भरड्याचे वडे..

Submitted by सुलेखा on 2 December, 2011 - 01:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भरडयाचे वडे करण्यासाठी भरडा तयार करुन ठेवायचा आहे..भरडयाचे पिठ तयार असले कि वडे करायला वेळ लागत नाही..भरडयाचे प्रमाण याप्रमाणे घ्यायचे प्रमाण थोडे बदलुन घेतले तरी चालते..
३ वाटी चणाडाळ,२ वाटी तांदुळ,१ वाटी उडिद डाळ,१ वाटी मुग डाळ बिनासालीची,१ वाटी मसुरडाळ,१ वाटी गहु,मुठभर धणे व २ चमचे जीरे..हे गिरणीतुन थोडे जाडसर दळुन आणावे..[ढोकळ्यासारखे]
भरडा २ वाटया..
हिरवी मिरची ३ आले एक इंच तुकडा,लसुण पाकळ्या सोललेल्या ४-५ ,जिरे १ चमचा,मिरे १ चमचा,धणे १ चमचा हे सर्व एकत्र जाडसर वाटुन घ्यावे..
तीळ २ चमचे.
ओवा १ चमचा..
ति़खट,मीठ,हळद चवीनुसार.
मेथी ची पाने/पानकोबी/गाजर्/मटार दाणे/शेंगदाणे यापैकी एक अर्धी वाटी..काहीही नसले तरी चालते...
तेल तळणी साठी..किंवा तव्यावर तेल सोडुन ही भाजता येतात..
आधणाचे गरम पाणी ३ वाटया..

क्रमवार पाककृती: 

३ वाटया पाणी छान उकळले कि त्यातले एक वाटी पाणी काढुन ठेवावे..उरलेल्या पाण्यात २ चमचे तेलाचे मोहन घालावे..
२ वाट्या भरड घेवुन त्यात वाटण्,तिखट्,मीठ्,ओवा,तीळ घालावे..हे मिश्रण उकळलेल्या पाण्यात थोडे थोडे घालत चमच्याने ढवळत रहावे घट्टसर वाटले तर वगळलेले पाणी अर्धी वाटी घालावे..साधारण २ वाटी भरड असेल २ १/२ वाटी पाणी लागते हे प्रमाण आहे..
आता त्यात मेथी /पानकोबी/गाजर्/मटर अर्धी वाटी घालावे..
हाताने छान कालवुन या मिश्रणाची चव म्हणजे मीठ्,तिखट ची पाहुन घ्यावी व लहान लहान चपटे जाडसर वडे हातावर थापुन गरम तेलात खरपुस तळावे टिशु पेपर वर काढुन जास्तीचे तेल टिपुन घ्यावे.
लोणचे,चटणी बरोबर खावे...सोबत मस्त वाफाळलेला चहा किंवा कोफी..

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी भरपुर ..
अधिक टिपा: 

तळणीचे तेल गरम असावे.म्हणजे गरम तेलात वडे तळायचे आहेत..उकड काढुन पिठ भिजवले आहे त्यामुळे वडे तळताना जास्त तेल लागत नाही..

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

दिनेशदा सध्या आई च्या सेवेत असल्याने फोटो चे जमत नाहीये..माझ्या आईला पॅरालिसीस झाला आहे..मला फोटो देता येत नाही याची खंत आहे..थोडी अजुन तब्येतीत सुधारणा झाली कि नक्की फोटो देईन..

योगेश, भरडयाची तयार भाजणी सुद्धा मिळते.सकस किंवा तत्सम तयार पिठं वाल्याना विचारा..किंवा वेगवेगळी पिठे एकत्र करुन गव्हाऐवजी जाड रवा किंवा बारीक सांजा वापरा..मी उसगावात असताना असे च केले होते..छान झाले होते..मुख्य म्हणजे गरम चवीला मस्त लागले पण थंड झाल्यावर ही खुसखुशीत लागले..तेलात तळुन एकदा व नंतर- मात्र ओव्हन च्या ट्रे मधे खरपुस भाजुन वरुन तेलाचा हात फिरवला.. असे वडे सगळ्यांनाच आवडले बरोबर कोथिंबीर ,मिरची,लसुण्,खोबरे घालुन चटणी..मस्त मेनु सगळ्यांच्या आवडीचा..

वा!!

हे वडे श्राद्धाला करण्याची पद्धत आहे..पण इतर वेळी खाल्ले तरी सकस आहेत ना?हे वडे ,तांदुळाची खीर आपल्याकडे फक्त तेव्हाच करतात..पण इतर प्रांतात आवर्जुन करतात..