Submitted by अविनाश खेडकर on 19 November, 2011 - 13:35
कवित्व नाही माझा बाणा
मी नच असे थोर कवी तो
लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन्
समाज ज्यांना थोर मानतो
कधी न केली कसली ईर्षा
कुण्या कवीच्या काव्यत्वाची
तुम्ही नभीचे सुर्य तळपते
ना मज क्षमता काजव्याची
आवडले जे जेंव्हा जेंव्हा
शब्द सुमने उधळीत गेलो
काळोखाच्या साम्राज्यावर
मी शब्दांचा प्रकाश झालो
मनात ऊठले वादळ तेंव्हा
विचार माझे लिहिते झाले
ना मात्रांशी सोयर माझे
वृतांनी मज दूर लोटले
अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान लिहीता.. शुभेच्छा !
छान लिहीता.. शुभेच्छा !
चांगली आहे. मी शब्दांचा
चांगली आहे.
मी शब्दांचा प्रकाश झालो>>>>शब्द माझा प्रकाश झाले.(अस मला वाटतं.)
कधी मनाला भरती येते अन् मी
कधी मनाला भरती येते
अन् मी कागदावर सांडत जातो.>>> सुंदर!!
कुणी लिहिलेल्या
कुणी लिहिलेल्या काव्यत्वाची...कुणा कवीच्या काव्यत्वाची
आणि..
अन् मी कागदावर सांडत जातो...अन कागदावर सांडत जातो(ह्यात मी अध्याहृत आहेच)
हे दोन बदल केले तर कवितेत गेयता येतेय.
बाकी, कविता आशयघन आहे...अर्थातच आवडली..हेवेसांन.
देव साहेब आपल्या सारख्या
देव साहेब आपल्या सारख्या जेष्टांची प्रतिक्रिया मिळणे माझ्यासाठी खुप प्रेरनादायी आहे.
आपण सुचवलेले बदल पटले तसे ते मी केले आहेत. असेच मार्गदर्शन करत रहा. धन्यवाद.
सांजसंध्या, विभाग्रज, वि दि पाटील आपले धन्यवाद.
संपुर्ण रचना खुप
संपुर्ण रचना खुप आवडली......
शुभेच्छा!!!
सुंदर .......
सुंदर .......
चातक, सुन्या खूप खूप धन्यवाद.
चातक, सुन्या खूप खूप धन्यवाद.
आशय चांगला आहे, पण काही
आशय चांगला आहे, पण काही ठिकाणी वृत्त गडबडलंय.
वृत्त गडबडलं किंवा वृत्त सांभाळताना शब्दांची ओढाताण झाली की
रसभंगाला वाव मिळून आशयाचा प्रभाव कमी होऊ शकतो.
वैयक्तिक मत आहे हे. प्रांजळ अभिप्रायाचा राग नसावा.
विभाग्रज तसे शब्द माझ्यासाठीच
विभाग्रज तसे शब्द माझ्यासाठीच काय सगळ्यासाठीच प्रकाश असतात. पण या ठिकाणी
काळोखाच्या साम्राज्यावर
मी शब्दांचा प्रकाश झालो
अन्यायाविरुध्द मी शब्दरुपी प्रकाश झालो, म्हणजे त्या विरुध्द मी कवितेच्या माध्यमातुन आवाज उठविला.
एरवी शब्द माझे देवच.
भिडेकाका आपल्या प्रतिक्रिया हे आमच्या सारख्या नवख्याच्या पाठीवर कौतुकाची थाप वाटते आम्हाला. त्याचा राग येईलच कसा? ती आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
काका खरं सांगायच तर मी कविता लिहीतांना वृताचा विचार केलाच नाही. मी फक्त तालात लिहीण्याचा प्रयत्न केला. त्यात तुम्हाला वृत्त काही ठिकाणी का होईना आढळले यात मला आनंद आहे. कारण मला मराठी व्याकरणाविअषयी जास्त काही माहित नाही. पण कुनी मला वृत्ताविषयी,छंदांविदांविअषयी सविस्तर मार्गदर्शन केल्यास वृत्तात व छंदात कविता करायला मला नक्किच आवडेल.
आपल्या प्रतिक्रियेबद्ल खूप आभरी आहे
hi kavitahi chhan vatli. pan
hi kavitahi chhan vatli. pan 'hokar' khupach avadli.
अनुभवले जगण्यातून जे जे मनात
अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.>>>
मस्तच! प्रामाणिक व मुद्देसूद कविता वाटली. धन्यवाद!
छान रचना आहे !
छान रचना आहे !
अविनाश छान लिहिता तुम्ही.
अविनाश छान लिहिता तुम्ही.
अप्रतिम!
अप्रतिम!:)
झकास आहे!
झकास आहे!
मस्त अविनाश पुलेशु - Kiran
मस्त अविनाश
पुलेशु
- Kiran
गुलाबाच्या ताटव्यातून
गुलाबाच्या ताटव्यातून फिरतांना निवडूंगाकडेही लक्ष दिलेत.
बेफिकिर्,मुकु,उमेश वैद्य,हर्षदा,दक्षिणा,उ चा पती सर्वांचे मनापासुन आभार.
निवडुंग नव्हे हा तर 'अनंत'
निवडुंग नव्हे हा तर 'अनंत' आहे. मंद सुगन्धी व पवित्र.
छान आणि प्रभावी मांडलीय. असेच
छान आणि प्रभावी मांडलीय. असेच दमदार व्यक्त होत रहा.

कवित्व नाही माझा बाणा
मी नच असे थोर कवी तो
लिहिले ज्यांनी काव्य ग्रंथ अन्
समाज ज्यांना थोर मानतो>>>>>
आहेत; असे आहेत येथे पण!
अवि, उमेसभाय म्हणतात तेच खरं.
अवि, उमेसभाय म्हणतात तेच खरं. दमदार काव्य.
कधी मनाला भरती येते अन्
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.
<<<< निव्वळ अ प्र ति म..!!!
अनुभवले जगण्यातून जे जे मनात
अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.
हे आवडले.
कवीच्या काव्यत्वाची म्हणजे काय? ते कवित्वाची असायला हवे (?)
कवीच्या काव्यत्वाची म्हणजे
कवीच्या काव्यत्वाची म्हणजे काय? ते कवित्वाची असायला हवे (?)>> मयेकरांशी सहमत आहे.
सुरेख. आवडली.
सुरेख. आवडली.
वाह, सुंदर कविता !
वाह, सुंदर कविता !
अविनाश, अतिशय प्रामाणिक भावनेतुन जन्मलेल्या तुमच्या या कवितेमध्ये वृत्त, मात्रा, छंद आहेत की नाहीत याची मलाही काही कल्पना नाही. ठार अडाणी आहे मी याबाबतीत ! पण त्यामुळे माझ्यासारख्यांना तरी
काही फरक पडत नाही. जी कविता वाचल्यावर हृदयातुन ' वाह सुंदर ' असा हुंकार उमटतो ती खरी कविता
असे माझे वैयक्तिक मत आहे ! :स्मित:...........
आपल्या सर्वांच्या प्रामाणिक
आपल्या सर्वांच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्ल मनापासून धन्यवाद.
अनुभवले जगण्यातून जे जे मनात
अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.>>>>>>>>>>>>>>>>>
क्या बात है.
खूप प्रामाणिक आणि सुंदर कविता.
आवडली.
तुम्ही स्वता:ला निवडूंग नका म्हणू.
तुम्ही तर गुलमोहर आहात. आनंद देणारे.
तुम्हाला आवडली. कविता भरून
तुम्हाला आवडली.
कविता भरून पावली.
प्रतिसादाबद्ल धन्यवाद.
एकदम झॅक
एकदम झॅक
Pages