संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी

Submitted by वरदा on 11 November, 2011 - 02:19

आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने Happy

ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!

१. चारुलता - Experimental Condensed Matter Physics
http://www.maayboli.com/node/30377

२. वरदा - Archaeology
http://www.maayboli.com/node/30478
http://www.maayboli.com/node/30479

३.रूनी - Meteorology/ Atmospheric Physics
४. भाग्या - ??
५. अनिता - ??
६. नलिनी - Chemoinformatics
७. लाजो - environmental design
८. संपदा - Medical Informatics
९. अस्चिग - Astrophysics
१०. चिनूक्स - nanotechnology
११. निवांत पाटिल - Chemical Engineering

१२. पेशवा - Electrical/Computer Engineering
http://www.maayboli.com/node/30923

१३. सखिप्रिया - Electrical/Computer Engineering/Chip Design

१४. सई केसकर - Biofuels
http://www.maayboli.com/node/30645

१५. भास्कराचार्य - mathematics
http://www.maayboli.com/node/41358
http://www.maayboli.com/node/45632
http://www.maayboli.com/node/45918
http://www.maayboli.com/node/46221

१६. रार - Medical/ Stem cell Research
१७. रार चा नवरा - material science
१८. रार ची आई - हिंदी साहित्य
१९. वैशाली अरुण - Solar energy

२०. राजकाशाना - Physics - Probe Microscopy
http://www.maayboli.com/node/30614
http://www.maayboli.com/node/30616
http://www.maayboli.com/node/30633

२१. विजय देशमुख - Photonics
http://www.maayboli.com/node/44626
http://www.maayboli.com/node/44731

२२. अवल - History
२३. ज्ञाती - Neuro-Bio Chemistry
२४. ज्ञातीचा नवरा - thermal/mechanical engineering/nanotechnology research
२५. कानडा - information security by combining biometrics with cryptography
२६. पळस - Spin Physics/ Structural Biology/ Chemistry (का आणखी काहीतरी?? :फिदी:)
२७. निलेश - Environmental Engg
२८. ऋचा - Environmental Engg
२९. अरभाट - Physics
३०. ganeshbehere - Insect Molecular Biology, Evolutionary Biology and Population Genetics of Insects
३१. नलिनीचा नवरा - organic chemistry
३२. चारुलताचा नवरा - Theoretical condensed matter physics
३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे
३४. मृण्मयी - Agrobacterium mediated plant transformation

३५. चंपक - Organic chemistry - Asymmetric synthesis
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301

३६. ललिता-प्रीतिचा नवरा - Chemical Reaction Engineering - Microemulsion Systems and Micellar Catalysis
३७. Bagz - Computer Science - Compilers
३८. कल्पु - Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis

३९. उदय - Physics
http://www.maayboli.com/node/30906

४०. किंकर - Management - Banking and Finance

४१. शांतीसुधा - Education Technology (Mathematics Education)

४२. अंबरीष फडणवीस - Metabolic Engineering and Biofuels

चूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बादवे, लले, तुझ्या नवर्‍याचा विषय नक्की कुठल्या शाखेत येतो गं? >>> 'केमिस्ट्री' ही एकच ढोबळ शाखा मला माहित आहे. त्यापुढची शाखा-उपशाखा विचारून सांगते Proud

वा, वा. हा उपक्रम अतिशयच आवडला. या सगळ्या हुशार आणि आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या मायबोलीकरांचे अभिनंदन. आणि सगळ्यांना सलाम!!!!

वरदा, दादा, सायो, ... धन्यवाद!

मी माझ्या कामाबद्दल लिहिलेले जुणे लिखाण http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=821258#PO... इथे उपलब्ध आहे. (जुनी मायबोली- रंगीबेरंगी- चंपक चे पान)

माझ्या पोस्ट डॉक संशोधनावर पेटंट दाखल करण्याचे काम चालु असल्याने इतक्यात लिहिणे शक्य होणार नाही. विद्यापीठाकडून परवाणगी मिळताच नक्की लिहिल Happy

सध्या जिल्हा परिषद अन पंचायत समिती २०१२ साठी काम चालु आहे. त्यावर मार्च २०१२ मध्ये लिहिल Happy

मी ३ वर्षांपूर्वी संगणकशास्त्रात Ph.D. केलं आहे. कामाचा विषयः Compilers. त्याबद्दल लिहायला खूपच आवडेल. आणि मराठीत लिहायला फारच आनंद होईल.

चंपक,
तुमची लिंक तपासून बघता का परत? त्याच्यावर एरर येतेय.
मार्च २०१२ ची वाट बघत आहे. निवांत. काही घाई नाही Happy

Bagz
तुझं स्वागत आहे. जरूर लिही. तुझं नाव अ‍ॅड केलंय यादीत. Happy

अरे वा! छान धागा. अस्मादिक आणि आमचे अहो सुद्धा संशोधक. माझी Ph.D. in Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis from University of Arizona. त्याला सुद्धा २० वर्ष झाली. या क्षेत्रात का आले? कशी टिकले, का बाहेर गेले? यावर लिहायला नक्कीच आवडेल. पण त्याकरता हा धागा नव्हे ना?

चंपकाचा रंगीबेरंगी धागा इथे आहे

त्यावर 'मी Organic chemistry---Asymmetric synthesis ह्या विषयावर Ph.D. केली आहे! ' हे वाक्य असलेली त्याची पोस्ट हीच तो मागील पानावर लिंक देउन सांगत होता.
कल्पुपण याच विषयात पदवीधर दिसते आहे.

महान उपक्रम! वाचायला मजा येतेय. आता महिना - दोन महिने तरी "काय वाचावे?" अशी काळजी नाही Wink
अवांतरः माझा एक मामा आहे. बीई सिव्हील इंजि, एमटेक स्ट्र्कचरल इंजि आणि पीएच्डी तबला Happy

सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटी, कला अश्या विषयांमधे कोणीच दिसत नाहीये संशोधन केलेले.
ह्म्म्म असं कोणी नात्यात, ओळखीत जरी असेल तरी त्यांना माबोवर यायला आणि लिहायला सांगा ही विनंती.

हे विषय अनोळखी असले तरी महत्वाचे आहेत.

स.शा.तल्या एकीला (मायबोलीकरीण) सांगीतले आहे. पाहु कधी लिहिते.

लोक्स,
सईचा लेख पण आला. Happy

नंद्या, धन्यवाद. लिंक देते चंपकची.

नी,
'अशास्त्रीय' लोकांची संख्या अपेक्षेप्रमाणेच कमी आहे. जरा इथल्या लोकांचं लिखाण बर्‍यापैकी झालं की मी माझ्या ओळखीतल्या काही जणांना सांगून बघेन.
मला वाटतं तुझ्या कार्यक्षेत्रात (आणि निगडित क्षेत्रात) औपचारिक पीएचडी साठी संशोधन केलेले कमी असतील. पण कामाच्या निमित्ताने तू सुद्धा संशोधन करत असतेसच की. तेव्हा अशा ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टच्या संशोधनावर तुला (किंवा तुझ्या व्यावसायिक मित्रमैत्रिणींना) लिहायला काहीच हरकत नसावी....

अवल लाही हलवा ना थोडंसं. मी विपूत निरोप ठेवलाय. तुम्ही पण जरा आग्रह करा. ती इतिहासाची आहे.

मी माझा एम.ए. चा वर्गमित्र डॉ. प्रवीण भोळेला विचारते तो लिहेल का ते. माझ्यामते पुणे विद्यापीठात(किंवा बहुतेक संपूर्ण महाराष्ट्रात) अश्या प्रकारे केले गेलेले पहिलेच संशोधन असावे ते.
संगीत नाटक अकादमी आणि तश्याच प्रकारच्या अजून काही संस्था दरवर्षी काही फेलोशिप्स देतात प्रयोगकला/ ललितकलांशी निगडीत संशोधनांसाठी. एक-दोन वर्षांची मुदत असते. तसे कोणी आहे का बघते.

वरदा ,
उदय या माबोकराचा या यादीत समावेश कराल का?
त्यांच्या आयडीची लिंक : http://www.maayboli.com/user/23053
त्यांनी पदार्थविज्ञानात डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि १८ वर्षे संशोधनक्षेत्रात आहेत.

भरत,
उदयना २-३ दिवसांपूर्वीच विपूत सविस्तर औपचारिक आमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी इथे विविध लेखांवर प्रतिसादही दिलेत पण त्यांच्या संशोधनाबद्दल काहीच बोलत नाहीयेत. तेव्हा तुम्ही पण त्यांना आग्रह करणार का आपल्या लेखनमालेत सहभागी व्हायचा? Happy

त्यांनी इथे विविध लेखांवर प्रतिसादही दिलेत पण त्यांच्या संशोधनाबद्दल काहीच बोलत नाहीयेत. तेव्हा तुम्ही पण त्यांना आग्रह करणार का आपल्या लेखनमालेत सहभागी व्हायचा?
---- आग्रहाची अवशक्ता नाहीच आहे :स्मित:. विचार केलेलाच आहे, जरुर लिहीणार... ३० नोव्हेंबर पर्यंत लेखन पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेन.

इतक्या हजारो माबोकरांपैकी फक्त एवढेच संशोधक?? नक्कीच आणखी असतील की... कुठे गेले सगळे?

बास कि इतकेच... वाचताना तोंडाला फेस येणार आहे इतक्यानेच Happy
( कळालं तर ठीक, नाहीतरी वा वा, क्या बात है म्हणावंच लागणार आहे Proud )

.

मस्त यादी आणि उत्तम उपक्रम!!
वाचत आहे. सर्वांनी लिहा कृपया.

रच्याकने, सर्व पीएचडी म्हणजे डॉक्टर ना? Happy निदान भारतात तरी.
परदेशात जे पीएचडी पदवी मिळवतात, त्यांना काय संबोधन मिळते 'डॉक्टर'सारखे?

@ पौर्णिमा - इथे फ्रांस मधे फक्त PhD धारकांनाच डॉक्टर म्हणतात. बाकी डॉक्टरांना (वैद्य वाले डॉक्टर) medecin (मेदसां) म्हणतात.

--
कानडा

Pages