मी कागदावर सांडत जातो

Submitted by अविनाश खेडकर on 19 November, 2011 - 13:35

कवित्व नाही माझा बाणा
मी नच असे थोर कवी तो
लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन्
समाज ज्यांना थोर मानतो

कधी न केली कसली ईर्षा
कुण्या कवीच्या काव्यत्वाची
तुम्ही नभीचे सुर्य तळपते
ना मज क्षमता काजव्याची

आवडले जे जेंव्हा जेंव्हा
शब्द सुमने उधळीत गेलो
काळोखाच्या साम्राज्यावर
मी शब्दांचा प्रकाश झालो

मनात ऊठले वादळ तेंव्हा
विचार माझे लिहिते झाले
ना मात्रांशी सोयर माझे
वृतांनी मज दूर लोटले

अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कधी न केली कसली ईर्षा
कुण्या कवीच्या काव्यत्वाची
तुम्ही नभीचे सुर्य तळपते
ना मज क्षमता काजव्याची

अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.>>>>>>खूपच प्रामाणिक आहात बाई तुम्ही.

मस्त मस्त मस्त कविता.

तुम्ही पण नभिचे सुर्य होऊ शकता. तुमची कविता वाचून निदान मला तरी तस वाटतं.

छान Happy

अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.
>>>
छान लिहिलेय, असेच सान्डत जा नेहमी कागदावर, चान्गलेच सान्डता तुम्ही. क्रु गै न

चिखल्या, अल्केमिस्ट...........
मनापासून धन्यवाद.
बाय द वे या अल्केमिस्ट नावाचा अर्थ काय?
अल्कोहोलची केमेस्ट्री तर नाही?....... क्रु गै न

Pages