सहजच

Submitted by मनिषा लिमये on 13 February, 2008 - 22:43

इतक्या वर्षांनी अचानक "ती "रस्त्यात दिसली.
समोर येऊन अगदी ओळखीचं हसली.
बोलण -बिलण गप्पा
ऊभ्या झाल्या उन्हात.
मनातला विषय तसाच अजुन मनात.
तीच म्हणाली सह़ज-
बोलला नाहीस म्हणुन कळलं नाही का मला?
केव्हापासून जवळुन ओळखत्ये तुला.
अरे, प्रेम असंच असतं, वाटलं नाही तरी हवं त्याला दिसतं.
गुलाब कोमेजतो
आणि पाकळ्यांचा रंगही जातो उडून,
तुझ्या आठवणींचा काटा मनात आहेच दडून.
आली तशीच गेली
ती सहज हात करुन,
तसाच मी उभा
अन
डोळे आले भरुन.

गुलमोहर: 

अरे!!
माझ्या लाखो वर्षापुर्वीच्या कवितेला अशी अचानक उर्जितावस्था कशी काय आली बुवा?? Uhoh
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

खूप सुंदर कविता......
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.

खूप आवडली कविता ... किती सुंदर फ्लो आहे सुरवातीपासून शेवटपर्यंत. वाचता वाचता आठवणीचा काटा कधी बोचला ते कळतच नाही Happy

मनिषा : क्या बात है...अस्सल भावनांच प्रतिबिंब लाखो वर्षांतही बदलत नाहीच. मझा आला !!! कीप इट अप मॅडमे !!!!

गिरीश

व्वा मनिषा, कविता आवडली .... सहज आणि सुरेख.

तू बोलत नाहीस म्हणून
चुप्प नसतेस कधीच
शब्दांनीच सांगायला हवं का?
विचारशील डोळ्यांनी उगीच

वा ! कविता असावी तर अशी ! उगाच भारंभार शब्द नाहीत ! नेमके आणि सुस्पष्ट शब्द आणि त्यामधुन अचुक भाव-व्यक्ती ! खरंच छान ! आवडली !
- धनंजय मराठे

Pages