सबंध आवळ्याचा सोपा मोरांबा.. फोटोसहीत आणि नरम /टिकाऊ आवळा सुपारी.

Submitted by सुलेखा on 19 December, 2011 - 23:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

सध्या बाजारात आवळे खुप आहेत..आवळा सुपारी म्हटले कि कडक /वडी सारखी/किसुन केलेली हे प्रकार करतात..त्यात मेहनत बरीच लागते..म्हणजे आवळे किसणे/फोडी करणे हा प्रकार बोटे दुखवणारा असतो ..तसेच .सबंध आवळ्याचा मोरांबा थोडा कठिणच वाटतो...मोरांबा आणि सुपारी करण्यासाठी त्यातल्या त्यात हा सोपा प्रकार पहा..
१]आवळा मोरांबा--
Aawala moramba.JPG१/२ किलो आवळे छान मोठे रसदार घ्यावे..
पाऊण किलो साखर..
चुना-चण्याइतका..
आवळे धुवुन सुरीच्या अग्र भागाने सगळीकडुन टोचे लावुन घ्यावे..
[हे मात्र थोडे कटकटीचे काम आहे]
एका पसरट भांडयात आवळे घालुन ते बुडतील इतके पाणी घालावे त्यात चण्याएवढा चुना थोड्या पाण्यात घालुन कालवुन घालावा व पाणी ढवळुन त्यावर जाळीचे झाकण ठेवावे..२ दिवस तसेच राहु द्यावे..
२ दिवसांनी हे आवळे पाण्यातुन काढुन स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावे..कुकर मधे थोडेसे पाणी घालुन त्यात आवळे टाकुन कूकरच्या २ शिटया काढाव्या..
प्रेशर उतरल्यावर या आवळ्यात साखर मिसळुन ठेवावी..तासाभराने ढवळुन हे आवळे मंद आचेवर शिजवावे..अधुन मधुन ढवळावे..खाली लागु देवु नये.. पाक आळत आला कि गॅस बंद करावा..थोडासा पाक असावा..थंड झाला कि भरुन ठेवावा..

२[आवळा सुपारी---
१/२ किलो आवळे..
१/२ किलो साखर..
काळे मीठ्,जिरे+मिरेपुड्,साधे मिठ हे चवीनुसार घालायचे आहे..साधारण प्रत्येकी पाउण चमचा लागेल पण मिरेपुड मात्र पाव चमचाच घालावी..[चाट मसाला घातला तरी चालेल]
आवळे धुवुन एका बाऊल्/पातेली/ताटली/झिपलोक च्या पिशवीत ठेवुन फ्रीजर मध्ये २ दिवस ठेवावे..
२ दिवसांनी फ्रीजर मधुन बाहेर काढुन एका ताटात्/परातीत काढुन ठेवावे..
साधारण २-२ १/२ तासानी हे आवळे तडकलेले दिसतील..आता प्रत्येक आवळ्याच्या कळ्या सोडवुन घ्याव्या..बी सहजपणे विनासायास निघते..या फोडीत साखर मिसळुन उन्हात ठेवावे वर जाळी ठेवावी..म्हणजे हवेतला कचरा त्यात पडणार नाही..साखरेचा. पाक सुटेल..दुसरे दिवशी पुन्हा उन्हात ठेवतेवेळी त्यात मीठ जिरेपुड वगेरे आपल्या आवडीप्रमाणे हवे ते घालावे..दिवसभरात २-३ वेळा ढवळावे.. कडक ऊन असेल तर ३ दिवसात त्यातील पाक आळतो..२ दिवसानी भांडे बदलुन परातीत पसरावे म्हणजे लौकर वाळेल..ओलसर असताना बाटलीत भरुन ठेवावी

क्रमवार पाककृती: 

वर जिन्नस बरोबर च कृति लिहीली आहे..

वाढणी/प्रमाण: 
मुखशुद्धी आहे तेव्हा प्रमाण काय सांगावे..
माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही कृती छान आहेत. सध्या बाजारात आवळेही भरपुर आहेत Happy

मी अन्नपुर्णामध्येही आवळे दोन दिवस पाण्यात ठेवायचे हे वाचलेले. पण असे केल्याने त्यातल्या जीवनसत्वाचा नाश होत नाही का?

साधना, आवळ्याचा राब /राप जातो पण जीवनसत्व रहातात..मुख्य म्हणजे तुरट्पणा कमी होतो..त्यामुळे खाल्ल्यावर घशाला बोचत नाही..

मी अन्नपुर्णामध्येही आवळे दोन दिवस पाण्यात ठेवायचे हे वाचलेले. पण असे केल्याने त्यातल्या जीवनसत्वाचा नाश होत नाही का? >>>>मलाही हाच प्रश्न पड्लाय...

सुलेखा फोटोचे जमले का, इथेच खाली image अशी अक्षरे आहेत, त्यावर क्लीक केलेत तरी चालेल.
त्यासाठी फोटोची फाईल, पेंटब्रशमधे उघडून अ‍ॅस, जेपिजी म्हणून सेव्ह करा. साईज १५० पेक्षा कमी करा. मग इमेज या शब्दावर क्लीक करा. मग जी नवीन विंडो उघडेल, त्यातल्या अपलोड शब्दावर क्लीक करा. मग ब्राऊझर विंडो उघडेल, त्यात फाईल ची यू आर एल कॉपी करा. मग ओपन वर क्लीक करा. मग फाईल अपलोड झाली कि सेंड टू टेक्स्ट एरिया वर क्लीक करा... बस फोटो इथे दिसू लागेल.

पुर्वी आपल्याकडे पिवळसर रंगाचे छोटे आवळे मिळत ते जास्त तुरट असत. ते पाण्यात ठेवावेच लागत. पण सध्या पुण्या मुंबईला तरी मलेशिया वाणाचे आवळे मिळतात. ते मोठे, जेडच्या रंगाचे आणि अर्धपारदर्शक असतात. ते थेट उकडले तरी चालतात.

इथे फोटो टाकणे जमले आहे...पहिला-वहिला फोटो आहे..पारंगत व्ह्यायला थोडा वेळ लागेल..

काकू, फोटो मस्त. आत्ता जेवायला घेतले आहे तर हा मुरांबा ताटात वाढून घ्यावा असे वाटले Happy
आता प्रत्येक रेसिपीबरोबर फोटो पाहिजेच ही आग्रहाची विनंती Happy

पहिल्या कृतींत आवळ्याच्या बिया काढत नाहीत? दुसरी कृती मस्त आहे. पण साखर आळण्याइतके ऊन नाही सध्या Sad

एक किलो आवळे दिले गेले आहेत, त्यासाठी कमीतकमी कष्टाच्या कृती शोधत आहे Happy

पौर्णिमा,निलम,
मोरांबा करताना आवळ्याच्या बिया काढायच्या नाहीत फक्त बाहेरुन सुरीच्या अग्रभागाने टोचुन घ्यायचे आहेत ..ऊन कमी असेल तर फोडींचा रंग किरमीजी होईल्.बाकी चवीत फरक पडणार नाही..फक्त रात्री ते ताट्/परात घरात ठेवावे व पुन्हा सकाळी ऊन्हात..