' असं काहीसं गृहीत धरलेलं चालेल ना?

अर्रर्र...दोन शीर्षकांमध्ये सूक्ष्म भेद आहे. तो दुर्लक्षिलेला चालेल ना? Lol Rofl

गामा पैलवान Rofl हो हो! तुम्ही असंच गृहित धरा हो आणि लिहा मात्र नक्की. तुमचा लेख नक्की येऊद्या. Happy

बेफि, तुम्ही लिहिणार हे वाचून आनंद झाला. लिहिल्यानंतर काटछाट करुन तो हजार शब्दांमध्ये बसवायला तुम्हाला नक्कीच जड जायला नको. तुम्ही एक गझलकार आहात हे विसरु नका. वृत्तातपण बसवू शकाल तुम्ही. तेंव्हा अगदी नक्की लिहा हो! Happy

गामाभौ, शीर्षक योग्यच आहे हो!
उगा ते 'स्त्रीपुरुष निखळ मैत्री' असं केल तर निखळ मैत्रीचा विषय खळखळाट करीत "लैलामजनु" "हीररान्झा" "शिरीनफरहाद" "बाजिरावमस्तानी" इत्यादिक कथासूत्रान्कडे वळेल! काही खवचट हिन्दुद्वेष्टे/बुप्रावादी त्यात "राधाकृष्णाला" देखिल घुसडवतील Proud तस नको व्हायला, नै का? Wink

विषय चान्गलाय, मला बरच काही सूचतयं, लिहायला वेळ मिळेल का? Sad

मला थोडेसे गोंधळल्यासारखे झालेय.

लिंगनिरपेक्ष ओळख म्हणजे आयडेंटीटी असे अपेक्षित आहे का? तसे असेल तर विषयाचा आवाका खूप मोठा आहे. नुसते मैत्री म्हटले तर पूर्ण वेगळा विषय असेल पण ओळख म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे ते जरा समजेल का?

Genderless Identity एवढाच विषय घेतला असता तर मैत्रीसोबत इतरही प्रोफेशनल अथवा सोशल मुद्द्याचा विचारविमर्श करता आला असता असे मला वाटते.

लिंगनिरपेक्ष ओळख म्हणजे आयडेंटीटी असे अपेक्षित आहे का? << हो.
मैत्री हा म्हणले तर ओळखीच्या पुढचा टप्पा होऊ शकतो.

हे जे वर संवाद दिले आहेत ते काय आहेत ते समजेल का? म्हणजे कथा, ललित वगैरेही स्वरुपात लेखन अभिप्रेत / अपेक्षित आहे का? वरील संवाद हा या उपक्रमामध्ये आलेला एक सहभाग आहे का?

धन्यवाद.

मंडळी वरच्या जाहिरातीमूळे 'लेख संवाद रुपात हवा का?' वगैरे शंका असल्यास त्याचे स्पष्टीकरण -

रोजच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीकडे लिंगनिरपेक्षतेने बघणे याचे उदाहरण म्हणून जाहिरातीत संवाद दिलाय.
उपक्रमासाठी लेख पाठवायचे आहेत. लेखात मुद्दा स्पष्ट करताना उदाहरणात संवाद वापरु शकता. आवश्यक नाही.
हा परिसंवाद-विशेषांक असल्याने अंकामधे प्रामुख्याने आपल्या विचारांवर/ अनुभवांवर/ अभ्यासावर आधारित लेख अपेक्षित आहेत.
शब्दमर्यादा १०००.
लिखाण पाठवायची अंतिम तारीख आहे १५ फेब्रुवारी २०१२
लेखन पाठवायची जागा http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

.

नवीन जाहिरात पाहिली आणि पुन्हा काही प्रश्न पडले. ते इथे मांडते.
१. स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? >> म्हणजे नक्की काय? असे पाहून काय साध्य होईल? म्हणजे असे कशासाठी पाहायचे?
२. लिंगनिरपेक्ष मैत्री - यामध्ये समानलिंगी आणि भिन्नलिंगी दोन्ही अपेक्षित आहेत की फक्त भिन्नलिंगी? भिन्नलिंगीच अपेक्षित असेल तर ते लिंगनिरपेक्ष कसे काय? पहिलीच अट 'भिन्नलिंगी' ही झाली. समानलिंगी अपेक्षित असेल तर त्यात 'लिंगनिरपेक्षतेचा' बाऊ येणारच नाही. प्रचंड गोंधळ आहे मनात.
३. ओळख - यात ओळख हा 'आयडेंटिटी' अशा अर्थाने आहे हे वर स्पष्ट झाले. पण म्हणजे नक्की काय? उदा. इथे काही डुप्लिकेट आयडी स्वत: स्त्री आहे की पुरुष हे उघड होऊ न देण्यासाठी खुबीने क्रियापदे वापरतात. 'करते आहे' किंवा 'करतो आहे' ऐवजी 'करत आहे'. एवढ्याने ते त्यांची लिंगसापेक्ष ओळख लपवून ठेवू शकतात. प्रत्यक्ष जीवनात हे कसे शक्य आहे?
४.मैत्री - इथे मैत्रीच्या सीमारेषेपर्यंतच जायचे असेल तर नव्या जाहिरातीत प्रेम कुठून आले? सुरुवातीला एखादी सो कॉल्ड 'लिंगनिरपेक्ष' निखळ मैत्री असेल आणि तिचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले तर ही लिंगसापेक्षता कुठून येते? आधी मला या ठिकाणी लिंगनिरपेक्ष मैत्री म्हणजे 'स्त्री असो वा पुरुष फक्त मैत्री असणं महत्त्वाचं' असं वाटलं होतं. पण प्रेमाची जाहिरात आल्यावर लिंगनिरपेक्ष काहीच उरत नाही. नक्की काय म्हणायचंय?

मुक्तेश्वर कुलकर्णी,
लिखाण पाठवण्यासाठी
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
या दुव्याचा वापर करावा.
लिखाण हे जेपेग म्हणजे इमेज स्वरूपात चालणार नाही.
केवळ लेखच हवे आहेत.

१. >> स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? >> म्हणजे नक्की काय? >>
बरेचदा आपण स्त्री/पुरुष आहोत या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून विचार केला जातो किंवा नाही आणि तसे न केल्याने स्वतःलाच कुंपण घातल्यासारखे होते किंवा नाही. समोरच्या व्यक्तीकडे बघतानाही असेच होते का?
>>असे पाहून काय साध्य होईल? म्हणजे असे कशासाठी पाहायचे?>>
असे पाहण्याची गरज वाटत नसेल तर तोही मुद्दा मांडून लिहिता येऊ शकतेच.
२. यामध्ये समानलिंगी आणि भिन्नलिंगी दोन्ही अपेक्षित आहेत की फक्त भिन्नलिंगी? <<< लिंगनिरपेक्ष मैत्री ही दोन मनुष्यप्राण्यांमधे असते. ती दोन माणसे स्त्रिया आहेत वा पुरूष वा स्त्री-पुरूष हा मुद्दाच जिथे बिनमहत्वाचा आहे अशी मैत्री ही लिंगनिरपेक्ष मैत्री.
३. ओळख याचा अर्थ आयडेंटीटी म्हणून प्रत्यक्ष आयुष्यातलाच घ्यायचा आहे.व्यावसायीक जगात वावरताना स्री/पुरुष याच्यापलीकडे जी त्या व्यक्तीचे ज्ञान, गुणवत्ता यासारख्या गोष्टींमुळे निर्माण झालेली ओळख असते तशा प्रकारची ओळख इथे अपेक्षित आहे.
४.मैत्री हीच या विषयाची सीमारेषा आहे असे कुठेही सूचित केलेले नाही. किंबहुना तो फक्त एक पैलू आहे. लिंगनिरपेक्ष विचारांचे इतर अनेक पैलू असू शकतात. जसे की प्रेम व्यक्त करणे ही उर्मी स्त्री वा पुरूष कुणाचीही असू शकते आणि तसे असायला हरकतही नाही. जाहिरातीत 'मी स्त्री आहे मग मी कसे प्रपोज करु?' या पारंपारीक जेंडर रोल्स बद्दल भाष्य आहे.

अनुमोदन संयोजक.

अरे लोकहो, मनातल्या त्या गोंधळासकट लिहा की . त्यात काय.
'मी लिंगनिरपेक्षता मानत नाही, When Harry met Sally असे काहीही लिहू शकालच की.'

Pages