[या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)
८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर
९. उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला
=======================================================================
=======================================================================
उत्तर कर्नाटक भटकंतीच्या "मिरजान किल्ला" या भागात सांगितल्याप्रमाणेच काहि ठिकाणे आपल्या पूर्वनियोजित प्लानिंगमध्ये नसतात पण त्या ठिकाणाला भेट दिल्यावर नकळतच "व्वाह" असे उद्गार निघतात. मिरजान किल्ल्याप्रमाणेच अजुन एक ठिकाण म्हणजे "याना हिल्स". कारवार-मुरूडेश्वर हायवेवर कुमटा या गावापासुन एक रस्ता सिरसीला जातो (सिरसीपासुन याना हिल्स ४०किमी अंतरावर आहे). तेथुनच जवळ गर्द वनराईत लपलेले हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासुन सोळा किमी आत (वळणावळणाचा रस्ता असल्याने सोळा किमीहि जास्त वाटतात :-)) याना हिल्सचा पायथा आहे. पायथ्याला गाडी उभी करून अंदाजे दोन अडीच किमीची चढण चढुन आल्यावर सर्वात उंच भैरवेश्वरा शिखर (उंची १२० मी.) आणि मोहिनी शिखर (उंची ९० मी.) असे निसर्गाचे दोन चमत्कार दिसतात. या दोन अडीच किमीची प्रवासात आपल्याला साथ देतात ते उंचच उंच दाट झाडी, सोबत वाहणार्या नदीचे खळाळते पाणी, आपल्या अवतीभोवती बिनधास्तपणे बागडणारी फुलपाखरे (आम्हाला येथे ब्लु मॉर्मनने अगदी मनभरून दर्शन दिले, त्याच्या चंचलपणामुळे कॅमेर्यात बंदिस्त करता आले नाही पण आठवणीत मात्र कायमचे बंदिस्त केले. :-).), विविध पक्षी आणि निरव शांतता. याना हिल्सच्या जंगलात विविध प्रकारची मसाल्याची झाडे आहे, माझ्या अज्ञानामुळे मला फक्त तेजपत्त्याचे झाड ओळखु आले.
तासादिडतासाची हि चढण पार करण्यासाठी काहि ठिकाणी व्यवस्थित पायर्या आणि रेलिंग लावले आहेत. विशेष उल्लेख करावासा वाटतो कि मला या ठिकाणी गुटख्याची पाकिटे, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा/पेपर प्लेटचा कचरा, पान/गुटखा खाऊन मारलेल्या पिचकार्या असं काहीही दिसलं नाही. 
हाताशी वेळ कमी असतानाहीआवर्जुन जाऊन आलो नाहीतर या जागेला भेट दिली नसती तर काहितरी खुप सुंदर पाहण्याचे राहुन गेल्याची रुखरुख राहिली असती. उंचच उंच शिखरे आणि त्यांच्या पोटातली गुहा यामुळे उत्तर कर्नाटक भटकंतीत आवर्जुन पहावी अशी हि जागा आहे.
प्रचि ०१
गर्द सभोती रान
प्रचि ०२
आकाशाशी स्पर्धा करणारी वृक्षसंपदा
प्रचि ०३
तेजपत्ता
प्रचि ०४
गुळवेल
प्रचि ०५
पायर्या
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
रॉक हिल्स
प्रचि ०९
प्रचि १०
मोहीनी शिखर
प्रचि ११
भैरवेश्वरा शिखर
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
भैरवेश्वर शिखराच्या पोटातील गुहा
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
याना हिल्सबद्दल असलेल्या माहितीचा कानडी भाषेतला फलक (भाषांतर केल्यास मलाही कळवावे :फिदी:)
(क्रमशः) 
अधिक
अधिक माहिती:
http://trekwiki.wetpaint.com/page/Yana
जिप्स्या, एक आगळीच सफर
जिप्स्या, एक आगळीच सफर घडवलीस.

मोठे मोठे कातळही इतके सुंदर आणि मनमोहक असू शकतात यावर आज दुसर्यांदा विश्वास बसला. खूप लहान असताना मंत्रालय ला गेले होते, तिथे मोठे मोठे दगड पाहून आवाक झाले होते. आज पुन्हा झाले.
जिप्सी - तू कुठे कुठे जाशील,
जिप्सी - तू कुठे कुठे जाशील, काय काय शोधशील आणि तेथील फोटो / वर्णनातून घरबसल्या आम्हाला किती वेगवेगळे नयनमनोहर अनुभव देशील याचे शब्दात वर्णनच करता येत नाही.... आभार, धन्यवाद हे शब्दही तोकडे वाटू लागले मला...
तेथील खडकांवर त्या उभ्या रेषा दिसतात हे कशामुळे ? फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतात हे खडक - दक्षिणाला अनुमोदन...
मस्त फोटो. पण तो तेजपत्ता
मस्त फोटो.
पण तो तेजपत्ता नाही. माझ्या मते ती गुळवेल आहे.
तेजपत्ता च झाड असत. वेल नाही.
हापिसबैठे कर्नाटक दर्शन घडवलस
हापिसबैठे कर्नाटक दर्शन घडवलस ते हि फुकट.
धन्यवाद
दक्षिणा, शशांक, रीमा, झकास
दक्षिणा, शशांक, रीमा, झकास धन्यवाद
पण तो तेजपत्ता नाही. माझ्या मते ती गुळवेल आहे.>>>>>धन्स रीमा, तेजपत्त्याच्या प्रचि अपडेट केला.
झकासच, या 'याना' बद्दल नुकतेच
झकासच, या 'याना' बद्दल नुकतेच वाचले होते. सही सफर सुरु आहे आमची. कर्नाटक पर्यटन मंडळाकडून 'आभारपर मानधन' आल्यास नवल नाही.
सुंदर.. खरंच अनोखे ठिकाण.
सुंदर.. खरंच अनोखे ठिकाण. मुद्दाम जावेसे असे.
अशी मोहिनी शिखरे आफ्रिकेत आहेत आणि तिथे माकडांची वस्ती असते.
आणि ती घळ थेट १२७ अवर्स वाली वाटतेय.
अप्रतिम मित्रा... सुंदर सफर
अप्रतिम मित्रा...
सुंदर सफर घडविलीस...
ह्या जागेला भेट द्यायचे फार दिवसांपासुन मनात आहे...
जबरदस्तच रे , मला तर ही
जबरदस्तच रे , मला तर ही अलिबाबा ची गुहा वाट्ते आहे.
हा.का.ना.का.
जिप्स्या-तिथे परत गेलास तर जरा तिळा तिळा दार उघड हा मंत्र बोलुन बघ.
गुळवेल म्हणजे काय ? ही वेल तर काळेमिरी सारखी आहे.
सुंदर फोटो ! गुळवेल म्हणजे
सुंदर फोटो !
गुळवेल म्हणजे काय ? ही वेल तर काळेमिरी सारखी आहे.>>>
खेड्यांमध्ये गुळवेलीचा काढा औषधी समजला जातो सर्दी पडश्यावर अक्सीर ईलाज म्हणून.
कर्नाटक पर्यटन मंडळाकडून
कर्नाटक पर्यटन मंडळाकडून 'आभारपर मानधन' आल्यास नवल नाही>>>>सागर
आणि ती घळ थेट १२७ अवर्स वाली वाटतेय.>>>>>>अगदी अगदी. मला या घळीत जाताना मायबोलीकरांनी केलेली सांदण दरीची भटकंती आठवलेली.
ह्या जागेला भेट द्यायचे फार दिवसांपासुन मनात आहे...>>>>नक्की जाऊन ये. तुझ्या नजरेतुन याना हिल्स पुन्हा एकदा बघायला आवडेल.
बंगळुरूपासुन ~४०० किमीवर आहे हि ठिकाण.
तिथे परत गेलास तर जरा तिळा तिळा दार उघड हा मंत्र बोलुन बघ.>>>>>:फिदी:
धन्स गीता अधिक माहितीसाठी
जिप्सी, दक्षिणा आणि शशांक
जिप्सी, दक्षिणा आणि शशांक पुरंदरेंना १००% अनुमोदन .:)
खुपच मस्त प्र.चि. आहेत.. आणि वर्णन पण... मुद्दाम जायला पाहिजे असे वाटले.
जिप्सी, खरेच आहे... किती
जिप्सी, खरेच आहे... किती माहीती मिळते आहे . फोटो तर अप्रतिमच :स्मित:..
नंदिनी प्लीज भाषांतर कर
नंदिनी प्लीज भाषांतर कर
अरे मस्तच.. सहीये.. आम्हाला
अरे मस्तच.. सहीये.. आम्हाला सांधण दरी आठवली..
अरे मस्तच.. सहीये.. आम्हाला
अरे मस्तच.. सहीये.. आम्हाला सांधण दरी आठवली..
अरे मस्तच ... काय जबरी लोकेशन
अरे मस्तच ... काय जबरी लोकेशन आहे ...
आम्हाला सांधण दरी आठवली.. >> हो रे ...
जिप्सी, फोटोग्राफीत तुझी
जिप्सी, फोटोग्राफीत तुझी मास्टरी आहेच पण तुझ्यातला लेखक पण प्रगट व्ह्यायला लागलाय हं!! मस्त.. फोटोंचं समर्पक शब्दांत वर्णन करणे हे सुद्धा तू लीलया करतोएस.त्यामुळे फोटोंइतकाच लिखाणालाही सलाम!
मस्तच
मस्तच
वर सर्वानी जे प्रतिसाद दिलेत
वर सर्वानी जे प्रतिसाद दिलेत +१००.
मला आता काही सुचतच नाही हे सर्व बघून
योगेश, नेहमीप्रमाणे सुंदर
योगेश, नेहमीप्रमाणे सुंदर बोलकी प्रचि.
मस्त रे जिप्सी, आवड्ले हे
मस्त रे जिप्सी, आवड्ले हे फोटो.