पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गेल्या काही दिवसापासुन रोज सकाळी मळ्मळ्त आणि उल्ट्या पण होतात.मला पीत्ताचा ञास नाहिये.मला कळ्त नाहिये कि हे नक्की कश्यामुळे होते आहे.मझ्या सासुबाईन्ना या कोरड्या उल्ट्या आहेत अस वाटत.कोणी यावर काही उपाय सांगु शकेल का???

>>पित्त झाल्यावर करायच्या उपायांपेक्षा न होऊ देणंच बरं.

अगदी अगदी भरत. मी आधी पोस्ट केलंय तरी पुन्हा एकत्र करते:

१. इथे सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे रात्रीची झोप आवश्यकच
२. शेंगदाणे किंवा कूट घातलेले पदार्थ जमल्यास खाऊ नयेत किंवा कमी खावेत.
३. उन्हात जाताना छत्री न्यावीच. निदान मुंबईत तरी लोक चांदण्यात फिरावं तसे उन्हात फिरतात आणि आपण छत्री नेली तर परग्रहावरून आलेल्या प्राण्याकडे पहावं तसे पहातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. पित्ताचा त्रास त्यांना नाही आपल्याला होतो Proud
४. २ किंवा ३ शक्य न झाल्यास पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी २-३ आमसुलं/कोकमं खावी किंवा त्याचं सरबत घ्यावं अथवा लिंबाच्या रसातले आल्याचे तुकडे खावे (थोडे कमी कारण आलं उष्ण असतं)
५. भरतने म्हटलं तसं सकाळी पित्त उलटून टाकणे हा उत्तम उपाय. घश्यात थोडा वेळ खवखव होते पण निदान दिवस बरा जातो.

गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टांच्या मते पित्त उलटून टाकणे हा उपाय अयोग्य आहे. पोटातली सगळी रसायनं आम्ल (अ‍ॅसिडिक pH) अस्तात. त्यामुळे ती वर येताना अन्ननलिकेला पोळून अपाय करू शकतात. या नलिकेच्या पेशीस्तराला (लायनिंगला) अशा आम्ल वातावरणाची सवय नसते. एरवी पित्ताच्या उलट्या होण्यामुळे देखिल हा त्रास होऊ शकतो. या प्रकारे पित्ताच्या ओकार्‍या होत राहिल्या तर आन्ननलिकेचे अल्सर्स उद्भवू शकतात. तेव्हा योग्य ती काळजी घ्यायला हवी. घरगुती उपाय करूनही वरचेवर त्रास होत असेल तर डॉक्टरांना गाठायला हवं. पित्ताचा त्रास कमी करण्यात 'वजन कमी करणं' हा पण महत्त्वाचा भाग आहे. (एकूणच जीवनपध्दतीत बदल हा उत्तम उपाय असं कळलंय. Happy )

अरे बापरे, मला वाटत होते पित्त उलटून टाकणे चांगले म्हणजे पित्ताचे प्रमाणे कमी होईल...
कारण मला त्रास चालू झाला की मी चक्क घशात बोट घालून पित्त उलटवून टाकतो...
पोटातली सगळी रसायनं आम्ल (अ‍ॅसिडिक pH) अस्तात. त्यामुळे ती वर येताना अन्ननलिकेला पोळून अपाय करू शकतात.
शप्पथ..हे जाणवते बर का...घशाची आणि अन्ननलिकेची आग होते..
मृण्मयी खूप खूप धन्स गं, यापुढे मी असा कायतरी अघोरी प्रकार नाय करणार

महिना झाले पित्ताचा भयंकर त्रास होतो आहे.जेवण नेहमीप्रमाणेच आहे बाहेरचं खाणं बंद आहे तरीही रोज डोक दुखतं उलटी केली तर त्रास कमी होतो पण रोज उलटी करावी का?
मला हा त्रास कधी उलट सुलट खाण्याने व्हायचा पण हल्ली रोजचं होतोय डॉ. जाउन आले त्यानीं दिलेल्या गोळ्यानी फरक पडला पण गोळ्या बंद केल्या कि परत सुरु.पोटात आणि छातीत नुसती जळजळ होतेयं आणि डोकं जाम दुखतयं यावर काय उपाय असेल तर सांगा? प्लिज

.

.

पित्ताचा त्रास नक्की त्याच्या तीव्रतेसकट डॉक्टर ला सांगता येणं, ते समजणारा डॉक्टर मिळणं, आणि त्यावर योग्य उपाय होणे या मलातरी दैवदुर्लभ गोष्टी वाट्तात. त्यापेकक्षा स्वःताच प्रयोग करणे जास्त चांगलं.

मला ७ महिन्या पुर्वि काविल् झालेली लिवर ची जास्त प्रमानात.आता रक्त चेक केले तर कविल दाख्वत नाही. पन मला कधी कधी उलति आल्या सारखे होते. डॉक्त्तर ने सन्गितले कि तुला पित्ता चे तरास आहे. पन मला काविल् होन्या पुर्वि हा त्रास् कधिच नवता. पन मला आता खुपच पित्ताचा त्रास् होतो. उल्त्या पन होतात. पोटात पन दुखते. मला काही उपाय सान्गा.

सर्वाची वेदना वाचली,उपाय वाचले पण आहाराच्या बाबतीत कु़णीच काही बोलत नाहिये. जे इनपूट तुम्ही देता तेच आउटपूट असते. तेव्हा चमचमीत्,मसालेदार्,तिखटजाळ,वेळी अवेळि आणि मुख्य म्हणजे पुरेशी भूक नसताना खाणे ही सारी कारणे अ‍ॅसिडीटी ला लागू पडतात. मी पण अ‍ॅसिडीटीचा पेशंट आहे पण आहारनियमन्,अत्यंत कमी तिखट्,मसालेदार्,आंबट कमी केले आणी आटोक्यात आणले आहे. अजुनही जेव्हा पावभाजी,वडे खातो तेव्हा दुध्,आइस्कीम चा मारा करतोच्.यामुळे बराच फरक पडला शिवाय स्वभावात पण... कारण अ‍ॅसिडीटी चे पेशंट तापट असतात हा स्वानुभव...

"सकाळ"ची "फॅमिली डॉक्टर"ची जी पुरवणी येते त्यात बालाजी तांब्यांची औषधे पुरविणार्‍या सर्व औषधांच्या दुकानांची यादी असते.

माझा नवरा सध्या सकाळी उठल्यावर १ ग्लास कोमट पाण्यात लिंबुरस आणि १ च मध घेतो आहे, त्यांना अ‍ॅसिडीटिचा त्रास आहे तर हे बाधक नाही ना होणार?

साक्षी, वैद्यकशास्त्रात सर्वसामान्य मार्गदर्शन असते पण त्यातले काय आपल्याला फायदेशीर आहे हे आपले आपणच ठरवायचे असते. त्यांना थोडे स्वतःचेच निरीक्षण करायला सांगा. उत्तर त्यांनाच सापडेल.

सामान्यपणे लिंबूपाण्याने अन्नमार्ग धुतला जातो म्हणून ते फायदेशीर ठरते. पण सकाळी अन्शपोटी घेतल्याने पित्त वाढू शकते. तसे झाल्यास लिंबू थोडे कमी करून बघा अथवा खाल्ल्यानंतर तासाभराने पिऊन बघा.

साक्षी माझ्या योगा टिचरने सांगितलेल आठवत की जर अ‍ॅसिडीटिचा त्रास असेल तर लिंबुपाणी पिउ नये. कारण लिंबामध्ये अ‍ॅसिड असत ते आपल्या शरीरातील अ‍ॅसिडमध्ये अ‍ॅड होत.

सकाळ"ची "फॅमिली डॉक्टर"ची जी पुरवणी येते त्यात बालाजी तांब्यांची औषधे पुरविणार्‍या सर्व औषधांच्या दुकानांची यादी असते.>>>वैभव बालाजी तांबेंचं पित्तशांती गोळ्या घ्या खूप उपयोगी आहेत.>>>>>>>>काही उपयोग होत नाही बालाजी तांबे चा औषधांचा ...माझ्या बाबांनी अनुभव घेतला आहे..नाव मोठे आणि लक्षण खोटे असा प्रकार वाट्तो मला...

अ‍ॅसिडीटिचा त्रास असेल तर लिंबुपाणी पिउ नये. कारण लिंबामध्ये अ‍ॅसिड असत ते आपल्या शरीरातील अ‍ॅसिडमध्ये अ‍ॅड होत.<<

त्या ऐवजी कोमट पाण्यात मिठ टाकून पिल्यास लवकर आराम मिळेल. हे माझा वैयक्तीक अनुभव आहे.

सध्या आवळा कँडी आणि मोरावळा खात आहे (खाऊवाले पाटणकरची प्रोड्क्टस). ओके वाटत आहे. शारंगधरचे कूलकंद सुद्धा घेत आहे रोज सकाळी थंडगार दुधातून. चहा/कॉफी पूर्ण बंद. पनीर, पिझ्झा बंद. तरीही अधूनमधून असह्य त्रास होतोच. आता सवय झाली आहे आणि पूर्ण त्रास जाईल असे वाटत सुद्धा नाही. कमीत कमी त्रास होईल ह्यासाठी मात्र उपाय चालू असतात.

एकदा डोके दुखायला लागले की जरा खुट्ट झालेलेसुद्धा सहन होत नाही. उजेड सहन होत नाही. पित्त उलटून पडले की फार फार बरे वाटते.

मी सध्या सकाळी उठ्ल्या उठ्ल्या एक तांब्याभरून पाणी पितो. (एक लीटर) सावकाशपणे थोडे थोडे करून.
याचा मला पित्तासाठी फायदा होतोच आहे पण किडनीस्टोनसाठी सुद्धा.

लंपन.. जमोप्या म्हणतो तसेच हा मायग्रीन आहे... मी याच प्रकाराचा फार जुना नमुना आहे.
यात डोकेदुखीचे चक्र साधारणपणे ठरलेले असते... त्रास सुरू झाला की मी 'माय्ग्रानील' नावाची गोळी हेतो. किमान आठ तास डोकेदुखी बंद होते. कडक कॉफी हा सुद्धा एक उपाय लागू पडतो. ५-६ महिन्यात एकदा तरी 'क्लासिकल मायग्रेन' चा त्रास होतोच.पएकूणच मायग्रेन हा प्रकार गंमतीदार असतो

Pages