उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला

Submitted by जिप्सी on 21 November, 2011 - 23:24

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर
===============================================
===============================================
कधी कधी असं होतं कि एखाद ठिकाण लिस्टमध्ये नसताना अचानक समोर येतं आणि हे नसंत पाहिलं तर काही तरी मिस केलं असत असं सहजच वाटुन जात. मिरजान किल्ला आमच्या कर्नाटक सफरीच्या लिस्टमध्ये नव्हताच. आंतरजालावरून उत्तर कर्नाटकची माहिती घेतानाही याचा उल्लेख कुठेच आढळला नाही. गोकर्णला आदल्या दिवशी मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नाही म्हणुन आम्ही मुरूडेश्वरला गेलो. एक रात्र तेथे राहिल्यावर दुसर्‍या दिवशी दुपारी १२ च्या आत गोकर्णला पोहचायचे म्हणुन सकाळीच निघालो. मुरूडेश्वर - कारवार रस्त्यावर कुमटा गावाच्या आधी डावीकडे माझी नजर एका बोर्डवर गेली वर "मिरजान फोर्ट" एक किमी असे लिहिले होते ("चोराची नजर बोचक्यावर आणि भटक्याची नविन ठिकाणावर Proud "). हे ठिकाण लिस्टमध्ये नसल्याने गाडी वेगात गोकर्णला जात होती. पुढे जाऊन परत यु टर्न घेऊन गाडी मिरजान गावात शिरली आणि दृष्टीस पडला अत्यंत देखणा असा हा "मिरजान किल्ला". नॅशनल हायवेपासुन फक्त एक किमीच आत असुन तास-दिडतासात सहजच बघुन होतो. तेंव्हा या ठिकाणची भटकंती करत असाल तर आवर्जुन या भुईकोट किल्ल्याला भेट द्या. Happy

मिरजान किल्ल्याचा इतिहास विकिपिडियावर येथे वाचण्यास मिळेल. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
दूर्गदेवता
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
(क्रमश: :-))

गुलमोहर: 

वाहव्वा! कसली स्वच्छता आहे किल्ल्यात...आणि ती सुद्धा किल्ला भुईकोट असुनही. कर्नाटक सरकार आपल्या ऐतिहासिक वारश्यांची चांगली निगा राखते हे सिद्ध होतं यावरुन.
दिमाखदार दिसतोय किल्ला!
सोनेरी उन्हांमुळे सुंदरच आलेत फोटो.

अरे, या किल्ल्याचे कितीतरी बांधकाम अजूनही सुस्थितीत दिसत आहे. किल्ला चांगला मेंटेन केलेला दिसतोय............
जिप्सी - तू वेगवेगळ्या अँगलने, जवळून - दुरुन फोटो काढल्यामुळे हा किल्ला कसा असेल याचा बर्‍यापैकी अंदाज बांधता येतोय. तुझ्यासारख्या कसबी फोटोग्राफर कडे या बेसिक गोष्टी असणे हे स्वाभाविकच आहे म्हणा.......
प्र चि २३ मधले ते गोल दगड आहेत का तोफगोळे ?

कसं सुंदर छान मोकळं मोकळं वाटतय..
(वासु-सपना.. बबनराव शिर्के पाटील, रा. रेठरे बुद्रुक.. अशी अक्षरे पण नाहीत ! )

फारच सुंदर किल्ला आहे रे...
आणी अगदी सुस्थितीत आहे...

(वासु-सपना.. बबनराव शिर्के पाटील, रा. रेठरे बुद्रुक.. अशी अक्षरे पण नाहीत ! )>>>
दिनेशदा,
बहुतेक ह्या किल्याचा कुठेही ऊल्लेख नसल्यामुळे आपल्या प्रेमवीर्/पेंटर लोकांना अजुन माहित नसावा...

(वासु-सपना.. बबनराव शिर्के पाटील, रा. रेठरे बुद्रुक.. अशी अक्षरे पण नाहीत ! ) >>> Lol साक्षरता कमी असल्याचा परिणाम.

सुंदर किल्ल्याच्या सुंदर प्रचि,

ऐतिहासिक वारश्याचे उत्तम जतन केल्या बद्द्ल कर्नाटक सरकार चे अभिनंदन
प्रचि २२ मधील विरगळ अनोखी आणि सुंदर धन्यवाद जिप्स्या आमच्या पर्यंत हे सर्व पोहचवण्यासाठी Happy

.

सुरेख फोटो. किल्ला मस्त आहे.

प्रचि १७ फार आवडले. मला खाम्ब आणि खिडक्या, झरोके यान्च्या सीमिट्री साध्य झाल्या की ते फोटो पहायला फार आवडते. प्रचि १७ मध्ये झरोक्यान्चा कोन छान आला आहे. प्रचि ९ पण छान आहे.

महाराष्ट्रात बुरुज या प्रकारचे दिसत नाहीत. कदाचित आपल्याकडच्या कातळ जमिनीत अशा जास्तीच्या आधाराची गरज नसावी.
पण आपल्याकडच्या सरळसोट बुरुजांखालची (तळाची) हालचालही वरुन सहज दिसते, इथे दिसत नसेल ना बहुतेक !

महाराष्ट्रात बुरुज या प्रकारचे दिसत नाहीत. कदाचित आपल्याकडच्या कातळ जमिनीत अशा जास्तीच्या आधाराची गरज नसावी.<<
दिनेशदा या किल्ल्याचे बुरूज, तटबंदी सर्व जांभ्या दगडात बांधून काढलेय, आपल्याकडे बाणकोट, अंजनवेलचा गोपाळगड हे किल्ले पाहीलेत तर एवढी नाही पण थोडीफार याच प्रकारची रचना तुम्हाला पहायला मिळेल.
जांभा दगड ठीसुळ असल्या कारणाने जमिन खचल्यास बुरूज आरण्याची शक्यता असते म्हणून हे दूहेरी बांधकाम केले असावे.

कर्नाटक सरकार आपल्या ऐतिहासिक वारश्यांची चांगली निगा राखते हे सिद्ध होतं यावरुन.>>>>अगदी अगदी Happy

प्र चि २३ मधले ते गोल दगड आहेत का तोफगोळे ?>>>तोफगोळे नाही वाटले, दगडच होते (बहुदा) Happy

आणखी एक म्हणजे गर्दी अजिबात नाही दिसत, बरे आहे.>>>>येस्स, आमच्या आणि पुरातत्व खात्याच्या दोन माणसाव्यतिरीक्त कुणीच नव्हते.

(वासु-सपना.. बबनराव शिर्के पाटील, रा. रेठरे बुद्रुक.. अशी अक्षरे पण नाहीत ! )
बहुतेक ह्या किल्याचा कुठेही ऊल्लेख नसल्यामुळे आपल्या प्रेमवीर्/पेंटर लोकांना अजुन माहित नसावा.
साक्षरता कमी असल्याचा परिणाम. >>>>दिनेशदा, चंदन, ईनमीनतिन:फिदी:

धन्यवाद वेताळ, अधिक माहितीकरीता Happy

त्याकाळी जो काय विचार केला असेल तो शतकानुशतके टिकलाय एवढं खरं.>>>>>अगदी अगदी.

कसली स्वच्छता आहे किल्ल्यात.. .....ऐतिहासिक वारश्याचे उत्तम जतन केल्या बद्द्ल कर्नाटक सरकार चे अभिनंदन