सहजच

Submitted by मनिषा लिमये on 13 February, 2008 - 22:43

इतक्या वर्षांनी अचानक "ती "रस्त्यात दिसली.
समोर येऊन अगदी ओळखीचं हसली.
बोलण -बिलण गप्पा
ऊभ्या झाल्या उन्हात.
मनातला विषय तसाच अजुन मनात.
तीच म्हणाली सह़ज-
बोलला नाहीस म्हणुन कळलं नाही का मला?
केव्हापासून जवळुन ओळखत्ये तुला.
अरे, प्रेम असंच असतं, वाटलं नाही तरी हवं त्याला दिसतं.
गुलाब कोमेजतो
आणि पाकळ्यांचा रंगही जातो उडून,
तुझ्या आठवणींचा काटा मनात आहेच दडून.
आली तशीच गेली
ती सहज हात करुन,
तसाच मी उभा
अन
डोळे आले भरुन.

गुलमोहर: 

मस्तच लिहिलय ग... आवडली

-प्रिन्सेस...

मनिषा, एकदम झक्कास आहे कविता.

>> आली तशीच गेली
ती सहज हात करुन
किती सहजता आहे!

अती सुन्दर...

सुरेखच लिहिली आहेस मनिषा, एकदम सहजपणे जमलीय. शेवट एकदम टचिंग!

तीचे आंधळे प्रेम. छान आहे कविता.

मनिशा,
छान लिहिल आहेस. अगदि भिडल मनाला.

वाह.....
खूप आवडली... प्रत्येक ओळ... Happy

मनिषा खूप छान झालिये गं...... अगदी सहज....!
खूप दिवसांनी वाचली तुझी कविता....... लिहिती रहा गं !

मनिषा, सुंदर कविता..... अन किती सहज!

मनिषा
'सहजच' अगदी सहज साध्या सरळ शब्दात लिहीलीस ...
'आली तशीच गेली ती सहज हात करुन ...तसाच मी उभा अन डोळे आले भरुन'
.... सुंदरच ... किती कठिण पण किती सहज लिहीलेस ..

छान सहजसुंदर!

मने विकेट. मस्त लिहिलेयस. नविन काही लिहिलयस का? ते पण पोस्ट ना इथे

एकदम सहजच आवडुन गेली कविता... छान!!

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

मनिषा... डोळे आले भरुन.... मस्तच Happy

मने छानच ग कविता, मला मुक्त छंदात ल्या कविता खुप आवड्तात , अगदि प्रसंग च डोळ्यासमोर उभा केलास

व्वा !
एकदम तरल कविता!
आवडली खुपच!!
Happy
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

अगदी माझ्या अनुभवातली घटना तुला कशी कळली?

अस्सं जर खरंच झालं तर...? डोळे मात्र नक्की भरुन येतील!

आवडली!

मन्शा तेरा ये रंग मालूम नही था.
मस्त गं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

अगदी माझ्या अनुभवातली घटना तुला कशी कळली?<<<
मला सगळं कळत बरं खरे Proud

पण माझ्या वर्षा-दिडवर्षा पुर्वीच्या कवितेला अचानक उर्जितवस्था कशी काय आली बरं ?

अभिप्रायाबद्दल सगळ्यांचेच आभार.

मेरा कौनसा रंग मालुम नही था तेरेकु निरजा??? Proud
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

मनिषा, कविता आवडली गं.. Happy
>>>>>मला सगळं कळत बरं खरे
खरे साहेब.. अजून काही घटना काव्यरूपांत बाहेर येण्यापुर्वीच शरण जा मनिषादेवींना.. Proud
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

सुरेख !
गुलाब कोमेजतो
आणि पाकळ्यांचा रंगही जातो उडून,
तुझ्या आठवणींचा काटा मनात आहेच दडून. >>> वाह !

    ***
    Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.

    खुप सुरेख...सहज भावना मांडल्या...

    Pages