दलिया मसूर खिचडी

Submitted by राजुल on 9 December, 2011 - 01:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी दलिया, १ वाटी मोड आलेले मसूर, १ कान्दा, १ टोमॅटो, आले लसूण पेस्ट, १ ढब्बी मिरचि,२ मिरचि, मटार, हलद, हिन्ग, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा काला मसाला, कोथिम्बिर, ओले नारळ, कडिपत्ता, मीठ-गूळ चवी नूसार, १ चमचा साजूक तूप, मोहरी, जीरे, ३ वाट्या पाणी.

क्रमवार पाककृती: 

दलिया थोडे भाजून घेऊन गरम पाण्यात ५ मिनीट भिजवून धुवून घेणे. कूकर मधे साजूक तूप तापल्यावर मोहरी, जीरे, मिरच्या,कडीपत्ता,हळद,हिन्ग घालून फोडणी करणे.कान्दा फोडणी मधे परतावा, टोमॅटो, मसूर,मटार, ढब्बी मिरची, दलिया त्यात परतून घ्यावे, तिखट, मसाला, मीठ्, गूळ आणि तीन वाट्या पाणी घालून ढवलून घ्यावे व २ ते ३ शिट्या मन्द गॅस वर काढाव्यात.
डिश मधे काढून वरुन नारळ आणि कोथिन्बिर घालावी.पोटभरीची वन डीश मील तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
३ जणाना पुरेशी
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. मी हा दलिया साध्या मूगडाळीचा करतो. आता मसूर वापरून पण करून पाहीन. यात कांदा + बटाटा + असेल तर अजून एखादी भाजी पण छान लागते.

मी भाज्या घालून करते खिचडी. आता मसूर ट्राय करेन. मसुर आणि कायस्थी मसाला.
परिणिता, बिर्याणी मसाल्याची आयडिया मस्त! नेहमी गोडा मसाला घालते. आता रुचीपालट म्हणून बिर्याणी मसाला घालेन आणि जोडिला बोनलेस चिकन.