'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा १

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2012 - 00:42

नमस्कार मंडळी,

स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?
असेच समोरच्याकडे पाहता येते का?
अशी मैत्री असू शकते का?
या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत?
वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भाने लिंगनिरपेक्ष अस्तित्व आणि मैत्री या दोन्हीचे वेगवेगळे पैलू असू शकतात का? असतील तर कसे?
हे मुद्दे तर आहेतच आणि या प्रश्नांमधे नसलेलेही अनेक मुद्दे तुमच्या मनात असू शकतातच.
या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया.

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' या विषयावरील आपल्या परिसंवाद विशेषांकाचे संपादक मंडळ तयार झाले असून मंडळाचे काम सुरू झाले आहे.

या संपादक मंडळातील मायबोलीकर आहेत
नीधप
अगो
स्वाती२
नानबा
पराग
सानी
नादखुळा

हा उपक्रम संयुक्तातर्फे होत असला तरी संपादक मंडळातही संयुक्ताबाहेरच्या व पुरूष मायबोलीकरांचाही सहभाग आहे ही यावर्षीची एक विशेष बाब. लिंगनिरपेक्षता यासंदर्भात विचारांचे आदानप्रदान व्हायचे तर ते योग्यच आहे.

हे झालं संपादक मंडळाबद्दल. पण हा अंक तुमच्या विचारांशिवाय, लेखांशिवाय घडूच शकत नाही. तेव्हा स्त्री, पुरूष, नवे, जुने, साधे, फोडणीचे, आटपाटनगरातले, दंबद्विपावरचे, अल्लड नवथर, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अश्या सगळ्याप्रकारच्या मायबोलीकरांनी लेखण्या/ कीबोर्डस सरसावून सज्ज व्हा.

हा परिसंवाद-विशेषांक असल्याने अंकामधे प्रामुख्याने आपल्या विचारांवर/ अनुभवांवर/ अभ्यासावर आधारित लेख अपेक्षित आहेत.
शब्दमर्यादा १०००.
तुम्हाला रोजच्या व्यापातून वेळ काढणे कठीण जात असेल हे लक्षात घेऊन लेख पाठवण्यासाठी मुदतवाढ करीत आहोत. लेख पाठवण्याची अंतिम तारीख आता २० फेब्रुवारी अशी आहे.
लेखन पाठवायची जागा http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

चला तर मग लिहायला घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लिखान लिहीले पंण अप्रकाशित ठेवले पकाशीत करतो म्हटले तर दिसत नाही आहे. कॄपया दुवा द्यावा म्हणजे पुर्ण प्रकाशित करेल

वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे लिखाण शोधलेत का?

'संपूर्ण' असे क्लिक करून जर सुपूर्द केले असेल तर तुम्हाला पोच यायला हवी. मेल चेक करणार का?

मला बरच काही सुचतय, माझ्याकडे दोन्ही बाजुन्नी मुद्दे आह्त, पण लिहायला चान्सच मिळत नाहीये Sad
(घरी बसुन लिहीलेल "हस्तलिखित" चालणार नसेलच! असो)

मेल चेक करायचा प्रयत्न केला असता रेडीफ मधे १ ही मेल नाही.
त्या साईट्चे अ‍ॅडमिन प्रॉबलेम आहे असे म्हणतात.
(Dear Rediffmail user, we have restored your access to your account! Currently you will be able to use
the service in a limited way e.g. you will see recent mails delivered to your account. The older mails may not be viewable,
you may experience delay in receiving new mail, your personal folders may not be visible.

This is only a temporary problem. You will soon be able to use your account in a normal way. We appreciate your support. )

>>> लिंब्या, तू बर्‍याच गोष्टी गृहीत धरतोस! <<<< Lol
त्याशिवाय का जगता येत? अन आजवरचे जगणे, "अनेकानेक गोष्टी शिकुन" गृहित धरण्यातच तर गेलेल अस्त की प्रत्येकाचचं
असो, ते तू मुद्द्यान्बद्दल म्हणते आहेस की "हस्तलिखिता" बद्दल? Wink
हस्तलिखिताबद्दल म्हणत असशील, तर मान्य, मी (संयोजक तथा लेखक, दोन्ही भुमिकातुन विचार करीत) गृहित धरतोय, की जेपीजी/इमेज्/हस्तलिखित वगैरे स्विकारण्यात अर्थ नाही.
नैतर उद्या स्पर्धेत गाणं म्हणायचय, तर मी उपस्थित नै रहात माझी एमपीथ्री पाठवुन देतो असे म्हणण्यासारखे आहे. असो.
तुफानी मुद्दे डोक्यात वावटळीसारखे येतात अन धुक्यासारखे विरुनही जाताहेत Sad पकडूनच ठेवता येत नाहीयेत. शिन्चे विचार रेकॉर्ड करायची सोय अस्ती "विज्ञानात" तर कित्ती भरे झाले अस्ते नै?

पुन्हा तेच Happy
तुला खरोखरंच जर लिहायचे असते, तर तू संयोजकांना विचारू शकला असतास की हस्तलिखित पाठवले तर चालेल का?

संयोजकांना नमस्कार.

मी लेख पाठवला आहे व त्याचा विरोपही मिळाला. मात्र हा प्रतिसाद वेगळ्या कारणासाठी देत आहे. मंडळातील एक सदस्य कोणत्यातरी मूळ सदस्याचा ड्यु आय डी आहे असे काहींचे मत आहे. (किंवा उलटेही म्हणता येईलच म्हणा की मूळ सदस्य हाच या आयडी चा ड्यु आयडी आहे.) (समजा अजिबात असे काही नसले तरीही ):

अशा स्वरुपाच्या उपक्रमात समाविष्ट झालेला आय डी मूळ आय डी आहे हे तपासले जाते किंवा नाही हे विचारावेसे वाटले. (म्हणजे त्याचे एक किंवा अनेक ड्यु आय डी असू शकतील, पण उपक्रमात सहभागी झालेला आय डी मूळ आहे हे). (वास्तव जगात या उपक्रमाला एखाद्या व्यासपीठावर न्यायचे झाल्यास कोणाला न्यायचे हा एक प्रश्नच होऊ शकेल असे वाटते. भासमान जग असले तरी उपक्रम वास्तव आहे म्हणून विचारावेसे वाटले.)

चुभुद्याघ्या

-'बेफिकीर'!

लिंबू, हस्तलिखित लेख आवश्यक रुपात पाठवण्यासाठी टंकन सहाय्य मिळावे म्हणून विनंती करायची मित्र मंडळींकडे. Happy

बेफिकिर,

संयोजक मंडळातील सर्व सदस्यांना त्यांचे खरे नांव, ईमेल, फोन नं. ही माहिती अ‍ॅडमिनना कळवणे बंधनकारक आहे.

कुळकर्णी, तुमचे लिखाण पोचले आहे. धन्यवाद.

लिखाण पाठवायच्या आधी सर्वांनी आपल्या मायबोली आयडीला जो इमेल जोडलेला आहे तो अ‍ॅक्टिव्ह आहे ना हे बघून घ्या कारण पोच त्या इमेलवर पाठवली जाते.

स्पृहणीय उपक्रम. प्रस्तुत परिसंवादाला प्रतिसादस्वरूप लिखाण पाठवलेले आहे. लिखाण पाठवण्यामधे काही तांत्रिक अडचण/त्रुटी माझ्याकडून राहून गेली असल्यास कळवावे ही विनंती.

धन्यवाद !
बेफी यांच्या दि. ६ च्या टिप्पणीशी सहमत.
खरे नांव, ईमेल, फोन नं. ही माहिती अ‍ॅडमिनना कळवणे बंधनकारक आहे.>> याचा अर्थ अ‍ॅडमिनला याची पुर्ण कल्पना असते. परंतु यात तर सर्वच खोटेही सांगु शकतो. आज दिवसाल १ सिम बदलनारे लोक आहेत.

मी माझा लेख(? की मुक्तचिंतन? Proud ) दिला आहे. Happy
पण ती लिन्क कुठेतरी दिवाळीअन्काकडे वगैरे गेलीये, अन पुन्हा मला ते पान उघडुन बघता येणार नाहीये, नक्की "नेमक्याजागीच" पोचलाय का कसे कळणार?

ओके नीरजे, चेकतो, (पण माझ्या या आयडीला इमेल कोणता आहे? Uhoh Proud )
बघितले, आलीये मेल Happy पण त्यात लिहिलय की आपल्या साहित्याच्या स्वीकृती/नकारासंदर्भात आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, म्हणजे काय गो? काही करा (स्वीकृत/नकार), पण काटछाट करुन अर्धवट स्वीकृत करु नका बर का. Happy
दुर्दैवाने, मी लिहीलेल्या शीर्षकातील "भ्रमाचा" (नुस्त्या भ्रमाचा, भ्रमाच्या भोपळ्याचा नव्हे Proud ) मुद्दा नीटसा मान्डलाच गेला नाहीये असे मला आता नन्तर जाणवतय. Sad (ऑफिसमधे एकाग्रता साधत नाहीये) पण ठीके, आहे तेवढा मजकुर योग्य-पुरेसा आहे असे वाटले तर घ्या तो लेख. नन्तर प्रतिक्रियांमधे अधिक विश्लेषण देता येईलच, नाही का?

मन्जुडी, स्वाती, शेवटी केलच बर का टाईप, हस्तलिखित पाठविण्याचे/तशी विनन्ती करण्याचे धाडस दोन कारणाने होत नव्हते, एक तर माझे मलाच ते पटत नव्हते, अन दुसरे म्हणजे माझे हस्ताक्षर "दिव्य" आहे. असो. धन्यवाद.

कुठल्याही विशेषांकासाठी तुम्ही लिखाण पाठवल्यावर ते लिखाण विशेषांकामधे समाविष्ट होईल अथवा नाही याचा निर्णय त्या त्या विशेषांकाचे संपादक मंडळ घेते. त्यालाच स्वीकृती अथवा नकार असे म्हणतात.

सर्व लिहित्यांना एक विनंती आहे की वरती किंवा आधीच्या घोषणेमधे जे प्रश्न वा मुद्दे आले आहेत ते विषयाची ओळख करून देण्यासाठी आले आहेत. ती प्रश्नावली नाही त्यामुळे केवळ तेवढेच प्रश्न घेऊन लिखाण करायची जरूर नाही. त्या प्रश्नांच्या पलिकडे जाऊन लिंगनिरपेक्षतेसंदर्भाने विचार मांडायचे असल्यास त्याचेही स्वागत आहेच.

संयोजक, तर मग जमल्यास "लेख नंबर २" पाठवू का? चालेल का तस? कारण अजुन १५ पर्यन्त वेळ आहे. हव तर आधिचा लेख भाग १ व नन्तर पाठविता आला तर तो भाग २ असे प्रकाशित करता येईल, मी दोन्ही लेखात विषयाची कन्ट्युनिटी राखायचा प्रयत्न करेन. Happy

संयोजक, तर मग जमल्यास "लेख नंबर २" पाठवू का? >>>
दुसरा लेख आपण पाठवू शकता. दोन्ही लेखांची निवडप्रक्रिया वेगवेगळी असेल. दोन्हीपैकी कुठलाही लेख निवडला गेल्यास तो अंकात समाविष्ट केला जाईल.

Pages