Submitted by मनिषा लिमये on 13 February, 2008 - 22:43
इतक्या वर्षांनी अचानक "ती "रस्त्यात दिसली.
समोर येऊन अगदी ओळखीचं हसली.
बोलण -बिलण गप्पा
ऊभ्या झाल्या उन्हात.
मनातला विषय तसाच अजुन मनात.
तीच म्हणाली सह़ज-
बोलला नाहीस म्हणुन कळलं नाही का मला?
केव्हापासून जवळुन ओळखत्ये तुला.
अरे, प्रेम असंच असतं, वाटलं नाही तरी हवं त्याला दिसतं.
गुलाब कोमेजतो
आणि पाकळ्यांचा रंगही जातो उडून,
तुझ्या आठवणींचा काटा मनात आहेच दडून.
आली तशीच गेली
ती सहज हात करुन,
तसाच मी उभा
अन
डोळे आले भरुन.
गुलमोहर:
शेअर करा
कवितेला एक छान लय
कवितेला एक छान लय आहे.
कुसुमाग्रजांच्या ' कणा ' कवितेला आहे ना, तशी.
तरल आशय, शेवट छान..... आवडली कविता. सहजसुंदर.
Pages