Submitted by राजुल on 9 December, 2011 - 01:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी दलिया, १ वाटी मोड आलेले मसूर, १ कान्दा, १ टोमॅटो, आले लसूण पेस्ट, १ ढब्बी मिरचि,२ मिरचि, मटार, हलद, हिन्ग, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा काला मसाला, कोथिम्बिर, ओले नारळ, कडिपत्ता, मीठ-गूळ चवी नूसार, १ चमचा साजूक तूप, मोहरी, जीरे, ३ वाट्या पाणी.
क्रमवार पाककृती:
दलिया थोडे भाजून घेऊन गरम पाण्यात ५ मिनीट भिजवून धुवून घेणे. कूकर मधे साजूक तूप तापल्यावर मोहरी, जीरे, मिरच्या,कडीपत्ता,हळद,हिन्ग घालून फोडणी करणे.कान्दा फोडणी मधे परतावा, टोमॅटो, मसूर,मटार, ढब्बी मिरची, दलिया त्यात परतून घ्यावे, तिखट, मसाला, मीठ्, गूळ आणि तीन वाट्या पाणी घालून ढवलून घ्यावे व २ ते ३ शिट्या मन्द गॅस वर काढाव्यात.
डिश मधे काढून वरुन नारळ आणि कोथिन्बिर घालावी.पोटभरीची वन डीश मील तय्यार.
वाढणी/प्रमाण:
३ जणाना पुरेशी
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे..पौष्टीक ही आहे..वन
छान आहे..पौष्टीक ही आहे..वन डिश -मील आहे..
छान आहे. मी हा दलिया साध्या
छान आहे. मी हा दलिया साध्या मूगडाळीचा करतो. आता मसूर वापरून पण करून पाहीन. यात कांदा + बटाटा + असेल तर अजून एखादी भाजी पण छान लागते.
धन्यवाद सुलेखा, योगेश. हो यात
धन्यवाद सुलेखा, योगेश. हो यात वेग वेगळ्य भाज्या उदा. वान्गी, गाजर ई.पण छान लागतात.
सही.. मी नेहेमीच वन डीश मील
सही.. मी नेहेमीच वन डीश मील च्या शोधात असते.. आज करून बघीन!
मी सालीसकट मुगाची डाल वापरून
मी सालीसकट मुगाची डाल वापरून दलिया करते खिचडी करताना चमचाभर बिर्याणी मसाला टाकावा छान चव येते
आता मसूर वापरून करून पाहीन
आता मसूर वापरून करून पाहीन
मी भाज्या घालून करते खिचडी.
मी भाज्या घालून करते खिचडी. आता मसूर ट्राय करेन. मसुर आणि कायस्थी मसाला.
परिणिता, बिर्याणी मसाल्याची आयडिया मस्त! नेहमी गोडा मसाला घालते. आता रुचीपालट म्हणून बिर्याणी मसाला घालेन आणि जोडिला बोनलेस चिकन.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.