जाहीर बातमीफलक - उपक्रम - सावली ट्रस्टच्या विद्यार्थि-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत

Submitted by सुनिधी on 31 October, 2011 - 13:43

नमस्कार मायबोलीकर.

पुण्यातील सावली सेवा ट्रस्ट या गरीब व गरजू तसेच बुधवारातील देहविक्रय करून उपजीविका कमावणार्‍या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी काम करणार्‍या सेवाभावी संस्थेला गेल्या महिला दिन उपक्रमात मायबोलीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा मदत केली व त्या अंतर्गत चार मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च उचलला.

त्यानंतर काही जणांनी 'सावली' ला मदत करण्याविषयी विचारणा केली होती. ही संस्था आपल्या मदतीवरच जास्त करुन चालत असल्याने संचालिका मृणालिनी भाटवडेकर ह्यांना दिवाळीअगोदर संपर्क केला असता त्यांच्याकडुन संस्थेच्या मुलामुलींना शिक्षणमदत आणि त्या व्यतिरिक्त दिवाळीनिमित्त त्या मुलामुलींना नवीन ड्रेस घ्यायला जमेल तशी मदत कोणी करु शकले तर खुप चांगले होईल असे सांगण्यात आले. एक चांगल्यापैकी ड्रेस ७०० पर्यंत येऊ शकतो. कॉलेजमधे जाणारे आहेत त्यांना थोडा जास्ती. अशी ६०-७० मुले-मुली आहेत, अशी माहिती मिळाली. ही माहिती संयुक्तावरील मैत्रिणींना समजल्यावर त्यांनी ताबडतोप मदत पाठवायला सुरुवात केली व पाहता पाहता २५००० रुपये जमले. दिवाळी अगोदर ती रक्कम 'सावली' ला सुपुर्त करण्यात आली. त्यातून किमान ३०-३२ ड्रेसेस ची सोय होऊ शकली. मुलांना खुप आनंद झाला असे भाटवडेकर मॅडमनी सांगितले.

आता एका महत्वाच्या उपक्रमाला सुरु करत आहोत त्याची माहिती आपणा सर्वांपर्यंत पोचवत आहोत. हा उपक्रम आहे 'सावली' च्या मुलामुलींना शिक्षणासाठी मदत.

'सावली' ची ही मुले/मुली अतिशय हुषार व मेहनती आहेत. बुधवार पेठेसारख्या वस्तीतुन आलेली आहेत. ती लहानपणापासुन गरिबी, असुरक्षितता, सदैव भांडणे, अपमान, भीती अशा वातावरणात वाढलेली असतात.
त्या सर्व मुलांना एकत्र करुन त्यांच्या आयांच्या व मुख्य म्हणजे त्या मुलीमुलींच्या मनात बाहेरच्या जगाबद्दल विश्वास निर्माण करुन त्यांना शिक्षणाठी तयार करणे, त्यांचे अशांत मन शांत करुन जगायला प्रवृत्त करणे हे काम 'सावली' करते.

भाटवडेकर मॅडमना हा विश्वास पैदा करायलाच ५-६ वर्षे लागली व हळुहळु मुलेमुली ह्यात आनंदाने, विश्वासाने सहभागी होउ लागली.

आज १०० मुले 'सावली' तर्फे शिकत आहेत. काही मुले शिक्षण संपवुन नोकरीला लागलेली आहेत व १०-१५ हजार रुपये पगारावर नोकरी करत आहेत. कॉलेजात जाणार्‍या काही मुलींना 'त्या' व्यवसायात जावे लागु नये म्हणुन कॉट बेसिसवर 'सावली' ने ठेवले आहे. मुलामुलींना 'सावली' तर्फे ज्या कोर्स ला घालता येऊ शकेल (सावलीकडे ह्या मुलांना महागडे शिक्षण देण्याइतके फंड्स नाहीत) त्याला घातले जाते व त्यावर ते नंतर बर्‍यापैकी नोकरी मिळवतील असे पाहिले जाते. उदा. काही मुली नर्सिंग चा कोर्स करतात. नर्सेस ना मागणी असल्यानी त्या लगेच आपल्या पायावर उभ्या रहातात.

'सावली' ची माहिती मुळात अरुंधतीकडुनच मिळाली आहे व वेळोवेळी अरुंधतीने हा उपक्रम सुरु करण्यासाठी लागणारी मदत केली आहे.

अरुंधती कुलकर्णी ह्यांच्याकडुन मिळालेली महत्वाची माहिती,
आमच्याकडे कामाला येणार्‍या बाईंच्या दोन्ही मुलींच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी जेव्हा सावली ट्रस्टमार्फत कोणी उचलली तेव्हाच त्यांचे शालेय शिक्षण शक्य झाले आहे. अन्यथा त्यांना मोलमजुरी किंवा धुणीभांडी करायला लागली असती. आणि त्यांची स्थिती बरी म्हणावी एकवेळ, अशा पार्श्वभूमीच्या मुली व मुलांना तिथून मदत मिळते आहे.

सावली ट्रस्टमार्फत मदत केल्या जाणार्‍या प्रत्येक इयत्तेच्या मुलींचा भाटवडेकर बाईंनी एक छोटासा ग्रूप बनवलाय. या मुलींच्या शाळेतील शिक्षकांनाही ग्रूप संकल्पनेमुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला सोपे जात आहे, आणि भाटवडेकर बाईंनाही त्या मुलींना मार्गदर्शन करणे, त्यांच्या प्रगतीचा - घरच्या स्थितीचा आलेख ठेवणे सोपे जाते. या मुली एकमेकींना अभ्यासात मदत करतात, तसेच स्पर्धेच्या भावनेतून जास्तीत जास्त मेहनत घेऊन अभ्यास करण्याचे वातावरण जतन करायला त्याची मदत होते. तसेच प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे एक मुलगी दुसरीचा आधार बनते, तिला मदत करते. त्यांच्या घरी त्यांना जर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली तर या मुली एकमेकींना मदत करू शकतात, तसेच ताबडतोब भाटवडेकर बाईंपर्यंत त्याबद्दल निरोप जातो.

या मुली ज्या वस्तीत राहतात तिथे सतत भांडणे चालू असतात. एका घराला खेटून दुसरे घर. रस्त्यावरच बराचसा संसार. वस्तीत येणारे-जाणारे, विकृत नजरेचे व व्यवहाराचे अनेकजण. विचित्र आहे वातावरण. पण त्यातून या मुलींना सुरक्षित ठेवायचे म्हणजे सोपे काम नाहीए. या मुलींना ''धंद्यात'' न घालण्यासाठी वा त्यांची विक्री न करण्यासाठी तसेच त्यांचे शिक्षण जारी ठेवण्यासाठी कित्येकदा त्यांच्या घरी किराणा भरणे, त्यांचे वा त्यांच्या आईचे वैद्यकीय खर्च करणे, गरजेप्रमाणे काही वस्तूची मदत देणे अशी कसरतही करावी लागते. पण ते अपरिहार्य आहे. पुढे कॉलेजात गेल्यावर त्या ''कमवा व शिका'' धर्तीवर छोटे-मोठे जॉब्ज करून शिक्षण + नोकरी करतात. वेश्याव्यवसायात न पडण्यापासून त्यांना केवळ आणि केवळ त्यांचे शिक्षणच वाचवू शकते आणि सन्मानाने जगण्याची एक चांगली दिशा देऊ शकते.

धन्यवाद अरुंधती!!!

वर्षाखेरीस 'सावली' आपल्याला त्या मुलांचे निकाल व प्रगती कळवतील. संस्थेचा ऑडीट रिपोर्ट पण कळवतील.
संस्थेचा प्रशासनावर शून्य रुपये खर्च होतो. तुम्ही देणगीरूपात दिलेला प्रत्येक पैसा मुलांच्या कल्याणासाठी वापरला जातो हे संस्थेने आवर्जून कळविले आहे.

वर लिहिल्याप्रमाणे 'सावली' संस्था आपल्या मदतीवरच चालते त्यामुळे हा उपक्रम मायबोलीवर जाहीरपणे राबवला गेला तर खुप मुलामुलींचे कल्याण होऊ शकेल ह्या हेतुने हा दुवा चालु केला आहे.

आर्थिक माहिती-

एका मुलाचा/मुलीचा १ वर्षाचा शैक्षणिक खर्च ५००० रुपये असतो. ह्या मुलामुलींना एकाने सलग ३ वर्षे मदत केली तर त्यांचे कॉलेज शिक्षण व्यवस्थीत पुर्ण होईल व डिग्री मिळेल.

आपल्याला कोणालाही ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर कृपया इथे वा ईमेल ने कळवु शकता.
सहभागी व्हायचे असेल तर सध्या अशी माहिती लागेल,

१. तुम्हाला किती मुलांना/मुलींना मदत करायची इच्छा आहे?
२. ह्याचे उत्तर देणे शक्य असेल तर छान - किती वर्ष तुम्ही ही मदत करु शकता? त्या मुलीचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत जमेल का? (सध्या तरी १ वर्ष असेच धरुन चालत आहे).
३. तुम्हाला त्या मुलींशी पत्रव्यवहार करायचा असेल तर तुमचा (शक्यतो) भारतातला पत्ता. कारण ती मुले-मुली परदेशी पत्र कितपत पाठवु शकतील माहीत नाही. प्रीपेड पाकीट पण त्यांना पाठवु शकता जेणेकरुन मुले आपल्याला पत्र लिहु शकतील. ईमेल पाठवायचे झाल्यास तुम्ही ते भाटवडेकर मॅडमना पाठवू शकता, जे त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल.

ही माहिती मिळाल्यावर प्रत्येक सदस्याला स्वतंत्र ईमेल करु.
मुलामुलींची माहिती जाहीर न करता प्रत्येकाला त्यांची मदत ज्या विद्यार्थ्यासाठी वापरली जाणार आहे त्याच मुलांची/मुलींची माहिती पाठवु व जमल्यास पत्ते पण. भाटवडेकर मॅडमना पण त्यात कॉपी करु. सदस्यांना पत्राद्वारे मुलामुलींशी संपर्क करायला हरकत नसेल तुमचे पत्ते ईमेल ने कळवा.

सध्या मलाच संपर्क करा.

खाली सुपंथ च्या खात्याची माहिती देत आहे. तुम्ही त्यावर पैसे पाठवु शकता. मेमो 'सावली शिक्षण फंड' असा लिहावा.

Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

केदार जोशी ह्यांनी दिवाळी ड्रेस उपक्रम व ह्याही उपक्रमासाठी सुपंथतर्फे मदत करण्याची नेहमीप्रमाणे तयारी दाखवली आहे, आणि ते तशी मदत करतही आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार.

मृणालिनी भाटवडेकर.
त्यांचा संपर्क क्रमांक : ९८२३२७०३१०
पत्ता : ई १००४, ट्रेझर पार्क, संतनगर, पर्वती, पुणे ९.

धन्यवाद!!

काहीही प्रश्न असतील तर इथे लिहावेत.

*** आजतागायत मायबोलीकरांनी संयुक्ता सुपंथ उपक्रमातून 'सावली'तील एकूण २६ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. मायबोलीकरांच्या विधायक जाणिवांची व प्रयत्नांची ही यशस्वी पावतीच म्हणता येईल!


**** ता. क. - हा न संपणारा उपक्रम आहे त्यामुळे ह्या उपक्रमात आपण केव्हाही सहभागी होऊ शकता. आपली इच्छा आम्हाला ईमेल ने कळवु शकता किंवा इथे पण लिहु शकता ****

सावली सेवा संस्थेने दिलेले आभारपत्र
maayboli sanyukta supanth thanks certificate PDFOnline.pdf

सावली संस्थेतील मुलांना दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत : http://www.maayboli.com/node/32497

मागोवा -

ह्या मायबोली उपक्रमातर्फे १० फेब्रुवारी २०१२ पर्यं एकुण २७ मुलांची ह्या वर्षीच्या शिक्षणाची सोय केली गेली आहे. ह आकडा जसा बदलेल तसे इथेच बदल करत राहु.

अजुनही देणगीदार संपर्क करत आहेत.
ह्यातल्या काहींनी ३ वर्षाची देखील एकदम सोय केली आहे. काही जणांनी एकापेक्षा जास्त मुलांची जबाबदारी उचलली आहे.
सर्व देणगीदारांना त्यांच्या मानस अपत्याची माहिती व फोटो पाठवले आहेत. व पावत्याही पाठवल्या आहेत.

सर्व देणगीदारांचे खुप आभार.
खालील व्यक्तींकडुन ह्यासाठी नेहमीच मदत झाली व होत राहील.
केदार जोशी - त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन वेळोवेळी सुपंथतर्फे सावलीला आलेल्या देणग्या लगेच पाठवल्या.
अरुंधती कुलकर्णी - सतत सावली च्या भाटवडेकर मॅडमना संपर्क साधुन त्यांच्याकडुन लागेल ती माहिती घेतली व आपल्याला पुरवली.
भाटवडेकर मॅडम - कितीही रात्री फोन केला तरी सर्व माहिती लगेच लिखीत स्वरुपात दिली. ह्यापुढेही त्या सर्व मुलांची प्रगती, संस्थेचा अहवाल वगैरे योग्यवेळी पाठवत रहातीलच.
वेबमास्तर - मायबोली तर्फे हा उपक्रम करु दिला हे कधीच विसरता येणार नाही व उपक्रमाबाबत मार्गदर्शन पण केले.
संयुक्ता - संयुक्ता मधुन वेगवेगळ्या कल्पना पुढे आल्याने होऊ शकला.

ह्यापुढे सावलीचे अहवाल सर्व देणगीदारांना ईमेल मधुन पाठवले जातील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी,
तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
संयुक्ता जोवर हा उपक्रम चालवतील तोवर मी दरवर्षी तीन मुलींच्या शिक्षणाकरता मदत करू शकते.

केदारच्या खात्यावर पैसे जमा करून तुला किंवा त्याला कळवते.

हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद सुनिधी. वेळोवेळी मिळेल ती माहिती, समन्वय, मदत यासाठी कधीही मला हक्काने सांग. Happy मायबोलीकरांकडून या चांगल्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळो हीच सदिच्छा!

आणि संयुक्तातील दिवाळी ड्रेस फंडसाठी उत्स्फूर्तपणे निधी संकलनात भाग घेतलेल्या व प्रोत्साहन देणार्‍या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक! Happy तुमच्यामुळे आज सावलीतील मुलांची दिवाळी गोड झाली.

हे सावली ट्रस्टच्या मुलामुलींचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे काही फोटोग्राफ्स :

पारितोषिक वितरणासाठी जमलेले विद्यार्थी, पालक व पाहुणे :

sav2 copy.jpg

बक्षीस समारंभास उपस्थित सावलीची मुलं मुली :

sav1 copy (1).jpg

आणि या आणखी काही कन्या :

sav3 copy.jpg

धन्यवाद सुनिधी / अरुंधती.
मी दोन मुलींसाठी तिन वर्षांची कमिटमेंट घ्यायला तयार आहे.

अभिमानाची बाब आहे की संयुक्ताचा माझ्या आठवणीतील हा चवथा तरी उपक्रम आहे. (अंधशाळा २, दिवाळी ड्रेस १). फारसा गाजावाजा न करता यात सातत्य येऊ पाहते आहे आणि संयुक्ता सदस्या ठोस मदत करत आहेत याबद्दल समाधान वाटते.

केवळ स्पष्टीकरणासाठी ही पोस्ट : हा उपक्रम जरी संयुक्तातर्फे सुरू केला गेला असला तरी कोणीही मायबोलीकर त्यात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी संयुक्ता सदस्यच असायला पाहिजे असे नाही. Happy

सुनिधी, माहितीबद्दल धन्यवाद. मी सध्यातरी एका मुलीच्या एका वर्षाच्या शिक्षणाकरता कमिटमेंट घेते.

रैना...<<अभिमानाची बाब आहे की संयुक्ताचा माझ्या आठवणीतील हा चवथा तरी उपक्रम आहे. (अंधशाळा २, दिवाळी ड्रेस १). फारसा गाजावाजा न करता यात सातत्य येऊ पाहते आहे आणि संयुक्ता सदस्या ठोस मदत करत आहेत याबद्दल समाधान वाटते.>> अनुमोदन.

मी तीन वर्षांसाठी एका मुलीच्या शिक्षणाची कमिटमेंट घेईन. पैसे २/४ दिवसात जमा करते. चालेल ना?

सुनिधी, मी तुला इमेल करेन म्हटले होते, आणि माझ्या लक्षात आहे, मी फक्त सद्ध्या खूप बिझी आहे - डोक्याला थोडा ताप आहे खरं तर, पण मी करते ह्या वीकेंडला गं.

,

सुनिधी, मी कोणत्या तरी बाफावर लिहिले एके मी एका मुलीची कमिटमेंट घेईन, ते आता मला सापडत नाहीये, तेह्वा परत इथेही लिहिते की मी एका मुलीची ३ वर्षांची कमिटमेंट घेत आहे.

ह्यात सहभागी होणार्‍या सर्वांनी कृपया आपली खरी नावे मला ईमेल मधुन कळवाल काय? भाटवडेकर मॅडमना जी यादी एक्सेल मधे पाठवण्यात येइल त्यात ती नावे असतील. बाकी कोणी ती यादी पहाणार नाही त्यामुळे काळजी नाही. त्या प्रत्येक ईमेल ला उत्तर म्हणुन मुलांची/मुलींची माहिती पाठवायला सुरु करता येइल.

तुम्हाला त्या मुलामुलींना संपर्क करायचा तर भाटवडेकर मॅडमच्या पत्त्यावरच केलेला सोयिस्कर आहे असे त्यांनी कळवले आहे. वर पत्ता देत आहे.

ज्यांची नावे व ईमेल आयडी माझ्यापाशी होते त्यांना माहिती पाठवली आहे. आपली ईमेल पहा (जंक पण पहा). पोचपावती कृपया द्या (हे खुप महत्वाचे आहे).

ज्यांना ईमेल नसेल आली त्यांनी ईमेल व नाव-आडनाव हे कृपया पाठवा.

आंतरजालावर उपलब्ध असलेली सावली सेवा ट्रस्ट, त्यांचे कार्य व ट्रस्टच्या संचालिकांविषयीची ही ओळख :

मृणालिनी-उमा ह्यांची मायेची ‘सावली’

सेवाव्रती!

.. आणि त्यांचे जीवनच उजळून निघाले!

सुनिधी, मेल मिळाली. धन्यवाद. आज आईशी बोलले. आई २० नोव्हेंबर पर्यंत दोन मुलींची तीन वर्षांसाठी लागणारी मदत ट्रान्सफर करेल.

स्वाती२ - बरं Happy

काही मुलींची पुरेशी माहिती नाहिये असे वाटले म्हणुन भाटवडेकर मॅडमना संपर्क करत आहे. तेव्हा काल ज्यांनी ईमेल पाठवली त्यांनी प्लिज २ दिवस द्या, २ दिवसात उत्तर देईन.
----------------
सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी इथे वा ईमेल ने मुलींना आधार द्यायची इच्छा व्यक्त केली आहे.
पण सावलीकडे २ छोटी मुले आहेत ज्यांचे वडील 'वाया गेल्यात' जमा आहेत व मुले अगदी एकटी पडली आहेत. घरात ती एकटी रहातात व त्यांना कधी जेवायला मिळते कधी नाही अशी स्थिती आहे.
सावलीला त्या मुलांना आपल्या होस्टेलमधे ठेवायचे आहे, आधार द्यायचा आहे, त्यांना शाळेत घालायचे आहे व त्यांची काळजी घ्यायची आहे. जर तुमच्यापैकी कोणाला तुमची मदत त्या मुलांना गेलेली चालत असेल तर कृपया कळवा. म्हणजे मुलीऐवजी त्या मुलांची माहिती तुम्हाला पाठवु.

सुनिधी
14 November, 2011 - 20:59 या पोस्ट्मधे उल्लेखलेल्या मुलांचा १ वर्षाचा रहाणं/खाणं/शिक्षण याचा प्रत्येकी खर्च किती ?

अर्पणा एका मुलाचा/मुलीचा वर्षभराचा खर्च हा ५००० असा सावली ने सांगितलाय.
प्रामुख्याने तो शिक्षणाला लागणार्‍या सर्व गोष्टी करायला वापरतात. त्यात फीया,वह्या-पुस्तके, गणवेष, होस्टेल खर्च, कोचिंग क्लास ची फी व ह्याशिवाय शक्य असेल तेव्हा औषधोपचार, काऊंसलिंग, अन्न अशा गोष्टी पुरवल्या जातात. पण ५००० च मदत द्यावी असे मात्र अजिबात नाही. जितकी इच्छा असेल तितकी मदत करु शकतो.

हो हो, ५००० रुपये हा मुख्यतः शैक्षणिक खर्च आहे.

आजच्या इमेलमध्ये सावलीच्या भाटवडेकर मॅडमने एक फार छान गोष्ट सांगितली. या मुलामुलींना जेव्हा सावलीच्या उपक्रमांत सामावून घेतले जाते तेव्हा त्या सर्व मुलामुलींना पहिली गोष्ट सांगतात ती म्हणजे, ''तुम्ही जशी आहात तशी आम्हाला आवडता.''

त्या म्हणतात की असे सांगितल्यावर व त्याचा प्रत्यय आल्यावर या मुलांच्या वागण्यात आपसूक मोकळेपणा येतो, खोटे बोलणे बंद होते. या मुलांना सतत संधी द्यावी लागते. प्रोत्साहन द्यावे लागते. ज्या वातावरणात ती वाढतात, राहतात त्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी चालना द्यावी लागते. प्रोत्साहन, विश्वास यांमुळे त्यांच्याही मनात आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा जागृत होते. येथील प्रत्येक मूल हे 'स्पेशल' आहे. त्याला उमलण्याची संधी देण्याबद्दल, या मुलांच्यात विश्वास दाखवल्याबद्दल भाटवडेकर बाईंनी पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू सांगितले आहे. Happy

सर्वांना माहितीच्या ईमेल केल्या आहेत. Happy
कृपया 'जंक' पण पहाणे. तरीही ज्यांना मिळाली नाहिये त्यांनी कळवावे.

सर्वजणांचे खुप खुप आभार. तुमच्या सहकार्याशिवाय काहीच शक्य नव्हते. धन्यवाद!!!!!!!!

सुनिधी,
मला मुलगा/मुलगी कुणालाही मदत गेली तर चालणार आहे.
पैसे २५ Nov. २०११ ला जमा करेन
Pay to मधे काय लिहु 'सावली शिक्षण फंड' की Kedar Joshi????

व्हेज, खातेदाराचे नाव 'केदार जोशी' असेच लिहावे. मेमो मधे - 'सावली शिक्षणफंड' असे चालेल.
शैलजा, अर्पणा व व्हे़ज तुम्हाला आज माहिती पाठवत आहे. मदतीबद्दल मनापासुन आभार.
---------------------

काल जी ईमेल आलीत त्याला उत्तर इथे लिहिते म्हणजे सर्वांना कळेल.

१. ज्यांना ह्या वर्षाची ची टॅक्स पावती हवी आहे त्यांना कोणत्या नावाने हवी आहे ते ईमेल ने कृपया कळवणे. subject मधे 'टॅक्स संबंधीत' असे लिहावे म्हणजे मला मेल शोधायला वेळ लागणार नाही. तसेच किती रक्कमेची पावती हवी ते पण लिहिणे.

२. मुलांचे/मुलींचे फोटो मागितले आहेत. ते मिळाले की सर्वांना पाठवुच.

३. भाटवडेकर मॅडमना आपण मुलांसाठी पत्र पाठवु शकता. मॅडमचा फोन नं तर वर आहेच.

४. भाटवडेकर मॅडमना मुलांना ह्या उपक्रमाबाबत कल्पना देण्यास सांगितली आहे कारण आता कोणती मुले आपण घेतोय हे त्यांना आता माहीत झाले आहे. आपण मुलांना पत्र लिहिलेत तर भाटवडेकर मॅडम ती पत्रे त्या त्या मुलीला देऊन त्यांच्याकडुन तुमच्यासाठी पत्र लिहुन घेतील. मग ती स्कॅन करुन किंवा पोस्टाने जे सोयीचे आहे त्याप्रमाणे आपल्याला पोचवता येतील.

Happy

----

आपण मुलांना पत्र ईमेलवर पण लिहु शकता. भाटवडेकर मॅडमचा ईमेल आयडी सर्वांना दिला आहे.

अरुंधती
ज्या दोन मुलांना होस्टेलला ठेवायचे आहे त्यांचा प्रत्येकाचा वर्षाचा खर्च किती आहे कळू शकेल का? त्यातला जेवढा आर्थिक भार मला उचलता येईल तेवढा घ्यायचा विचार आहे.

रूनी, त्या दोन मुलांची सोय नुकतीच झाली असे भाटवडेकर बाईंकडून कळाले आहे. धन्स गं! Happy तू सुनिधीकडे डिटेल्स कळवलेस तर त्याप्रमाणे ती तुला यादीतील गरजू मुला/मुलीचे तपशील वगैरे कळवू शकेल.

Pages