काकडीचे कोरडे (मस्त आणि सोप्पी पारंपारिक पाककृती)

Submitted by गिरिश देशमुख on 8 November, 2011 - 08:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काकडी चा कीस (काकडीची साले काढून मग किसणे) १ कप
बेसन (डाळिचे/ चण्याचे पीठ) २ कप
२ चमचे तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, पाणी,
कढिपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिर्चीचे तुकडे (आवडीनुसार) ५- ६

क्रमवार पाककृती: 

बेसन (डाळिचे/ चण्याचे पीठ) पाण्यात सरबरीत मिक्स करून घ्या.
कढईत २ चमचे तेल घेऊन, मोहरी - हिंग - हळद- मिरची- कढिपत्ता घालून फोडणी करून घ्या, त्यात काकडीचा कीस (रसा सहीत) परतून घ्या. त्यात बेसनाचे मिश्रण घालून मंद आचेवर शिजू द्या, सतत ढवळत रहा. पिठल्यासारखी पळी-वाढी कन्सिस्टन्सी आली की मीठ घालून मिक्स करून घ्या. वर कोथिंबीर पेरा आणि भाकरी बरोबर सर्व करा.
खाताना अर्धा चमचा गोडे तेल घालून घ्या (आवडत असेल आणि चालत असेल तर!)

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

*या पदार्थात सहसा कांदा, लसूण घालत नाहीत. आवडत असल्यास घालायला हरकत नाही.
*काकडीचा आणि हींग- हळद- कढीपत्ता यांचा एकत्रीत स्वाद छान लागतो.
*डाळीचे पीठ आणि भाजणी (थालीपीठाची) समप्रमाणात वापरल्यास एक वेगळीच चव येते.
*मुगाच्या डाळीचे पीठ वापरता येईल.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण अशीच माझी रेसिपी, मस्तं चव लागते , एकदम बिन कान्दा लसुणाची सात्विक तरी टेस्टी रेसिपी.
हा फोटो
ka.jpg

एकदम बिन कान्दा लसुणाची सात्विक तरी टेस्टी रेसिपी

अगदी चार्तुमासात चालेल मला.

काकडी ला option म्हणुन अजुन कायकाय आहे ...

काकडीला पर्याय :-
गाजर, दूधी भोपळा, लाल भोपळा, गिलकी (घोसाळी), दोडकी (शिराळी), ढेमसे, पत्ताकोबी ईत्यादि !
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्स !