या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक
===============================================
===============================================
"कित्तुर" गावचे नाव घेताच सर्वप्रथम आठवते ते स्वातंत्रसंग्रामातील रणरागिणी "राणी चेन्नमा". कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गाल च्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.
कित्तुरचे युद्ध:
त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते.
(साभार: विकिपिडिया)
सध्या या किल्याचे नूतनीकरण चालू आहे. याच परीसरातील एका संग्रहालयात स्वातंत्र्यसंग्रमातील वस्तु आणि पुरातन मूर्ती ठेवल्या आहेत.
म्युझियमच्या बाहेर हा आवेशातील "राणी चेन्नम्मा" यांचा पूर्णाकृती पुतळा
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
===============================================
===============================================
देवगाव येथील कमल नारायण मंदिर
कित्तुर शहरात प्रवेश करण्यापूर्वी (खानापूरहुन) साधारण ५ किमी अंतरावरील देवगावात (देग्राम किंवा देगाव) कदंब शैलीतील अजुन एक पुरातन "कमल नारायण" मंदिर आहे. १२व्या शतकातील हे मंदिर कदंब राजवटीत बांधले आहे. कदंब राजवटीतील राजा शिवचित्ता यांची पत्नी राणी कमलादेवी यांनी हे मंदिर बांधुन घेतले आहे.
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
मंदिराच्या छतावरील या कमळाचे सौंदर्य कॅमेर्यातही मावत नव्हते 
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
मंदिराशेजारील एका घरात हे कारागिर दगड आणि लाकुड यांना तासुन सुंदर कलाकृती निर्माण करत होते. 
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
(क्रमश:)
अप्रतिमच
अप्रतिमच
छान
छान
आईशप्पथ... जिप्सी धन्स रे!
आईशप्पथ... जिप्सी धन्स रे! कित्तुर किल्ल्याची ओळख करुन दिलीस.
राणी चेन्नमाची कहाणी लहानपणी वाचली होती.
या पराक्रमी राणीचे व्यक्तीगत जीवन व्यथित करणारेच होते.
तारखांचा काहीतरी घोळ असल्याने उर्वरीत प्रतिसाद काढुन टाकत आहे. तरीही हे पाहु शकता.
http://www.freeindia.org/biographies/greatlkings/keladi/index.htm
आणि इथेही
http://hinduhistory.blogspot.com/2008/02/rani-chennamma-of-keladi.html
स्स्स्स्स्स्ही
स्स्स्स्स्स्ही मित्रा...
मंदिरांचे व त्यांच्या पॅसेज चे फोटोज् अप्रतिम घेतले आहेस...
जाम आवडले....
सुरेख प्र.ची खासच ,
सुरेख प्र.ची खासच , माहेतीपुर्ण लेखण
राणी चेन्नम्माचा इतिहास खूपच
राणी चेन्नम्माचा इतिहास खूपच प्रेरणादायी.
माहिती आणि प्र चि - उत्तमच.
प्र चि १४ तील ते छतावर कोरलेले कमळ - केवळ, केवळ......
ते संपूर्ण मंदिरच अप्रतिम कारागिरीने नटलेले दिसते - सलाम या अनामिक शिल्पकारांना.......
जिप्सी, लहानपणची आठवण आली.
जिप्सी, लहानपणची आठवण आली. माझ्या आज्जीचे माहेर कित्तूर. लहानपणी धारवाडला फिरायला गेलो की एकदा कित्त्तूरला जाऊन यायचे. (एम के हुबळीचा नरसिंहाला सुद्धा) किल्ल्य्यात तर आमची पिकनिक जायची. सर्व मावस मामे काके आते भावंड एकत्र जमून धमाल करायचो.
ही लिन्क फेसबूकवर शेअर करू का?
ही लिन्क फेसबूकवर शेअर करू
ही लिन्क फेसबूकवर शेअर करू का?>>>>>बिनधास्त!!!!
अगदी न विचारता 
योगेश, धन्यवाद. इतिहासाची
योगेश, धन्यवाद. इतिहासाची आठवण झाली. मस्त माहिती आणि फोटोही. अप्रतिम कलाकुसर आहे.

आर्ये, तुझी स्मरणशक्ती दांडगी आहे.
फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. >>>>होते, आहेत, आणि त्यात वाढच होतेय.
या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.>>>सलाम.
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो.
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो. त्यासोबत रोमांचक इतिहास पण.
(बाबा रे जेवत वगैरे होतास कि नाही, का नुसते फोटोच काढलेस ?)
(बाबा रे जेवत वगैरे होतास कि
(बाबा रे जेवत वगैरे होतास कि नाही, का नुसते फोटोच काढलेस ?)>>>>दिनेशदा, हे सर्व पाहूनच त्याच पोट भरत असेल. मग जेवायची गरजच काय?

छान फोटो. खुपच मजा
छान फोटो. खुपच मजा आली.
प्रचि. २४ फार आवडला. त्यात खाम्बान्ची सीमिट्री छान आली आहे. दारातुन येणारा प्रकाश अगदी "ऊघडले स्वर्गाचे दार" असे वाटतय.तशीच सीमिट्री प्रचि.१३ मध्ये पण आहे.
मस्तच.... माहिती बद्दल
मस्तच.... माहिती बद्दल धन्यवाद!!!
दिनेशदांना खरंतर विचारायचे
दिनेशदांना खरंतर विचारायचे आहे की, खाद्यंतीचे फोटो काढलेस की नाही?
मस्त रे ...
मस्त रे ...:)
जिप्सी, मस्तच ... वर्णन आणि
जिप्सी, मस्तच ... वर्णन आणि फोटो पण अतिशय सुरेख आलेत.. खुपच आवडले.:) ,
जिप्सी - मस्तच्...खूप सुरेख
जिप्सी - मस्तच्...खूप सुरेख फोटो, खूप छान वरणन - जाम अवडेश... माला पण जावसं वाटतय....
सुपर!!
सुपर!!
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार्स
आर्या, धन्स लिंक्स दिल्याबद्दल
सलाम या अनामिक शिल्पकारांना.......>>>>अनुमोदन
दिनेशदा, शोभा, नंदिनी

सुंदर फोटोज आणि छान माहीती
सुंदर फोटोज आणि छान माहीती !
लाकडाचे पाय खरे वाटावे इतकी नाजुक कलाकुसर आहे.
राणी चेन्नम्माचा इतिहास खूप
राणी चेन्नम्माचा इतिहास खूप प्रेरणादायी.
प्रचि आणि वर्णन अप्रतिमच
मस्तच.
मस्तच.
जिप्सी, खूपच सूंदर!!
जिप्सी, खूपच सूंदर!!
अप्रतिम
अप्रतिम