माझे लहानपण ,शिक्षण गुजरात मधले..त्यामुळे तिथल्या रितीभाती खुप जवळुन अनुभवल्या..गुजराती लोक तेलकट ,चमचमीत,पण गोडसर चवीचे पदार्थ जास्त आवडीने खातात ..भाज्या तर पुर्ण पणे तेलातच शिजवतात..पानात वाढलेल्या भाजीचे तेल थोडेसे ओघळलेच पाहिजे..उन्हाळ्यात ज्वारी-बाजरीचे--तांदुळाचे -अजुन बर्याच प्रकाराचे उकड काढुन केलेले पापड,बटाटा-केळ्याचे वेफर्स परात -भर तळुन ठेवतात..तहान लागली कि आधी पापड खायचा मग पाणी प्यायचे.. त्याशिवाय भजी-फरसाण-चिवडा तर असतेच..
गुजराती गोटे हा भज्यांचाच एक सुसंस्कृत प्रकार आहे..फार तेलकट नसतात..बडोद्याजवळ डाकोर नांवाचे कृष्णाचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे..तिथले गोटे खुपच प्रसिद्ध आहेत..हे गोटे करण्यासाठी लागणारे जिन्नस या प्रमाणे--
जाडसर बेसन पिठ २ वाटया..
रवा जाडसर १/२ वाटी..
[जर जाडसर बेसन नसेल तर साधे बेसन व रवा १-१ प्रमाणात घेता येतो..अगदी तशी चव येणार नाही पण झक्कास लागेल.]
धणे व मीरे २-२ चमचे घेवुन जाडसर खरडुन घ्यावे--हे एकाचे २ तुकडे झाले तरी पुरेसे आहे..
बडीशोप जाडी २ चमचे..
तिखट २ ते ३ चमचे ...[आवडीप्रमाणे कारण काळ्यामिर्याचे तिखट ही आहे..]
मीठ चवीप्रमाणे..
हळद १ चमचा..
जिरे १ चमचा..
साखर २ लहान चमचे.
आंबट दही अर्धी वाटी..
सोडा पाव चमचा /चुटकीभर..
मोहनासाठी गरम कडाकडीत तेल २ मोठे चमचे..
भिजवायला गरम पाणी साधारण ३ वाटी--[पाणी लागेल तसे थोडॅ थोडे घालायचे आहे.]
..तळण्यासाठी तेल..
कोथिंबीर-मिरची-खोबरे-लसुणपात घातलेली पातळसर चटणी..
बेसन ,रवा एकत्र करा त्यात दही व तिखट,मीठ,हळद,साखर-धणे-जिरे-मिरे-बडीशोप घालावे..गरम पाणी अगदी थोडे थोडे घालत कालवावे..घट्टसर मिश्रण तयार झाले पाहिजे..आता हे मिश्रण १५ मिनिटे तसेच ठेवावे..
पुन्हा एकदा कालवुन पहावे..[रवा घातल्याने कधीकधी मिश्रण जास्त घट्ट होते तेव्हा थोडेसेच चमच्याने पाणी घालावे..तर कधी-कधी मिश्रण सैल ही होते..अशावेळी थोडे रवेदार बेसन अथवा रवा घालावा..]
आता कढईत तेल तापायला ठेवावे..यातील २ चमचे तेलाचे मोहन मिश्रणात घालुन ढवळावे व सोडा घालुन पुन्हा ढवळावे..या मोहनाच्या तेलानेही मिश्रण सैल होते..तेव्हा हे लक्षात ठेवुन च पाणी घालायचे आहे ..कि मिश्रण घट्टसर च असले पाहिजे..
गरम तेलात मध्यम आकाराचे गोलाकार गोटे सोडावे..गॅस कमी करुन अगदी मंद आचेवर हे गोटे गुलवट रंगावर तळावे..तळलेले गोटे कागदावर काढुन जास्तीचे तेल टिपुन घ्यावे..
चटणीबरोबर आस्वाद घ्यावा..
डाकोरला बटाटेवड्याच्या आकारातील खुसखुशीत गोटे खाल्ले आहेत..मंद आचेवर तळले कि आतुन खुसखुशीत होतात..
हे गोटे -प्रत्येकी ३-४ तुकडे करुन वरुन कोथिंबीर्,बारीक चिरलेली थोडीशी चवीपुरती हिरवी मिरची,कांदा ,हिरवी तसेच चिंचे ची चटणी व गोडसर दही व शेव घालुन भन्नाट लागते..
चिंचेची चटणी-सॉस ही चालेल..
आधी तळुन ठेवले तरी चालतात ..थंड ची चव ही छान लागते..तसेच मावेत गरम ही करता येतात..
उसगावातील लो़कांना तर फारच आवडले..त्यांनी आधी भजी/वडे खाल्ले होते..त्यांनी गोटे करुन ही पाहिले व आवडल्याचे कळवले..
मी एकदा अहमदाबादहुन ट्रेन ने
मी एकदा अहमदाबादहुन ट्रेन ने येताना एका स्टेशन वर खाल्ले होते गरम गरम. फारच सुरेख लागतात. आता एकदा करुन बघेन. रेसिपीबद्दल धन्यवाद!
पहिल्याच, लगेच च्या झक्कास
पहिल्याच, लगेच च्या झक्कास प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
आजच्या लोकसत्तात पण ह्या
आजच्या लोकसत्तात पण ह्या गोट्यांबद्दल आले आहे.
नीधप,योगायोग म्हणावा का?
नीधप,योगायोग म्हणावा का? कृति,साहित्य सारखे आहे का?
या गोटयाचे तयार पिठ ही गुजरातेत मिळते..पण अस्सल डाकोर सारखा घरी करण्याचा मजा वेगळा आहे..
खरय सुलेखा, मी पण बडोदयाची
खरय सुलेखा, मी पण बडोदयाची असल्याने गोटानी वानगी वाचल्यावर एकदम घरी गेल्यासारखे वाटले लोकसत्तेत अशीच रेसिपी दिली आहे
मी ही अशाच प्रकारे गोटे करते
मी ही अशाच प्रकारे गोटे करते थेडी मेथी टाकून पण छान लागतात
पहिल्यांदाच ऐकला हा पदार्थ,
पहिल्यांदाच ऐकला हा पदार्थ, कधीतरी करुन बघायला हवा.
ती राजस्थानी 'गट्टे की सब्जी'
ती राजस्थानी 'गट्टे की सब्जी' ह्याच गट्ट्यांची असते का?
योगायोगच. मी काय पाकृ खूप
योगायोगच. मी काय पाकृ खूप तपशीलात वाचत नाही त्यामुळे ते हे सेमच आहे का ते माहित नाही. नाव सारखेच वाटले म्हणून सांगितले केवळ.
मी खाल्लेत हे. चवीष्ट लागतात.
मी खाल्लेत हे. चवीष्ट लागतात. गुजरातचा सकाळचा नाश्ता एकदम भन्नाट प्रकार आहे.
सगळे जवळपास तेलकटच(फाफडा, गाठिया, मुठिये,जलेबी असे सकाळ/ तर कधी संध्याकाळच्या नाश्त्यात असते एखाद दुसरा ढोकळा/खांडवी सोडली तर.
गिटसचे मिळतात पण खूप खूप तेल पिवून मग वर येतात. आत जाळी पडते पण खाल्लं की नंतर घशात तेल लागते ह्या पाकिटातील गोटे केले की.
चवदार लागतात हे गोटे. पण तयार
चवदार लागतात हे गोटे. पण तयार पिठात सोडा खूप घातलेला असतो म्हणून हलके होतात. मी मेथी (पाला) घालून केले होते एकदा.
सोडा अगदी कमीच घालायचा.
सोडा अगदी कमीच घालायचा. त्यामुळे जाळी थोडी कमी होते पण घशात खवखवते कमी.. .पण आंबट दही घातलेले असते त्यामुळे हलके होतात..,कसुरी मेथी..मेथी ची पाने,मेथी खरबरीत किंवा अर्धा चमचा सबंध घालुनही छान चव येते..
मंजुडी-गट्टे की सब्जी मधे फक्त रवेदार बेसन च वापरतात व कृति ही वेगळी आहे..
नीधप-घरात लाडुबेसनचे रवेदार बेसन थोडेसे उरले होते..त्याचे अगदी परवा च केले होते त्यामुळे इथे रेसिपी लिहीली आहे..खरंच योगायोग आहे हा..
परिणीता,मी ही अशीच अधुन मधुन पाकृ.च्या सौजन्याने गुजरातमा फरी आवुं छुं..
फोटो पोस्टाल का प्लीज?
फोटो पोस्टाल का प्लीज?
'गोटे' म्हणजे गोल आकारात
'गोटे' म्हणजे गोल आकारात असायला हवेत ना आयडियली? करावेसे वाटत आहेत. 'गोल' झाले चांगले तर फोटो टाकेन
बित्तुबंगा, मला फोटो चे तंत्र
बित्तुबंगा,
मला फोटो चे तंत्र अजुन काही नीट जमले नाही कुठे तरी चुकते आहे.नीट जमले कि टाकीन..
सुलेखा.. एकदम तोंपासु आहे
सुलेखा.. एकदम तोंपासु आहे रेसिपी.. नक्की ट्राय करीन..
मोठ्या कंच्यांच्या आकाराचे केले तर चालतील?? बटाटेवड्यांसारखा आकार.. फार मोठे होतील बहुतेक!!!
ते फोटू चं बघ हां...
वर्षूनील, मोठ्ठा कंचा [लहान
वर्षूनील,
मोठ्ठा कंचा [लहान गोटी नाही] अगदी चालेल..तळुन थोडासा मोठा होईलच..मंद आचेवर तळायचे म्हणजे आतुन खरपुस तळले जातील-गिच्च होणार नाहीत..खरी कमाल तळण्याचीच आहे..तेव्हाच ते खुसखुशीत होतील..
पौर्णिमा,
होय.गोटा गोल आकारात च हवा..
आज उद्यातच करते आणी टाकते
आज उद्यातच करते आणी टाकते फोटू ...
छान ( आणी सोपी..)रेसिपी बद्दल धन्स सुलेखा
ડાકોરના ગોટા ઐય્યા છે
ડાકોરના ગોટા ઐય્યા છે
जय श्रिक्रस्ण सुलेखा बेन.
जय श्रिक्रस्ण सुलेखा बेन. एकदा नक्की करून बघेन. ते खास गुजराती बेसन आणले पाहिजे.
मस्त. एकदम तोंपासु फोटो
मस्त. एकदम तोंपासु फोटो टाकाच प्लीज
स्लर्रप!! मस्त पाकृ
स्लर्रप!! मस्त पाकृ
मस्त पाकक्रुती. एकदा नक्की
मस्त पाकक्रुती. एकदा नक्की करणार
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/10684 गट्टे की सब्जी..
गट्टे करताना शिजवतात, तळत नाहीत... माझी आवडती भाजी
मस्त! इथे एका गुजराथी
मस्त! इथे एका गुजराथी कुटुंबात खाल्ले होते.
बित्तुबंगा,तमे बतावेली साइट
बित्तुबंगा,तमे बतावेली साइट उपर लखेला हमणाज वांच्या...सारा छे..सामग्री मा फेर छे में आवी कोई साईट परथी नथी लिधा..डाकोर जी ना दर्शन माटे गया हता..त्यारे गोटा नो आस्वाद लिधो हतो अने विधी पण त्यांथीज मळी हती.
अश्विनीमामी-रवेदार बेसन आणुन करुन पहा...आवडतील तुम्हाला
मी पण नेहमी तयारच खाल्लेत.
मी पण नेहमी तयारच खाल्लेत. गुजराथमधेही आणि राजस्थानातही.
मस्तच लागतात.
सुलेखा, फोटोचे अजून जमत नसेल तर आमच्यापैकी कुणालाही इमेलने
पाठवा. आमच्यापैकी कुणीही आनंदाने करेल हे काम.
सगळ्यांनाच फोटो हवे आहेत.
दिनेशदा धन्यवाद. फोटोसाठी
दिनेशदा
धन्यवाद. फोटोसाठी कुठेतरी माझे चुकत आहे..बहुतेक १-२ दिवसात शिकेन.[फोटो चा साईज कमी होत नाहीये..].प्रयत्न चालु आहे..
मस्त रेसिपी. इथे उसगावात दीप
मस्त रेसिपी. इथे उसगावात दीप ब्रँडचं गोटा मिक्स मिळतं ते केलेलं आहे. अर्थात त्याची तुलना वरच्या रेसिपीशी नकोच.
सुलेखा, तुमचा मूळ फोटो राईट
सुलेखा, तुमचा मूळ फोटो राईट क्लिक करुन पेंट ब्रशमध्ये उघडा आणि साईझ कमी करत आणा आणि मग इथे अपलोड करा. सुरवातीला कटकटीचं वाटेल पण एकदा तंत्र जमलं की काहीच प्रॉब्लेम नाही.
Pages