नमस्कार मायबोलीकर.
पुण्यातील सावली सेवा ट्रस्ट या गरीब व गरजू तसेच बुधवारातील देहविक्रय करून उपजीविका कमावणार्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी काम करणार्या सेवाभावी संस्थेला गेल्या महिला दिन उपक्रमात मायबोलीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा मदत केली व त्या अंतर्गत चार मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च उचलला.
त्यानंतर काही जणांनी 'सावली' ला मदत करण्याविषयी विचारणा केली होती. ही संस्था आपल्या मदतीवरच जास्त करुन चालत असल्याने संचालिका मृणालिनी भाटवडेकर ह्यांना दिवाळीअगोदर संपर्क केला असता त्यांच्याकडुन संस्थेच्या मुलामुलींना शिक्षणमदत आणि त्या व्यतिरिक्त दिवाळीनिमित्त त्या मुलामुलींना नवीन ड्रेस घ्यायला जमेल तशी मदत कोणी करु शकले तर खुप चांगले होईल असे सांगण्यात आले. एक चांगल्यापैकी ड्रेस ७०० पर्यंत येऊ शकतो. कॉलेजमधे जाणारे आहेत त्यांना थोडा जास्ती. अशी ६०-७० मुले-मुली आहेत, अशी माहिती मिळाली. ही माहिती संयुक्तावरील मैत्रिणींना समजल्यावर त्यांनी ताबडतोप मदत पाठवायला सुरुवात केली व पाहता पाहता २५००० रुपये जमले. दिवाळी अगोदर ती रक्कम 'सावली' ला सुपुर्त करण्यात आली. त्यातून किमान ३०-३२ ड्रेसेस ची सोय होऊ शकली. मुलांना खुप आनंद झाला असे भाटवडेकर मॅडमनी सांगितले.
आता एका महत्वाच्या उपक्रमाला सुरु करत आहोत त्याची माहिती आपणा सर्वांपर्यंत पोचवत आहोत. हा उपक्रम आहे 'सावली' च्या मुलामुलींना शिक्षणासाठी मदत.
'सावली' ची ही मुले/मुली अतिशय हुषार व मेहनती आहेत. बुधवार पेठेसारख्या वस्तीतुन आलेली आहेत. ती लहानपणापासुन गरिबी, असुरक्षितता, सदैव भांडणे, अपमान, भीती अशा वातावरणात वाढलेली असतात.
त्या सर्व मुलांना एकत्र करुन त्यांच्या आयांच्या व मुख्य म्हणजे त्या मुलीमुलींच्या मनात बाहेरच्या जगाबद्दल विश्वास निर्माण करुन त्यांना शिक्षणाठी तयार करणे, त्यांचे अशांत मन शांत करुन जगायला प्रवृत्त करणे हे काम 'सावली' करते.
भाटवडेकर मॅडमना हा विश्वास पैदा करायलाच ५-६ वर्षे लागली व हळुहळु मुलेमुली ह्यात आनंदाने, विश्वासाने सहभागी होउ लागली.
आज १०० मुले 'सावली' तर्फे शिकत आहेत. काही मुले शिक्षण संपवुन नोकरीला लागलेली आहेत व १०-१५ हजार रुपये पगारावर नोकरी करत आहेत. कॉलेजात जाणार्या काही मुलींना 'त्या' व्यवसायात जावे लागु नये म्हणुन कॉट बेसिसवर 'सावली' ने ठेवले आहे. मुलामुलींना 'सावली' तर्फे ज्या कोर्स ला घालता येऊ शकेल (सावलीकडे ह्या मुलांना महागडे शिक्षण देण्याइतके फंड्स नाहीत) त्याला घातले जाते व त्यावर ते नंतर बर्यापैकी नोकरी मिळवतील असे पाहिले जाते. उदा. काही मुली नर्सिंग चा कोर्स करतात. नर्सेस ना मागणी असल्यानी त्या लगेच आपल्या पायावर उभ्या रहातात.
'सावली' ची माहिती मुळात अरुंधतीकडुनच मिळाली आहे व वेळोवेळी अरुंधतीने हा उपक्रम सुरु करण्यासाठी लागणारी मदत केली आहे.
अरुंधती कुलकर्णी ह्यांच्याकडुन मिळालेली महत्वाची माहिती,
आमच्याकडे कामाला येणार्या बाईंच्या दोन्ही मुलींच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी जेव्हा सावली ट्रस्टमार्फत कोणी उचलली तेव्हाच त्यांचे शालेय शिक्षण शक्य झाले आहे. अन्यथा त्यांना मोलमजुरी किंवा धुणीभांडी करायला लागली असती. आणि त्यांची स्थिती बरी म्हणावी एकवेळ, अशा पार्श्वभूमीच्या मुली व मुलांना तिथून मदत मिळते आहे.
सावली ट्रस्टमार्फत मदत केल्या जाणार्या प्रत्येक इयत्तेच्या मुलींचा भाटवडेकर बाईंनी एक छोटासा ग्रूप बनवलाय. या मुलींच्या शाळेतील शिक्षकांनाही ग्रूप संकल्पनेमुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला सोपे जात आहे, आणि भाटवडेकर बाईंनाही त्या मुलींना मार्गदर्शन करणे, त्यांच्या प्रगतीचा - घरच्या स्थितीचा आलेख ठेवणे सोपे जाते. या मुली एकमेकींना अभ्यासात मदत करतात, तसेच स्पर्धेच्या भावनेतून जास्तीत जास्त मेहनत घेऊन अभ्यास करण्याचे वातावरण जतन करायला त्याची मदत होते. तसेच प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे एक मुलगी दुसरीचा आधार बनते, तिला मदत करते. त्यांच्या घरी त्यांना जर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली तर या मुली एकमेकींना मदत करू शकतात, तसेच ताबडतोब भाटवडेकर बाईंपर्यंत त्याबद्दल निरोप जातो.
या मुली ज्या वस्तीत राहतात तिथे सतत भांडणे चालू असतात. एका घराला खेटून दुसरे घर. रस्त्यावरच बराचसा संसार. वस्तीत येणारे-जाणारे, विकृत नजरेचे व व्यवहाराचे अनेकजण. विचित्र आहे वातावरण. पण त्यातून या मुलींना सुरक्षित ठेवायचे म्हणजे सोपे काम नाहीए. या मुलींना ''धंद्यात'' न घालण्यासाठी वा त्यांची विक्री न करण्यासाठी तसेच त्यांचे शिक्षण जारी ठेवण्यासाठी कित्येकदा त्यांच्या घरी किराणा भरणे, त्यांचे वा त्यांच्या आईचे वैद्यकीय खर्च करणे, गरजेप्रमाणे काही वस्तूची मदत देणे अशी कसरतही करावी लागते. पण ते अपरिहार्य आहे. पुढे कॉलेजात गेल्यावर त्या ''कमवा व शिका'' धर्तीवर छोटे-मोठे जॉब्ज करून शिक्षण + नोकरी करतात. वेश्याव्यवसायात न पडण्यापासून त्यांना केवळ आणि केवळ त्यांचे शिक्षणच वाचवू शकते आणि सन्मानाने जगण्याची एक चांगली दिशा देऊ शकते.
धन्यवाद अरुंधती!!!
वर्षाखेरीस 'सावली' आपल्याला त्या मुलांचे निकाल व प्रगती कळवतील. संस्थेचा ऑडीट रिपोर्ट पण कळवतील.
संस्थेचा प्रशासनावर शून्य रुपये खर्च होतो. तुम्ही देणगीरूपात दिलेला प्रत्येक पैसा मुलांच्या कल्याणासाठी वापरला जातो हे संस्थेने आवर्जून कळविले आहे.
वर लिहिल्याप्रमाणे 'सावली' संस्था आपल्या मदतीवरच चालते त्यामुळे हा उपक्रम मायबोलीवर जाहीरपणे राबवला गेला तर खुप मुलामुलींचे कल्याण होऊ शकेल ह्या हेतुने हा दुवा चालु केला आहे.
आर्थिक माहिती-
एका मुलाचा/मुलीचा १ वर्षाचा शैक्षणिक खर्च ५००० रुपये असतो. ह्या मुलामुलींना एकाने सलग ३ वर्षे मदत केली तर त्यांचे कॉलेज शिक्षण व्यवस्थीत पुर्ण होईल व डिग्री मिळेल.
आपल्याला कोणालाही ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर कृपया इथे वा ईमेल ने कळवु शकता.
सहभागी व्हायचे असेल तर सध्या अशी माहिती लागेल,
१. तुम्हाला किती मुलांना/मुलींना मदत करायची इच्छा आहे?
२. ह्याचे उत्तर देणे शक्य असेल तर छान - किती वर्ष तुम्ही ही मदत करु शकता? त्या मुलीचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत जमेल का? (सध्या तरी १ वर्ष असेच धरुन चालत आहे).
३. तुम्हाला त्या मुलींशी पत्रव्यवहार करायचा असेल तर तुमचा (शक्यतो) भारतातला पत्ता. कारण ती मुले-मुली परदेशी पत्र कितपत पाठवु शकतील माहीत नाही. प्रीपेड पाकीट पण त्यांना पाठवु शकता जेणेकरुन मुले आपल्याला पत्र लिहु शकतील. ईमेल पाठवायचे झाल्यास तुम्ही ते भाटवडेकर मॅडमना पाठवू शकता, जे त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल.
ही माहिती मिळाल्यावर प्रत्येक सदस्याला स्वतंत्र ईमेल करु.
मुलामुलींची माहिती जाहीर न करता प्रत्येकाला त्यांची मदत ज्या विद्यार्थ्यासाठी वापरली जाणार आहे त्याच मुलांची/मुलींची माहिती पाठवु व जमल्यास पत्ते पण. भाटवडेकर मॅडमना पण त्यात कॉपी करु. सदस्यांना पत्राद्वारे मुलामुलींशी संपर्क करायला हरकत नसेल तुमचे पत्ते ईमेल ने कळवा.
सध्या मलाच संपर्क करा.
खाली सुपंथ च्या खात्याची माहिती देत आहे. तुम्ही त्यावर पैसे पाठवु शकता. मेमो 'सावली शिक्षण फंड' असा लिहावा.
Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042
केदार जोशी ह्यांनी दिवाळी ड्रेस उपक्रम व ह्याही उपक्रमासाठी सुपंथतर्फे मदत करण्याची नेहमीप्रमाणे तयारी दाखवली आहे, आणि ते तशी मदत करतही आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार.
मृणालिनी भाटवडेकर.
त्यांचा संपर्क क्रमांक : ९८२३२७०३१०
पत्ता : ई १००४, ट्रेझर पार्क, संतनगर, पर्वती, पुणे ९.
धन्यवाद!!
काहीही प्रश्न असतील तर इथे लिहावेत.
*** आजतागायत मायबोलीकरांनी संयुक्ता सुपंथ उपक्रमातून 'सावली'तील एकूण २६ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. मायबोलीकरांच्या विधायक जाणिवांची व प्रयत्नांची ही यशस्वी पावतीच म्हणता येईल!
**** ता. क. - हा न संपणारा उपक्रम आहे त्यामुळे ह्या उपक्रमात आपण केव्हाही सहभागी होऊ शकता. आपली इच्छा आम्हाला ईमेल ने कळवु शकता किंवा इथे पण लिहु शकता ****
सावली सेवा संस्थेने दिलेले आभारपत्र
maayboli sanyukta supanth thanks certificate PDFOnline.pdf
सावली संस्थेतील मुलांना दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत : http://www.maayboli.com/node/32497
मागोवा -
ह्या मायबोली उपक्रमातर्फे १० फेब्रुवारी २०१२ पर्यं एकुण २७ मुलांची ह्या वर्षीच्या शिक्षणाची सोय केली गेली आहे. ह आकडा जसा बदलेल तसे इथेच बदल करत राहु.
अजुनही देणगीदार संपर्क करत आहेत.
ह्यातल्या काहींनी ३ वर्षाची देखील एकदम सोय केली आहे. काही जणांनी एकापेक्षा जास्त मुलांची जबाबदारी उचलली आहे.
सर्व देणगीदारांना त्यांच्या मानस अपत्याची माहिती व फोटो पाठवले आहेत. व पावत्याही पाठवल्या आहेत.
सर्व देणगीदारांचे खुप आभार.
खालील व्यक्तींकडुन ह्यासाठी नेहमीच मदत झाली व होत राहील.
केदार जोशी - त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन वेळोवेळी सुपंथतर्फे सावलीला आलेल्या देणग्या लगेच पाठवल्या.
अरुंधती कुलकर्णी - सतत सावली च्या भाटवडेकर मॅडमना संपर्क साधुन त्यांच्याकडुन लागेल ती माहिती घेतली व आपल्याला पुरवली.
भाटवडेकर मॅडम - कितीही रात्री फोन केला तरी सर्व माहिती लगेच लिखीत स्वरुपात दिली. ह्यापुढेही त्या सर्व मुलांची प्रगती, संस्थेचा अहवाल वगैरे योग्यवेळी पाठवत रहातीलच.
वेबमास्तर - मायबोली तर्फे हा उपक्रम करु दिला हे कधीच विसरता येणार नाही व उपक्रमाबाबत मार्गदर्शन पण केले.
संयुक्ता - संयुक्ता मधुन वेगवेगळ्या कल्पना पुढे आल्याने होऊ शकला.
ह्यापुढे सावलीचे अहवाल सर्व देणगीदारांना ईमेल मधुन पाठवले जातील.
थँक्स वैजयन्ती.
थँक्स वैजयन्ती.
मी शनिवारी केदार जोशींच्या
मी शनिवारी केदार जोशींच्या नावावर १ मुलासाठी पैसे ट्रांसफर केले. मला आयसीआयसीआय च्या साइटवर 'आमच्या डेटाबेस मधे या अकांउंटचं वेगळं नाव आहे' अशी वॉर्निंग आल्यामुळे मी एकाच मुलासाठी पैसे ट्रांसफर केले आहेत. मला पैसे पोहोचलेत ते बघून सांगता का प्लीज , मी दुसर्यासाठीचे ट्रांसफर करेन.
माझ्या आईने गेल्या आठवड्यात
माझ्या आईने गेल्या आठवड्यात बँकेत चेक दिला.
हो अर्पणा, सांगते. धन्यवाद
हो अर्पणा, सांगते. धन्यवाद स्वाती.
ज्यांची मदत सुपंथ ला पोचली
ज्यांची मदत सुपंथ ला पोचली आहे त्या सर्वांना मेल केले आहे. कृपया राहिले असल्यास कळवावे. अर्पणा मदत पोचली आहे एका मुलासाठी.
कोणी १०० रुपये test ह्या नावाने दिले आहेत का? असेल तर ईमेल ने कळवु शकाल का म्हणजे ते सुपंथ च्या नेहमीच्या मदतीतुन वेगळे करता येतील.
------------
आपल्याला कळवायला खुप आनंद होतो आहे की, २४ मुलांसाठी मदतीचे हात पुढे आले आहेत. त्यातले काही १ वर्ष तर काही ३ वर्षे तर काही संयुक्ता हा उपक्रम चालवेपर्यंत हात मदत करत रहाणार आहेत.
१२ मुलांसाठीची मदत सुपंथ ला पोचली आहे.
बाकीच्यांनी सवडीनुसार मदत पाठवली की १ डिसेंबर ला सावली ला पाठवण्यात येईल.
सावलीकडुन पावती घेतली जाईल.
टॅक्स साठी नावे कळवावीत
थँक्स सुनिधी, अपडेट्सबद्दल.
थँक्स सुनिधी, अपडेट्सबद्दल.
सुनिधी, तिनचार दिवसांपूर्वी
सुनिधी,
तिनचार दिवसांपूर्वी दोन मुलींसाठीची रक्कम केदारच्या खात्यावर जमा केली आहे. प्लीज एकदा पाहुन सांगशील का?
१-२ दिवसात ईमेल ने पावत्या
१-२ दिवसात ईमेल ने पावत्या पाठवायला सुरु करण्यात येत आहे.
कोणी १०० रुपये test ह्या
कोणी १०० रुपये test ह्या नावाने दिले आहेत का >> सुनिधी हे सुपंथसाठीच एका जुन्या सदस्याने नवीन अकाउंट मधून पाठवले आहेत.
सुनिधी, तुला इ-मेल पाठवली
सुनिधी, तुला इ-मेल पाठवली आहे. प्लिज चेक करशील कां?
माझ्या पावतीसाठी भारतातला
माझ्या पावतीसाठी भारतातला पत्ता पाठवला तर चालेल का ? इथे माझ्यापर्यंत पावती पाठवायला बराच खर्च येईल.
मेधा, चालेल, भारतातला पत्ता
मेधा, चालेल, भारतातला पत्ता पाठव. पावत्यांच्या स्कॅन इमेजेसही इमेल करणार आहोत.
अरे वा! छान उपक्रम सुरु झालाय
अरे वा! छान उपक्रम सुरु झालाय हा. सध्या इतर ठिकाणी मदत पाठवणे सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सहभागी झाले नाही तरी उपक्रमास आणि सावली ट्रस्टला तसेच मुलांना अनेक शुभेच्छा!
दोन दिवसांपूर्वी एका
दोन दिवसांपूर्वी एका मुलींसाठीची रक्कम केदारच्या खात्यावर जमा केली आहे. प्लीज एकदा पाहुन सांगशील का?
माझ्या पावतीसाठी भारतातला
माझ्या पावतीसाठी भारतातला पत्ता पाठवला तर चालेल का ? इथे माझ्यापर्यंत पावती पाठवायला बराच खर्च येईल.>> मलाही हे चालेल. किंवा स्कॅन केलेली इमेलही चालेल. पत्ता कळवायचा असल्यास कोणाला कळवू ?
असामी, मला किंवा सुनिधीला
असामी, मला किंवा सुनिधीला आपला भारतातला पत्ता इमेलने कळवलात तरी चालेल.
अनुदोन, बघते. थँक्स.
सुनिधीचा कॉम्प्युटर सध्या
सुनिधीचा कॉम्प्युटर सध्या नादुरुस्त असल्यामुळे तिला पुढचे चार-पाच दिवस तरी माबोवर लॉगिन किंवा इमेल चेक करणे मुश्किल आहे असे तिने कळवले आहे. त्यानंतरच ती इमेल्सनाही प्रतिसाद देऊ शकेल असा तिचा निरोप आहे.
सावलीसाठी ४ जणांची देणगी
सावलीसाठी ४ जणांची देणगी सुपन्थकडे आली आहे (९ डिसेंबरला एक, १४ ला एक व १६ ला दोन). त्यातल्या ३ देणगीदारांची माहिती आम्हाला मेलवरुन मिळाली आहे पण चौथी देणगीदार व्यक्ती कोण आहे ते अजुन कळले नाहिये. कृपया ईमेलमधुन कळवु शकाल काय, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला नोंद करता येईल.
खालील डोनेशन तपशील ज्यांचे
खालील डोनेशन तपशील ज्यांचे आहेत त्यांनी आपली नावे त्यानुसार कृपया संपर्कातून मला/ सुनिधीला कळवावीत ही नम्र विनंती. (नंतर उडवून टाकेन.) धन्यवाद.
१. NEFT-CITIN11153789842-ARUNDHATI SANDEEP
२. BIL/276269509/Savali Fund-2011/NSP
अरुंधती मी तुला आणि सुनिधी ला
अरुंधती मी तुला आणि सुनिधी ला इ-मेल पाठवली आहे.
सुनिधी, मी पैसे केदार
सुनिधी, मी पैसे केदार जोशीच्या अकाऊंट मध्ये टाकले आहेत. प्ली़ज मिळाल्याचे कळवशील का?
सुनिधी/ अरुंधती, सुपंथच्या
सुनिधी/ अरुंधती, सुपंथच्या खात्यात आजच पैसे भरले आहेत. कृपया खातरजमा कराल का?
TRN : 090080964066016
_मधुरा_, शैलजा, ठीक आहे.
_मधुरा_, शैलजा, ठीक आहे. थँक्स.
सर्व देणगीदारांना ईमेल मधुन
सर्व देणगीदारांना ईमेल मधुन पावत्या पाठवल्या आहेत. जर अजुनही कोणाला मिळाली नसल्यास कृपया कळवावे. लगेच पावती पाठवली जाईल.
२ देणग्या निनावी आल्या आहेत त्या देणगीदारांचे देखील खुपखुप आभार.
आढावा - मुख्य लेखाच्या शेवटी
आढावा - मुख्य लेखाच्या शेवटी हलवत आहे व तिथेच वेळोवेळी बदल करत राहु.
सेच केदार जोशी ह्यांनी
सेच केदार जोशी ह्यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन वेळोवेळी सुपंथतर्फे सावलीला आलेल्या देणग्या लगेच पाठवल्या त्या बद्दल त्यांचेसुध्धा खुप आभार. >>
उलट संयुक्ताने मला ही संधी दिल्याबद्दल संयुक्ताचे आभार. ह्या अकाउंट मधून त्या मध्ये ट्रान्सफर करायला काहीच लागत नाही.
धन्यवाद सुनिधी आणि अरुंधती.
धन्यवाद सुनिधी आणि अरुंधती. हा सर्व प्रोजेक्ट तुम्ही दोघींनी तोलून धरला आहे.
फोटो मिळाले. पावत्या मिळाल्या. फोटो पाहुन छान वाटले खरंच.
सुनिधी , या उपक्रमा विषयी मला
सुनिधी , या उपक्रमा विषयी मला खूप उशीरा समजले. आता मला या उपक्रमात सहभागी होता येईल का?
धन्यवाद सुनिधी, इथे सर्व
धन्यवाद सुनिधी, इथे सर्व उपक्रमाचा नेटका आढावा दिल्याबद्दल!
सुरुवातीला जेव्हा ह्या उपक्रमात सहभाग घेतला तेव्हा कल्पनाही नव्हती की या सेवा उपक्रमात मायबोलीकरांचा व संयुक्तांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल! पण एकामागोमाग एक इमेल्स मधून, संपर्कातून अनेक संयुक्तांनी व मायबोलीकरांनी उपक्रमात रस दाखवला, सावलीतील मुलांचा शैक्षणिक खर्च उचलायची तयारी दाखवली. सावलीच्या भाटवडेकर मॅडमनेही आम्ही (मी व सुनिधी) जेव्हा जेव्हा फोन करू / इमेल करू, तेव्हा तेव्हा लगेच आम्ही त्यांना सांगू ती माहिती पुरविली. कोठेही खळखळ नाही, आढेवेढे नाहीत, दिरंगाई नाही. सुनिधीनेही अतिशय चिकाटीने व शिस्तीत सर्व इमेल्सचा पाठपुरावा करणे, त्या त्या देणगीदात्यांना आवश्यक माहिती देणे, वेळोवेळी फोनवरून संपर्क, केदारशी संपर्क अशा बर्याच स्तरांवर ही जबाबदारी पेलली. मला खूप छान वाटले या उपक्रमात सहभागी होता आले, आपल्या सर्वांच्या योगदानातून काही साध्य करता आले.... थँक यू मायबोली, थँक्स संयुक्ता!
सुनिधी आणि अरुंधती, तुम्ही
सुनिधी आणि अरुंधती, तुम्ही नेटाने काम केलेत या बद्दल शतशः धन्यवाद! केदार, तुमचेही आभार! या उपक्रमामुळे मानसकन्या मिळाल्या. धन्यवाद मायबोली आणि संयुक्ता!
Pages