घरातील महत्वाचे पेपर्स कसे लावावेत

Submitted by साक्षी१ on 13 January, 2012 - 00:01

माझ्या घरात सगळे पेपर्स वेगवेगळ्या फाइल मध्ये आहेत ,आता मला ते व्यवस्थीत लावायचे आहेत. पण कुठुन सुरवात करु समजत नाहीये. काहीतरी सुचवा ना. कशी वर्गवारी करु यासाठी काही स्पेशल प्रकारच्या फाइल आहेत का? किंवा तुम्ही कसे फाइल करता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लायब्ररी पद्धतीने लावावीत.

म्हणजे कसे?

मी असे लावलेले आहे बॉक्सेस/कंटेनर मध्ये फायली टाकून ठेवल्या आहेत.
HOME related Only
1)under reports
- health reports
---- each persons health report first on name wise sorted and within name yearwise

- vehicle reports/receipts( any kind of oil change etc)

- electronics purchases reports/receipts
---- each compliances purchase receipt by name and within name updates (for example auaguard filter changed receipts etc.)

2)bill
-- medical bills
-----each person's bills stored in seperate small file on name and within that small file per year sorted.
-- water bills
--eletric bills
--phone bills
वरच्या बिल्स सारख्या गोष्टी एक वर्षाने(जवळपास मार्च नंतरचा दिवस चांगला मुहुर्त बघून श्रेड करायच्या).

3) Investements
Bank wise classfication and then within that maturity date for FD

असे करत जावे

मग
Office only(if you have business or working )

अवांतर-
आमच्या पिताश्रींकडे त्यांचे पहिलीतले परीक्षापत्रक आहे पिवळे झालेले आहे लॅमिनेट पण बाहेरून पण त्यांच्या शौक की कालातरांने असेच काही आठवणी/फोटोज वगैरे लॅमिनेट केलय.

त्यांनी बँकेत उघडलेले पहिल्या खात्याची रीसीट हल्लीकडेच फेकून दिली.

तेव्हा इतका जपून ठेवायच्या नसतील व काही वस्तू लागत नसतील तर सरळ एक श्रेडर घ्यावा व टाकावे फाडून.

नाहीतर शेजार्‍यांची बरीह्च पोरं गोळा करून बसवा फाडायला. लहान मुलांचा आवडता खेळ आहे. पन तुम्हाला त्यांना खाउ व सांभाळायचे काम करावे लागेल. चुकून पेपर फाडून कंटाळले की वेगळेच काम करतात हि मुलं. Wink

रच्याकाने सोसायटीची मेंटेनन्स ची बिल, इलेकट्रीसिटी ची बील किती वर्षापर्यंत जपून ठेवावीत. ? >> हो मला ही हाच प्रश्न पडला आहे . काल पेपर्स काढताना पहीलं माझ्याकडे गेल्या ५ वर्षाची विज बिले आहेत......
केदार , सायो घन्स चांगल्या आहेत लिंक्स.......

> आला पेपर की करा फाईल ह्या तत्वावरच हे काम उरकू शकतं.
मी आजकाल २-मिनीट रुल वापरायचा प्रयत्न करतो: कोणतेही काम, जर ते दोन मिनीटात होऊ शकणार असले तर लगेच करुन(च) टाकायचे.

घरातील सर्व व्यक्तींना प्रेमाने समज देणे कि एकच ऑफिशिअल सिग्नेचर हवी व सर्व कागदपत्रांवर तीच व तशीच हवी. ह्या सह्या नावा समोर घेउन ते एका फाइल मध्ये लावावे. दोन तीन सह्या, छोट्या सह्या वगैरेचे लाड चालवून घेऊ नये. ऑथोरिटीज फार वैतागतात.

घरातील सर्व व्यक्तींना प्रेमाने समज देणे कि एकच ऑफिशिअल सिग्नेचर हवी व सर्व कागदपत्रांवर तीच व तशीच हवी. ह्या सह्या नावा समोर घेउन ते एका फाइल मध्ये लावावे. दोन तीन सह्या, छोट्या सह्या वगैरेचे लाड चालवून घेऊ नये. ऑथोरिटीज फार वैतागतात>> अगदि अगदि हे फारच महत्वाचे आहे

रच्याकाने सोसायटीची मेंटेनन्स ची बिल, इलेकट्रीसिटी ची बील किती वर्षापर्यंत जपून ठेवावीत. ? >> जर घर भाड्याने दिले असेल तर तीन वर्षे किंवा सध्याचा भाडेकरू जितकी वर्ष राहत आहे यातील जास्तीत जास्त वर्षे ठेवावीत... नाहीतर एक वर्ष ठिक आहे... जर एखाद्या महिन्यात विजेचे बील जास्त आले तर गेल्या तीन महिन्याची बिले आणि त्या महिन्याचं एक वर्षापूर्वीच बिल (Consumed Units) बघणं महत्त्वाचे आहे.
जर घरी मशिन असेल तर विजेचे बिल ऑनलाईन भरा आणि बिले PDF मध्ये ठेवा(http://billing.mahadiscom.in/)

**

कालच केदार आणि सिमाने सांगीतल्या प्रमाणे फाइल्स आणल्या त्यांना नंबरींग केले आणि त्यात पेपर्स लावले शुक्र आणि शनि यातच गेला, मुलींनाही कामाला लावले (पेपर फाडण्याच्या) Lol त्याही २ दिवस खुशीत आहेत आज सकाळीच उठल्यावर विचारले आई आज कुठले पेपर्स आवरायचेत?

अश्विनीमामी आजचा बेत तुम्ही सांगीतल्या प्रमाणे एक्सेल फाइल बनवुन मेल करण्याचा आहे.
माझ्याकडे फारच महत्वाचे पण रद्दित टाकता न येण्या सारखे खुप म्हणजे खुपच पेपर्स होते, ते नवर्याने पहाटेच गुरख्याला हाताशी धरुन जाळून टाकले व राख झाडांना खत म्हणून घातली.

कागद कुजवा (पाण्यात बुडवून) >> मस्त आयडीया आहे अजुन बरेच पेपर्स आहेत त्या बाबतीत असचं करते...
पण पुढे त्याचे काय करु? ( म्हणजे खतं म्हणुन उपयोग होईल क?)

मी पण फारसा व्यवस्थित नाही पण मला हवा असलेला कागद सापडतो. <<< केदार, आमच्या आबासाहेबांचं पण असंच असतं. Proud अगदी त्यांच्या दूरध्वनी क्रमांकांच्या नोंदवहीतही मराठी किंवा इंग्रजी अकारविल्हे आधी आऊट आऊट!! पण त्यांचं त्यांना चटकन सापडतं. आऊसाहेबांचं तर याहून अचाट. घरातल्या कुणाचीही कसलीही चिटोरी कुठे मिळेल हे बसल्या ठिकाणाहून (आकाशवाणी केल्यागत) सांगतात. Lol

मी आजकाल २-मिनीट रुल वापरायचा प्रयत्न करतो: कोणतेही काम, जर ते दोन मिनीटात होऊ शकणार असले तर लगेच करुन(च) टाकायचे. <<< आशिष, जोरदार अनुमोदन! ( काम केल्यावर स्वतःला खूप वेळ मनातल्या मनात शाब्बासकी देत बसायचं. म्हणजे पुढच्या वेळी हुरूप राहतो. Proud )

2 मिनिट रूल भारी वाटतोय , उद्यापासून प्रयत्न करणार.
अमेरिकेत कागद आवरणे हि डोकेदुखी झालेय. पासपोर्ट ,विसा, बँकेचे कागद, हे तर असतातच, शिवाय दर आठवड्याला येणाऱ्या जाहिराती, लोन Certificates ताप आहे सगळा. पोर कागद फाडायच काम न सांगता करत असतात, पण त्यांनी फाडलेले कागद गोळा करून टाकणे हि पण डोकेदुखी आहे . सगळ्या रिसीट जपून ठेवायच्या आणि २ महिन्यांनी फेकून दिल्या कीच त्यातली एखादी लागते Happy

२ मिनीट रूल मीही मधे वापरायचे ठरवले होते. मग काय झाले लक्षात नाही Happy

कधी कधी असेही होते. इलेक्ट्रिक बिल भरून झाले आहे. आता इतका वेळ डोके खाणारा तो कागद कोठे ठेवायचा? त्याची फाईल माहीत आहे, त्यात बहुतेक बिले आहेत (काही इकडेतिकडेही सापडतात अधूनमधून. पण "एकदा नीट लावू" असे म्हणून दुर्लक्षिली जातात), तेथे खरे म्हणजे उठून ठेवायला पाहिजे. पण हातातला चहा तोपर्यंत गार होईल. आणि मुळात ते काम बोअर आहे. म्हणून टेबलवर जेथे जागा असेल तेथे ते सरकवले जाते. मग चहा पिऊन होईपर्यंत माबोवर तेवढ्यात काहीतरी खमंग मजकूर असलेला बाफ सापडतो. तो वाचण्यात आणि स्वतःचे मौलिक विचार डोक्यात जमवून लिहीण्यात आणि मग पुढची १५ मिनीटे कोणी त्यावर प्रतिक्रिया देत आहे का ते बघण्यात हे सर्व विसरले जाते.

त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा अ‍ॅड्रेस प्रूफ लागते, तेव्हा सहा महिन्यापूर्वीची बिले फक्त सापडतात. "लेटेस्ट" बिल जाम सापडत नाही. मात्रा त्यानंतर काही दिवसांनी फोटो किंवा इतर काही शोधताना बरोबर सापडते Happy

असेच काहीतरी झाले असावे.

मी पण वेगवेगळ्या फाईल्स करून त्यात कागदपत्रे ठेवली आहेत. शिवाय एक डायरी आहे, त्यात इन्व्हेसमेंट विषयी सर्व डिटेल्स लिहून ठेवलेत. म्हणजे कुठली एफ. डी. कधी मॅच्युअर होणार ते लगेच कळते. आता मला ते सर्व एक्सेलमचे करायचे, त्यासाठी अजून चांगला मुहुर्त सापडत नाही आहे.:)
स्कॅन करून ठेवण्याची आयडीया पण फार महत्त्वाची आहे. ते सुद्धा मी लवकरच करेन .....

माझ्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनींग करुन त्याच्या कॉपीज माझ्या इमेल अकाऊंटवर वेगळ्या फोल्डरमधे
असतात, तसेच सोबत कायम एका फ्लॅश ड्राइव्हवर आणि लॅपटॉपवर पण असतात.
स्कॅनींग मात्र रंगीतच करायचे.
बाकी ओरिजीनल कशी ठेवायची, यासाठी वरच्या सर्वच टिप्स चांगल्या आहेत.

Pages